Showing posts with label स्फुट लेखन. Show all posts
Showing posts with label स्फुट लेखन. Show all posts

Friday, 4 September 2020

Customer is the GOD

|| श्री स्वामी समर्थ ||

 Amazon CEO Jeff Bezos


माझ्या वाचनात आलेली एक वेगळी पण विचार करायला लावणारी माहिती  आज आपल्यासोबत शेअर करत आहे. आपल्याला ती नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. आज मार्केटिंग चा जमाना आहे. पण ते करत असताना ज्यांच्या साठी मार्केटिंग करत आहोत ते आपले ग्राहक हे आपले " देव " आहेत आणि त्यांना विसरून चालत नाही, ह्याची उत्तम जाण आणि भान ज्यांना आहे तेच आपला व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवू शकतात .


Do You Use Amazon CEO Jeff Bezos’ Empty-Chair Strategy?
Amazon’s CEO, Jeff Bezos frequently leaves one seat empty at the company’s most important meetings. It’s there for the most important person in the room – the customer. According to Forbes, Amazon tracks its performance against five hundred measurable goals. And nearly 80% of them relate to customer objectives. The obsession with understanding the customer gives Amazon the confidence to innovate freely without fretting about short-term results, Bezos says. “We don’t focus on the optics of the next quarter; we focus on what is going to be good for customers.”
As a CEO, you can implement this strategy successfully to help your business succeed. But here is a word of caution – make sure your team is culturally intelligent. David Livermore, thought leader in cultural intelligence (CQ), a global leadership and the author of “Leading with Cultural Intelligence” says the danger arises when senior executives simply assume the person represented by the empty chair values what they do. And if everyone in the meeting comes from the same cultural background, it’s going to be tough to get a grasp of the preferences and opinions of the customer.
David Livermore, a speaker at The Global Leadership Summit 2018 advises CEOs to not just go ahead and add an empty chair to their most important meetings, But also to follow these guidelines to make it effective.
Don’t make assumptions: Don’t assume everyone wants what you want. Remind everyone in the meeting that their own values and perspectives can’t be applied to all customers.
How much do you really know: How much do you and your team really know about your target audience? What are their specific needs and desires? How will our meeting address them?
Perspective-Taking: Do we really have the ability to step outside our own experience and imagine the perceptions and motivations of the customer? If we do, it will help us predict:
  • What does our customer (or prospective customer) value?
  • What’s going on in his/ her mind?
  • What would s/he say about the ideas we’re discussing right now?
  • Are we able to constantly adjust our perspectives based on further observations, emerging trends, and real-life interactions with our customers?
David says that without cultural intelligence, you will not really benefit from adopting this Amazon practice. But an empty chair + cultural intelligence is a smart, strategic way to keep your meetings focused on the most important people your organizations exists to serve – your Customers!.

To know more Click on the following Link 


I found it interesting so sharing...

अस्मिता

#antarnad #marketing #amazon #customerobsession #emptychair





Wednesday, 26 August 2020

Innovations Unlimited …..

|| श्री स्वामी समर्थ ||



आजचे युग हे प्रचंड स्पर्धात्मक आहे आणि त्यात टिकून राहायचे असेल तर बुद्धी आणि युक्तीचा सुरेख मेळ ज्याने घातला तो तरला .आपली उत्पादने विकण्यासाठी लोक कायकाय शक्कल लढवतील काही सांगता येत नाही . माझ्या पाहण्यात , वाचनात आलेली काही उदाहरणे आज देत आहे.



दादर येथील एका मिठाई विक्रेत्याने काही वर्षापूर्वी १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संकल्पना आणली होती. 90% वरील गुण मिळालेल्या मुलांनी त्यांची Mark sheet दाखवून पेढ्यांवर Special  Discount  घ्यावा अशी त्यांनी जाहिरात केली होती.




अशीच अजून एक भन्नाट कल्पना Bandra येथील एका Juice Centre ने राबवली होती. मुंबईत त्या दिवशी जितके तापमान तितका Discount त्यांच्या काही Product वरती त्यांनी ठेवला होता.




काही दिवसापूर्वी आम्ही मैत्रिणी एका मोठ्या नावाजलेल्या हॉटेलात जेवायला गेलो होतो . व्यापारात खेळतात ते फासे त्यांनी आम्हाला टाकायला सांगितले .त्यात जो आकडा येयील तितका Discount आम्हाला आमच्या Bill वरती त्यांनी दिला.



कालच वाचनात आले कि Myanmar मधील एका हॉटेल ने एक अद्भुत Discount योजना राबवली. चित्रात स्पष्ट दिसत आहे कि ज्या बार मधून तुम्ही जाल तितका Discount तुमच्या बिलावर तुम्हाला मिळेल.
आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करणे हे एक कौशल्य आहे. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात .





आजच्या स्पर्धात्मक युगात काळानुसार जो बदलतो आणि आपले उत्तोपादन विकण्चयासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवतो तोच  “बाजीगर ” ठरतो.





अस्मिता 

अभिप्राय जरूर द्या.


Antarnad18@gmail.com



#antarnad #marketing tricks #product selling #marketing gimmics #discount #innovations 


Friday, 7 August 2020

घड्याळ्याच्या काट्यावर

|| श्री स्वामी समर्थ ||


अष्टोप्रहर आपल्या सतत नजरेसमोर असणारे घड्याळ. आज जाणून घेवूया त्याबद्दल थोडी माहिती. असा एकही माणूस नाही ज्याला घड्याळ माहित नाही. अगदी सकाळी लवकर उठायचे म्हणून गजर लावण्यापासून आपल्याला घड्याळाची सोबत असते. आज आपली नाळ घड्याळाशी इतकी घट्ट जोडली गेली आहे कि घड्याळासाठी आपण कि आपल्यासाठी घड्याळ हा एक संशोधनाचाच विषय झाला आहे. इतरांशी भेटीगाठी ,रोजची व्यावहारिक जगातील कामे जसे बँकेचे व्यवहार , जिम ला जाणे ,फिरायला जाणे ,सिनेमा नाटक सगळे अगदी घड्याळाच्या काट्यावर असते . दुकाने उघडायच्या आणि बंद होण्याच्या वेळा ,सलून ,मॉल अगदी सगळेच घड्याळ्याच्या काट्यावर अवलंबून आहे .

पूर्वीच्या काळी सूर्याच्या स्थितीवरून वेळ निश्चित होत असे. तर अश्या ह्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटकाचा म्हणजेच घड्याळ्याचा शोध “ गॅलिलिओ ” ने लावला आहे हे सर्वश्रुत आहेच. आजच्या आधुनिक जीवनशैलीत तर घड्याळाला अनन्यसाधारण महत्व आहे. लोकल ट्रेन ,विमानाचे उड्डाण सगळ्याचे धागे घड्याळाशी जोडले गेले आहेत . लग्नाचा मुहूर्त सुद्धा घड्याळावर म्हणजेच वेळेशी निगडीत असतो. लग्नाचा , साखरपुड्याचा , बारश्याचा , कुठल्याही शुभकार्याचा मुहूर्त आपण काढतो. आता मुहूर्त म्हणजे शेवटी वेळच ,म्हणजे घड्याळ आलेच.


आजकाल बाजारात फेरफटका मारलात तर अनेक रंगाची आकर्षक ,स्टायलिश घड्याळे पाहायला मिळतात. आता तर मोबाईल मध्ये घड्याळ असल्याने हातावरच्या मनगटी घड्याळाची क्रेझ कमी होत आहे.
मंडळी घड्याळ आपल्याला बरेच काही शिकवते . घड्याळ काय दर्शवते तर “ वेळ ” आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते . आपण वेळ पाळली नाही तर आपल्यासाठीही गोष्टी वेळेवर घडत नाहीत .काही जण वेळेच्या बाबत एकदम पक्के असतात, त्यांच्या येण्यावर घड्याळ लावावे इतके ते वेळ पाळतात आणि काही अगदी त्याच्या उलट . सगळाच सावळा गोंधळ असतो. १० वाजता येतो सांगतील आणि येतील ११ वाजता आल्यावर ,त्यानंतर चक्क १५ मिनिटे उशीर का झाला त्याच्या सबबी सांगत बसतील .

