Wednesday, 16 April 2025

कुंडलीतील पंच तत्वांची तर्कशुद्ध मांडणी

 || श्री स्वामी समर्थ ||



पंचतत्वाशी आपली सर्वांची नाळ जोडली गेलेली आहे. त्यांची वेगळी ओळख करून न देता सरळ विषय मांडते. आपल्या ऋषी मुनींनी निसर्ग कुंडली अतिशय अभ्यासपूर्वक मांडली आहे .त्यातील पंचतत्व अभ्यासण्या सारखी आहे. स्मुक्ष अभ्यास केला तर लक्ष्यात येते कि अग्नी च्या समोर वायू तत्व आले आहे. अग्नीसाठी प्राणवायू लागतो आणि म्हणूनच अग्नीसमोर वायू आहे . पण हा वायू प्रमाणबद्ध असला पाहिजे , अतिरेक उपयोगी नाही अन्यथा अग्नी भडकू शकतो .


जल तत्वासमोर पृथ्वी तत्व आहे. कोरडी माती कसलाच आकार घेवू शकणार नाही . मातीचे भांडे बनवायचे तर जल हवेच इतकी साधी सोपी रचना आहे. तसेच जल धरून ठेवायला सुद्धा पृथ्वी तत्व लागते. म्हणूनच त्यांच्या राशी एकमेकांसमोर . केंद्रातील सर्व स्थाने अति महत्वाची आणि आपल्या आयुष्याचा तो आधार आहे तिथे चारही तत्व आहेत अशी तर्कशुद्ध रचना आपल्या कुंडलीची आहे. कुंडलीचा सखोल अभ्यास त्यातील अनेक गोष्टीतील तर्क उलगडून दाखवतो . केंद्रातील स्थानांमध्ये चर तत्व आहे . जन्माला आल्यावर तिथेच थांबून न राहता शरीर बुद्ध मन सगळ्यात वाढ अपेक्षित आहे . चतुर्थ भाव म्हणजे सुखस्थान , प्राथमिक शिक्षण , वास्तू ह्या सर्वात वाढ किंवा अधिक चांगला बदल झाला पाहिजे . सप्तम भावात अर्धांगिनी ,नवीन नाते उमलू पाहणारे हे स्थान , नवीन नाते अनेक अपेक्षा घेवून बहरणारे हे स्थान त्यामुळे सर्वांगीण प्रगती इथे अपेक्षित आहे. सरतेशेवटी दशम भाव , कायम तोच पगार असेल तर कसे निभावणार  नाही का. हुद्दा , दर्जा , सामाजिक पत उंचावण्यासाठी इथे अर्थार्जनाचा लेख सुद्धा उंचावला पाहिजे . थोडक्यात ह्या चारही स्थानात असलेली कार्य हि दिवसागणिक बदलत जाणारी यशाची निर्मिती करून आयुष्याचा आलेख उंचावणारी आहेत म्हणून इथे चर तत्वाच्या राशी ज्या माणसाला सतत कार्यरत ठेवतात , पुढे पुढे नेत राहतात त्याचे अधिष्ठान आलेले आहे .


आयुष्याच्या जवळजवळ मध्यापर्यंत येणारी स्थाने आणि त्यांच्या राशी बघा . आयुष्याचा उपभोग घेणारा शुक्र आणि आर्थिक नियोजन करणारा बुध त्याच्या राशी तिथे आहेत . संसार सुखाचा होण्यासाठी लागणारा शुक्राचा अविष्कार तारुण्यात आलेला दिसतो . त्याआधी शिक्षण आणि पोटासाठी अर्थार्जन बुध देत आहे . मुलीचा बाप मुलगा आपल्या लेकीचे पोट हा कसे भरणार ते पाहणारच कि . जीवनात पन्नाशी नंतर असतो तो वानप्रस्थाश्रम त्यामुळे ९ १० ११ १२ ह्या राशी विरक्ती आणणाऱ्या आणि मोक्षाकडे वाटचाल करायला लावणाऱ्या दोन महत्वाच्या ग्रहांच्या आहेत आणि ते म्हणजे गुरु आणि शनी .आपण आयुष्याच्या संध्याकाळीच काही गोष्टी सोडून देवू शकतो अर्थात तेही अध्यात्माचा पाया जीवनात भक्कम असेल तर अन्यथा नाहीच . सगळे कवटाळून बसतो एखादी साडी विरली तरी ती कुणाची तरी आठवण म्हणून देऊन टाकण्याची वृत्ती आपली नसते . आठवण कसली त्यापेक्षा कुणीतरी ती चार वेळा नेसेल तरी .असो .  वय झाले कि माणसाने प्रपंचातून लक्ष्य काढून प्रभूच्या चरणी मन , चित्त गुंतवावे हेच ह्या कुंडलीच्या मांडणीतून सिद्ध होते . 

