|| श्री स्वामी समर्थ ||
प्रत्येक वर्ष अगदी प्रत्येक दिवस नवीन आशा घेवून येत असतो . 2026 काही दिवसात सुरु होईल. नवीन वर्षात मी हे करणार मी ते करणार असे अनेकविध संकल्प करण्यास आपली सुरवात झालेली आहेच. आता हे किती काळ टिकतात ते आपल्यालाही माहित आहे . जेव्हा एखादी गोष्ट करायची असते त्यासाठी नवीन वर्ष सुरु होण्याची वाट कश्याला बघायची ? सुरु करायचे लगेच . विचार मनात येतो तो क्षण म्हणजेच संकल्पाचा मुहूर्त. असो.
ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने हे वर्ष कसे आहे ते बघुया . सोशल मिडीया वरती “ ह्या ४ राशीना दिलासा मिळणार “, “ ह्या ३ राशी धनवान होणार “ , “ ह्या राशीनी सावध व्हावे ..” हे असले सगळे वाचण्यात वेळ घालवण्यापेक्षा नामस्मरण करा .
कुणाच्याही शब्दात आणि विचारात किती अडकायचे ते आपले आपण ठरवायचे असते . सोशल मिडीया वर राहूचे राज्य आहे. राहू दिशा देऊ शकतो आणि दिशाहीन सुद्धा करू शकतो. आपली बुद्धी आणि मन स्थिर ठेवून नामात स्वतःला गुंतवून घ्यावे हे उत्तम. असो.
ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि अध्यात्मात असलेल्या लोकांनी मागे वळून पाहायचे नाही . ग्रहांना आपले काम करू देत आपण आपले करुया . अवकाशातील चंद्र सूर्य मंगल हि मंडळी आपले शत्रू नाहीत हे नक्की . तेही आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग आहेत आणि त्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य समृद्धेकडे वाटचाल करत असते . ज्योतिष शास्त्र हे एक गहन शास्त्र आहे जे आपल्याला आपल्याच जन्माची कथा आणि व्यथा दोन्हीही उलगडून सांगणारे आहे . त्याचा सकारात्मक अभ्यास आणि विचार करता आला पाहिजे. विचार सकारात्मक ठेवलेत तर सर्व काही सकारात्मक घडेल ह्यात शंकाच नाही. म्हणून मी नेहमी म्हंटले मला कुणाच्याही पत्रिकेत वाईट काहीच कधीच दिसताच नाही. आशेचा किरण पत्रिकेत असतोच आणि तो शोधणे हेच ज्योतिषाचे काम असते.
पुढील वर्षात गुरु मिथुन , कर्क आणि सिंह ह्या ३ राशीतून भ्रमण करणार आहे .
सध्या गुरु ११ मार्च पर्यंत वक्री अवस्थेतून मिथुन राशीत भ्रमण करत आहे . आपण घाईघाईत कामाला बाहेर पडतो आणि काहीतरी वस्तू घरात विसरलो म्हणून पुन्हा घरी येतो वस्तू घेतो आणि घराबाहेत पडतो . राहिलेले काम गुरु पूर्ण करूनच पुढे जाणार आहे . हीच वक्री अवस्था आहे, प्रत्येक लग्नाला गुरु वेगवेगळी फळे देणार आणि प्रत्येक पत्रिकेला सुद्धा . आपल्या वयक्तिक पत्रिकेतील ग्रहांची बैठक पाहिली आणि त्याला गोचर लावले तर अचूक उत्तर मिळतेच .
अष्टम स्थान हे मानसिक त्रास देणारे आहे. ह्या भावातून जेव्हा राहू किंवा शनी सारखे ग्रह गोचर भ्रमण करतात तो काल आत्यंतिक त्रासाचा असतो . कुठून काय समस्या निर्माण होईल सांगता येत नाही पण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असाच तो काळ असतो . त्यात हनुमान चालीसा आपली साधना उपासना ह्या सर्वच मानसिक मोठा आधार मिळतो म्हणून त्यात वाढ करावी . नामस्मरण काश्यावरही मात करण्याची ताकद ठेवते ते सतत करावे.
वर्षात येणारी चंद्र आणि सूर्य ग्रहणे महत्वाची असतात , त्या काळात मोठे निर्णय घेतले तर चुकण्याची शक्यता असते. ज्यांना साडेसाती आहे त्यांच्यासाठी त्यांच्या मूळ पत्रिकेतील चंद्राच्या पुढे आणि मागे ८-८ अंश शनी असतो तो काळ खरा साडेसातीचा असतो . त्यांनी शनी उपासना करावी . जे करायचे ते भावयुक्त .
बुध आणि शुक्राच्या लग्नांना गुरु फारसा प्रभावशाली ठरत नाही . कुठला ग्रह आपल्यावर कृपा करतो ???? तर त्याचे उत्तर सगळेच ग्रह करतात असे आहे.
ग्रह हे आपल्या कर्माची फळे देण्यास बांधील असतात त्यामुळे तुम्ही दर चार मिनिटांनी खा खा खात असाल आणि पुरेसा व्यायाम झोप नसेल तर तुमची पचनसंस्था बिघडणार , मधुमेहाला आमंत्रण नक्कीच . मग ह्यात दोष कुणाचा ग्रहांचा कि आपला ? अर्थात आपला त्यामुळे उठ सुठ ग्रहांच्यावर बिल फाडणे बंद झाले पाहिजे.
आपल्या आयुष्य वर्तमानात जगायला शिकले पाहिजे कारण वर्तमानातील प्रत्येक क्षण तुमचे भविष्य समृद्ध करत असतो . माझा मुलगा १० वी मध्ये चांगले मार्क मिळवेल का? हे सांगायला ज्योतिषी कश्याला पाहिजे बर . विचार करा . वर्षभर तो काय अभ्यास करतोय ते तुमच्यासमोर आहे त्यावरून तुम्हीही अंदाज करू शकता.
साडेसाती शनी राहू केतू मंगळ ह्या ग्रहांचा नको तितका धसका घेण्याचे मुळात काहीच कारण नाही . तेही आपले आणि चंद्र रवी गुरु शुक्रही आपलेच आहेत .
अनेक वेळा गोड बोलणारा मित्र आपल्या मागून वार करत असतो आणि जो वाईट वाटत असतो तोच संकटात धावून येतो हे अनुभव आपल्याला रोज येतात . आयुष्य जगायला धाडस लागते , एखादे काम अगदी नोकरीला रोज जायचे तर अंगात ताकद लागते आणि ती प्रदान करणारा मंगळ आहे त्यामुळे मंगळ वाईट नाही.
शनी एखाद्या गोष्टीला विलंब लावतो कारण तो विलंब आपल्याच भल्यासाठी असतो हा का नाही विचार करत . सगळे आपल्या मनासारखे वेळेत झाले कि आपण खुश , पटतय का ? अहो एखाद्याचा विवाह उशिरा झाला कारण आधी झाला असता तर कदाचित मोडला असता म्हणून ग्रहांनी तो उशीर केला असा सकारात्मक विचार करा तर आणि तरच आयुष्य सुखी होईल .
गुरु हा बुधा सारख्या बौद्धिक राशीत वक्री होवून आलाय म्हणजे तो राहिलेली सर्व कामे मार्गी लावणार हे नक्की मग त्यासाठी आपण आपली कर्म शुद्ध केली पाहिजेत . आपले आचरण चांगले असेल तर देव मदत करेल , नुसते बसून राहिलो ग्रहांच्या भरवश्यावर तर कसे होणार ? कर्क राशीत गुरु उच्च होणार मग साधना सुद्धा उच्च करा कि . नाम वाढवा , सतत काहीतरी मागे लावून घ्या .
स्वतःसाठी फालतू विचार करण्यासाठी वेळ शिल्लक ठेऊच नका .
१. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य घालून शांतपणे गायत्री मंत्र म्हणावा . आपल्या श्वासाकडे लक्ष्य केंद्रित करावे . श्वास लयबद्ध असतो त्यावर लक्ष ठेऊन शांतता अनुभवावी .
२. रोज निदान एकदा श्री रामाचा जप करून एकदा तरी हनुमान चालीसा म्हणायचीच काहीही झाले तरी .
३. १ जानेवारी पासून रोज एक श्री गजानन विजय ग्रंथातील अध्याय वाचायचा २१ दिवसात एक पारायण होईल महिन्यातून एक असे १२ महिन्यात १२ पारायणे होतील. का नाही महाराज आपल्यावर कृपा करणार निश्चित करणार .
४. रोज किंवा दर शुक्रवारी श्री सुक्त म्हणून घरच्या घरी देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचेच . ते कुंकू डबीत भरून ठेवायचे आणि रोज थोडे पाण्यात घालून फुलाने घरभर शिम्प्दायाचे पूजा झाली कि. घरात सकारात्मक लहरी उर्जा निर्माण होईल. घरात प्रसन्न वाटेल. आशावाद वाढेल .
५. रोज श्री स्वामी समर्थ जप करायचा न चुकता
६. श्री स्वामी कृपा तारक मंत्र म्हणायचा . हे सर्व कसे किती वेळा म्हणायचे ते आपल्या वेळेनुसार सोयीने म्हणायचे कारण आपण प्रापंचिक माणसे आहोत . कामे सोडून केले तर महाराजाना ते आवडणार नाही. ह्या सर्वांच्या मुळे आपला आत्मविश्वास वाढेल . उमीद पे दुनिया कायम आहे. सारखे ज्योतिष ज्योतिष न करता सद्गुरू कृपा कशी होईल ते बघा त्यासाठी प्रयत्नशील राहा. महाराजांच्या हाताखाली सर्व ग्रह आहेत ते आपले मन आणि हित दोन्ही जाणतात . त्यांना हे करा ते करा सांगायची गरज नाही . त्यांना हवे ते आणि तेच देतील तेही योग्य वेळी . आपले हित त्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने खडे न फोडता आपली साधना वाढवा . नेहमी काहीतरी हवे म्हणून नाम न घेता त्यांच्यासाठी फक्त भक्ती म्हणून नाम घ्या कारण त्याचा परिणाम अधिक उत्तम होयील. भक्ती अपरंपार अमर्यादित हवी त्यातून साधना घडते आणि साधक तयार होतो. भक्ती मात्र शुद्ध खरी हवी . ह्या वर्षी शनी महाराज संपूर्ण वर्ष मीन राशीतच भ्रमण करतील आणि जुलै नंतर चार महिने वक्री अवस्थेत राहतील. राहू आणि केतू ५ डिसेंबर २६ पर्यंत अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत भ्रमण करणार आहेत . इतर ग्रह त्यांच्या गतीनुसार प्रत्येक महिन्याला मार्गस्थ होतील.

पुढील वर्षी २०२६ हे रवीच्या अमलाखाली आहे असे मानले तर सूर्याची उपासना अधिक फलदायी ठरेल. मुळातच सूर्य हा दाता आहे . गायत्री मंत्राशिवाय दिवस सुरु करूच नये .
सोशल मिडीया वरील वाचन ज्ञानात भर घालणारे आसवे आणि काहीतरी वाचून ते नियम आपल्या स्वतःच्या पत्रिकेला लावणे तेही शास्त्राची ओळख नसताना हे सर्वार्थाने घातक आहे. येणारे वर्ष सर्वांच्यावर गुरूंचा वरदहस्त असणारे आहे त्यामुळे कुठल्याही शंका न घेता सेवेत राहा. मनात कल्प विकल्प आणू नका. देव झेपेल तितकेच दुक्ख देतो . नकारात्मक वाचन करू नका . आपण फार साधी माणसे आहोत आपले काहीही वाईट होत नाही आणि होणारही नाही.
प्रचंड उर्जा , आशावाद आणि सकारात्मकता ह्यांनी भरलेले हे नवीन वर्ष आपल्या दरवाज्यावर दस्तक देत आहे त्याचे तितक्याच उत्साहात , मोकळ्या मनाने दिलखुलास पणे स्वागत करुया. मी नेहमीच म्हणते मला कुणाच्याही पत्रिकेत वाईट दिसतच नाही ,
अगदी हाच दृष्टीकोन ठेवून म्हणूया... अब जो भी होगा सब अछ्या ही होगा.
सद्गुरू आपले महाराज कधीतरी आपले वाईट होऊ देतील का? नाही ना . मग झाले तर हाच विश्वास उराशी घेवून नवीन वर्षात एकमेकांचा हात धरून पदार्पण करुया . विश्व प्रार्थना करुया. परमेश्वरा मानवजातीचे , अखंड विश्वाचे ,सर्व प्राणीमात्रांचे भले कर , सगळ्यांना बुद्धी दे. नोकरी व्यवसाय उत्तम चालू राहूदेत . आर्थिक विवंचना नको आणि मिळालेल्या लक्ष्मीचा सदुपयोग होवूदे . चांगली बुद्धी प्रदान करण्यासाठी नवीन वर्ष आणि रोजचा दिवस पूजा करताना गणपती स्तोत्र म्हणावे म्हणजे मन शांत होते आणि दिवसभरासाठी सकारात्मक उर्जा मिळते.
जसा विचार कराल तसे होईल त्यामुळे सोच बदलो .
मनातील जर तर किंतु परंतु काढून टाका . महाराजांना फक्त भक्ती हवी आहे . ज्याने ह्या अखंड विश्वाची निर्मिती केली तो तुमच्या शिरापुरीवर लाडू पेढ्यासाठी फिदा होणार नाही , तुमच्या एका साडी चोळीमुळे प्रसन्न होणार नाही.
मनापासून हाक मारून तर बघा , हाकेला “ ओ “ नक्कीच येणार . ह्याच विश्वासावर आपल्या भक्तांचा जीवन प्रवास आहे हे निश्चित मग वर्ष दिवस कुठलाही असो.
स्वामी माझा मी स्वामींचा
येणारे नवीन वर्ष सर्वांसाठी उत्तम आरोग्य , सद्बुद्धी , आर्थिक स्थैर्य , कौटुंबिक आनंद आणि सोहळे , इच्छा मनोकामना , संकल्प पूर्तीचे , अधिकाधिक अध्यात्मिकता , भक्तीभाव , सकारात्मकता , समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची बुद्धी ह्या सर्वांनी परिपूर्ण असुदेत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना .
संतांच्या जेजे असेल मनी तेते येयील घडोनी , भरवसा त्यांच्या चरणी ठेऊन स्वस्थ राहावे .
प्रापंचिक जीवनाला अध्यात्माची जोड असेल तर आहे तेच आयुष्य अधिक उत्तम होईल ह्यात दुमत नसावे .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment