Showing posts with label अभिप्राय. Show all posts
Showing posts with label अभिप्राय. Show all posts

Friday, 24 July 2020

वाचकांचे अभिप्राय

||श्री स्वामी समर्थ ||


 अभिप्रायाबद्दल मनापासून आभार.


अमित जाधव

श्री स्वामी समर्थ।
आपण पाठवलेला लेख आवडला। माझ्याकडून पण स्वामी महाराज नित्यसेवा करून घ्यायचे। सेवेत एकाग्रता असणे खूप महत्वाचे असते हे समजयलाच खूप वेळ लागला। आजून सुध्दा प्रयत्न चालू आहेत। शेवटी काय करता आणि करविता तूच एक स्वामींनाथा माझिया ठायी वार्ता मी पणाची नसेची।
धन्यवाद आपल्या मार्गदर्शनपर लेखाबद्दल.

उमेश सांगवीकर

प्रारब्ध शुध्दीचे प्रयत्न व परिणाम निरपेक्षतेच्या निकषावर खरे उतरल्यानंतर त्याचे होणारे सुंदर चित्रण किती मनोहर असतं हे चिंतनाने समजले. दान, चिंतन,प्रारब्धशुध्दी, संचित, कर्मानुसारिणी बुध्दी काय परिणाम करते त्यामुळे जीवनसरितेत विहार करताना कोणती शाश्वत शीड आपण पकडावी त्याचा प्रत्यय्य पुन्हा येऊन समाधान वाटले. 

स्मिता ताम्हणकर

लेख सुंदर.आजी ची ,आई ची आठवण आली.माझी आई मुंबईत असून छोट्या जात्यावर मेतकूट, कुळीथ पीठ दळत असे.पाट्यावर चटणी वाटत असे.खलबत्यात कुटलेले दाण्यांचे कुट,लसणीचे तिखट, आंबे डाळ यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.


अस्मिता

अभिप्रायासाठी खालील लिंक वरती click करा.

antarnad18@gmail.com

Thursday, 23 July 2020

सौ. नीना अल्पे काकडे ह्यांचा अभिप्राय

|| श्री स्वामी स्मार्थ ||


सौ. नीना अल्पे काकडे 

अस्मिता , 
      खूप सुंदर...काळजाला खोलवर जाऊन भिडणारं.... माझ्या नशिबानं मी सासर आणि माहेर दोन्ही कडेही एकत्र कुटुंब पद्धती मध्ये वावरले... काळाच्या ओघात माहेरी नोकरी व्यवसायानिमित्त सगळे दूर गेले पण माझं सासर आजही आठ जणांच आहे..... लहानपण खेड्यात गेल्यामुळे चुल....सारवणं...शेणसडा....या जिव्हाळ्याच्या गोष्टी होत्या..... खूप खूप धन्यवाद तुला ..... तू माझं सोनेरी लहानपण पुन्हा जिवंत केलंस.


निनाताई मी आपली मनापासून आभारी आहे.आपल्यासारख्या वाचकांची दाद मला प्रोत्चाहन देते.

धन्यवाद


अस्मिता


antarnad18@gmail.com


अभिप्राय

||श्री स्वामी समर्थ ||





श्री . दिलीप तांबोळकर ,पुणे ह्यांचा "अनुबंध स्वयंपाकघराचे " ह्या लेखावरील अभिप्राय


खरं तर स्वयंपाक घरात घरातील गृहिणीची सत्ता आणि त्या अनुषंगाने तिच्या सत्तेत कुणी घूसखोरी केलेली तिला चालतही नाही आणि कुणी करु पण नये. कारण त्या ठिकाणी त्या गृहिणीचे मन, हितगूज तिचं विश्व दडलेलं असतं. आणि त्यासाठी ती तन मन लावून दिवसभर सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा आणि मन सांभाळत असते अगदी न कुरकुरता. हे घरातील तमाम सभासदांना माहीत असते. सणासुदीला तर घरातील गृहिणीची खरंच लगभग असते. भल्या पहाटे उठून तयारीला सुरुवात होते. घरात होणारे धार्मिक सण आणि हे कुलाचार त्यातली भक्ती आणि ती सात्विकता त्या अन्नात उतरते हे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे तेच ह्याचा आनंद जाणो,...

तसं बघितलं तर रोजचाच कुकर,तेच डाळ तांदूळ,आणि करणारे हात पण तेच पण चव परत रोज ठरवली तरी अशी होत नाही,...

*सात्विक मनाने केलेला स्वयंपाक किती माणसं आले तरी कमी पडत नाही*

आणि हे सगळे मी लहानपणापासून घरात बघत आलो आहे. सुरुवातीला आजी आणि आई.. नंतर आई आणि ताई.. ताई सासरी गेली कि आई आणि सौभाग्यावती.. आता तर आई नाही व सौ पण नाही.. पण बाहेरच अन्न आणून खाण्याच्याऐवजी जसा येईल तसा स्वयंपाक करुन त्या अन्नपूर्णेचा वास घरात टिकून राहण्यासाठी मी पण कंबर कसून तयार होऊ लागलो. नाॅन प्लेईंग कॅप्टन सारखा.. 



मी आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार मानते.

अस्मिता

antarnad18@gmail.com



Tuesday, 21 July 2020

वाचकांचे अभिप्राय

||श्री स्वामी समर्थ ||


सुनील भालेराव

अस्मिता मॅडम आपण पाठविलेला ध्यान साधना या वरल लेख अतिशय सुंदर आहे


सुहास पायगुडे

खूप छान माहिती मिळाली. आयुष्य सुंदर जगण्यासाठी लागणारी एक शिदोरीच मिळाली असे वाटते आहे. मनापासून धन्यवाद.


अभय कोल्हटकर

"श्रावण सोहळा" हा तुझा ब्लाॅग वाचला..

ह्या लेखात तू श्रावण महिन्यातील सर्व धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक सोहळ्यांचे खूप सुंदर व सर्व बारीक सारीक गोष्टींचे, संदर्भांचे वर्णन केले आहेस.. त्या वर्णनामुळे श्रावण महिन्यातील सर्व सण प्रत्यक्ष साजरे करत असल्याचा भास झाला.. तसेच माझं बालपण सुद्धा डोळ्यासमोर आले.. श्रावण महिन्यातील शनिवारी लहानपणी बटु म्हणून आमंत्रण असायचं ..त्या वेळी शनिवारी सकाळी स्नानापासून दुपारच्या पक्वान्नांवर ताव मारेपर्यंत सर्व प्रसंग आठवले.. तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी वाईच्या परिसरातील विविध महादेवाच्या मंदिरात पहाटे उठून जात असू तसेच सरत्या/शेवटच्या सोमवारी भरणारी जत्रा व त्या मध्ये लहानपणी केलेली धमाल पण आठवली.. माझ्या घरातील माझ्या आठवणीतील मंगळागौरीची पूजा पण आठवते...त्या निमित्ताने घरातील सवाष्ण स्रीयांची (आई, काकू, बहिणी) लगबग, धावपळ पण अनुभवायला मिळाली. खरंच श्रावण महिन्यातील या सर्व सणावारांने आपणामध्ये चैतन्य व उर्जा निर्माण होते व त्यावर आपण पुढील कार्यकाळ व्यतित करतो.. ह्या लेखासाठी तुझे आभार, अभिनंदन 💐 व धन्यवाद...


रघुनाथ  पाटील

आपला लेख आवडला, मी हॅपी थॉट्स केले आहे, त्यामुळे आम्ही दररोज साधना करतो


हेमा गायकवाड

खुपच सुंदर आहे लेख.आपल्यामुळे इतकी सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद .


श्रीकांत खाडिलकर

साधना का व कशी करावी----- पदमासनाचा अट्टाहास नसावा,ज्या आसनात सुख वाटेल तेच आसनात बसून साधना करणे जास्त योग्य वाटते,पातंजली ऋषींनी सुद्धा " स्थिरम सुखमासानं " असेच म्हटले आहे. आपल्याला प्रतिक्रिया अपेक्षित आहे म्हणुन मी माझे वैयक्तिक मत दिले आहे .


सुलभा पाटील

I always read your articles on the group n like them..but article about dhan sadhana.. really great n helpful to those who really wants to do sadhana. I always wanted to do dhan sadhana,but due my knee operation I am not able to fold my legs n also can't sit on the floor. You have given a very nice n correct way to do dhan sadhana.but I request you please guide me in my case..how to do dhan sadhana proper way..

अंजली आलेकर

अतिशय साध्या व सोप्या भाषेत ध्यान कसे करावे आणि त्याचे आपल्या धकाधकीच्या जीवनातले त्याचे  महत्व स्पष्ट केले आहे.  ध्यान म्हणजे काय , त्याचे फायदे काय ,  कसे करायचे, ह्यात एकेक स्टेप कसे पुढ जायचे हे अतिशय योग्य आणि सोप्या पद्धतीने सांगितलं आहे . लेखकाची वाचकाबरोबर कनेक्ट होण्याची शैली खूप छान आहे. 


कविता नेहेते 

Khup chan lihile aahe sadhna kashi karavi.maze man nehmich ashant aste, tya sathi me medha vatu ghete. Pan aata tumhi sopya ritine sangitaleli sadhna me karaycha praytna karnar. Khup Dhanyavad

रेखा जोशी

प्रत्येकाने अनुकरण करावे असा बोधपूर्ण लेख. नियमित उपासना व साधनेने समस्या आपोआप सुटतात, मार्ग मिळतो हा माझा अनुभव. 

अश्विनी लोणकर 

खूप छान साधनेवर माहिती दिली मला साधना करायची आहे पण कशी करावी समजत नव्हते ,तुमचा पूर्ण लेख प्रेरणादायी आहे.अजून माहिती मिळाली तर खूप छान.

कृष्णा पाठक

"केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे"...क्या बात है!!!साधना कशी आणि का करावी? साधना केल्याने आपल्या अंतर्मनात कसे सकारात्मक बदल घडून येतात?आजच्या या धकाधकीच्या जीवनात साधना किती आवश्यक आहे? या लेखात आपण खूपच सुंदर आणि सोप्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!











Sunday, 12 July 2020

अभिप्राय

|| श्री स्वामी समर्थ ||






आदरणीय अस्मिता जी, 

सप्रेम नमस्कार !

 ▪️आपल्या ब्लॉगवरील, काही लेख वाचलेत. फेसबूक वरील आपल्या लेखातून,  आपण जेवढ्या कुशलतेने सामाजिक विषय हाताळता आहात,  तेवढ्याच कुशलतेने,  आपणास अध्यात्मिक विषयही हाताळता येतो,  याची प्रचिती,  आपल्याला लेखनावरून आली .
 ▪️अध्यात्मात आहे रुची असणे,  हाही प्राक्तनाचा एक भाग आहे,  असे मी मानतो. प्रत्येकासच ते प्राप्त होईल असे  नाही. 
 ▪️गुरु महात्म्याचा महिमा,  व आपली नितांत  प्रगाढ  श्रद्धा,  प्रत्येक लेखातून व्यक्त होत आहे. 
▪️ वेलीला जसा वृक्षाचा आधार असतो,  किंबहुना, वृक्षाच्या  आधाराशिवाय वेल स्वतःचा,  सहजरित्या विस्तार करूच  शकत नाही, तद्वतच, गुरुश्रद्धा ही मानवी जीवनातील आधार होय,  असे म्हटल्यास वावगे होणार नाही. 
▪️ श्रद्धेतही, निरामय आनंद असतो. जसजशी,  या विषयात,  तन्मयता वाढत जाते,  तसतशी, या आनंदाची अनुभूती ही वाढत जाते. 
▪️ आपल्याकडून, अशीच, गुरु चरणाची अखंडित, सेवा घडो,  ही ईश्वरचरणी प्रार्थना. 
▪️ पुढील वाटचालीस,  आपणास,  सहर्ष शुभेच्छा. 

पुंडलिक दाते, अकोला.

 ज्योतिष अभ्यासक.

Wednesday, 21 March 2018

अभिप्राय


मंडळी ,

         " संवाद " ह्या माझ्या लेखावर श्री. अभिजित भाटलेकर यांनी त्यांचा अभिप्राय दिलाय आपल्यासाठी इथे पोस्ट करत आहे.  श्री. अभिजित यांनी मला अभिप्राय तर दिलाच पण लेखनासाठीही प्रोत्चाहन दिले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

लेख आवडला... संवाद हे टॉनिक आहे हे एकदम मान्य. पण आज मी जिथे तिथे बघतो की भोवतालचे अनेकजण / जणी तोंडाला येईल ते बोलताना दिसतात. त्यांच्याशी गप्पा मारताना, किंवा नुसतं त्यांचं ऐकतानाही, अक्षरशः जागोजाग ठेचा लागल्याचा अनुभव येतो. लागलीच कळतं की ह्या लोकांनी आजवर पुरेसं ऐकलेलं नाही. नुसते बोलताहेत.  (माझा अपवाद आहे, अनेक वर्षांपासून मी खूप सांभाळून बोलतो... जवळपास अनावश्यक होईल इतके सांभाळून बोलतो..ज्याचा मला काहीसा त्रासही होतो) अविचाराने वापरलेला शब्द हे जगातले सर्वात घातक शस्त्र आहे व विचारपूर्वक वापरलेला मोजका शब्द हे अत्यंत गुणकारी औषधही आहे. शब्द चुकीचा वापरल्याने जगात रक्तपात झालेले आहेत, मानवाचं पराकोटीचं नुकसान झालेलं आहे. 
गेल्या पंचवीस वर्षांत मला अशी काही मोजकी माणसं भेटली, की ज्यांचं कुठलंही बोलणं नीट ऐकावं. रघुराम राजन, अजित रानडे, सुकुमार रंगनाथन (माझे माजी संपादक), अंबरीश मिश्रा, जेरी पिंटो , ज्यो मॅकनॅली, डेव्हिड बर्नेट, सेबॅस्टिओ सालगाडो . यांचं ऐकून मला त्यांचे विषय तारा कळलेच पण हेही कळलं की "कसं" बोलावं. थ्री इडियट्स मधला फरहानायट्रेट  आणि प्रीरॅज्यूलायझेशन हा प्रसंग आठवतोय..? त्याच्या शेवटी रँचो सरांना सांगतो, मैं आपको इंजिनिअरिंग नहीं पढा रहा था, मैं आपको ये पढा राहा था कि "पढाते कैसे है". "शिकणं" शिकवणारा , ऐकणं शिकवणारा क्लास कुठेही नाहीये, तो आपला आपल्यालाच घ्यावा लागतो. म्हणूनच मला हे वाटतं की आधी गप्प राहून ऐकणं महत्वाचं आहे. मध्यंतरी वाचलं होतं,  वी हॅव वन माऊथ अँड टू इयर्स , यूज देम इन दॅट प्रपोर्शन.