Tuesday, 16 January 2024

दशा

                                                              || श्री स्वामी समर्थ ||

 

अनेकदा ग्रहस्थिती त्रासदायक असते जसे 5 12 भावांची दशा अंतर्दशा नोकरी साठी त्रासदायक स्थिती निर्माण करते . 5 हे षष्ठ भावाचे व्यय भाव . आता षष्ठ भाव म्हणजे काय day to day life . बरोबर ना? मग रोज आपण काय करतो तर ऑफिस मध्ये जातो अगदी नियमित ठरलेली 8.12 ची लोकल असते. पण अचानक पंचम भाव लागतो आणि आपल्या नित्याच्या दिनक्रमात बदल होतो . सुट्टी घेणे ऑफिसला न जावेसे वाटणे असे होते कारण पंचम हा षष्ठ भावाच्या कार्यात अडथळा आणतो. तसेच 12 वा भाव हा सुद्धा लग्नाचे म्हणजे जातकाचे स्वतःचे व्यय भाव . सर्वाचाच व्यय होणे. म्हणून आपण गमतीने 5 12 लागले कि VRS असे म्हणतो. माझ्या एका नातेवाईकांची नोकरीची शेवटची २ वर्ष राहिली होती आणि 5 12 लागले. मी त्यांना म्हंटले आता तुम्ही बहुतेक नोकरीतून स्वेच्छया निवृत्ती घेणार आणि मुलीकडे जाणार फिरायला परदेशी . किती चिडले माझ्यावर म्हणाले मला पूर्ण पेन्शन हवी आहे मी कश्याला सोडीन नोकरी . पुढील 5 मिनिटात मी माझे अखंड खानदान आणि ज्योतिष शास्त्र ह्यावर बरेच तोंडसुख घेतले . हा कसा रिकामटेकडया लोकांचा उद्योग वगैरे वगैरे .असो.

पुढील  महिन्यात त्यांचे बॉस बदलले आणि कुणीतरी खडूस माणूस (असे त्यांच्यामते) आला आणि त्यांना मस्त कामाला लावले.  7 वाजता घरी येणारा माणूस 9 वाजता घरी यायला लागला. बरे वय आता निवृत्तीकडे झुकलेले , दमायला लागले. परत ऑफिसमध्ये रोजच्या कटकटी वाढल्या . ह्या सर्वाला कंटाळून त्यांनी ६ महिन्यांनी म्हणजे निवृत्तीच्या आधीच दीड वर्ष
VRS घेतली . फंडाचा पैसा मिळाला , उभ्या आयुष्यात कुठे गेले नव्हते ते परदेशी स्थायिक असलेल्या लेकीकडे गेले . असो.

5 वा भाव म्हणजे संतान आणि मनोरंजन 12 म्हणजे भटकंती . ज्योतिष काय कुठलेही शास्त्र हे परिपूर्ण आहेच , सांगणारा जाणकार हवा हे मात्र नक्की . पण त्याही पुढे आपल्याला माहित नसेल तर गप्प राहावे उगीच कश्याला कुणाला नावे ठेवायची ? नसेल विश्वास सोडून द्यावे ह्या वादात कश्याला वेळ घालवायचा ? आयुष्यात वेळ सत्कारणी लावण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेतच कि त्या कराव्यात ...सहमत ?

 

सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230






No comments:

Post a Comment