||श्री स्वामी समर्थ ||
काल गुरुचे नक्षत्र आणि कालच मला माझ्या ओळखीचे एक जण म्हणाले दत्ताच्या दर्शनाला जात जा गुरुवारी . काल गुरुवार नव्हता पण योगायोगाने दत्ताच्या देवळात दर्शन झाले. काल मी ज्या ठिकाणी गेले असताना समोरच्या गल्लीत जुने मोठे प्राचीन दत्त मंदिर दिसले. आत गेले पण ते बंद झाले होते तरीही शेजारच्या दरवाज्याने आतमध्ये गेले आणि श्री दत्त , मारुती आणि देवीच्या मूर्तींचे सुरेख आणि शांतपणे दर्शन घेतले . ध्यानी मनी नसतानाही आज हे दर्शन झाले. ह्या ठिकाणी मी ह्याहीआधी २-३ वेळा गेले होते पण इथे दत्ताचे देऊळ आहे हे मला कालच समजले. रस्ताच मला त्या देवळाशी घेऊन गेला कारण मी नेहमी वेगळ्या रस्त्याने जाते . निसर्ग अनेक संकेत आपल्याला देत असतो आणि डोळसपणे पाहिले तर ते आपल्याला अनुभवता येतात त्याचा प्रत्यय आला. ज्या कामासाठी गेले होते ते काम होणार ह्याची ग्वाही माझ्या आतल्या आवाजाने मला दिली होती आणि त्याच आनंदात माझा सगळा दिवस गेला.
देवळात एक विलक्षण उर्जा जाणवत होती . खोलवर विचार करता हा अनुभव साधा नाही तर ह्यात काहीतरी शुभ संकेत आहे हे नक्की. माझा आनंद आपल्याशी शेअर करावासा वाटला म्हणून ह्या दोन ओळी. आनंद आणि जगण्याचे निम्मित्त नेहमीच अश्या लहान गोष्टीत दडलेले असते त्याची पुनश्च प्रचीती आली .
श्री स्वामी समर्थ
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment