|| श्री स्वामी समर्थ ||
राहुने आपल्या तन मनावर अक्षरशः ताबा मिळवला आहे. सतत मोबाईल वर दिसणार्या व्यक्तीच्या पत्रिकेत सध्या राहू सक्रीय आहे हे समजायला हरकत नाही. राहू दशा चालू झाली कि व्यक्ती अनेक प्रलोभनात अडकत जाते . youtube , इन्स्टा , whatsapp हेच त्याचे जग होते . ह्यात होणारी स्कॅम सुद्धा राहुचीच मेहेरबानी आहे. ह्या सर्व माध्यमांचा गरजेपुरता वापर केला तर उत्तम पण आज आपण ह्यामुळे संवाद विसरत चाललो आहोत . एकमेकांशी मोकळ्या गप्पा मारायला वेळ नाही आपल्याला किबहुना ते आता out dated म्हणायला हरकत नाही . आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती असतात त्यांना सगळी माहिती असते किबहुना ती त्या आवर्जून घेत गोळा करत असतात . राजकारण खेळणे , इथले तिथे करणे , गैरसमज पसरवणे जे मुद्दामून केले जातात , गरज नाही तिथे नाक खुपसणे ह्यात राहूच आहे. राहू म्हंटले कि भल्याभल्यांची झोप उडते . अनेकदा चार लोक एका गोष्टीला वाईट म्हणू लागली कि अर्थात त्यांच्या अनुभवावरून पाचवा सुद्धा त्या शृंखलेत सामील होतो आणि त्याला वाईट म्हणू लागतो (अनुभव नसताना ).असो हा मनुष्य स्वभाव आहे. आयुष्यातील सगळे चढ उतार आपल्याला राहू दशेतच बघायला मिळतात . रंकाचा राव करणारा राहू जनमानसाला जबरदस्त प्रभावित करणारा जणू खलनायक आहे . खेकडा जसा दगडाला घट्ट धरून असतो अगदी तसाच राहू आपल्या मेंदूचा ताबा घेतो .
म्हणूनच आज राहुविषयी अधिक जाणून घेवूया . प्रत्येक वेळी अभ्यासातून , संशोधनातून आणि अनुभवातून आपल्याला राहूचे अनेक नवनवीन कंगोरे उलगडत जातात आणि आपण सुद्धा विस्मयचकित होवून जातो. अनैतिकता हा राहूचा स्वभाव निश्चित आहे पण अनेकदा चांगल्या ग्रहांच्या युतीत संपर्कात येवून तो आपल्याला एक वेगळा दृष्टीकोन सुद्धा देवू शकतो . अनैतिक गोष्टी घडवण्यात राहुचेच master mind असते पण अनेकदा ते कोण घडवते तेच समजत नाही . आपल्या संपर्कात असणार्या व्यक्तीत राहू लपलेला असतो पण त्यातील कोण आपला आणि कोण आपला नाही ह्याचा पत्ता आपल्याला काही करून न लागणे हीच राहू दशा आहे. म्हणूनच राहू दशेत व्यक्तीने कमीतकमी लोकांच्या संपर्कात राहावे , समाजात कमी मिसळावे , डोळसपणे जगावे , आंधळा विश्वास इथे कामाचा नाही . कुठेही अंध विश्वास ठेवून सही करू नये , कुणालाही जामीन राहू नये .
राहुकडे शीर आहे , डोळे कान नाक घसा सगळी इंद्रिये आहेत त्यामुळे राहू दशा अंतर्दशेत व्यक्तीला हे करू कि ते करू असे होवून जाते , जे जे दिसते ते सर्व हवे असते तसेच व्यक्तीतील passion वाढते , विचारांच्या कक्षा रुंदावतात पण हे सर्व पचवता मात्र येत नाही कारण त्याच्याकडे शरीरच नाही . विचारांना नुसते पंख फुटून उपयोग नाही ते प्रत्यक्षात तर आले पाहिजेत जे येत नाहीत . मला खूप काही करायचे आहे पण त्या कल्पना सत्यात उतरत नाहीत . त्यातून हाती येते ते मात्र वैफल्य .
