आपले प्रेम असेच राहूदे
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार मंडळी,
आजपर्यंत “अंतर्नाद “
ह्या ब्लॉगला १००० पेक्षा जास्ती वाचकांनी भेट दिली आहे. त्याबद्दल मी सर्व
वाचकांचे मनापासून आभार मानते. दाद देणारा उत्तम वाचकवर्ग असेल तर आपल्या लिखाणाचे
चीज होते. गेल्या दीड महिन्यात ब्लॉग सुरु झाल्यापासून मला खूप लोकांनी फोन, email
,whatsapp आणि इतरही माध्यमातून ,प्रत्यक्ष भेटून जे प्रोत्चाहन दिले त्यांची मी
शतशः ऋणी आहे. आपली सर्वांची साथ आणि वेळोवेळी केलेले अमूल्य मार्गदर्शन फार फार
मोलाचे आहे, त्यावर ह्या ब्लॉगची पुढील वाटचाल सुरु राहील .
माझ्या पाठीशी सदैव उभे राहून प्रेरणा देणाऱ्या सद्गुरू
श्री स्वामीसमर्थांच्या चरणी त्रिवार वंदन.