Showing posts with label वास्तुशास्त्र. Show all posts
Showing posts with label वास्तुशास्त्र. Show all posts

Friday, 31 July 2020

देवघर

||श्री स्वामी समर्थ ||



काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाला भेटण्याचा योग आला.. घरातील देवघराकडे सहज लक्ष्य गेले. मनात असंख्य विचार आले ते तुमच्यासमोर मांडत आहे ...

आपल्या वास्तूत देवघराला अनन्यसाधारण महत्व आहे... घराचे क्षेत्रफळ कसेही असो परंतु घरात देवघर नसेल तर त्या वास्तूत खऱ्या अर्थाने मांगल्य असणार नाही. देवघराचा आकार तसेच ते लाकडाचे कि संगमरवराचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे....पण त्यातील देवाचे स्थान हाच आजचा आपला विषय आहे.

मी ज्या घरी गेले होते तिथे मला अनेक देवांच्या मूर्ती त्यांचे फोटो देवघरात दिसले. अनेक वेळा आपण तीर्थक्षेत्री गेलो कि तिकडची आठवण म्हणून किंवा हौस, आवड म्हणून किंवा त्या देवतेवरील श्रद्धा काहीही म्हणा तेथील मूर्ती ,फोटो घेऊन येतो आणि घरी आल्यावर ती देवघरात ठेवतो. कधी कुणी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती, देवीची फ्रेम, चांदीचे देवांचे चित्र असलेले नाणे देतात आणि आपण ते सरळ देवघरात ठेवतो. अश्या प्रकारे मग एकाच देवघरात एकाच देवतेचे अनेक फोटो, मूर्ती होतात...एकाच घरातील चार व्यक्ती वेगवेगळ्या गुरूंची आराधना करत असतील तर त्या सर्व गुरुंचेही फोटो ,मूर्ती ह्यांचाही समावेश देवघरात असतो ...अश्या देवघराकडे पाहून असे वाटते कि खरच येथील देवांना तेथे मोकळा श्वास तरी घेता येत असेल का? त्यात पुन्हा अनेक देवांच्या मूर्ती एकतर प्रचंड मोठ्या असतात कि मागचे देवच दिसत नाहीत किंवा इतक्या लहान असतात कि अगदी microscope  घेवूनच बघायला लागेल.

बरेचदा विधिपूर्वक प्रतिष्ठापना न करता देवघरात देव ठेवले जातात .घरात भिंतींवर इतरत्रही सद्गुरूंचे किंवा इतर देवांचे फोटो असतात. कधीकधी त्या देवांच्या फ्रेम , आरसे दुभंगलेले असतात...देवघरातील देवांची कित्येक ठिकाणी रोज पूजाही होत नाही आणि झालीच तर देव गुदमरतील आणि त्यांचे मुखही दिसणार नाही इतकी भारंभार फुले त्यांना वाहिलेली असतात. त्या देवतेला ना कधी नेवैद्य दाखवला जात ना कधी त्यांच्या नावाचा जप केला जातो. कित्येक वेळा आपल्या सद्गुरुंची जयंती, पुण्यतिथीहि माहित नसते, हि खेदाची बाब आहे.
आपण स्वतः दिवसभरात निदान एकदा तरी अंघोळ करतोच पण हल्ली बरेच ठिकाणी वेळेअभावी दिवसेंदिवस देवघरातील देवांना पाणी हि लागत नाही. “अहो कुठे वेळ असतो हे सोपस्कार करायला आम्ही आमच्या कामातच परमेश्वर बघतो..”हि उत्तरे ऐकायला मिळतात ...पण मग तसे असेल तर मग घरात देवघर तरी कश्याला हवे ? सांगायचे तात्पर्य जर पूजा व्यवस्थित होत नसेल तर इतके देव देवघरात ठेवण्याचा अट्टाहास कश्याला आणि वंशपरंपरागत असलेले देव देवघरात असतील तर social media वरचा थोडा वेळ कमी करून देवपूजा जरूर करावी त्याने आपलेच आयुष्य सुसह्य आणि सुखकर होईल ह्यात तीळमात्रहि शंका नाही .

 हल्ली अनेक घरात देवांच्या so called antic मूर्ती पाहायला मिळतात आणि निरांजनाच्या ऐवजी zero चा bulb लावलेला असतो. निरांजनाचे कार्य zero चा bulb खरच करेल का? मुलाचे लग्न झाले कि मुलगी सासरी येताना अन्नपूर्णा ,श्री गणेशाची मूर्ती घेवून येते म्हणजे पुन्हा देवघरातील देवांच्या संखेत वाढ ..आजच्या आधुनिक काळात आपली विचारसरणी आणि life style सुद्धा modest झाली आहे ,तेव्हा मुलीने सासरी येताना माहेरून देवांच्या ऐवजी उत्तम संस्कार आणावेत ज्यामुळे तिचाच संसार सुखाचा होईल असे मला वाटते.

पूर्वीच्या काळी “देवघरासाठी” अगदी वेगळी खोलीच असे. तिथे सोवळे पाळले जात असे, पूर्वीचा काळ वेगळाच होता . आताच्या modern युगात सगळ्याच संकल्पना बदलत चालल्या आहेत. कुठलीही जागा घेताना किबहुना ती निश्चित झाल्यावर सर्वसाधारण व्यक्ती on a priority  Interior Designer  ला बोलावते. अर्थातच महिला वर्ग पुढाकार घेवून मग स्वयपाकघर व अन्य खोल्यातील Furniture ची रचना करण्यात गुतून जाते. सर्व सुशोभीकरण झाले कि मग उरलेल्या जागेत निर्विकारपणे एकदाचे त्या परमेश्वराला स्थान मिळते हुश्श.....पण मंडळी ,ज्या विधात्यामुळे आपल्याला ह्या वस्तूचा लाभ होतो आहे त्याचे स्थान वास्तुत सर्वप्रथम निश्चित करणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य आहे, पण आपण त्याबाबतीत उदासीन आहोत..एवढ्यावरच भागत नाही तर त्यात आपल्या अज्ञानाचीही (जे आपल्याला प्रगल्भ ज्ञान वाटते ) भर असते ....बहुतेक वेळी पूर्व पश्चिम किंवा उत्तरदक्षिण देवघर ठेवले जाते .

मंडळी, ईशान्य दिशा हि देवांची दिशा मानली आहे म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील देवघराचे योग्य स्थान इशान्य दिशेस असावे जेणेकरून आपण नमस्कार करताना आपले तोंड ईशान्य दिशेस येयील. परंतु तसे शक्य नसेल तर देवघर हे उत्तरेपासून पुर्वेपर्यंत कुठेही असले तरी चालते. कुठेतरी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात अडगळीत देवघर ठेवू नये . ज्या परमेश्वराने ह्या सृष्टीची निर्मिती केली आहे त्याची दृष्टी अमृततुल्य आहे तेव्हा त्याची दृष्टी कुठे आहे ह्याची काळजी न करता आपली दृष्टी कुठे असणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे.

परमेश्वराचे अस्तित्व अणुरेणूत आहे...जसा भाव तसा प्रत्यय..देवाला आपल्यासारखा संवाद साधता येत नसेल तरी आपल्या चुकांची जाणीव तो आपल्याला करून देतोच देतो. अनेक जाणकारांशी ह्यावर चर्चा करताना  “ चुकीच्या जागेवर असणारे देवघर “ हेच घरातील अनेक समस्यांचे मूळ असल्याचे सांगितले.

आपल्या घरातील देवघर बसवताना त्याचे शास्त्र नीट समजून घ्या. त्यासाठी आपल्या घरातील गुरुजी किंवा जाणकार मंडळींचे मार्गदर्शन घ्या. देवघरात हिंदूंचे आराध्य दैवत ज्याच्या पूजेनेच आपण सर्व गोष्टींचा श्री गणेशा करतो तो श्री गणेश , आपली कुलस्वामिनी , कुलदैवत ,अन्नपूर्णा , गोपालकृष्ण आणि आपले इष्ट दैवत याचा समावेश असावा. देवांच्या मुर्तीही सुबक असाव्यात ,शक्यतो मूर्ती ह्या पंचधातूच्या असाव्यात (त्यात शिसे आणि लोखंड नसावे कारण ते प्रेताचे प्रतिक मानले जाते) परंतु त्याला अमुक एक नियम नाही चांदीच्याही ठेवू शकता पण त्या अगदी लहान किंवा अगदी मोठ्या नसाव्यात. देवघरात देवांच्या मूर्तीची जागा सारखी बदलू नये तसेच देव आसनावर ठेवावेत.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रोज साग्रसंगीत पूजा करायला सगळ्यांनाच वेळ मिळत नाही पण निदान रोज देवांवर हळद कुंकू आणि एखादे फुल धूप दीप उदबत्ती ,घंटानाद आणि एका लहानश्या वाटीत साखर ठेवली ,नित्याची प्रार्थना ,नामस्मरण केले तर देवघराचे मांगल्य तर वाढतेच पण घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. रोजच्या TV वरील तासंतास चालणाऱ्या मालिका साठी जितका वेळ आपण देतो किबहुना त्यापेक्षा कितीतरी कमी वेळ पुजेस लागतो. रोजच्या व्यवहारात आपण घरी येताना ब्रेड –बटर, भाजी , maggi न विसरता आणतो ना तितकाच किबहुना त्याहूनही कमी वेळ पुले आणायला लागतो..

देवांची पूजा शक्यतो प्रातःकाळी मन प्रसन्न ठेवून करावी. आपण देवळात दर्शनाला जातो तेव्हा तेथील देवांची पूजा झालेलीच असते ,नाही का?? तसेच घरातील देवांचेही आहे ..आरामात उठून पेपर वाचन चहा नाश्ता टीव्ही वरील सर्व कार्यक्रम (जे नंतरही पाहता येतात )पाहून त्यानंतर देवांचीं पूजा ,मग ती अगदी साग्रसंगीत का असेना,  केली तर अश्या घरात कालांतराने काय परिस्थिती निर्माण होत असावी याचा विचार न केलेलाच बरा. देवघरातील देवांच्या मूर्तींमध्ये ती देवता आपल्या पूजेने, नामस्मरणाने प्रत्यक्ष वास करू लागते आणि घराला मांगल्य प्राप्त होते...आपण पूजा करत असलेल्या देवतेवर आपली निस्सीम श्रद्धा हवी.

दिवसभरात अनेक जप न करता ठरलेला एकच जप एकाग्रतेने भक्तीने करणे हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. काही लोकांची एकापेक्षा अधिक घरे आहेत त्यांनी ज्या वस्तुत आपण राहत नाही तिथे देवाची मूर्ती न ठेवता शक्यतो फोटो ठेवावा.

तसेच कुठल्याही कारणामुळे घरातील देवांची पूजा व्यवस्थित होत नसेल तर यथाशक्ती त्यांचे विसर्जन करावे .. ज्या देवांचे विसर्जन करायचे आहे त्या मूर्ती ,फोटो पाटावर ठेवून त्यांची धूप दीप नेवैद्य( दही भाताचा) ठेवून पूजा करावी, विसर्जनाचे कारण देवास सांगावे आणि सन्मानाने नेवैद्या सकट वाहत्या पाण्यात (कुठल्यातरी नाल्यात ,माहीमच्या खाडीत नाही) यथाशक्ती विसर्जन करावे.

वर्षातून एकदा आपल्या कुलदेवता व कुलदेवी यांच्या दर्शनास अवश्य जावे व कुळाचार पाळावेत. जेणेकरून आपल्या पुढील पिढीलाही आपले कुलदैवत ,कुलस्वामिनी,गोत्र ह्याची ओळख होईल. घरातील देवपूजा म्हणजे घरातील फक्त वृद्ध माणसांची जबाबदारी नाही आणि ते वेळ घालवण्याचे साधनही त्याहूनही नाही. ”बाबा आता काय तुम्ही retire झाला आहात तेव्हा देवपूजेत वेळ जाईल तुमचा .” ..असे न म्हणता खरतर आजकालच्या तरुण पिढीनेच ती करावी म्हणजे मन शांत एकाग्र राहील आणि दिवसभरातील Stress कधीही Stress वाटणारच नाही. करून तर पहा..रोजची देवपूजा हेच आपले मोठे Fixed Deposite आहे जे अखेरी उपयोगाला येणार आहे .

खरतर , आपण so called option ला टाकलेली देवपूजाच आयुष्याच्या अखेरी आपल्याला तारणार आहे आणि त्याने दिलेले हे दोन हात शेवटी त्याच्याच समोर जोडून नतमस्तक व्हायचे आहे हे विसरू नका. शेवटी काय तर काळ कितीही बदलला तरी पूर्वापार चालत आलेल्या काही संकल्पना ,जसे घरातील देवघर व देवपूजा, ह्याशिवाय आपली वास्तू आणि पर्यायाने आपले आयुष्य हि अपूर्णच राहणार कारण देव आहेत , देव होते आणि देव राहणारच...शुभं भवतु.


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

Wednesday, 22 July 2020

अनुबंध स्वयंपाकघराचे

||श्री स्वामी समर्थ ||  


समस्त स्त्रीवर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील “ स्वयपाकघर ”. आपली नाळ स्वयंपाकघराशी जोडलेली असते .आपला बायकांचा सगळ्यात जास्ती वेळ स्वयंपाकघरात जातो. येथील प्रत्येक गोष्टीत आपला जीव अडकलेला असतो. येथील वस्तू कितीही जुन्या झाल्या तरी त्याची रवानगी अडगळीच्या खोलीत किंवा माळ्यावर होते पण त्या टाकून देणे आपल्यासाठी केवळ अशक्य.

पूर्वी घरे मोठी होती आणि एकत्र कुटुंबे होती त्यामुळे स्वयपाकघरात अनेक पिढ्यातील स्त्रीवर्गाचा वावर असे आणि त्यांचे संसार असत . घरातील प्रत्येक पिढीतील सुना त्यांच्या माहेरूनही काहीना काही भांडी ,घेवून येतातच घरातील स्त्रियाही जितक्या एकोप्याने नांदत नसतील इतक्या स्वयपाकघरातील वस्तू पिढ्यानपिढ्या नांदत. प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली आणि त्या त्या जागी त्या अगदी मानाने राहत असत. जसे मोठी भांडी , हंडे , कळश्या ,पाटे ,जाती ,विळी, रोळी, खलबत्ता ई.

आधुनुकीकरणामुळे विभक्त कुटुंबे जन्माला आली आणि घरातील सामानसुमानही विभागले गेले. स्वयपाक घराचेही विभाजन झाले. बदलत्या काळाबरोबर मनात नसतानाही काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात त्यातलीच हि अपरिहार्य गोष्ट.


पूर्वीच्या काळी कुटुंबे एकत्र नांदत , पहिली पंगत घरातील पुरुष मंडळी आणि लहान मुलांची असे. त्यानंतर स्त्रीवर्ग आणि शेवटी गडीमाणसे. परसात केळी असत त्यामुळे केळीच्या पानावर जेवण वाढले जायचे. लेकीसुना सर्व वाढायला लागायच्या. वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे....म्हणून सुरवात व्हायची. पानात काहीही ठेवायचे नाही हा शिरस्ता असायचा. आग्रहाने वाढणेही व्हायचे आणि चवीने खाणेही .सणासुदीला ह्या पंक्तीना वेगळेच स्वरूप यायचे . केळीची पाने , त्याभोवती रांगोळी , उदबत्यांचा घमघमाट आणि  जिलब्या , मोदक , लाडू , खीरपुरी , पुरणपोळीचा खास बेत असायचा. मोठ्या सुनेच्या हातची खास डाळिंबी उसळ, काकुच्या हातची चवदार कढी, कुणाच्या हातची गरम भाकरी , चटणी अशी प्रत्येकाची खासियत असायची. स्वयपाकघरात कामे विभागली जायची आणि पंगत ठरलेल्या वेळीच व्हायची. त्यावेळी सोवळे खूप असायचे .प्रथम देवांना नेवैद्य मग पंक्तीभोजन होत असे.. प्रातःसमयी अंघोळी करून चूल आणि भोवतालची जमीन सारवणे हा नेम असे. पूर्वीच्या काळी आजकालच्या सारख्या मिक्सर , ओव्हन . अश्या आधुनिक सोयी नसत. जात्यावर धान्य दळणे , पाट्यावर चटण्या , मोठाल्या खलात मसाले कुटणे  ह्या कष्टाच्या कामामुळे स्त्रियांना आपोआपच खूप व्यायाम मिळत असे.  स्वयंपाकघर मोठे असे आणि तिथे घरातील स्त्रियांची आणि कधीतरी घरातील गडी माणसांची मागील दारातून जाये असे. मागील परसातील अळू वगैरे लावलेल्या भाज्या , पुजेची फुले काढून दे, चुलीसाठी लाकडे , झाडावरील नारळ उतरवून सोलून दे अशी सर्व कामे अगदी यंत्रवत होत असत .घरातील स्त्रीला घरातील भांड्याकुंड्यांची व्यवस्थित मोजदात असे. शेजारून काही पदार्थ आला तर त्यात काहीतरी पदार्थ घालूनच ते परत दिले जाई.


तेव्हा Gas च्या शेगड्या नसत. स्वयपाक चुलीवर होत असे आणि त्या चुलीवरच्या स्वयपाकाची चव खास असायची. अंघोळीच्या पाण्यासाठीही बंब असत .विरजण लावलेले ताक घुसळायला मोठे हंडे आणि फडताळाचे कपाट म्हणजे स्वयंपाकघराची खासियत असे. तांब्या पितळ्याची भांडी स्वयपाकघरात असत .आजकाल आपल्याला त्याचे महत्व समजू लागले आहे.  त्याकाळी फ्रीज नव्हते त्यामुळे दुध दुभत्याचे पदार्थ ह्या फडताळात सुरक्षित असायचे. पोतीपोती धान्य येवून धान्याच्या खोलीत पडायचे . धान्य ,भाज्या निवडणे , वर्षाची बेगमीची कामे ,मसाले कुटणे , जात्यावर दळण दळणे अशी कामे करताना घरातील स्त्रिया ओव्या , श्लोक म्हणत असत त्यामुळे घरातील सकारात्मक उर्जा वाढून नको त्या चर्चांना तिलांजली मिळत असे.
घरात अनेक पिढ्या एकत्र नांदत असल्याने अनेक वयोगटाची माणसे असत तरीही एकोपा होता . पूर्वीचा काळच वेगळा होता.
काळाबरोबर संकल्पना बदलल्या , शहरीकरण झाले आणि एकत्र कुटुंबे संपूर्ण नाही पण बर्याच प्रमाणत नामशेष झाली . स्वयंपाक घराचा चेहरा मोहरा बदलला. चुलींची जागा अत्याधुनिक cooking range ने घेतली, पाटे-वरवंटे ,खलबत्ते जावून मिक्सर आले तसेच दळणाची जातीही नामशेष झाली.



स्वयंपाकघर कात टाकून नव्याने सजले .कांदे बटाटे ,लसून ठेवण्यासाठी रंगीबेरंगी छान टोपल्या आल्या तर भांड्यांची रवानगी ट्रोली मध्ये झाली. स्वयपाक घरांच्या भिंती आकर्षक रंग लेऊन दिमाखात उभ्या राहिल्या . सगळ कसे चकाचक झाले. आधुनिकी करणाची छाप प्रत्येक कानाकोपर्यात दिसू लागली. स्त्रीवर्गाचे काम सोप्पे झाले , स्वयंपाक घरे आटोपशीर झाली .
स्वयंपाक घरातील गृहिणीचा वावर हा सर्वाधिक असल्याने तिथे मोकळेपणा आणि सुटसुटीत पणा पाहिजे. प्रत्येक स्वयपाकघरात त्या घरातील गृहिणीचे राज्य असते म्हंटले तर वावगे ठरू नये. तेथील अगदी चहासाखरेचे डबे ठेवण्याची ठिकाणेही ठरलेली असतात. आधुनिक स्वयंपाकघरांना  फ्रीज, ओवन,कुकिंग रेंज,मिक्सर ह्यासारख्या अत्याधुनिक गोष्टींचा साज चढला. ह्या सर्वांमुळे आज स्त्रीवर्गाचे कष्ट आणि वेळ वाचत आहे. जाती , पाटा ,उखळ ,ह्या गोष्टी आता नामशेष झाल्या .पूर्वीसारखे कष्ट ,उठबस कमी झाली आणि त्यामुळे पूर्वीच्या स्त्रियांचा दळणकांडण करताना नैसर्गिक आपोआपच व्यायाम व्हायचा तो आता होत नाही.

नवीन काळात पंक्तीभोजन , भारतीय बैठक घालून यथेछ्य ताव मारणे ह्या गोष्टी आता लोप पावत गेल्या. भारतीय बैठकीची जागा आता टेबलखुर्चीने घेतली. पूर्वी जेवताना म्हटले जाणारे “ वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे.”हे श्लोक आताच्या पिढ्यांना (काही अपवाद वगळता) माहीतसुद्धा नसतील. आता TV बघत जेवणे हेच बर्याचदा पाहायला मिळते. शहरात कार्यालयातून घरी येण्याच्या वेळाही बदलत्या असल्याने सहभोजन सुद्धा नावापुरतेच राहिले.पूर्वी घरचे जेवण ह्याला पर्याय नसे पण आता हॉटेल मध्ये जाऊन जेवले नाही तर आपण “out dated किंवा orthodox” ह्या कॅटेगरीत जाऊन बसतो. चुलीवरची बासुंदी ,भाजी भाकरी हे आता फक्त आठवणीत राहिले. पूर्वीच्या काळी स्त्रिया प्रथम चुलीची पूजा करून चूल पेटवत .अश्या कित्येक गोष्टी आता फक्त गावातच काही ठिकाणी पाहायला मिळतात .


पूर्वी स्त्रिया नोकरी करत नसत त्यामुळे हि सर्व कामे त्यांना दिवसभर पुरत ,पण आता स्त्रीचा बरासचा वेळ बाहेर जात असल्याने मनात असूनही अनेक गोष्टी शक्य होत नाहीत.
खरे सांगायचे तर “ स्वयंपाक घर ” आता “ Modular किचन ” झाले आहे . स्वयंपाकघराची संकल्पना जरी काळानुसार बदलली असली तरी स्त्रियांच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही. 50 -100 वर्षापूर्वीची स्त्रीही स्वयपाकघरात राबत होती आणि आजचीही तेच करते. स्वयंपाक घर हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. घरातील मंडळींच्या मनात शिरण्याचा मार्ग हा पोटातून असतो असे म्हंटले जाते ते उगीच नाही. घरातील स्त्री आनंदी असेल आणि तिने आनंदाने जीव ओतून स्वयंपाकघराची आणि स्वयंपाकाचीही धुरा व्यवस्थित सांभाळली तर घरात सकारात्मक , संतुलित उर्जा प्रवाहित होते, जी घराचे वेगळेपण , सौख्य जपते .अश्या  घराला कधीही कमी पडत नाही. दिवसभर दमून आलेल्या घरातील मंडळी दोन घास खाऊन तृप्त होतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हि घरातील स्त्रीसाठी मोठी पावतीच असते.

स्वयपाकघर जुन्या पद्धतीचे असो अथवा नव्या ,गृह्लक्ष्मीचा तेथील वावर तिथे प्रेमाचे शिंपण करते. स्वयपाकघरातील अगदी लहानसहान गोष्टींशी स्त्रीचे अनुबंध असतात , येथील प्रत्येक गोष्टीत ती अनेक नाती पाहत असते आणि त्यांच्या आठवणीत रमतहि असते .अमुकअमुक गोष्ट माझ्या आईने , काकूने दिली हे सांगताना तिचे डोळे कधी पाणावतात ,तिचे तिलाही उमगत नाही. कितीही आधुनिकीकरण झाले तरी स्वयंपाक घरात वावरणारी स्त्री आजही तितक्याच प्रेमाने सर्वांची उठबस करतेय  .घरातल्या सर्वाना ,आल्या गेलेल्यांना प्रेमाने खाऊ घालणारी गृह्लक्ष्मीच ह्या स्वयंपाक घराला मूर्त स्वरूप देते.

तर असे हे अनेक नाती जपणारे ,”अन्न हे पूर्णब्रम्ह ” म्हणत खाद्य संस्कृतीचा वारसा जपणारे आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या आपल्या पूर्वजांच्या आठवणी ,वारसा ह्जयाना उजाळा देणारे असे हे आपले “ शाही स्वयंपाकघर ” आजही तुमच्या आमच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

अस्मिता 

antarnad18@gmail.com

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

#antarnad #Modular kitchen Decor #women #diet Food #positive vibes  #relations #traditions
#अंतर्नाद #स्वयंपाकघर #घरगुती पदार्थ #स्त्री #सुगरण #स्वयंपाकघराची दिशा #सकारात्मक उर्जा
#बंध #नातीगोती #अन्न हे पूर्णब्रम्ह #परंपरा 



Thursday, 18 June 2020

माझे वास्तुशास्त्र

|| श्री स्वामी समर्थ ||





मंडळी ,अनेक शास्त्रांप्रमाणे वास्तुशास्त्र हेही एक महान शास्त्र आहे आणि त्याचे अभ्यासक हि खूप आहेत. एखाद्याच्या घरात गेले कि आपल्याला एकदम प्रसन्न वाटते मग ते घर लहान अथवा मोठे कसेही असुदेत . पण कधीकधी एखाद्याच्या वास्तूत आपल्याला क्षणभर सुद्धा बसवत नाही ह्याचे कारण तेथील नकारात्मक उर्जा . अशा वास्तूत आपण फार रमत नाही .वास्तू सुशोभित , निटनेटकी असणे गरजेचे आहेच पण त्याहीपेक्षा तिथे सकारत्मक लहरी , स्पंदने असणे त्याहीपेक्षा आवश्यक आहे . वास्तुदोष हा वास्तुत नसून आपल्या कृती आणि विचारामुळे निर्माण होतो. आपली कर्मे आपल्या वास्तुमधील लहरींवर परिणाम करत असते.त्यामुळे वास्तूला दोष देण्यात काहीच अर्थ नाही .

काही घरात माणसे कित्येक पिढ्या रहात असतात. अनेक पिढ्या सुखा समाधानात राहतात ,  अनेकांचे जाणेयेणे असते , पूर्वी सणासुदीला माणसे एकमेकांकडे जातयेत असत .अनेक सोहळे , समारंभ त्या वास्तूने पाहिलेले असतात . पूर्वी काही ठिकाणी मोठी घरे असत आणि एकत्र कुटुंब पद्धतीने लोक अगदी गुण्या गोविंदाने रहात असत . आता आधुनिक काळात ह्या गोष्टींचा ह्रास होताना दिसतो. आपल्या घरात आपल्या पूर्वजांनी अनेक पूजा पाठ , व्रत वैकल्ये केली , ऐश्वर्य उपभोगले त्या वास्तूला जर उतरती कळा लागली तर ती सध्या घरात वावरत असलेल्या माणसांच्या कर्मामुळे  असते, वास्तूचा ह्यात काहीच संबंध नाही . जर वास्तूत काही कारणाने दोष असता तर मग तीच वास्तू इतके अनेक वर्षे मागील पिढ्यांना सुख कशी देवू शकली  हा अभ्यासाचाच विषय होईल नाही का? 
पूर्वी वडिलांच्या नावावर असलेले घर आता तुमच्या नावावर आले आणि घराला उतरती कळा लागली तर स्वतः मधील दोष शोधा वास्तुमधील नाही हे साधे सरळ गणित आहे. 


आपण आपल्या विचारांनी आणि स्वतःच्या कुकर्मांनी आपली वास्तू दूषित करतो. पूर्वी मानवाचे वास्तव्य गुहेत होते . कालांतराने तो झोपडी किंवा कुटी बांधून राहू लागला . आधुनिक काळातील मानवाने दगडविटांच्या पक्क्या घरात रहायला सुरवात केली. 
ह्या वास्तूत त्याची प्रगती जरूर झाली आणि जीवनात आनंद , स्थिरता आली. काही जणांच्या नशिबात स्वतःची वस्तू नसते , अनेकांचे आयुष्य घर करण्यातच खर्ची होते म्हणूनच म्हणतात ना “ घर पाहावे बांधून ” काही जणांना आपल्या आई वडिलांच्या पुण्यायीने वडिलोपार्जित घर मिळते पण स्वतःचे घर नशिबात नसते. अनेकांची घरासाठी ससेहोलपट होते ,तर अनेकांना जीवनाच्या अखेरपर्यंत भाड्याच्या घरात राहावे लागते  आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी जे जतन करून ठेवले आहे ती वास्तू दुषित होवू न देणे हे आपले परम कर्तव्य आहे. 

कुठल्याही वास्तूमध्ये एका रात्रीत वास्तुदोष निर्माण होत नाही . अनेक उलटसुलट गोष्टी वारंवार घडल्याने घरातील पंचभूतांचा समतोल बिघडतो आणि वास्तूत दोष निर्माण होतो. 
आपल्या घरात जर पैसा टिकत नसेल, सौख्य लाभत नसेल , आपल्या कडून देवाचे काहीच होत नसेल , वेळी अवेळी पूजा किंवा व्रत वैकल्ये, कुलाचार होत नसतील , आजारपण किंवा घरात अन्न फुकट जात असेल  , घरातील उपवर मुलामुलींच्या विवाहात अडथळे येत असतील , नोकरी व्यवसाय जेमतेम चालणे , घरातील लहान मुले सतत चिडचिड , वस्तूंची आदळआपट करत असतील , सतत तणाव असेल , सर्व असूनही आनंद नसेल , एकमेकांचे विचार पटत नसतील  तर समजून जायचे कि आपल्या वास्तूत काहीतरी दोष निर्माण झाला आहे. 

आपल्या हातून संतापाच्या भरात वाट्टेल ते बोलले जाते , शिव्याशाप देणे. अभद्र बोलणे ह्या गोष्टी घडतात . आपल्या प्रत्येक कृतीवर वास्तू 

“ तथास्तु “ म्हणत असते, ह्याचे भान असुदे.

मुळात वास्तूमध्ये वास्तुदोष का निर्माण होतात ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्यावर आधुनिकीकरणाचा इतका पगडा असतो कि ह्या गोष्टी समजून घ्याव्यात असे आपल्याला वाटत सुद्धा नाही आणि मग गोष्टींचा अतिरेक झाला कि आपण हजारो रुपये घालून वास्तूपरीक्षण करून घेतो.

आपल्या वास्तूचा मुख्य दरवाजा अमुक अमुक दिशेस आहे, पाण्याची टाकी इथे आहे आणि स्वयपाकघर तिथे आहे म्हणून वास्तू दोष निर्माण झाला ह्याबद्दल चर्चा ऐकू येतात पण हे सर्वप्रथम डोक्यातून काढून टाकले पाहिजे. आज काळ शहरात घरे दाटीवाटीने असतात , आजकाल इमारत बांधताना वास्तुतज्ञांची पण मदत घेतली जाते. घराचे allotment करताना अनेक वादही होतात कारण प्रत्येकाला पूर्व पश्चिम उत्तरेकडचे घर हवे असते पण प्रत्येकाला असे स्वतःच्या पसंतीचे घर मिळणे नेहमीच शक्य नाही . 
दक्षिण दिशेस मुख्य दरवाजा नको कारण ह्या दिशेस दरवाजा उघडणार्या घरात त्रास असतो हे पिढ्यानपिढ्या चाललेले चुकीचे विचार काढून टाकले पाहिजे. दक्षिण , पश्चिम दिशा वाईट हे विचार सर्वप्रथम आपण मनातून हद्दपार केले पाहिजेत . 

अभ्यासासाठी आपण एखद्या इमारतीची रचना बघुया . जिथे काही घरांचे दरवाजे दक्षिणेस उघडतात तर काही पूर्वेस . अभ्यासाअंती असे दिसून येयील कि दक्षिणेकडे दरवाजे उघडणार्या काही घरात त्रास आहे तर काही ठिकाणी अत्यंत भरभराट , आनंद आहे . अगदी तसेच पूर्वेकडे दरवाजा उघडणाऱ्या घरांमध्येही कुठे अत्यंत तापदायक स्थिती तर काही ठिकाणी सुख समृद्धी पाहायला मिळाले. जर दक्षिण दिशा  वाईट असती तर सगळीकडे एकच त्रास अनुभवायला मिळाला असता पण तसे दिसत नाही .
याचाच अर्थ दक्षिण किंवा पश्चिम दिशा वाईट आणि पूर्व किंवा पश्चिम दिशा चांगली असा सरसकट अर्थ आपण काढू शकत नाही ,पटतंय का? 


मंडळी , घराचा मुख्य दरवाजा ज्याला आपण घराचे प्रवेशद्वार म्हणतो त्यास वास्तूशास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे. वास्तूचा हा दरवाजा कुटुंबाचा आरसा असतो. तो घरातील माणसांबद्दल बरेच काही सांगून जातो . 

आजकाल आपण कुठेही गेलो कि काहीतरी विकत आणतोच. एखाद्या प्रदर्शनाला भेट दिली ,तेथे एखादी वस्तू आवडली कि तिचा प्रवेश घरात झालाच म्हणून समजा. त्यासारखी एक वस्तू आधीच आपल्या घरात असते पण म्हणतात न हौसेला मोल नाही . अनेक प्राचीन दुर्मिळ वस्तू मग त्या समया असुदेत कि मोठ्या फुलदाण्या . एक न दोन अनेक गोष्टी घरी आणल्या जातात. सुरवातीला त्याची निगा राखली जाते पण कालांतराने त्यावर धुळीचे साम्राज्य होवून वस्तू असलेल्या जागी वास्तू दोष निर्माण होतो. आपली वास्तू म्हणजे फर्निचर चे दुकान नाही. आवडले कि कुठलीही गोष्ट आपण घरी आणतो , त्याची खर्च गरज नसते. ह्या वस्तू घरात फक्त अडगळ म्हणून राहतात . श्री गणेश किंवा आपले इष्टदैवत ह्यांचे असंख्य फोटो आणि मूर्ती आपल्या घरात असतात . घरात देव्हारा सोडून मूर्ती किंवा फोटो नसावा .

प्रत्येक खोलीत वेगळे घड्याळ असते आणि प्रत्येक घड्याला वेळ मात्र वेगवेगळी दर्शवते .हाही एक दोषच आहे ह्यावरून कुटुंबातील सर्वांची मते वेगवेगळी आहेत असे जाणवते. लग्नाच्या पत्रिका त्या जोडप्यास मुले झाली तरी आपल्या संग्रही असतात, त्या लग्न झाले कि फेकून दिल्या पाहिजेत. खरतर ६ -८ महिने ज्या गोष्टी आपण वापरल्या नाहीत त्या सर्व टाकून दिल्या पाहिजेत. घरातील बंद पडलेल्या वस्तू जसे घड्याळे , टाईप राईटर, मोबाईल अश्या गोष्टी एकत्र चालू करून ठेवा अन्यथा फेकून द्या .

आपल्याला सगळे सतत जमवायची हौस असते. श्री स्वामी समर्थानीही भक्तांना म्हंटले आहे , “ अरे ,किती जमवशील आणि कश्यासाठी हि हाव ..? कारण हे जमवणे म्हणजे अग्नीत तुपाची धार ”.


मंडळी ,घरातील स्वछ्यता, टापटीप , घरात रोज केर काढून जमीन गोमुत्राने अथवा खड्या मिठाने पुसून घेणे , वस्तू जागच्या जागी असणे, स्वयपाकघरातील नीटनेटकेपणा, घरात अन्नाची नासाडी होवू न देणे, घरातील गृहिणीने आनंदाने घरात स्वयपाक करणे, कुटुंबातील कुलाचार यथाशक्ती पार पाडणे, घरात आल्यागेलेल्याचे हसतमुखाने केले जाणारे आदरतिथ्य  ,एकमेकांशी असलेला संवाद , सहकुटुंब भोजन करणे , सकाळ संध्याकाळ वेळेत घरातील देवांची पूजा ,दिवाजवळ दिवा लावणे ह्या सर्व गोष्टींचे पालन म्हणजेच “ घराचे वास्तुशास्त्र ” .

काही घरात गेल्यावर घरात कुबट वास येत असतो तसेच सर्वत्र पसारा असतो . वर्षानुवर्ष तो तसाच असतो , अशी वास्तू काही चांगले फळ देयील हे दुरापास्त आहे .


सर्वात महत्वाचे म्हणजे घराचा मुख्य दरवाजा , प्रवेशद्वार .आजकाल शहरातून आपल्याला अत्यंत आधुनिक पद्धतीची ,सुशोभित घरे आणि त्यांचे दरवाजे पाहायला मिळतात . घराचा दरवाजा कित्येक ठिकाणी खूप जास्ती सजलेला असतो , काय मिळेल ते तिथे लावलेले असते. अनेक प्रकारच्या देवांच्या मूर्ती दरवाज्यावर असतात तार अनेक दिव्यांचा प्रकाशझोत असतात . दरवाज्याच्या दोन्ही बाजूस सुशोभित फुलांची झाडे असतात . घराच्या मुख्य दरवाज्यातून सुख दुख , आनंद , लक्ष्मी अलक्ष्मी ,संकटे ,मानहानी , वैफल्य , नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करत असते . घराचा दरवाजा पुसून उंबरठ्यावर आणि बाहेर सुबक रांगोळी काढणे , आणि संध्याकाळी घराबाहेर तुळस असेल तर तुळशीजवळ दिवा लावणे ह्या गोष्टींमुळे घरात शांतता प्रस्थापित होते , घरातील सकारात्मक लहरींचे प्रमाण वाढते. घराचा उंबरठा आणि दाराची संपूर्ण चौकट एकाच स्वरुपाची असावी , शक्यतो उंबरठा लाकडाचा असावा नसेल तर संपूर्ण चौकट संगमरवर अथवा लाकडाची असावी. घराला दोन दरवाजे असतील तर दोन्ही दरवाजे नीट आसवे, कुठे तुटलेले नसावे,घराचा दरवाजा अलगद लावावा, तसेच घराच्या दारावर  सणासुदीला फुलांचे तोरण बांधावे.पण ते दुसर्या दिवशी काढून टाकावे कारण त्याचे दुसर्या दिवशी निर्माल्य होते. 

काही लोकांकडे सण संपला तरी १५ दिवस काय महिनोंमहिने ते तोरण तसेच असते. घराच्या मुख्य दरवाज्यात कुणाशीही बोलत उभे राहू नये. घराचा दरवाज्यातून काय आत येते ते त्याचा वरती उल्लेख केलाच आहे. त्यामुळे घराच्या मुख्य द्वारात उभे राहून गावगप्पा मरणार्यांच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि आली तर ती टिकत नाही. घरात क्लेश , माणसात दुरावा आणि घरातील माणसाना बरे न होणारे दीर्घ काळचे आजार होवू शकतात . घराच्या दरवाज्यात आतबाहेर गप्पा केल्यामुळे दरवाज्यातच नकारत्मक उर्जा तयार होते आणि त्याचे अत्यंत वाईट परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात . पूर्वीच्या काळी घरातील स्त्रीयांना घराच्या दरवाज्यात येण्यास मज्जाव असे, त्या आतमध्ये स्वयपाकघरात किंवा माजघरात बोलत असत . 
आता तुम्हीच ठरवायचे कसे वागायचे ते. 

घराचा मुख्य दरवाजा कुठल्याही दिशेने उघडत असावा तो वाईट नक्कीच नाही. त्यामुळे त्यात मनात संदेह असू नये. 


दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना
शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा
शुभंकरोती कल्याणम्, शुभंकरोती कल्याणम्
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशांदिशांतुन या लक्ष्मीच्या, दिसती पाउलखुणा
या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळेजीवना
दिव्या-दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार
दिव्यास पाहुन नमस्कार हा, रिवाज आहे जुना




आपल्या वास्तूचा आणि पर्यायाने कुटुंबाचाही उत्कर्ष होण्यासाठी आपण आपली नित्यकर्मे अत्यंत  प्रामाणिक पणे करावीत , योग्य धनसंचय करावा, दारात आलेल्या याचकास विन्मुख जावू देवू नये, आपापल्या परीने  सण साजरे करावेत , घरातील लहान मुलांची दृष्ट काढावी , जमेल तसे यथाशक्ती दान करावे. आपल्या घरातील सकारत्मक उर्जा  आपल्यालाच जागृत ठेवायची आहे.  त्यामुळे आपले घर आपल्या मनातील चांगल्या विचारांनी अभेद्य ठेवावे. ह्या सर्वांमुळे मुलांच्या मनावर आणि एकंदरीत पिढीवर उत्तम संस्कार होतात , घरातील मुलांना चांगले वळण लागेल आणि त्यांना कुठलेही व्यसन लागणार नाही . आपल्या मुलांची उत्तम शिक्षणे होतील. घरात प्रत्येकाने आपल्या कुलस्वामिनीचा आणि इष्टदेवतेचा जप करावा. त्यामुळे घरातील अशुभतेचा नाश होवून सकारात्मकता वाढीस लागते.


घरामध्ये कुठल्याही प्रसंगात जर एखाद्या सवाष्णीचा अपमान झाला  तर तिचा शाप आपले घरदार उध्वस्त करतो. त्यामुळे कुलाचार , हळदीकुंकू असे समारंभ करताना आलेली प्रत्येक स्त्री देवीचे स्वरूप आहे असे मानावे. कुणाला न बोलवून अपमान करू नये कारण अश्याने दुसर्याचे मन दुखावते आणि त्याचा त्रास आपल्या कुटुंबास होतो.
आजकाल आधुनिकीकरणाच्या नावाखाली स्त्रिया बरेच ठिकाणी मासिक धर्म पाळत नाहीत . आपल्या घराण्याच्या रिती , परंपरा आणि मुल्ये जतन करावीत आणि त्याचे पालन करावे . जमत नसेल तर काहीच करू नये पण निदान अश्या चुका करून संकटे ओढवून घेवू नयेत. आपली कर्मे उत्तम करावीत , वास्तूत परनिंदा करू नये . आपल्या प्रत्येक शब्दावर वस्तू तथास्तु म्हणत असते ह्याचे भान ठेवावे. 
मंडळी अश्या अनेक वाईट कृत्यातून हळूहळू वास्तूचे पावित्र्य कमी होत जाते आणि मग वास्तुदोष निर्माण होतो. अनेक गोष्टीं वारंवार घडत गेल्या कि त्याचे नकारात्मक पडसाद आपल्या वास्तूत नाही उमटले तरच नवल.
अत्यंत श्रद्धायुक्त मनाने केलेली देवपूजा , कुलस्वामिनी आणि इष्टदेवतेचे नामस्मरण केले तर ती देवताच आपल्याला संपूर्ण दिवस सांभाळते .संध्याकाळी घरातील मुलांनी TV बघण्यापेक्षा शुभंकरोति म्हणावे . लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयी मुलांचे आयुष्य समृद्ध करतात आणि त्यांना चांगल्या वाईट गोष्टींसाठी ज्ञात करतात .आपल्या घरातील मंडळींनी मोठ्यांचा मान ठेवला तर घरातील लहान मुलेही त्याचे निश्चितपणे अनुकरण करतात . कितीही राग आला तरी घरातील स्त्रियांनी स्वयपाकघरात भांड्यांची आदळआपट करू नये. त्याने काय साध्य होणार आहे? काही घरात दोन पिढ्यात इतका दुरावा असतो कि शेवटी घरातील त्रासाला कंटाळून घरातील वृद्ध मंडळीना वृद्धाश्रमाचा रस्ता धरण्यास पर्याय नसतो. वृद्धाश्रमात कुणी मनापासून जात नाही .त्यांनीच पैपै करून जमवलेला संसार सोडून जाताना त्यांच्या मनाला किती क्लेश होत असतील आणि त्याचा सर्वच परिणाम वास्तूवर होतोच. घरातील शांततेवर विरजण पडते, नात्यातील दरी रुंद होते ,एकमेकांवरील प्रेमाला ओहोटी लागते आणि नकळत वास्तुदोष निर्माण होतो. कधीकधी आयुष्यात येणाऱ्या अनेक कटू प्रसंगामुळे आपण घरात काही अभद्र शब्द वापरतो , घरातील माणसात राग रुसणी होतात त्यात होणार्या शाब्दिक चकमकींचा परिणाम घरातील मुलांवर तसेच वास्तूवर पण होतो . 

कुटुंबातील भाऊबंदकी हेही वास्तु दोषाचे प्रमुख कारण आहे. कधी कधी मुलांचे नोकरी निम्मित्ताने परदेशी वास्तव्य होते किंवा सर्वच जण आपापली वास्तू घेतात . काही कुटुंबात  एकापेक्षा जास्ती मुले असली कि त्यांना आपापली जागा घेवून बाहेर पडावे लागते. एखाद्या अपत्यास आर्थिक विवंचनेमुळे तिथेच राहावे लागते पण हि वास्तू पुढे त्यास आणि त्याच्या कुटुंबास कधीही लाभत नाही . एकतर त्याने ती विकून दुसरीकडे जावे अन्यथा त्याची ठराविक रक्कम भावंडास द्यावी कारण अश्यावेळी भाऊबंदकी आड येते .वरवर उघड कुणी बोलले नाही तरी आज पैसे कुणाला नकोय आणि पैसा कितीही मिळाला तरी तोच दुरावा निर्माण करतो हे कटू सत्य आहे.हि जर आईवडिलांची मूळ जागा असेल तर त्यावर सर्वांचा समान हक्क असतो , आईवडिलांच्या प्रेमापुढे कुणी उघड बोलले नाही तरी मनात हाव असते आणि त्यातून क्लेश निर्माण होतात .एखाद्याला घर मोठे दिले एखाद्याला लहान , अगदी उच्चभ्रू कुटुंबातून देखील हि स्थिती आज पाहायला मिळते.


मंडळी, ज्योतिषशास्त्राचा विचार केलात तर पत्रीकेतील चतुर्थस्थान आणि चतुर्थेश शुभ योगात असेल किंवा त्यावर गुरूची दृष्टी असेल ,शुक्र गुरु आणि मंगळ सुद्धा शुभअसतील, चतुर्थ स्थानाशी निगडीत महादशा असेल तर स्वतःची उत्तम वास्तू होणार ह्यात शंकाच नाही . पण मुळातच स्वतःची वास्तू होण्याचेच योग नसतील तर सर्व व्यर्थ आहे. 

मंडळी घराला खरे घरपण हे घरातील माणसांमुळे येते.

घरातील आनंद , सौख्य एकमेकांबद्दल असणारे प्रेम ,आदर म्हणजेच आपल्या घराचे खरे “ वास्तुशास्त्र ” आहे असे मला वाटते .


लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.
Antarnad18@gmail.com

अस्मिता


  

Monday, 29 July 2019

उंबरठा –प्रतिक मर्यादांचे.


|| श्री स्वामी समर्थ ||







भारतीय संस्कृती मध्ये वास्तुशास्त्रास अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्वीची घरे चौसोपी असत. पुढे ओटी त्यामागे ओसरी ,माजघर ,स्वयपाकघर आणि मागे पडवी अशी प्रशस्त घरे असता . पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरे प्रशस्त असत ,अनेक पिढ्या ह्या घरांच्या छत्र छायेत गुण्यागोविंदाने राहत. आज शहरीकरण झाल्यामुळे गावच्या घरातल्या वास्तव्यास शहरातले लोक पारखे झाले आहेत. पूर्वी घरे शेणाने सारवलेली असत ,अगदी स्वयपाकघरातील चूल सुद्धा . दारासमोर सारवलेल्या जमिनीवर सुबक रांगोळी असे. 

ह्या सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे “ घराचा उंबरठा “. घरातल्या बायका रोज घराचा उंबरठा स्वछ्य पुसून त्यावर रांगोळी काढून त्याला पुजत.
वास्तुशास्त्रात देशील उंबरठा महत्वाचा मानला आहे . घर गावातले असुदे किंवा शहरातील घरास उंबरठा नाही असे घर नाही. आपल्या आणि बाहेरील जगामध्ये उभा ठाकणारा हा उंबरठा. घरात आपली हक्काची नाती असतात ,उंबरठा ओलांडला कि बाह्य जग सुरु होते आणि तिथे आपले कुणी नसते. आपण कितीही रागावलो कसेही वागलो तरी आपल्याला सांभाळून घेणारी माणसे उंबरठ्याच्या आतच असतात हेच जणू त्याला सुचवायचे असावे.

तर घरात प्रवेश करताना ओलांडावा लागणारा हा उंबरठा महत्वाचाच आहे .उंबरठा आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देतो,आपल्या अब्रूचे रक्षण करतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना उंबरठा ओलांडून बाहेर जाण्यास परवानगी नसे . मागील पडवीतून त्यांचे येणे जाणे चालत असे. स्त्रीने उंबरठा ओलांडू नये हि पूर्वापार चालत आलेली रीत.



उंबरा ओलांडलास तर वाकडे पाऊल पडू नये ,आपली अब्रू धुळीस मिळू नये हि त्यामागील भावना . शेतीवर काम करणारी गडीमाणसे इतर कुणीही हा उंबरठा ओलांडून आत येत नसत ,बाहेरील ओसरी ,पडवीत बसून त्यांना गुळपाणी दिले जाई. उंबरठ्याबाहेर चपला सुद्धा वेड्यावाकड्या ठेवू नयेत . घरातून बाहेर जाणर्या आणि येणाऱ्या प्रत्येकाची दाखल जणू हा उंबरठा घेतो त्यामुळे मनास बांध बसतो . कुठलेही वाईट कृत्य करताना आपण हा उंबरठा ओलांडून घरात कसे जाणार हा धाक बसतो . तर अश्या ह्या उंबरठ्यास घराची लक्ष्मण रेषा म्हंटले तर वावगे ठरू नये.
घरात येणाऱ्या पै पाहुण्याची वर्दी आपल्याला सर्वप्रथम उंबराच देतो . आपल्या चांगल्या वाईट सर्वच गोष्टींची दखल उंबरठा घेत असतो . आपले वैभव, समाधान ,चारित्र ,आचार विचार ,वर्तन ,आपल्या मर्यादांचे पालन करा हेच जणू हा उंबरठा मूकपणाने आपल्याला सांगत असतो .

उंबरठा आपल्या घरातील मानसिकतेचेही प्रतिक आहे . घरात कुणी आले तर त्याचे स्वागत आनंदाने करावे. काही घरास हल्ली सेफ्टी डोर असते ,आतील दरवाजा उघडून काहीजण प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर ठेवून दरवाजा उघडतात .अहो काहीतरी काम असल्याशिवाय कोण कश्याला येयील तुमच्याकडे . सर्वांचे आनंदाने स्वागत करा नाहीतर स्वगत करायला कुणी येणारच नाही अशी वेळ नको यायला .वेळीच सावध व्हा. घराला २ दरवाजे आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत . लोकांचा अपमान करायला नाही . घराच्या उंबरठ्यातून आत बाहेर करताना उंबरठ्यावर चुकूनही पाय ठेवू नये तर तो ओलांडून जावा. घरात येणार्या लोकांना आपण तसे सांगावे नाहीतर काहीजण चक्क उंबरठ्यावर चपला घालून पाय ठेवून छान गप्पा मारत उभी राहतात. उंबरठ्याच्या आत बाहेर शेजार्यांची गप्पा मारत तासतास उभे राहणाऱ्या घरांमध्ये नक्कीच आर्थिक समस्या उद्भवणार . तसेच उंबरठ्यावर शिळोप्याच्या गप्पा मारू नये त्यासाठी हि जागा योग्य नाहीच.