राहू व्यक्तीचा कल्पनाविस्तार वाढवतो , आशा अपेक्षा फुलवतो पण पुढे सर्व संभ्रम असतो . त्या सत्यात उतरवणे जमतेच असे नाही . राहूच्या दशेच्या अंतिम टप्प्यात अनेकदा व्यक्ती पूर्वपदावर आलेलीही दिसते . प्रचंड धाडस , काळी जादू वगरे प्रकार सुद्धा राहूच .
राहू अत्यंत हुशार आहे पण मंगळ आणि राहूच्या हुशारीत फरक आहे. राहू होत्याचे नव्हते करणारा आहे . अचानक आकस्मित , अकल्पित सुद्धा . मंगळ योद्धा आहे तो सरळ लढेल पण राहू कट करण्यात माहीर आहे . त्याच्यासारखा दुसरा कुठलाही ग्रह ह्यात त्याच्या जवळपास सुद्धा नाही . हेर खात्यातील किंवा हेरगिरी करणाऱ्या लोकांचा राहू बलवान असतो .
एखादे अनुमान लावणे अनेक तर्क वितर्क करणे म्हणजे राहू. कलियुगाचा बादशाह राहू आहे.
सोशल मिडिया , इंटरनेट चे युग अवतरले ते राहूमुळे . राहुने जग जवळ आणले . टेक्नोलॉजी राहुकडे . स्मार्टफोन म्हणजे राहूच . बघा आज प्रत्येक जण फोन मध्ये डोके खुपसून बसलेला असतो. ज्यांचा राहू पत्रिकेत सक्रीय आहे ते काम असो अथवा नसो फोन laptop ह्या माध्यमात सतत दिसतात . राहुने आपल्या तन मनावर ताबा मिळवला आहे. राहुने आपले विश्व जग बदलुन टाकले आहे . विशेष करून रात्री उशिरापर्यंत मुले काय सगळेच फोन घेवून बसलेले असतात . इन्स्टा म्हणजे सुद्धा राहूच . आपण गोष्टी एका क्लिक वर विकत घेतो अनेकदा फसतो सुद्धा . मी एकदा फुले ठेवयाची एक कुंडी मागवली जेव्हा ती प्रत्यक्षात घरी आली तेव्हा ती इन्स्टा वरती दिसत होती त्यापेक्षा खूप लहान होती . दिसणे आणि प्रत्यक्ष असणे ह्यातील फरक राहुने शिकवला त्या दिवशी मला . भ्रमित करणारा राहू , मुले अभ्यास करत नाहीत , काढून घ्या कि त्यांचे मोबाईल. करतील अभ्यास . बघा प्रयत्न करून . फोन काढून घेणे म्हणजे माश्याला पाण्यातून बाहेर काढण्यासारखे आहे. असो. राहुने तंत्रज्ञान दिले आहे पण त्याचा किती आणि कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे , पटतंय का?
व्यसनं राहुकडेच आहेत . राहू बरोबर असलेल्या इतर ग्रहांचे विशिष्ठ राशीतून होणारे योग हे व्यसने देतील आणि त्यातून बाहेर येणे अत्यंत अवघड होयील . राहू धुवा आहे त्यामुळे सिगरेट चे व्यसन , नशिल्या पदार्थांचे व्यसन राहू देतो . पण काही वेळा हा अध्यात्मिक प्रवास सुद्धा घडवतो . राहुकडे दृकश्राव्य मध्यम आहे . आपल्याला जे दिसते आणि जे दिसत नाही त्यातील पडदा म्हणजे राहू . जे दिसत नाही त्याचे दर्शन देणाराही राहू म्हणूनच त्याला अध्यात्माचा कारक म्हंटले जाते . साधना नामस्मरणाने हा मधला पडदा दूर होण्यास मदत होते . शत्रूंचा नाश करणारा राहूच आहे जर पत्रिकेत षष्ठात असेल. हि राहूची सर्वात उत्तम स्थिती आहे. राहुला कंट्रोल करण्यासाठी हनुमान चालीसा नित्य पठण करावे. नाग सर्प ह्यांचे प्रतिक राहूच आहे त्यामुळे पत्रिकेतील कालसर्प दोष राहूच दर्शवतो . राहूच्या दशेत गूढ विद्या , मंत्र तंत्र , ज्योतिष शास्त्राचे शिक्षण उत्तम होते . राहू संशोधन करवतो .
राहूचा दोष कमी करण्यासाठी माता दुर्गा ची उपासना , हनुमान चालीसा , शंकराला अभिषेक करावा.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment