|| श्री स्वामी समर्थ ||
गेल्या आठवड्यात एका स्त्री जातकाची पत्रिका पहिली. डिटेल पाठवल्यावर तिने २-३ वेळा फोन केला त्यावरून काय ते समजले. मी काय सांगणार ह्यासाठी तिचे कान जणू आसुसले होते . नैसर्गिक आहे कारण आपण फार सामान्य माणसे आहोत . एक अपत्य पदरात आणि द्वितीय विवाहाचा प्रश्न म्हणजे थोडी नागमोडी वाट.
आयुष्याच्या मध्यात जोडीदार अचानक कुठल्याही कारणाने सोडून गेला मग ती स्त्री असो अथवा पुरुष त्यांना सहवास , आर्थिक प्रश्न आणि उरलेले आयुष्य व्यतीत करण्यासाठी गरज असते ती जोडीदाराची आणि ह्या अनेक अनुषंगाने द्वितीय विवाहाचा विचार करावा लागतो. पण तो व्यवस्थित होणार असेल तर आणि तरच करण्यात अर्थ आहे नाहीतर ज्या ज्या गोष्टीसाठी विवाह करायचा त्याच मिळणार नसतील आणि पुन्हा दुसरा घटस्फोट किंवा आयुष्यातील सगळी शांतता पणाला लागणार असेल तर आहे हीच स्थिती बरी म्हणायची वेळ येते म्हणून शांतपणे अभ्यास करूनच पुढे जाणे इष्ट ठरते.
ह्या जगात कुणीही एकटे नाही कारण आपल्याला आपले महाराज प्रत्येक क्षणी सांभाळत आहेत हि श्रद्धा हवी , आपण त्यांच्या लेकी आहोत आणि त्यांच्या सेवेत आहोत .
असो वास्तव असे कि ह्या स्त्रीचा विवाह झाला तेव्हा दशास्वामी 2 आणि 7 ह्या भावाचे फळ देत असल्यामुळे विवाह झाला . पण विवाह पश्च्यात ३-४ वर्षांनी दशा बदलली आणि दशा स्वामी ने षष्ठ भावाची फळे जोरदार द्यायला सुरवात केली . आधीची दशा 2 7 भाव देत होती तर आत्ताची 3 6. त्यामुळे पुढे न बोलणेच योग्य . ह्या दशेने फळ दिलेच घटस्फोटाचे . सद्य दशा खूप कालावधीची असणार आहे त्यामुळे ह्या दशेत द्वितीय विवाह होणे अशक्य . ओढून ताणून केलाच तर टिकणे अशक्य कारण पहिल्या विवाहाचे झाले तसेच कडबोळे दुसर्याचेही होणार हे निश्चित .
आजचे जग आणि पर्यायाने आयुष्य खूप वेगळे आहे. पूर्वी एकत्र कुटुंब नांदत असत त्यामुळे घरात अनेक माणसे वेगवेगळ्या पिढीतील होती . शेती असे, घरातील पैसा हा सर्वांसाठी असे त्यामुळे अश्या वेळी त्यात एखाद दुसरा माणूस सहज सामावून जाई. पण आता विभक्त कुटुंबे त्यात कमी माणसे राहतात त्यामुळे अश्यावेळी चरितार्थ चालणार कसा तसेच मानसिक आधार , सुरक्षितता आणि सगळ्यात मुख्य एकटेपणा अश्या अनेक बाजूंचा विचार करून व्यक्तीने दुसर्या विवाहाचा पर्याय निवडणे अयोग्य नाहीच आहे. कित्येक द्वितीय विवाह हे प्रथम विवाहापेक्षाही उत्तम चालले आहेत पण त्यासाठी लागणारी ग्रहस्थिती अनुकूल हवी . ती नसेल तर आगीतून फुफाट्यात असे होयील.
ज्या आनंदासाठी द्वितीय विवाह करावा तो आनंद देणारी दशा ह्या स्त्री जातकाला नाही त्यामुळे माझे उत्तर अर्थातच नकारात्मक होते . आपण आपले खरे सांगावे. चार दिवस वाईट वाटेल पण नंतर आहे ती स्थिती स्वीकारून व्यक्ती आयुष्याला सामोरी जायील. मी म्हंटले तुझ्या पदरात एक अपत्य आहे आता तो तुझा आधार बनेल आणि तू त्याचा . काही दिवस गेले कि तू सर्व स्वीकारशील . काळ कुणासाठी थांबत नाही . मनोधर्य खचून चालणार नाही .
आहे हे असे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील एखादा कोपरा रिकामा आहे म्हणून आपण जगणे सोडून देतो का? नक्कीच नाही . आपण रडत राहिलो तर असलेले द्रव्य सुद्धा आजार पणावर खर्च होयील आणि त्यातून मग अधिक नवीन प्रश्न निर्माण होतील .
ह्या अनुषंगाने एक सांगावेसे वाटते कि गुणमिलन करून ह्या गोष्टी कळतील का? तर नाही . दशा आत्यंतिक महत्वाच्या असतात हे पुन्हा पुन्हा नमूद करावेसे वाटते कारण त्याच घटनांना हिरवा कंदील देत असतात . आयुष्यातील पुढील काळात येणाऱ्या दशा काय देणार आहेत ? दोघांचे पटणार कि नाही ? एखादी व्यक्ती वैफल्य ग्रस्त होते आणि व्यसनांच्या आहारी जाते हे गुणमिलन नाही सांगू शकणार . म्हणूनच गुण आणि ग्रह मिलन व्यवस्थित करून घेतल्याशिवाय निर्णय घेणे चुकीचे ठरेल इतकेच सुचवावेसे वाटते. जन्म आणि मृत्य हे पत्ते देवाकडे आहेत ते आपल्याला माहित नाही म्हणून जीवनात आनंद आहे . पण विवाहासाठी फक्त चालू असणारी दशा पाहू नका पुढील २५ वर्षाच्या दशा बघा त्यात आयुष्य मर्यादा , संतती , अपघात , व्यसने अनेक गोष्टी समाविष्ट आहेत .
आयुष्य सगळ्यांसाठी सोपे नसतेच पण कठीण सुद्धा नसते , मार्ग काढता येतो पण त्यासाठी ओढवून संकटे घ्यायची गरज खरच आहे का? तर नाही . त्या दोघांचे पटले नाही म्हणजे त्या दोन्ही व्यक्ती वाईट आहेत का? अजिबात नाही पण चुकीच्या दोन व्यक्ती एकत्र आल्या तर काय होणार ते ह्या उदा वरून समजेल. स्वभाव , दशा सर्व बघा आणि विवाहासाठी घाई करू नका . गुण मिलन ग्रहमिलनासाठी नक्कीच आग्रह धरा.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment