|| श्री स्वामी समर्थ ||
मनुष्य हा स्तुतीप्रिय आहे. कुणीही स्तुती केली कि ती व्यक्ती लगेच आपल्या “ Good Book “ मधेच जाते . तसेच यश सुद्धा माणसाला प्रिय आहे ते मिळाले कि सर्व जग सुंदर दिसू लागते आणि जगावेसे वाटते पण अपयश माणसाला पचवता येत नाही त्याला सामोरे जाणे कठीण असते . अपयश आले कि माणूस खचून जातो , नशीब चांगले असेल तर त्यातून कालांतराने बाहेर येतो नाहीतर मग व्यसने , चुकीचे मार्ग स्वीकारून दिशाहीन होतो.
देव सारखा रडवत नाही कधीतरी हसवतो सुद्धा . जिथे ऋतू , निसर्ग सुद्धा शाश्वत नाही तिथे आपले क्षणभंगुर आयुष्य ते काय ? जरा कुणी आपली स्तुती केली ,आपल्याला चांगले म्हंटले कि आपण आपली सुद्बुद बुद्धी जणू गहाण ठेवुन त्या व्यक्तीत गुंतत जातो आणि अनेकदा तिथेच फसतो. खरतर आपली वाहवा करणारे आपले खरच असतात का? हा आजकाल संशोधनाचा विषय आहे . आपली वाहवा ते नक्की कश्यासाठी करत आहेत हे एकदा तपासून बघा उत्तर सापडेल तुमचे तुम्हालाच.
खरतर आपले क्रिटिक , विरोधक आपले खरे मित्र असतात . राजकारणात विरोधी पक्ष जितका बलवान तितके सरकार काम अधिक करेल .तसेच विरोधक खरतर तुम्हाला तुमचीच ऋण बाजू दाखवून देतात ती स्वीकारली तर भले आपलेच आहे पण आपल्याला नेमका त्याचाच त्रास होतो .
अनेकदा विचार करण्याची शक्ती आपण घालवून बसतो , जे समोर आहे तेच खरे असे समजतो पण ते भासमान असते आणि हे जेव्हा समजते तेव्हा ओंजळीतून आयुष्य पार निघून गेलेले असते .
मन आपल्याशी सतत उन पावसाचे खेळ खेळत असते . आपल्या आयुष्यात आपण जे जे करतो ते मनाच्या निर्देशनामुळेच . आपल्या मनाला वाटले म्हणून पर्यटनाला गेलो , एखाद्या प्रदर्शनाला गेलो , एखादा पदार्थ केला , खाल्ला , एखादा कोर्स केला. जे जे आहे ते मनाच्या अवती भवतीच आहे . मनाविरुद्ध काहीही खपत नाही आपल्याला . कुठलीही लढाई मनापासून लढली जाते तेव्हाच यशश्री मिळते .
मनाला सतत काबूत ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न आपण करत असतो खरतर मन आपल्याला नाचवत असते. आपले मन किती अस्थिर असते हे मी वेगळे सांगायला नको. मनाचा कारक ग्रह चंद्र आणि तो आहे जल तत्वाचा त्यामुळे पाण्याच्या लाटांवर आपले मन सदैव हिंदकळत असते तेहि आपल्या नकळत .
अस्थिर मन अनेक व्याधिना मग त्या मानसिक असोत अथवा शरीरील जन्माला घालते . एखादी गोष्ट मनाने स्वीकारली तर आपण आनंदाने करतो . बघा रोज सकाळी उठायचा कंटाळा येतो पण शाळेची ट्रीप आठवा त्या दिवशी घरात सगळ्यांच्या आधीच आपण उठून बसलेले असतो कारण मन. माझ्या मनात एखादा विषय आला कि लगेच लेख लिहिला जातो . सांगून सवरून जीवाचा आटापिटा करून ह्या गोष्टी होत नाहीत .
मनात असेल तर ती गोष्ट सहजप्राय होते . एखाद्या शब्दानेही दुखावले जाणारे हे मन दिसत नाही पण असते . हे मन एखाद्याचे आयुष्य सावरू शकते त्याला जगायला स्फूर्ती देऊ शकते . मनाचे खेळ आजवर कुणास समजले नाहीत . आयुष्यभर एका छताखाली एका घरात राहणाऱ्या माणसांचे मन तरी कुठे आजवर कुणाला समजलेले आहे, पटतंय का?
एखादी विचारधारा आपण स्वीकारतो तेही मनाचा कौल असेल तर आणि तरच . अनेकदा अति विचार हे सुद्धा आजारांचे आणि मनस्वास्थ्य ढासळण्याचे कारण असते. सुप्त विचार मनाची शांतता घालवतात , ते साठून राहिले नाही पाहिजेत . अनेकदा अविचार हे सुद्धा आपल्या आयुष्यातील अनेक वळणावर घातक ठरतात .
चुकीचा विचार चुकीची संगत जवळ करतो. मनातील विचारांचे प्रतिबिंब अगदी स्पष्टपणे उमटते ते आपल्या चेहऱ्यावर आणि सर्वप्रथम डोळ्यात . मन तरल कोमल असते ,सहज कश्याच्याही अधीन होऊ शकते म्हणूनच भाव भावना आणि त्यांचा अविष्कार मनाशी निगडीत आहे.
अनेकदा मुले शाळा कॉलेज नंतर बाहेरच भटकत राहतात कारण त्यांना घराची ओढ नसते , स्वतःच्याच घरी यावेसे वाटत नाही कारण त्यांचे मन घरातील व्यक्तींबाबत आणि पर्यायाने वास्तूबाबत सुद्धा उदासीन असते .
मनाची व्यथा समजणे कठीण आहे. एकदा का हे मन निराशेच्या गर्तेत अडकले कि व्यसनांचे मार्ग खुले होतात आणि माणूस सर्वस्व घालवून बसतो. आत्मविश्वास कमी होतो आणि जगण्याची उमेद नष्ट होते. अनेकदा ह्या मार्गावरून परतणे अशक्य होते आणि आयुष्य हाताबाहेर जाते.
आपल्या आयुष्याच्या प्रवासात मन अत्यंत महत्वाचे आहे आणि मनावर संयम ठेवायचा असेल तर अथक प्रयत्न करायला लागतात . आजकालच्या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात तर जिथे प्रत्येक क्षणी आपल्या व्यक्तिमत्वाचा कस लागत असतो तिथे तर नक्कीच. लहानपणी आपल्याला घरातील मोठी मंडळी मनाचे श्लोक शिकवीत असत . लहानपणी मनावर जे बिंबले जाते ते चिरकाल टिकते म्हणूनच संस्कार हे मुलांच्या मनावर कायमचे ठसले जावेत म्हणून लहानपणीच केले जातात .आयुष्यातील कठीण वळणावर निर्णय घेताना हे संस्कार उपयोगी येतात .
मन चंगा तो सबकूच चंगा त्याप्रमाणे मनाला सतत ताजेतवाने ठेवण्याची गरज असते , ते क्षणात हस्ते तर क्षणात रुसते .
आपल्याला ह्या भूतलावर परमेश्वराने विशिष्ठ कार्य करायला पाठवले आहे आणि ते पूर्ण झाले कि आपला इथला प्रवास संपणार आहे. कितीही डोके आपटा एका क्षणाचे किंवा एका श्वासाचे सुद्धा extension मिळणार नाही . कुणाला सोबत घेवून आलो नाही आणि सोबत घेवून जाणारही नाही. तेव्हा आपले एकटे मस्त आपल्याच धुंदीत जगणे , आपले स्वतःचे विश्व निर्माण करणे , भरपूर वाचन , आपले छंद आवडी निवडी जोपासणे आणि सगळ्या जगाला फाट्यावर मारून आपल्या चेहर्यावरची स्मित रेषा अजिबात न घालवणे हा उपक्रम चालू करा ..आपल्याच मनाचा लगाम हातून निसटून देऊ नका , तसे झाले तर आयुष्य खर्या अर्थाने जगायला सुरवात होईल......
अनेकदा पत्रिकेत चंद्र बिघडलेला असतो कधी राहू , केतू शनी हर्शल अश्या पापग्रहांच्या संगतीमुळे , कुयोगामुळे किंवा अन्य ग्रहयोगांमुळे सुद्धा तेव्हा आपल्या मनाची ताकद उपसनेद्वारे वाढवणे हेच उत्तम. प्रत्येक गोष्टीला उपाय आहे पण तो किती करतात हे महत्वाचे आहे .
चंद्राचा जप करा किंवा शंकराचा जप करा सांगितला तर अनेक प्रश लगेच येतील किती वेळा करायचा ? कधी करायचा ? मग प्रवासात करायचा का? पाळी आली तर करायचा का? एक ना दोन ....श्री स्वामी समर्थ हा एकच जप करा कधी कसा करा तर श्वासागणिक करा ..संतांची सत्ता अगाध आहे.
रोज सकाळी “ हम को मन कि शक्ती देना... “ हि प्रार्थना ऐका नक्कीच फायदा होईल. आपले अनुभव शेअर करावेत .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
खूपच सुंदर लेख अगदी तंतो तंत खरा आज प्रत्येक मनुष्य या मना च्या प्रसंगातून जात आहे (म्हणजे उदास मन) त्यांच्या साठी हा लेख एक मार्गदर्शका सारखा आहे
ReplyDelete