आजकाल मुंबईसारख्या शहरात घराबाहेर पडले कि अनेक कारणानी इच्छित स्थळी पोहोचायला उशीर होतो म्हणून थोडे आधीच निघालो तर आपणही वेळ पाळण्यात आणि दुसर्याला दिलेला शब्द पाळण्यात यशस्वी होऊ.
वेळ न पाळणाऱ्या व्यक्तींमध्ये वक्तशीरपणा नसतो आणि त्यांच्याही बाबत सर्वच गोष्टी कधीच वेळेवर होताना दिसत नाहीत.



घराचे वास्तुशास्त्र करताना देव्हारा कुठे ठेवायचा हे सर्वप्रथम पाहावे तसेच घरातील घड्याळे कुठे लावायची त्यासंबंधीही विचार झाला पाहिजे . घड्याळासाठी ठराविक अशी दिशा नाही पण घड्याळातील वेळ पाळणे हे मात्र अत्यावश्यक आहे. घराच्या बाहेर दरवाज्यावर तसेच घरातील आतमधल्या दरवाज्यांवर सुद्धा घड्याळ लावू नये .

दिवाणखान्यात , बेडरूम मध्ये, अगदी स्वयंपाक घरातसुद्धा आकर्षक घड्याळे भिंतीवर किंवा अन्य ठिकाणी ठेवलेली आढळतात. हौसेला मोल नाही , अनेक प्रदर्शनातून सुद्धा वेगवेगळी घड्याळे घरातील सजावटीसाठी विकत घेतली जातात . सोने आणि हिऱ्यांचा वापर सुद्धा घड्याळे घडवताना आजकाल केला जातो. घरात प्रत्येक खोलीत एक अशी अनेक घड्याळे असतात . पण ह्या सर्व घड्याळे एकच वेळ दर्शवत आहे हे तपासून पहिले पाहिजे. प्रत्येक घड्याळ थोड्याफार फरकाने वेगळी वेळ दर्शवत असेल ,तर घरातील मंडळींचे विचारही दाही दिशांना असतात. सर्वांचे एकमत होते कठीण .

म्हणून सर्व घड्याळातील वेळ एकच असावी . तसेच काही घड्याळे बिघडलेली असतात पण तरीही ती आपण तशीच ठेवून देतो आणि घरातील “ Clutter ” वाढवतो. हि बंद घड्याळे एकतर दुरुस्त करून घ्यावीत नाहीतर सरळ फेकून द्यावीत हे उत्तम .आजकाल आपण किती चाललो , धावलो ह्याचे मोजमाप करणारी घड्याळे हा फार कुतूहलाचा विषय ठरत आहेत.त्यांची क्रेझ वाढल्यामुळे त्यांच्या किमतीही डोळे पांढरे करणाऱ्या आहेत.

टायटन, HMT, Citizen अश्या अनके कंपन्यांची विविध आकर्षक घड्याळे बाजारात पाहायला मिळतात . सणासुदीला ह्यावर अनेक ऑफर सुद्धा असतात. अनेक परदेशीय घड्याळ बनवणार्या कंपन्यांहि भारतीय बाजारपेठेत हजेरी लावताना दिसतात. घड्याळाच्या आकर्षकतेप्रमाणे त्यांच्या किमतीही लाखो रुपयांपर्यंत असतात .



तर अश्या ह्या घड्याळांचे आपल्या आयुष्यातील स्थान अनमोल आहे. घड्याळ आपल्याला वेळ दर्शवते आणि ती वेळ पाळणे किंवा न पाळणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते.

आयुष्यात प्रत्येक गोष्ट हि वेळेत नाही झाली तर आयुष्य निरस होते आणि आयुष्यातील अवीट गोडीच्या क्षणांना आपण पारखे होतो.

आपल्याला आता वेळेचे महत्व समजलेच असेल ,मग काय आजपासून दिलेली वेळ पाळणार ना?
आपण वेळ पाळूया आणि इतरांनाही वेळेचे महत्व समजावून सांगुया.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका .
Antarnad18@gmail.com


#antarnad #wrist watch #alarm #time #HMT #TITAN #Time is money #LIFE #Importance 
#अंतर्नाद #मनगटी घड्याळ #वेळ #गजराचे घड्याळ #वेळ महत्वाची #आयुष्य #घड्याळ्याच्या काट्याशी

Tuesday, 28 July 2020

पौष्टिक पोळीचा लाडू

||श्री स्वामी समर्थ ||



लहानपणीचा खाऊच्या डब्यातील सर्वश्रुत पदार्थ म्हणजे  "पोळीचा लाडू ". रात्रीच्या शिळ्या पोळ्या उरल्या तर आई ती पोळी कुस्करून त्यात गुळ ,तूप घालून मस्त पोळीचे लाडू करत असे . पंचपक्वान्नापेक्षाही जास्ती चव असे त्याला.
पूर्वीचा काळच वेगळा होता .शाळेतून आल्यावर खूप भूक लागलेली असायची आणि मग तेव्हा हा पोळीचा लाडू समोर आला कि आम्ही भावंड तो क्षणात फस्त करत असू. हे लाडू पौष्टिक तर असतातच पण अन्न फेकून दिले जात नाही हे सर्वात महत्वाचे.

आजकाल सारखे तेव्हा Maggi, सामोसे ,कुरकुरे , वेफर्स ,असे Pack Food अजिबात नव्हते .बाहेर जावून किंवा बाहेरील जिन्नस विकत आणून खाणे असे प्रकार तेव्हा प्रचलित नव्हते . जे काय खायचे ते घरी करून खायचे असा शिरस्ता असायचा .

आज कालच्या पोळ्या उरल्या आणि पोळीचा लाडू केला  तेव्हा  मन भूतकाळात फेरफटका मारून आले. लहानपणच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या.

असे हे लहान क्षणच आपल्या बालपणच्या आठवणींचे साक्षीदार करतात . ह्या क्षणांनी आपल्याला समृद्ध केले असते. ह्या लाडूत गुळापेक्षाही आईच्या हातचा गोडवा अधिक असायचा आणि म्हणूनच हे "पोळीचे लाडू " अगदी अजरामर झाले. आजच्या इंटरनेट च्या युगातील मुलांना कदाचित हे माहित सुद्धा  नसतील ,पण असे हे घरगुती पदार्थ खातखातच आम्ही लहानाचे मोठे झालो .

फास्टफूड च्या modern युगात  "पोळीचे लाडू ,फोडणीची पोळी " ह्या संज्ञा विरून गेल्या आहेत .
पण अधून मधून असे पदार्थ करून, ह्या आठवणीना उजाळा देऊन, त्या जतन करून ठेवल्या पाहिजेत . काय वाटते ?

अस्मिता

लेख आवडल्यास  खालील लिंक वरती अभिप्राय जरूर कळवा .

antarnad18@gmail.com



#antarnad #laddu #wheat grain #tasty food #healthy laddu #sweet #diet #Jaggery #receipe

#अंतर्नाद #पोळीचा लाडू #सणवार #मिष्टान्न # आई # चवदार #साजूक तूप #गुळाचा पदार्थ # आधुनिक काळ #शिळी पोळी  #आहार #आरोग्य  #गुळाची स्वादिष्ट पाककृती

Tuesday, 18 June 2019

" बालमोहनची मुले हुशार "

|| श्री स्वामी समर्थ ||



बालमोहनचे सर्वेसर्वा ...कै. परमपूज्य श्री. दादासाहेब रेगे.



बालपणीचा काळ सुखाचा . नुसत्या बालपणीच्या आठवणी आल्या तरी तासंतास आपण त्यात रमून जातो. बालपण म्हंटले कि सर्वप्रथम डोळ्यासमोर आपल्याही नकळत येते ती आपल्या शाळा . आपल्या शालेय जीवनाचा एकंदरीतच आपल्या उर्वरित आयुष्यावर खूपच मोठा पगडा असतो किबहुना आपले आयुष्य घडवण्यात शालेय जीवन , शाळेतील शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये.


आपल्या शाळेला आणि शिक्षकांना आपल्या हृदयात , मनाच्या कोपर्यात खास असे स्थान असते. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शाळेचा उल्लेख जरी झाला तरी कृतज्ञतेने ऊर भरू येतो . शाळेचे दिवस फुलपाखरासारखे असतात, लहान कोवळे , निष्पाप वय असते ते , छक्के पंजे माहित नसतात, २ + २ = ४ हे जितके सोप्पे तितकेच सगळे आयुष्य सोप्पे वाटत असते त्या वयात . ह्या काळात आपल्याला घडवणारे असंख्य हात असतात जसे आई बाबा ,घरातील इतर पण त्यात मोलाची कामगिरी करतात ते आपले शिक्षक.

बालमोहनचे मुख्य प्रवेशद्वार


आज रस्त्यातून जाताना शाळेची बस दिसली. शाळेच्या नव्याकोर्या युनिफोर्म मधील लहानलहान मुले रांगेत बसमध्ये चढत होती ,त्याचसोबत त्यांच्याबरोबर असणार्या पालकांची अनेकविध सूचनांना सलाम ठोकत त्यांचा किलबिलाट सुरु होता. हे सर्व दृश्य नकळत मला भूतकाळाच माझ्या  शाळेत घेऊन गेले. मोरपीसासारखे रंगीबेरंगी दिवस होते ते .माझी शाळा दादरची “ बालमोहन विद्यामंदिर”.कायम अभिमान वाटतो नाव सांगताना. बालमोहन आणि परमपूज्य कै. दादासाहेब रेगे हे एक समीकरण होते. दादांनी आपले सर्व आयुष्य मुलांच्या हितासाठी वेचले. शालेय शिक्षण घेऊन आपल्या ध्येयाकडे झेप घेताना मुले जगाच्या कानाकोपर्यात कुठेही असली तरी त्यांच्या व्यक्तीमत्वातून , आचारविचारातून "बालमोहन " ची ओळख झाली पाहिजे . थोडक्यात मुले हा शाळेचा आरसा असली पाहिजेत . त्यावेळी मुलांना खरोखरच शिक्षकांबद्दल आत्मीयता , तळमळ आणि आदरयुक्त भीती होती.

सामुदायिक प्रार्थना

११ वाजता शाळेची सुरवात प्रार्थनेने होत असे. सर्व आपापल्या जगी उभे राहून प्रार्थना म्हणत असत . उशिरा आलेले सर्व विद्यार्थी खालीच उभे राहून प्रार्थना म्हणून मग आपापल्या वर्गात जात असत . शाळेत एक प्रकारची शिस्त होती पण दशहत नव्हती. शाळेचे वातावरण शिक्षक आणि शाळेविषयी असलेल्या आपुलकीने भारावून गेलेले असायचे.


वरती उल्लेख केल्या प्रमाणे दादासाहेबांचे जातीने सर्वत्र लक्ष्य असायचे. पल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी एक उत्तम माणूस म्हणून घडला पाहिजे आणि शाळेचा उंबरठा ओलांडून बाह्य जगात त्याने आत्मविश्वासाने प्रवेश केला पाहिजे हा त्यांचा मानस असे. त्यावेळी मुले आणि शिक्षक ह्यांचे बंध अगदी घट्ट असायचे. काहीही अडले तर शाळा सुटल्यावर त्या विषयाच्या शिक्षकांना निसंकोच पणे विचारायला मुले कचरत नसत. त्यावेळी वेगळे Academic Counsellor वगैरे असा काही प्रकार नव्हता किबहुना असे शब्दही त्याकाळी प्रचलित नव्हते . 

अद्ययावत  वाचनालय


शिक्षणाशी नाते अगदी Transperant असायचे. अभ्यास केला नाही किंवा गृहपाठ झाला नाही तर पालकांची चिठ्ठी आणणे हा शिरस्ताच होता. अभ्यासातील शिस्तीसोबत मौजमजाही असायची . चैत्र महिन्यात तळमजल्यावरील लहान हॉल मध्ये रांगेत उभे राहून सर्वाना आंबे डाळ आणि पन्हे मिळत असे. कधीतरी शिक्षकांची नजर चुकवून पुन्हा रांगेत उभे राहून काही शूरवीर पुन्हा त्यावर यथेच्छ ताव मारत असत. कलिंगडाची चंद्रकोर सुद्धा मिळत असे

अभिमानास्पद क्षण


आमच्या शाळेला मैदान नसल्यामुळे शारीरिक शिक्षणाचा तास  आमचा शिवाजीपार्क वर होत असे. धावणे आणि अन्य स्पर्धाही तिथेच मोठ्या उत्चाहात पार पडत असत . आमच्या सर्वांचा श्वास असणारी “ वार्षिक सहल ” म्हणजे आनंदाची पर्वणीच असायची. दिवाळीची आणि नाताळची सुट्टी अश्या मोठ्या सुट्ट्या असायच्या पण त्याचसोबत श्रावण महिन्यात कधी कधी अर्धा दिवस सुट्ट्यांची खैरात असायची. दिवाळीच्या सुट्टीत घरचा अभ्यास असायचा . त्यासाठी वेगळी वही करून अभ्यास त्यात तारीख वाराप्रमाणे करून वही छान सजवून आणायची हा नियम असायचा . वर्गातील उत्कृष्ठ वहिला मग बक्षीस असायचे. बक्षीस म्हणून २०० / १०० पानी वहीच असायची पण ते वय इतके निरागस होते कि त्या वयात बक्षीस काय मिळाले आहे त्यापेक्षा मला बक्षीस मिळाले हा आनंद जगजेत्ता झाल्याहून कमी नसायचा.

दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास 


त्यावेळी अगदी अगदी माफक दरात सहली निघत असत जेणेकरून सर्वाना येता यावे. त्या सहलीचे प्लानिंग आमच्या लहानश्या मेंदूत १५ दिवस आधी ठरत असे त्यात अगदी बस मध्ये कुणी कुणासोबत बसायचे आणि कुठले कपडे घालायचे काय खाऊ सोबत न्यायाचा ....एक ना दोन जंगी तयारी असायची. त्या सहलीच्या आठवणी अजूनही मनात घर करून आहेत. काय अविस्मरणीय दिवस होते ते .
शाळेला २ सुट्ट्या असायच्या एक छोटी सुट्टी आणि एक मोठी. कधीकधी गृहपाठ केला नसेल तर मग त्या छोट्या सुट्टीत डबा खावून मोठ्या सुट्टीत गृहपाठ पूर्ण करण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडायचा .
आमच्या शाळेसमोर एक माणूस ज्याला आम्ही “ बुवा ” म्हणायचे तो गाभुळलेल्या चिंचा, बोरे , आवळे ह्याचे दुकान मांडून बसायचा .शाळा सुटल्यावर त्याचे दुकान दिसेनासे होईल इतका मुलांचा घेराव त्याला पडत असे . त्या काळात इतकी महागाई नव्हती त्यामुळे शाळेत अगदी चारआठ आण्याला बटाटा वडा मिळत असे. त्यावेळी CCD वगैरे चैनीचे प्रकार नसत .कधी आम्ही मैत्रिणी ठरवून डबा न आणता शाळेच्या कॅन्टीन मधील पदार्थांवर ताव मारत असू आणि मग  बाहेर जावून सुट्टीत पेप्सीकोला खाणे म्हणजे आमच्यासाठी आनंदोत्सव असायचा. किती लहानलहान गोष्टीत आभाळाइतका आनंद दडलेला असायचा जो आम्ही भरभरून जगलो आणि तो मुठीत आला कि
“ युरेका ” म्हणत आभाळ ठेंगणे व्हायचे.

कमी पैशातील मोठ्ठा आनंद


शाळेत प्रत्येक वर्गात मोठा फळा असायचा आणि त्यावर रोज वर्गातील मुलांची उपस्थिती त्यात मुले किती मुली किती असे विभाजन असायचे . समोर मध्यभागी रोज एक वेगळा सुविचार लिहिला जात असे. प्रत्येक वर्गात एक “ Monitor ” असायचा . बहुतेक वेळा तो वर्गातील हुशार विध्यार्थी / विद्यार्थिनी असे.
आपल्या वर्गातील आपल्या बालगोपाळ मंडळीवर तो दिमाखात चालून हुकमत गाजवत असे. पण ते तितकच असायचे कारण त्या वयात नको ते राजकारण मनास शिवलेले नसायचे त्यामुळे ते सर्वच सुखद होते.


प्रत्येक शाळेत असतो तसा आमच्याही शाळेत गणवेश होता . पण वाढदिवसाच्या दिवशी मात्र ह्या गणवेशाला सुट्टी मिळायची.
वाढदिवसाच्या दिवशी नवीन ड्रेस घातला कि सगळ्या शाळेला कळायचा आपला वाढदिवस .मग पहिल्या तासाला वर्गशिक्षक वाढदिवसाच्या शुभेछ्या देत आणि टाळ्यांच्या गजरात मग सर्व मुलांना गोळ्या ,चोकलेट वाटायचा कार्यक्रम पार पडत असे.

शालेय जीवनातील सोबती..वर्गातील  बाके 



शाळेत बाकावर बसायच्या जागांचीही कधीकधी अदलाबदली होत असे.पण शाळेत सर्व मुलांना सारखीच वागणूक असायची . पैशाच्या , श्रीमंतीच्या , गरिबीच्या ,हुशारीच्या भिंती कधीच आम्हा मुलांमध्ये आल्या नाहीत .शाळेतील नियम सर्वाना सारखेच असायचे , आवडता नावडता हा प्रकार नसायचा . शाळेतील वार्षिक कार्यक्रमही मोठ्या उत्चाहात पार पडत असत. त्यात असणार्या नाटकातून भाग घेणे मग त्यासाठी लागणारी वेशभूषा  ह्या गोष्टी सर्व गोष्टींची जय्यत तयारी असायची . दहीहंडी सारखे सण सुद्धा मुले साजरी करत असत . एकंदरीतच सगळ्याच गोष्टीत शिस्त असली तरी ती हवीहवीशी वाटणारी असायची . तेव्हा प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक हि चैन परवडणारी नव्हती . वर्गशिक्षक २-३ विषय सुद्धा शिकवत असत . एका ओळीत ८ शब्द लिहायचे 9 वा शब्द आला कि तो पुढील ओळीत गेला पाहिजे ,लिहिताना समास सोडला पाहिजे हा शिरस्ता असायचा . आजही लिहिताना  ओळीत 9 वा शब्द आला कि पुढील ओळीत लिहिला जातो इतका खोलवर पगडा मनावर आजही आहे. आपली सर्वच मुले जगात पुढे यावीत आणि एक उत्तम माणूस म्हणून त्यांची ओळख असावी ह्यासाठी शाळेतील शिक्षकांचे योगदान शब्दात मांडता येणार नाही इतके मोठे आहे. त्याकाळात बालमोहनची मुले इतकी टापटीप , शिस्तीत असायची कि गमतीने लोकही “ अरे हा बालमोहन छाप ” दिसतोय असे म्हणत असत. त्या वेळी बालमोहन विद्यामंदिर आणि पार्ले टिळक विद्यालय ह्या दोन शाळा अग्रेसर होत्या . दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कुठल्या शाळेची किती मुले पहिल्या ५० मध्ये आली हि चुरस असायची .


 हि स्पर्धा असली तरी ती “ Healthy Competition ” असायची. वर्ष निघून गेली ,दहावीची परीक्षा झाली . शेवटच्या दिवशी सेन्डोफ झाला तेव्हा क्षणभर बेघर झाल्यासारखे वाटले . शाळेतील शेवटचा दिवस अजूनही आठवतो अगदी तसाच्या तसा. आम्ही सर्व घरी जाताना किती वेळा मागे वळून पाहत होतो . आपला ह्या वास्तुबरोबरचा प्रवास इथवरच होता ह्या विचारांनीही मन बेचैन झाले होते, पण म्हणतात ना “ show must go on ” .शाळा संपली ,एक पर्व संपले . अधून मधून शाळेत एक फेरी व्हायची. जुने शिक्षक भेटले कि त्यांच्या चेहऱ्यावर ओळख दिसायची. पुढे पुढे कार्यबाहुल्यामुळे भेटी कमी होत गेल्या पण शिक्षकांबद्दलचा आणि शाळेविषयीचा आदर किंचितही कमी नाही झाला.बाह्यजगात वावरताना शाळेत झालेले चांगले संस्कार पावलोपावली कामी आले. त्यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरणारी आहे.


जगाच्या कानाकोपर्यात असणार्या बालमोहन च्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा जाज्वल्य अभिमान असणार ह्यात दुमत नाही  
“ मी बालमोहन ची विद्यार्थिनी आहे ” हे सांगताना काय अभिमान वाटतो तो शब्दांकित करता येणे निव्वळ कठीण आहे.  माझ्या मुलासोबातही पुन्हा मी १० वी पर्यंत शाळा जगले पण आमच्या वेळची सर काश्यालाच नाही हे पदोपदी जाणवले. काळासोबत शिक्षण पद्धती बदलत गेल्या ,नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रात रुजल्या , शाळेचा विस्तार झाला . आता आमच्या शाळेत मराठी सोबत इंग्रजी माध्यमातूनही शिक्षण आहे. पण आजही माझ्या डोळ्यांना माझी शाळा पूर्वीसारखीच दिसते आणि दिसत राहील . कधीतरी वाटते आपल्याच वर्गात जावून आपल्या बाकावर थोडावेळ निवांत बसावे. मला खात्री आहे हा लेख प्रत्येक वाचकाला आपल्या शाळेत घेऊन जायील कारण आपल्या सर्वांचेच शाळेशी असणारे बंध अतूट असतात .


आज समाजात वावरताना तसेच कार्यालयाच्या ठिकाणी मिळणारे यश ,सन्मान ह्या सर्वाची नाळ शाळेशी जोडली गेली आहे. आयुष्याने पुढील टप्पा गाठला पण शाळेच्या आठवणी मनात चिरतरुण राहिल्या .शाळेचे आणि शिक्षकांचे योगदान इतके अमूल्य आहे कि कश्यानेही त्याची भरपाई होवूच शकणार नाही .

एक कुटुंब


 “ बालमोहनची मुले हुशार ” असे शब्द कानी पडतात तेव्हा आम्ही सर्व आजी माजी विद्यार्थी  शाळेतील शिक्षकांच्या आणि शाळेसमोर अक्षरशः नतमस्तक होतो.  माझे संपूर्ण व्यक्तिमत्व आणि आयुष्य उत्तम संस्कारांनी समृद्ध करणाऱ्या माझ्या शाळेला आणि सर्व शिक्षकांना ह्या लेखाद्वारे  त्रिवार वंदन.


लेख आवडल्यास जरूर अभिप्राय कळवा.