|| श्री स्वामी समर्थ ||
मुले हे आपले अत्यंत नाजूक असे भाव विश्व असते . आपल्याला काहीही झाले तरी चालते पण मुलांना जरा खरचटले तरी दिवसभरात चार फोन असतात आपले घरी . मुलांचे संगोपन शिक्षण त्यांच्यासाठी आईबाप खस्ता काढतात , स्वतःला विसरून जगतात कारण मुले हेच त्यांचे विश्व असते . अनेकदा मुलांच्या आयुष्यात खडतर काळ येतो , त्यानाही संघर्षाला सामोरे जावे लागते , अचानक आलेली संकटे , शिक्षणातील अडथळे , मनासारखे यश न मिळणे ह्या गोष्टींमुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो , अनेकदा मग त्यातूनच पुढे वाईट संगती , सतत घराबाहेर राहणे हे नकळत घडू लागते . असो .
आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे आयुष्य सुखाचे जावे , त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊन त्यांना मार्ग मिळावा ह्यासाठी दत्तगुरुनी एका अत्यंत प्रभावी स्तोत्राची रचना केली आहे आणि ते म्हणजे “बालाशिष स्तोत्र “ . सहज सुंदर आणि तितकेच सोपे असे हे स्तोत्र मुलांच्या आईवडिलांनी कुणीही किंवा दोघांनीही रोज निदान एकदा तरी म्हणावे .हे मुलांची रक्षा करणारे कवच आहे. रोज एकदाच म्हणावे पण त्यात सातत्य ठेवावे . आपल्या वेळेप्रमाणे म्हणावे . कुठलेही स्तोत्र पठण किंवा उपासना मनापासून असेल तरच फळते . कसेतरी उरकून टाकल्यासारखे काहीच म्हणू नये निदान त्या देवतेचा अपमान तरी होणार नाही. कारण जिथे भाव नाही तिथे देव कसा बरे असेल ? कसलीही पिडा , अनारोग्य ,ग्रहपिडा किंवा भूतपिशाच्च पिडा , करणी बाधा , वाईट नजर अश्या अनेक दोषातून मुक्त करून मुलांचे रक्षण करणारे असे हे अत्यंत दुर्मिळ स्तोत्र आहे .
आपण मुलांसोबत 24 नसतो म्हणून ह्या उपासनेने त्यांचे रक्षण होते अर्थात हा विश्वासाचा प्रश्न आहे. मग आता हे म्हणून काय उजेड पडणार आहे आमचे चिरंजीव काय पहिले येणार कि काय ? तर त्यांच्या बुद्धीप्रमाणे फळ मिळेल पहिले येणार नाहीत पण निदान अभ्यास तरी करतील. चौफेर उधळलेले मन शांत तरी होईल . आता प्रत्यक्ष दत्तगुरुनी आपल्या लेकरांच्या उद्धारासाठी , कल्याणासाठी रचलेल्या स्तोत्राविषयी शंका घेणे किंवा त्यावर उहापोह करणे अयोग्य होयील .असो.
कुठलीही उपासना शंका कुशंका घेवून करूच नये आणि केली तर फळाची अपेक्षा करू नये. शेवटी हे स्तोत्र म्हणजे आशेचा किरण आहे असे समजावे आणि वाचन सुरु करावे . आज गुरुवार आहे. गुरु म्हणजे ज्ञान , आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करून आपल्या ज्ञानाच्या ज्योतीने आयुष्य प्रकाशमान करणारे गुरु . आजपासूनच म्हणायला सुरवात करा ..कुणी? तर सगळ्यांनी ..आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी , त्यांनी कुठल्या नको त्या गोष्टीत अडकू नये म्हणून, त्यांच्या यशासाठी आणि आनंदासाठी पालक हे नक्कीच करू शकतात .
अनेक पत्रिका समुपदेशनासाठी येत असतात , मुलांचे प्रश्न असतात . मुले ऐकत नाहीत , उशिरा घरी येतात , कित्येक घरात आई एकटीच असते वडील नसतात , अश्यावेळी त्या माऊलीने रात्री बेरात्री मुलांना शोधायला जायचे कि गृहस्ती सांभाळायची ? कायकाय करायचे तिने , तिचाही जोडीदार सोडून गेलेला असतो कि तिला आयुष्याच्या मध्यावर , मुलांच्याच कडे बघून जगत असते ती ,अनेकदा मुलांना शिक्षणात किंवा अगदी प्रेमात सुद्धा अपयश येते आणि शिक्षण सोडून देतात हताश होतात . आजकाल वाईट संगतीत अडकणे फारच सोपे झाले आहे , व्यसने करणे जणू फ्याशन झाले आहे, आपल्या पालकांचा जराही विचार मुले करत नाहीत अश्यावेळी कुणाचा तरी आधार लागतो . अश्या अनेक पत्रिका पाहिल्यावर मनात आले कि हे स्त्रोत्र वाचून कदाचित अश्या पालकांना मार्ग मिळेल म्हणून हा लेखन प्रपंच. ज्यांना वाचायची इच्छा आहे जरूर वाचा अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही .
हे अत्यंत प्रभावी आणि अद्भुत स्तोत्र आहे, ज्यांच्या मनात शंका असतील त्यांनी अजिबात वाचू नका पण इतरांनी मात्र नक्कीच वाचा आपल्या पाल्यासाठी आणि त्याच्या उत्तम निरोगी आयुष्यासाठी .
हे स्त्रोत्र इथे देत आहे. हे एका कागदावर लिहून वाचायला सुरवात करावी , आपल्या वेळेप्रमाणे वाचावे
कधी वाचावे – कधीही आपल्या वेळेप्रमाणे , ह्याला कसलेही नियम नाहीत . आता पाळी आली स्वतःची किंवा घरात कुणाची तर वाचू नका त्यासाठी मला फोन नको ह .काही गोष्टीत स्वतःचे विचार , तारतम्य असलेच पाहिजे .संकल्प सोडायचा का? तर हो . तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या मिटेपर्यंत तरी निदान वाचन करावे. उद्यापन नाही , उपवास नाही . प्रश्न खूप झाले वाचन सुरु करा . youtube वर ऐकायला मिळेल ते उच्चार कसे असावेत ह्यासाठी ऐका पण त्यानंतर मात्र रोज स्वतः म्हणायचे आहे. येणार ..प्रयत्नांती परमेश्वर .
श्री गुरुदेव दत्त |
टीप : अत्यंत तळमळीने ,मनापासून म्हणणार्यालाच ह्या स्त्रोत्राचा निश्चित लाभ होईल ह्यात शंकाच नाही . नुसते वरवरचे काहीच उपयोगी येणार नाही .शेवटी भाव तिथे देव.
शुभं भवतु
“ बालाशिष स्तोत्र"
स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनंदन।।
मुञ्च मुञ्च विपद्भ्योsमुं रक्ष रक्ष हरे शिशुम्।।१।।
प्रातर्मध्यंदिने सायं निशि चाप्यव सर्वथा।।
दुर्दृग्गोधूलिभूतार्तिगृहमातृग्रहादिकान्।।२।।
छिन्धि छिन्ध्यखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलधृक्।।
त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम्।।३।।
सुप्तं स्थितं चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः।।
भो देवावश्विनावेष कुमारे वामनामयः।।४।।
दीर्घायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः।।
इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य
दत्तपुराणांतर्गत
श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितः
बालाशिषः स्तोत्रह संपुर्णम.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment