Monday, 8 April 2024

कसे आहेत माझ्या पत्रिकेतील ग्रह ?- भाग 1.

 || श्री स्वामी समर्थ ||

आज ज्योतिष शास्त्राचा अभ्यास जगभर अनेक अभ्यासक करत आहेत , रोज नवनवीन शोध सुद्धा लागत आहेत . आज आपण खूप वाचतो (अनेकदा आपल्याला असलेले ज्ञान हे अर्धवट असते हे आवर्जून सांगावेसे वाटते ), ऐकतो आणि आपली मते त्या वरून तयार करतो. आपली पत्रिका म्हणजे जन्मस्थ आकाशात असलेल्या ग्रहस्थितीचे प्रतिबिंब जे बदलत नाही . आपल्या पत्रिकेत शुक्र इथेच का आणि शनी तिथेच का हा अभ्यासाचा विषय आहे कारण ते आपले पूर्व प्रारब्ध आहे. अतिशय मनापासून जर ज्योतिष शास्त्राचा खोलवर विचार आणि अभ्यास केला तर आपल्या आयुष्यातील अनेक गणिते सुटायला निश्चित मदत होईल. एखादी घटना आयुष्यात का घडली ह्याचा मागोवा घेता येयील किंवा भविष्यात काय घडू शकते आणि कधी त्याचा अंदाज येयील . हा अभ्यास अत्यंत सखोल आहे त्यामुळे वरवरचे वाचन इथे चालणार नाही , ह्यात फलादेश चुकण्याचीच भीती अधिक आहे. पृथ्वीपासून कित्येक मैल दूर असणारे ग्रह मानवी जीवनावर परिणाम करत आहेत इथेच आपण त्या ग्रहांची ताकद ओळखून त्यांना सलाम केला पाहिजे. त्या ग्रहांची बोली शिकलो आणि त्यांचे कारकत्व समजून घेतले तर जीवन सुकर होईल. 


व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे मिथुन राशीचे ह्या आठवड्यातील भविष्य असे आहे हे सगळ्या मिथुन राशी वाल्यांना लागु होईल का तर अर्थात नाही कारण ते मेदनिय भविष्य आहे . प्रत्येकाचे प्रारब्ध वेगवेगळे आहे. प्रत्येक ग्रहाचे थोडक्यात पण महत्वाचे विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहे त्याप्रमाणे ग्रह तुमच्या पत्रिकेत कसे आहेत हे तुमचे तुम्हालाच समजेल आणि ज्ञानप्राप्ती सुद्धा होईल. 

रवी हा सृष्टीचा निर्माता आहे .पितृसुखाचा कारक आहे. आयुष्य , अधिकार , राजकारण , रक्तदोष , पित्तविकार ,आरोग्य सोने अग्नी तीर्थयात्रा रवीच्या अमलाखाली येतात . रवीचा अंमल हृदयावर आहे. नेत्र तसेच शरीरातील शिरा ह्यावर रविचा अंमल आहे. रवी सर्व प्राणीमात्रांचा प्राणवायू आहे. शरीरातील शक्ती आणि प्रतिकार शक्तीचा कारक रवी आहे. नितीमत्ता , अलौकिक ,ईश्वरभक्ती , उच्च विचार  , सात्विकता ,अंतर्ज्ञान , अंतर्स्फुर्ती , मनाचा खंबीरपणा ,स्पष्टपणे बोलणे ,तर्कशुद्धता , स्थिर स्वभाव , ध्यानधारणा , धैर्य ह्याचा कारक रवी आहे. 

ग्रहमालिकेतील महत्वाचा पिवळाधमक तारा म्हणजेच  “सूर्य” . सुर्यमालीकेत मध्यभागी सूर्य असून त्याभोवती पृथ्वीसकट सर्व ग्रह फिरत असतात .सूर्य स्थिर असतो आणि पृथ्वी फिरत असते म्हणून आपण सूर्य उगवला , सूर्यास्त झाला असे म्हंटले जाते. सूर्य प्रत्येक राशीत महिनाभर असतो. १४ जानेवारीला सूर्य सर्व राशीत भ्रमण करून म्हणजेच एक संक्रमण करून मकरेत येतो ती मकर संक्रांत .सूर्यामुळे आपल्याला ऋतू आणि दिवस , वार ,वर्ष ह्याचे ज्ञान होते . सूर्याचा अंमल पाठीच्या कण्यावर आहे. सूर्यामुळे आपल्याला सूर्याची रास सिंह असून मेष राशीत तो उच्चीचा आणि तूळ राशीत निचीची फळे देतो. सूर्य आपला आत्मा आहे. सृष्टीमधील सजीवतेचा  कारक सूर्य आहे. विचार करा एक दिवस सूर्योदय झालाच नाही तर? असा हा सूर्य एक तप्त गोळा आहे. सूर्य हा ब्रम्हांडाचा आत्मा आहे.सूर्य म्हणजेच राजा .सूर्य चांगला असेल तर व्यक्ती पराक्रमी असते आणि राजकारणात यश मिळवते.

आपल्या उदय आणि अस्तामुळे एकाच दिवसात ३ भिन्न अवस्था दाखवणारा रवी आपल्याला भिन्न राशीतून प्रवास करत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा सुद्धा दाखवतो. चैत्र वैशाखात रवी नेतून मेषेत येतो त्यावेळी पृथ्वी सूर्याच्या निकट आलेली असते म्हणून आपल्याला असह्य उन्हाळा जाणवतो.काही काळाने रवी मेषेतून वृषभेत आणि पुढे मिथुनेत जातो . कर्केत गेल्यावर जणू असह्य उन्हाळ्याचा त्याला पश्चाताप होवून तो धरती आणि सृष्टी जलमय करतो .पुढील प्रवस्त करत कान्येतून तुलेत आपल्या नीच राशीत येतो तेव्हा सृष्टी आणि निसर्ग सुद्धा  आनंदाने डोलू लागतो.


सूर्याच्या भोवती सर्व ग्रह एका कक्षेत आपापल्या गतीने फिरत असतात ज्याला आपण क्रांतीवृत्त म्हणतो . सूर्याचे अस्तित्व अबाधित आहे आणि म्हणूनच तो राजा आहे. आता हा राजा पत्रिकेत चांगला असेल तर अर्थात राजासारखी राहणी , मानमरातब , सरकारी नोकरी , प्रसिद्धी , MBA चे उत्तम प्रशिक्षण , नेतृत्व , सरकारी यंत्रणा , वडिलांचे सौख्य प्राप्त होते . रवी आत्मकारक आहे आणि रवी पत्रिकेत चांगला असेल तर प्रकृती उत्तम असते अनेक आजार बरे होऊ शकतात . मनोधर्य किंवा मनाची उमेद व्यक्तीकडे असते . सूर्योदय झाला कि उजाडते आणि ते आपण आपल्या डोळ्यानीच पाहतो त्यामुळे आपल्या डोळ्यातील तेज दृष्टीचा कारक सुद्धा रवी आहे. सूर्याची आराधना केली , गायत्री मंत्राची नित्य उपासना केली आणि सूर्याला सकाळी अर्घ्य घातले तर सूर्य बलवान होण्यास मदत होते . रवी हा आत्मविश्वास देणारा ग्रह आहे. तो कमकुवत असेल तर कुठल्याही कार्यात यश येणार नाही किंवा आत्मविश्वासात कमतरता भासते आणि असुरक्षित वाटत राहते .  रवीची ऋण बाजू म्हणजे नको तितका पराकोटीचा अहंकार आणि उद्धटपणा . रवी कमकुवत असलेल्या व्यक्तींची जराशी स्तुती सुद्धा त्यांचा अहंकार फुलवते . ग्रह बलवान असेल तर अश्या खोट्या स्तुतीला कधीच भुलणार नाही तसेच टीकेला पण खिलाडू वृत्तीने घेतील.  पण कमकुवत ग्रह जराश्या स्तुतीने व्यक्तीला हवेत नेयील. 


ज्या घरात चंद्र गेला तिथे तुमच्या emotions, मन , भावना गेल्या हे लक्ष्यात ठेवायचे. चंद्र हा शीतल नैसर्गिक शुभ ग्रह सर्वाना हवाहवासा वाटणारा , कवी मनाला भुरळ पाडणारा आहे . चंद्र हा स्वयंप्रकाशी नाही . सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि तोच परावर्तीत होवून पृथ्वीवर येतो ज्याला आपण चांदणे पडलेय असे म्हणतो. म्हणजे चंद्रकिरण हे खर्या अर्थाने सुर्याचेच किरण असतात . चंद्र आणि सूर्य जेव्हा पृथ्वीच्या एकाच बाजूला असतात तेव्हा अमावास्या असते आणि पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला चंद्र अशी स्थिती असते त्याला पौर्णिमा म्हणतात . पृथ्वी हि वायुरूप अवस्थेतून घनरूप अवस्थेत येताना सूर्याच्या आकर्षणामुळे तिला एक मोठी भरती आली आणि त्यात तिचा एक मोठा भाग तिच्यापासून वेगळा आला जो तिच्याभोवती फिरत राहिला . अशी चंद्राची जन्मकथा आहे. 

आपल्या पत्रिकेत चंद्र ज्या भावात असतो ती आपली जन्मरास असते. चंद्राच्या जन्माच्या अनेक पौराणिक कथा वाचायला मिळतात. चंद्र हा कृष्णपक्षात क्षीण होत जातो . समुद्राला भरती ओहोटी येते ती चंद्रामुळे हा संदर्भ विष्णू पुराणात आढळतो. समुद्रातील पाणी वास्तविक कमी अधिक होत नाही पण चंद्राच्या आकर्षणामुळे तसे वाटते. चंद्राच्या आकर्षणामुळे पाणी ओढलेले दिसते .

भाऊ नसलेली बहिण चंद्राला भाऊ मानून त्यालाच ओवाळते. कालपुरुषाच्या  कुंडलीत चंद्र हे मूळ मानले आहे आणि इतर ग्रह ह्या शाखा आहेत . जर चंद्राचे इतर ग्रहांशी योग चांगले नसतील तर शुक्र गुरु कितीही चांगले असतील तरी काहीही उपयोग नाही. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. स्त्री हे एक विलक्षण कोडे आहे. 

विश्वाचा गाडा अखंड चालू ठेवण्याचे महान कार्य देवाने स्त्रीकडे सोपवले आहे. अखंड विश्वात जे जे सुंदर आहे पवित्र आहे, मंगल आहे ते स्त्रीमध्ये आहे .रवी हा आत्म्याचा तर चंद्र मनाचा कारक आहे.

मातेचे सुख चंद्रापासून बघतात . प्रेमळपणा , संपत्ती ,नैराश्य , आनंद , शरीरावरील शिरा , शरीरातील जलतत्व ,कुटुंब प्रेम  ,जलाशय , पर्यटन , नौकाविहार , फळे फुले , चांदी ,पेये , फळांचे रस , तसेच घशाचे आजार , स्वादुपिंड , स्तन , लाळ, दमा ह्यावर चंद्राचा अंमल आहे. विसरणे , मानसिक कमकुवतपणा,मेंदूची क्रिया ,पुरुषाचा उजवा तर स्त्रीचा डावा डोळा , वेड, प्रवासाची आवड , तीर्थयात्रा , विवेक स्त्रीसुलभ लज्जा ,गौरवर्ण,अती चंचलता  चंद्रावरून पहिली जाते.

चंद्र मनाची स्थिती दर्शवतो , वनस्पती , पाणी , खाद्यपदार्थ , आई ह्यावर अंमल करतो. पौर्णिमा आणि अमावस्या प्रमाणे मनाची स्थिती सुद्धा आनंदी आणि दुखी असते. मन किती प्रकारे आणि कश्या प्रकारे सतत बदलत राहते हे चंद्राच्या पत्रिकेतील स्थितीवरून ज्ञात होते . चंद्र चांगला असेल तर व्यक्ती कुठल्याही परीस्थित शांत राहून विचार करेल, वेळ बदलण्याची वाट बघेल पण चंद्र कमकुवत असेल तर जराजराश्या गोष्टीनी सुद्धा सगळे घर डोक्यावर घेईल. एखाद्या वेळी ट्रेन उशिरा आली तर व्यक्ती शांत बसून पेपर वाचेल पण एखादी सतत येरझार्या घालेल , १० वेळा ट्रेन आली का ते डोकावून बघत राहील. चंद्र बिघडला तर कश्यातच रस नसतो , व्यक्ती दिशाहीन आयुष्य जगते . चंद्रमा मनसो जातः म्हंटले आहेच . चंद्र कमकुवत असेल तर व्यक्ती मानसिक विकारांना बळी पडते तसेच व्यसनाच्या आहारी सुद्धा जावू शकते .

आज आपण रवी आणि चंद्र ह्या दोन ग्रहांच्या काही छटा पहिल्या . बघा तुमच्या पत्रिकेत हे दोन ग्रह कसे आहेत ? चंद्र आणि रवी कुठल्या भावात आहेत त्यावर राहू केतू शनी मंगल ह्यांच्या दृष्टी आहे का? चंद्र वृषभ राशीत आणि रवी मेष राशीत उच्च फळे देतो. लहानपणापासून डोळ्यांचे विकार दृष्टीदोष आहे म्हणजे रवी कुठेतरी बिघडला आहे अश्या प्रकारे ह्या दोन ग्रहांचा अभ्यास करा. पुढील लेखात पुढचे दोन ग्रह घेवूया .

क्रमशः 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

कसे आहेत माझ्या पत्रिकेतील ग्रह ?- भाग 2.

 || श्री स्वामी समर्थ ||


सूर्यमालिकेत रवी राजा आणि चंद्र राणी मानले तर बुध हा राजकुमार आहे. पण तो किशोर वयातील आहे. बुध म्हणजे शब्द , भाषा , वक्तृत्व त्यामुळे बुध ज्यांचा चांगला असतो ते बोलण्यात हुशार , अनेक भाषा जाणणारे बोलणारे असतात . शब्दांच्या कोट्यां करणारे आणि नकलाकार असतात . म्हणूनच बुधाला ग्रहांत बिरबल म्हंटले आहे . अत्यंत हजरजबाबी असतात . उत्तम सवांद शैली असणारे. चिरतरुण व्यक्तिमत्व असणारा आणि हुशार , उत्कृष्ठ स्मरणशक्ती आणि असामान्य शब्द सामर्थ्य . पण किशोरवयीन असल्यामुळे थोडासा अल्लड आणि कधी बालिश सुद्धा . बुध प्रधान व्यक्ती त्यांचे वय चोरतात म्हणजे ५० वर्षाचा माणूस ४५ चा दिसेल. कन्या राशीत बुध उत्तम फलित देतो. बुध आणि सोबत गुरु सुद्धा पत्रिकेत चांगले असतील तर व्यक्तीची शैक्षणिक पात्रता उत्तम असते , उच्च शिक्षण होते . बुध विष्णूचे प्रत्यक असल्यामुळे बुधाचे उपाय म्हणून विष्णूची आराधना , जप , सत्यनारायण व्रत करता येते . बुधाच्या राशी निसर्ग कुंडलीत 3 6 ह्या भावात येतात . 6 व्या भावावरून आपण आपले पोट पाहतो. आपले वितभर पोट आणि पोटाची भूक आपल्याला काम करायला लावते. बुधाकडे हात आणि बाहू आहेत . पाहिलेत ना काम करण्यासाठी आपल्याला तृतीय भावातील हात आणि बहु लागतात . तृतीय भाव पराक्रम आहे. पराक्रमाने , कर्तुत्व गाजवून आपण आपले पोट भरतो आणि काम करण्यासाठी हात लागतात . बुध हा नर्व्हस सिस्टीम दर्शवतो , बुधाकडे पृथ्वीतत्व आहे आणि आपली त्वचा ( पृथ्वीला जसे आवरण असते ). आपल्या त्वचेला एक प्रकारचा सुगंध असतो जसा पहिला पाऊस पडला कि मातीचा सुगंध येतो तसाच . बुधाला चंद्राने बिघडवले तर स्कीन म्हणजे त्वचेचे आजार होवू शकतात . चंद्र बुध मनाचे चांचल्य दर्शवतो. बुधाकडे थोडे नपुंसत्व आहे. म्हणूनच पंचम भावात बुधाच्या राशी किंवा पंचमेश बुधाच्या राशीत असेल तर संतती साठी पत्रिका अभ्यासावी लागते अर्थात त्याचसोबत जीवकारक गुरु सुद्धा. बुधाची मिथुन राशी तृतीय भावात येते जिथे करार मदार , लेखणी आहे , जाहिरात क्षेत्र . बुध दूत आहे म्हणूनच सगळी प्रसार माध्यमे तृतीय भावावरून पहिली जातात . शिवाजी महाराजांच्या काळात दूत खलिता घेवून इथून तिथे जात असत. थोडक्यात इथली बातमी तिथे ( दोन्ही अर्थाने ) हा बुध त्यात प्रवीण आहे. एखादा फालतू बडबड किंवा अर्थहीन बोलत असेल तर त्याचा बुध बिघडलेला आहे आणि एखादा मार्मिक , वैचारिक बैठक असणारा बोलत असेल तर त्याचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते , लिखाण वाचावेसे वाटते . बुध ठीक करण्यासाठी विष्णूची पूजा जप करावा .

राजाच्या राज्याला सेनापती मंगळ ह्याची नितांत गरज आहे . जोश , उत्साह , लढाऊ वृत्ती , आरे ला कारे करण्याची प्रवृत्ती , असामान्य धैर्य आणि शौर्य , नेतृत्व , अग्नीतत्व त्यामुळे भडका उडणे ( अनेकदा स्वभाव ) , शक्तीचे प्रदर्शन त्यामुळे समुद्रात पोहणारे , अग्निशामक दल , अनेक खेळ , पोलीस यंत्रणा , सैन्य दल , सर्जन ह्या क्षेत्रात  काम करणाऱ्या लोकांचा मंगळ नक्कीच महत्वाचा आहे. श्री गणेश , हनुमानाची पूजा  करावी . श्री गणेशाची आणि हनुमानाचे पूजन उपयुक्त होईल. मंगळ स्त्रीच्या पत्रिकेत पतीकारक मानला आहे. मंगळ हा अनेकदा अमंगळ करणारा असू शकतो जर तो राहू शनी ह्या ग्रहणी दुषित असेल तर . सुस्थितीत असलेला मंगळ स्वतःवर ताबा मिळवेल उठसुठ चिडणार नाही. भावनांवर विजय मिळवेल. रक्ताचा कारक असल्यामुळे BP , रक्तदाब , असुरक्षित पणाची भावना मनात येते. मंगळाकडे अजिबात धीर नाही तर तो प्रत्येक गोष्टीत अधीरता दर्शवतो. सेनापती ला इतकेच माहित आहे कि समोर शत्रू आहे आणि त्याचा निपात करायचा आहे. त्यामुळे तो फारसे डोके न चालवता कृती करतो तीही क्षणाचाही विलंब न लावता . असे हायपर पेशंट अनेकदा आपल्यालाच त्रास करून घेतात .रक्ताचा कारक असल्यामुळे राक्तासंबंधी आजार . मंगळाची पत्रिका हा विषय तर अत्यंत चुकीच्या दृष्टीने मांडला जातो. मंगळाच्या मुलामुलीत दोष आहे असे काही नसते , त्यांनी विवाह करू नये असे तर अजिबात नाही. बुधाच्या मिथुन आणि कन्या राशीतील मंगळ तितकासा धाडसी नसतो. शनी मंगल युती हि घातक , त्रासदायक मानलेली आहे .हनुमान चालीसा , गणपती स्तोत्र म्हणावे.  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

राहूचा विळखा ( प्रेमळ )

 || श्री स्वामी समर्थ ||

गोष्ट एका स्त्रीची . राहूची दशा चालू आहे. विवाह अद्याप झालेला नाही . वय पुढे गेले असले तरी विवाह करण्याची इच्छा आहे . राहू चतुर्थात सुखस्थानात . पत्रिकेतील ग्रहस्थिती अशी कि व्यक्ती प्रचंड hyper, over aggressive. असो.

कुणाशीही न पटण्याची असंख्य कारणे. राहुमध्ये जेव्हा गुरु ची अंतर्दशा सुरु झाली , गुरु पंचमेश त्यामुळे आता राहुने त्याची खेळी खेळली . ह्या स्त्रीच्या आयुष्यात कुणी व्यक्ती आली जिच्या प्रेमात बाई साहेब इतक्या पडल्या कि वास्तव , समाज कश्याचेही भान राहिले नाही. ह्या व्यक्तीशीच आपला विवाह होणार हे मनोमन जणू त्यांनी गृहीत धरले , नव्हे तसा विचार करायला राहुनेच भाग पाडले. आखिर प्यार प्यार होता है, प्यार किया तो डरना क्या वगैरे युक्तीना धरून प्रणयाचे रंग खुलत गेले.  राहुमध्ये गुरुचे अंतर संपताना सगळ्या रंगांचा बेरंग झाला. वास्तव समजले, भानावर आली तेव्हा लक्ष्यात आले कि जसा विचार केला तसे काहीच घडत नाही. ते प्रेम कधीच नव्हते होते ते फक्त आकर्षण , कारण जितक्या वेगाने तो माणूस ह्या स्त्रीच्या आयुष्यात आला तितक्याच  वेगाने तो निघूनही गेला. विवाहाचे सुख पत्रिकेत नाही त्यामुळे ह्याधीही अश्या घटना घडल्या आहेत . असो. 


राहूची दशा , अंतर्दशा , विदशा काहीही असो राहू आला कि तो ज्या भावात असेल ते भाव active होतात आणि तशी फळे मिळतात .राहू सगळ्या लग्नांना राशिना वाईट च फळे देणार तो कुणाचाही मित्र नाही . राहुने एखाद्या ग्रहासोबत युती केली कि त्यातील गुणांना शोषून त्याला आपल्यासारखे वागायला लावणारा हा तामसी ग्रह आहे . जितका चांगला तितका वाईट . अध्यात्मिक दृष्टीने , संशोधन ह्या साठी उत्तम पण फसवणूक , धोका , षडयंत्र ह्यात राहूचा हातखंडा आहे. म्हणूनच , राहूच्या दशेत प्रत्येक गोष्ट , कागदपत्रे  आणि माणसे सुद्धा तपासून घ्यावीत . घाईघाईत कुठेही सही करू नये , कुणाला जामीन राहू नये , कुणावरही काडीचाही विश्वास ठेवू नये , स्वतः डोळसपणे प्रत्येक गोष्टीची खात्री करून पुढे जावे. शेअर मार्केट साधे सोपे नाही , तिथेही चढ उतार आहेत . शेअर मार्केट मध्ये कमी काळात अधिक धन मिळवण्याची हाव धरून आपण सगळेच घालवून बसणार नाही ना हेही पाहावे. जपून पावले टाकावीत . राहूच्या दशेत निव्वळ गैरसमजामुळे अनेक नाती , मैत्रीचे संबंध तुटतात . राहू निव्वळ भास आहे, मोठ मोठी वलये आपल्या भोवती निर्माण करणारा , आकर्षणे गुंतवून ठेवतात.


आज ह्या स्त्री ला राहुने प्रेमाच्या विळख्यात अडकवले आणि तिने तिचे सर्वस्व घालवले. शेवटी हाती आला मनस्ताप . अनेकदा समजत असूनही व्यक्ती आंधळी होते आणि संकटे ओढवून घेते. विचाराची दिशाभूल करणारा , मती गुंग करणारा राहू आहे , तो आपल्याला विचार करायला संधी , वेळ देत नाही , घटना इतक्या वेगाने घडतात कि आपल्याला विचार करायला वेळ मिळत नाही नव्हे त्यावेळी आपल्याला तो करायचाच नसतो आणि आपण त्याच्या विळख्यात किती आणि कसे गुरफटत जातो ते आपले आपल्यालाही समजत नाही . आपण त्यातून बाहेर पडतो तेव्हा असंख्य गोष्टी ओंजळीतून निघून गेलेल्या असतात . राहू आपल्याला पूर्व जन्माचे भोग भोगायला लावतो , कधीतरी मागच्या कुठल्या तरी जन्मात आपण कुणाचे तरी नुकसान कलेले आहे मग ते आर्थिक , असो अथवा मानसिक त्रास दिलेला असो , ती व्यक्ती ह्या जन्मात कुठल्या तरी रुपात येवून आपल्यावर सूड उगवणारच , आपल्याला देणे द्यावेच लागणार . हिशोब चुकता .


कलियुगातील राहू हा महत्वाचा ग्रह आहे, संपूर्ण इंटरनेट युग राहूचे आहे पण ह्या सगळ्या चमकत्या दुनियेत आपण कुठे फसलो जात नाही ना? ह्याचा विचार केला पाहिजे , सतर्क राहिले पाहिजे . चमकत्या ग्यामर चे आकर्षण सगळ्यांना असते , पैसा प्रसिद्धीची हाव असते पण त्यासाठी आपण काय पणाला लावत आहोत हे समजत नाही व्यक्तीला .फक्त ती गोष्ट मिळवायची मग काहीही होवूदे इतकेच समजत असते . तुमची साधना उत्तम असेल तर तुमचे सद्गुरू तुम्हाला ह्यातून वाचवतील , बाहेर काढतील . वर उल्लेख केलेली स्त्री माझ्याकडे त्याच वेळी आली होती जेव्हा त्या माणसाशी ओळख झाली होती. मी तिला सतर्क केले होते पण राहूच्या प्रेमळ विळख्या पुढे आपल्या पामराला कोण विचारतो . राहूच्या दशेत एखादी गोष्ट झाली तर ती पूर्णत्वाला जाण्याची शक्यता कमी असते , ह्या मध्ये असेच झाले तो आला आणि निघून गेला मागे आंधळ्या प्रेमाच्या राहिल्या फक्त आठवणी त्याही मानसिक त्रास देणाऱ्या .


उपाय :  हनुमान चालीसा हा रामबाण उपाय राहूवर आहे. 

११ दिवस रोज ११ वेळा हनुमान चालीसा म्हणा संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला कि . काय आणि कसा फरक पडला , कसा मार्ग मिळाला , कशी कामे होत आहेत ते नक्की कळवा. भोग आपले आहेत तेव्हा आपल्यालाच हातपाय हलवायला लागणार आहेत . youtube वर लावून नाही ऐकायची हनुमान चालीसा, स्वतः म्हणायची आहे. वेळ नाही ? मग भोगा . जो भोगत आहे आणि ज्याला ह्यातून सुटायचे आहे तो वेळ नाही असे म्हणण्याचे धाडस नक्कीच करणार नाही .

करा करा... केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.

आज राहुचेच नक्षत्र आहे म्हणून हा लेखन प्रपंच .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

कुंकुमार्चन

 ||श्री स्वामी समर्थ ||



शरणागत दीनार्त परित्राण परायणे।

सर्वस्यार्तिहरे देवि नारायणी नमोऽस्तु ते॥

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला , चैत्र श्रावण मार्गशीर्ष ह्या महिन्यातील कुठल्याही शुक्रवारी किंवा नवरात्रीच्या ९ दिवसापैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास नवरात्रीत येणाऱ्या अष्टमीला किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावे.

पूजेचे साहित्य : २ ताम्हने,हळदकुंकू ,विडा,सुपारी,५ फळे ,कापसाचे वस्त्र , पूजेस बसावयास आसन,अत्तर ,सर्व प्रकारची सुवासिक फुले,देवीस गजरा ,वेणी , निरंजन ,समई , सुटते पैसे ,धूप-दीप ,नेवैद्यास साखर घातलेले गोड दुध ,पेढे, घरी केलेला गोड पदार्थ आणि दुपारी महानैवेद्य. दिवसभर समई तेवती ठेवावी.

पूजेस बसण्यापूर्वी घरातील मोठ्या मंडळीना नमस्कार करावा. धूतवस्त्र वेसावे. पुरुष पूजेस बसणार असतील तर जानवे घालावे. देवीची देव्हार्यातील मूर्ती एका ताम्हनात घेवून चौरंगावार किंवा पाटावर ठेवावी. तिला शुद्धोधकाने ,मग सुवासिक पाण्याने ,दुधाने आंघोळ घालून ,पुसून हळदकुंकू लावावे .फुलाने अत्तर लावावे , मग कुंकुमार्चनास सुरवात करावी.

कुंकुमार्चन म्हणजे काय ? तर देवीच्या मूर्तीवर कुंकवाने केलेला अभिषेक .काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे. हा अभिषेक करत असताना देवीच्या जपाचा मंत्रजागर होणे आवश्यक आहे. ‘देवीचा जप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत वहावे अथवा देवीचा नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे.

मूळ कार्यरत शक्तींतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्या् गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्तीरतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.

कुंकुमार्चन अभिषेक केलेले कुंकू लावून केला गेलेला जप आणि साधना अधिक एकाग्रतेने होते. कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचे रूप आहे, असा भाव ठेवून, घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतो. कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवी समोर उभी आहे, असा भाव ठेवा. देवीचा नामजप करत एकाग्रतेने चिमूट-चिमूट कुंकू चरणांपासून मस्तकापर्यंत वहा. हि पूजा स्त्री /पुरुष कुणीही करू शकतात .ह्याला कसलेच बंधन नाही. काही ठिकाणी कुंकवाचे स्नान घालतात किंवा केवळ चरणांवर वहातात. देवीला लावलेले कुंकू भक्तीभावाने स्वतःला लावा. कुंकुमार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो. आपली श्रद्धा जितकी जास्ती तितकी अनुभूती जास्ती.

बाजारात कुंकू मिळते .पूजेचे ,अभिषेकाचे कुंकू सांगावे .ते महाग आहे म्हणून साधे वापरू नये. हातावर खूप काळ रंग चिकटून रहाणारे रासायनिक पदार्थांचा अधिक वापर असणारे कुंकू वापरणे टाळा. कधी कधी कुंकू हे फारच लाल चुटुक असते आणि ते छान दिसते म्हणून बायका घेतात पण त्यात रसायने असतात .ते घेवू नये. रंगावर भुलून जावू नये.

कुंकुमार्चन करताना श्रीसूक्ताचा पाठ १५ वेळा करावा. १६ व्या वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुतीही म्हणावी म्हणजे श्रीसूक्ताचे 1 आवर्तन झाले. काही ठिकाणी सामुहिक रीतीने हि पूजा करतात. चंदनाची उदबत्ती मिळाली तर जरुर लावावी . सर्व पूजा झाल्यावर एका ताटात खण नारळ घेवून घरातल्या देवीची ओटी भरावी. डाळिंब मिळाले तर आणावे .देवीस ते फार प्रिय आहे. नवरात्रीचे ९ दिवस एका निरांजनात अगदी लहान कापूर घेवून तो प्रत्येक खोलीत जाळावा. घराला ४ खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत ते निरंजन घेवून जावे आणि तिथे एक कापुराची वडी त्यात जाळावी .मग ते उचलून अन्य खोलीत न्यावे आणि पुन्हा तेच करावे....याने घरात अत्यंत सकारात्मक उर्जा आणि लहरी निर्माण होतात .करून पहा..


चैत्र गुडीपाडवा म्हणजे हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरवात . येत्या नवीन वर्षात अधिकाधिक देवीची सेवा करून तिच्या आशीर्वादास पात्र होण्यासाठी “ कुंकुमार्चन “ करुया . हे सहज सोपे आहे आणि घरच्या घरी करता येण्याजोगेही आहे. इतका साग्रसंगीत घाट घालायचा नसल्यास देव्हार्यातील देवीवर कुंकुमार्चन करावे. पण करावे हे महत्वाचे आहे . प्रत्येक वेळी कुलस्वामिनीच्या दर्शनाला जायला जमते असे नाही , काही लोक नित्य वर्षातून एकदा तरी कुलस्वामिनीच्या दर्शनाला जातातच . असो पण नाही जमले तर निदान घरच्या घरी ह्या निम्मित्ताने आपल्याकडून देवीची सेवा घडावी ह्या उद्देशाने केलेला हा लेखन प्रपंच आहे.  तुम्हा सर्वाना देवीचा भरभरून आशीर्वाद मिळो हीच तिच्या चरणी प्रार्थना.


जप - ओं श्री महालक्ष्मै मातायै नमः

वरील जप रोजच अखंड वर्षभर जमेल तितका करावा.

सौ.अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230