|| श्री स्वामी समर्थ ||
अवकाशातील ग्रह हे सृष्टीतील जीवनावर
परिणाम करत असतात . हे परिणाम आपल्या पूर्व सुकृताप्रमाणे बरे वाईट असू शकतात .
पृथ्वीपासून लाखो मैल दूर असणारा चंद्र मानवी मनाचा कारक आहे आणि इतक्या दूर
असूनही प्रचंड अश्या सागराला तो भरती ओहोटी आणू शकतो इतके सामर्थ्य त्यात आहे.
ह्या चंद्राची ताकद वाढवायची असेल तर त्याची दाने अवश्य करावीत . मग इतक्या दूर
असलेल्या ह्या ग्रहावर ह्या दानाचा परिणाम होतो का? तर अवश्य होतो. पण त्याहीपेक्षा त्या
ग्रहाचा जप करणे सर्वार्थाने उत्तम .ग्रह दूर आहे कि जवळ हा प्रश्नच नाही तो दूरच
आहे पण तरीही तो सामर्थ्यवान आहे आणि त्याचे आपल्यावरील वेळोवेळी होणारे परिणाम
त्याच्या सामर्थ्याची अनुभूती देत असतात .
सौ. अस्मिता दीक्षित
No comments:
Post a Comment