Wednesday, 29 March 2023

धनयोग – शनी

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्यातील प्रत्येक वळण काहीतरी वेगळेपण देणारच . अनेकदा खूप कमी वयात आर्थिक स्थिरता येते तर कधी उतार वय झाले तरी येत नाही. पत्रिकेतील धनस्थाने महत्वाची आहेत . आपल्या आयुष्यात पैसा अनेकविध कारणांनी मिळत असतो जसे स्वकष्टार्जित धन , कमी कष्टातून म्हणजे शेअर मार्केट मधून मिळणारे धन , वारसाहक्काने मिळणारे धन , लॉटरी ,सट्टा , कमिशन , हुंडा ह्यातून होणारी धनप्राप्ती . धन मिळाले पण ते टिकणार का ? हा अजून पुढचा प्रश्न आहे. 


अनेकदा आपल्या आयुष्यात आर्थिक बाजू एकदम घसरते , कामधंदा बंद होणे किंवा अगदी रोजच्या गरजेपुरते सुद्धा उत्पन्न नसणे ह्या गोष्टी आर्थिक आणि मानसिक दौर्बल्य निर्माण करतात . मानसिक त्रास अनेक आजारांना सुद्धा जन्म देतात .

आपल्या आयुष्यातील चांगला वाईट कालावधी ओळखण्यासाठी हे दैवी शास्त्र नेहमीच मदतीला धावून येते . 


एक उदा पाहूया . एखाद्या ग्रहाची अंतर्दशा किंवा विदशा असेल आणि हा ग्रह जर षष्ठेश शनीच्या किंवा शनीच्या नक्षत्रात असेल तर उत्पन्नात घट होते हे निश्चित कारण शनी हा सर्व गोष्टी आक्रसून घेतो ,shrink करतो म्हणून उत्पन्न त्या काळात कमी होते . पण हे ज्यांना माहित नाही ते डोके आपटून घेत रडत बसतील किंवा त्रास करून घेतील , व्यसनी सुद्धा होतील , हि स्थिती कधीपर्यंत राहणार म्हणून नाहक चिंता करतील ,अश्या अनेक अनेक गोष्टी होतील पण ज्योतिष शास्त्राच्या आधारा मुळे ज्यांना ह्या उतरत्या काळाची पूर्वसूचना मिळाली आहे ते शांत राहतील, काळ आणि वेळ बदलण्याची वाट बघतील . ह्या काळासाठी लागणारी आर्थिक तरतूद आधीच करून ठेवतील. आपले इतर छंद जोपासतील कारण पुन्हा चांगल्या दशा आल्या कि पुन्हा काम आहेच ..त्यामुळे आपल्याला प्रत्येक वळण आधीच समजले तर आपण चांगल्या वाईट काळासाठी सर्वार्थाने सज्ज राहू .इतके असूनही अनेक वाईट गोष्टीही घडणार कारण ज्योतिष परिपूर्ण नाही , देवाने काही पत्ते त्याच्याही हातात राखून ठेवले आहेत . असो पण जितके मार्गदर्शन घेता येयील तितके नक्की घ्यावे म्हणजे हाही काळ सुखाचा जायील. धनस्थानात शनी सारखा ग्रह आर्थिक स्थिती मध्ये मंद गतीने वाढ करेल .

ह्यासोबत आपल्या पत्रिकेत गोचर भ्रमणाने सुद्धा ग्रह काम करत असतात पण मूळ ग्रह चांगला असेल तरच गोचर फळणार अन्यथा नाही त्यावर पुढील लेखात चर्चा करू .


कालाय तस्मै नमः


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


No comments:

Post a Comment