Tuesday, 16 January 2024

ट्रेडिंग करताना घ्या प्रश्न कुंडलीचा आधार

|| श्री स्वामी समर्थ ||



शेअर मार्केट मधून लाभ मिळेल का ?  त्यात गुंतवणूक करू का ? असा प्रश्न अनेक जातक विचारतात . अथक परिश्रमाने मिळालेल्या लक्ष्मीची गुंतवणूक विचार पूर्वक करावी लागते. शेअर मार्केट मध्ये अल्प काळात अधिक धन कमावणे ह्या उद्देशाने आलेले अनेक जातक गुंतवलेले धन सुद्धा घालवून बसतात . असो.

प्रत्येक  गोष्टीमागे अभ्यास हवाच . एखादा शेअर विकत घेताना प्रश्न कुंडलीचा आधार घ्यावा . प्रश्न कुंडली मांडली आणि त्यात पंचम भावाचा सब हा 2 6 11 भाव दर्शवत असेल तर नक्कीच केलेली गुंतवणूक फायदा देयील. जर 2 आणि 10 भाव लागत असतील तर अल्प स्वरूपातील फायदा होईल . प्रथम आणि तृतीय भाव असतील तर फायदा अगदीच थोडा असेल. 5 आणि 12 भाव असतील तर नुकसान होईल हे वेगळे सांगायला नको .  त्याचप्रमाणे 4 व 8 असे भाव लागले तर कदाचित ट्रेडिंग करायची इच्छाच नष्ट होयील , विचारच बदलेल . 7  8 9 भाव नुकसान दर्शवते .

ट्रेडिंग कसे करायचे ते आपण शिकत नाही तर ते “ कधी करायचे ?” ते शिकत आहोत . कुठलीतरी गल्लत करून पैसे लावायचे आणि मग ते बुडले कि शास्त्राच्या नावाने बोंबलत बसायचे असे होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण . आजकाल अर्धवट वाचून , शिकून कुठलाही नियम कुठेही लावतात आणि मग फलादेश चुकला कि शास्त्र कसे चुकीचे आहे अर्थहीन आहे हे सांगायला मोकळे. असो.

शेअर मार्केट नक्कीच लाभ करून देणारे आहे . पण हा लाभ मिळवताना अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी इतकच . रोज ट्रेडिंग करावे कि दीर्घ काळासाठी गुंतवणूक फायद्याची ठरेल हे समजले तर काहीच व्यर्थ जाणार नाही . कुठला भाव लागला तर कुठल्या कंपनीचे शेअर विकत घ्यावे हासुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे.

कमी कष्टात अधिक धन मिळवण्याच्या हव्यासापोटी अनेक जण रस्त्यावर आलेले आपण पहिले आहे. शेअर मार्केट मध्ये फायदा होईल कि तोटा ह्याबद्दल मुळात लग्न कुंडली बोलणारच आहे पण त्याही पेक्षा प्रत्यक्ष ट्रेड करताना जर प्रश्न कुंडली चे “ ब्रम्हास्त्र “ वापरले तर त्याची अचूक फळे मिळतील आणि नुकसान होणार नाही .

सौ. अस्मिता दीक्षित
संपक : 8104639230

 

No comments:

Post a Comment