Saturday, 24 March 2018

वाचकांचे अभिप्राय





              अस्मिता , तू का थांबलीस लिहायला असच मी म्हणेन ,तू या लेखाच्या शनी साडेसाती खाली लिहिलं आहेस न आता थांबा किंवा का थांबलात याला धरून बोलते आहे.
               खूप सोप्या भाषेत सहज सुंदर पद्धतीने शनी ,साडेसाती या बद्दल मनातली भीती दूर केली आहेस. अतिशय अभ्यासपूर्ण लेखन ही तर तुझी खासियत आहे आणि या लेखात पण तुझा तो लौकिक तू सार्थपणे सिद्ध केला आहेस.
               भले भले घाबरतात शनी महाराजाच नाव ऐकताच पण तू ज्या पद्धती हा विषय मांडला आहेस त्यावरून नक्कीच सांगता येईल की मनातली भीती दूर होऊन शनी महाराजांकडे बघण्याची दृष्टी बदलेल सगळ्यांची आणि आपले कर्तव्य पार पाडताना तू सांगितलेले उपाय नक्कीच लक्षात ठेवतील
तुझ्या कडून अशाच वेगवेगळ्या विषयांवर वाचायला भरपूर मिळो हीच मनापासून इच्छा,तुझ्या पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा...
सौ. मृणाल कर्डिले , पुणे.