लग्न भावात वृश्चिक हि राशी नसून चर तत्वाची मेष राशी आहे. लहान बाळ जन्म झाल्यावर तसेच तेव्हडेच राहते का? नाही हातापायाची सायकल हाच त्याचा व्यायाम पण पालथे पडायला शिकते आणि हळू हळू मोठे होत जाते कारण हाच आयुष्याचा नियम आहे . एका जागी न थांबता सतत पुढे जात राहिले पाहिजे . 

चतुर्थात येणारी कर्क राशी तिथे आपले सुखस्थान आणि माता . आई म्हणजेच घर हे आपले समीकरण आहे . मातेशिवाय घर असूच शकत नाही हे सर्वश्रुत आहे. आईचा मायेचा हात आपल्या लेकरांवरून आणि घरावरून फिरल्या शिवाय घराला घरपण नाही हे त्रिवार सत्य आहे. ह्याचप्रमाणे प्रत्येक ग्रह आणि स्थानाची महती इथे आहे आणि त्याच्यामागे तर्क हा आहेच जसे लग्न हे रूप दर्शवते आणि रूप अग्नी प्रकाशात आणतो म्हणून तिथे मंगळाची अग्नी तत्वाची मेष राशी आहे. द्वितीय भाव हा कुटुंबाचा आहे अर्थात कुटुंब संस्था टिकवायची असते , कुटुंबातील एकमेकांना धरून ठेवूनच संसाराची गाडी पुढे न्यावी लागते म्हणून तिथे पृथ्वी तत्वाची स्थिर गोडवा जपणारी वृषभ राशी आहे. शुक्र हा सुद्धा जल तत्वाचा आहे. इथे मनाचा चंद्र उच्च होतो.  संसारात मन नसेल तर सर्व फोल आहे. 

बुध शुक्र शनी हे त्यांच्या लग्नाला शुभ होतात तसेच रवी चंद्र मंगळ गुरु हे त्यांच्या लग्नाला शुभत्व देतात . कोण स्थानांचे स्वामीही एकमेकांचे मित्र असतात.

बुध हा पृथ्वी तत्व दर्शवतो आणि त्याच्या कडे गंध आहे. गंध आणि श्वास आपण नाकाने घेतो . नाकाला दोन नाकपुड्या आहेत कारण श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे जसे आपण प्राणायमात करतो. बुध हा द्विस्वभावी राशीचा आहे. म्हणून तिथे श्वास घेणे आणि सोडणे हि क्रिया होते. बुधाकडे गंध आहे आणि बुधाकडे त्वचाही आहे.  त्वचेला शिद्र( pores)  असतात ज्यामधून घाम बाहेर फेकला जातो. जर घामाचा उग्र वास असेल तर कुठेतरी शनी सुद्धा बिघडलेला असतो. आपल्या शरीरावर त्वचेचे आवरण आहे म्हणून आपल्या देहाला सुंदरता आणि आकार उकार आहे . 

पोटात आलेल्या अन्नाचे पचन नीट होण्यासाठी षष्ठ भावात सुद्धा पृथ्वी तत्वाच्या बुधाची कन्या राशी आहे. शरीराला आवश्यक घटक जवळ ठेवून इतर बाहेर टाकून देणे हि क्रिया असल्यामुळे इथे कन्या हि द्विस्वभावी राशी आहे. 

कुठल्याही पत्रिकेतील फलादेश पाहणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ह्या मुलभूत गोष्टी आपल्याला नीट समजतील. आपला देह सुद्धा एक दिवस पंच तत्त्वातच विलीन होणार आहे.  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230.


No comments:

Post a Comment