तर अश्या ह्या उंबरठ्याचे रोज हळदीकुंकू वाहून पूजन केले पाहिजे.  उंबरा पुसून त्यावर लक्ष्मीची पाऊले( पाऊले आत येणारी असावीत ) . त्यावर रांगोळी घालून उदबत्ती दाखवावी .संध्याकाळी दिवे लागणीस सुद्धा देवाजवळ दिला लावल्यावर उंबरठ्यास ओवाळावे. उंबरठ्या जवळ केर कचरा ठेवू नये .
प्रत्येक चांगल्या गोष्टीस विलंब नको म्हणूनच श्रावण महिन्यापासून ,प्रत्येक घरास घरपण देणाऱ्या ह्या उंबरठ्याचे पूजन करून त्याचा यथाशक्ती मान ठेऊया.  


लेख आवडल्यास जरूर कळवा



antarnad18@gmail.com

Sunday, 6 May 2018

सिंहद्वार अर्थात वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार


 ॥ श्री स्वामी समर्थ॥


 



मंडळी ,
     
       प्रत्येक वास्तूला प्रवेशद्वार असते ,ज्याला आपण घराचा दरवाजा म्हणतो, त्याला वास्तुशास्त्रात अनन्यसाधारण महत्व आहे. शास्त्रात ह्याला “सिंहद्वार “ असेही संबोधले आहे. आज त्याबद्दल काही अधिक माहिती जाणून घेवूया.....

       पूर्वीच्या काळी गावातील घरांना प्रशस्त दरवाजे असायचे. घराला मागील बाजूसही दरवाजा असायचा तेथून मग घरातल्या बायका आणि गडी माणसे यांची ये जा मागील बाजूस असलेल्या विहिरीवरील पाणी काढण्यास , वाळवणे घालण्यास होत असे.

       
हल्लीच्या काळात मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मुळात वास्तुच मिळणे कठीण झाले आहे त्यात मनासारखी वास्तू मिळणे त्याहून कठीण. सर्वसाधारणपणे वास्तू शास्त्राच्या सर्व नियमांचे पालन इच्छा असूनही करू शकत नाही .आता शहरांमध्ये असलेल्या घरांना एकच दरवाजा बघायला मिळतो. बैठे स्वतःचे घर असेल तर क्वचित मागील बाजूस दरवाजा असतो.

       
ज्याप्रमाणे आपण घरात मुख्य दरवाज्यातून प्रवेश करतो ,त्याचप्रमाणे घरात येणारी चांगली वाईट ऊर्जा (Energy) सुद्धा ह्याच दरवाज्यातून आत येत असते. घरात नकारात्मक ऊर्जा आली तर त्याचे परिणाम नुसत्या वास्तुवरच नाही तर तिथे राहणाऱ्या व्यक्तींवर त्यांच्या आरोग्यावरही झालेले दिसून येतात.

        उत्तरेपासून ते पुर्वेपर्यंत कुठेही वास्तूचे प्रवेशद्वार असेल तर त्यातून सकारत्मक ऊर्जा प्रवाहित होते असे शास्त्र सांगते. वास्तूशास्त्राप्रमाणे वास्तूचे प्रवेशद्वार हे पूर्व पश्चिम असावे कि उत्तर दक्षिण हा ह्या लेखाचा विषय नाही आणि मी वास्तू तज्ञ हि नाही. मला रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी नजरेस दिसतात त्याच बद्दल माझे अनुभव मी इथे कथन करणार आहे.

       
घर कसेही असो लहान अथवा मोठे पण घराचे प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजा ह्याबद्दल आपल्यात जागरूकता यावी यासाठी हा लेखन प्रपंच. घराचा दरवाजा सुबक आणि सुशोभित असेल तर घरात येणाऱ्या व्यक्तीस घरात येतानाच प्रसन्न वाटते. घराच्या मुख्य दरवाज्यावर घरमालकाच्या नावाची सुबक अक्षरातील पाटी असावी ,हयात नसलेल्या व्यक्तीचे नाव घरावर असू नये .घराच्या दरवाज्याची चौकट पूर्ण लाकडाची असावी, कारण लाकूड हे उर्जेचे संतुलन राखते. त्यामुळे लाकडाच्या चौकटीतून अधिकाधिक सकारात्मक ऊर्जा घरात येण्यास मदत होते. पण हल्ली अनेक घराच्या चौकटीसाठी संगमरवर हि वापरण्यात येते. घराचा दरवाजा लाकडाचा असावा आणि त्याला कुठलाही भडक रंग न देता शांत रंगांचा उपयोग करावा . दरवाज्यावर रंगांचे फोफडे नसावेत तसेच रंग, दरवाजा फुगलेला नसावा. घरास उंबरठा असणे अतिमहत्वाचे आहे. 
         
      उंबरठा हे आपल्या घराच्या मर्यादेचे प्रतिक आहे . घरात आपलेपणा असतो तर  उंबरठ्याबाहेर बाह्य जग सुरु होते हेच जणू उंबरठा सूचित करत असावा. नवीन घर घेताना घरास उंबरठा आहे कि नाही हे अवश्य पाहावे आणि नसल्यास तो करून घ्यावा तसेच घराचा दरवाजा आतील बाजूस उघडणारा असावा. त्यात तो उजवीकडून डावीकडे उघडणारा असेल तर अतिउत्तम . आजकाल शहरांमध्ये सुरक्षा अतिशय महत्वाची असल्यामुळे घराला बाहेरून एक दरवाजा ज्याला आपण safty door म्हणतो जे बाहेरील बाजूस उघडणारे असते .हे वास्तुशास्त्रास धरून नसले तरी आपल्याला स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही.  

         घराच्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूस कालनिर्णय तत्सम वेळ दर्शवणारी कॅलेंडर तसेच कोपऱ्यात केरसुणी ठेवू नये.  घरात येताना उंबरठा ओलांडून घरात यावे ,कित्येक लोक चपला घालूनच उबरठ्यावर उभे राहून एकतर बोलत तरी असतात नाहीतर उंबरठ्यावर चप्पल,बूट घालून पाय ठेवून येतात.घराच्या आतील बाजूस वरती , गणपतीची ,सद्गुरूंच्या फोटोंची फ्रेम पहायला मिळते ,ती सुद्धा दुभंगलेल्या अवस्थेत. अश्या घरात लक्ष्मी आणि आनंद किती काळ टिकत असेल यावर वेगळे भाष्य न करणेच योग्य.

       
 घरावर बाहेरील बाजूस अनेक देवी देवतांचे फोटो किंवा दक्षिण दिशेस दरवाजा असेल तर पंचमुखी हनुमानाचा फोटो पहायला मिळतो. पण ते वेळोवेळी पुसून चांगल्या स्थितीत ठेवणे हे आपलेच काम नाही का? त्याचबरोबर घराच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूस असणारी तोरणे किंवा दरवाज्यावरील देवांच्या फोटोंवर असणारे विविध decorative दिवे पाहायला मिळतात. हे सर्व जर माफक प्रमाणात आणि सुस्थितीत असेल तर ते खरोखरच सुशोभित दिसते पण उगीच आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडल्यासारखे तिथे भरमसाट गोष्टींची चुकीच्या पद्धतीने केलेली मांडणी ,रचना भडक दिसू शकते. त्यापेक्षा घराचा दरवाजा नीटनेटका, दाराबाहेर सुबक रांगोळी असेल तर घरात येणाऱ्या व्यक्तीस अधिक प्रसन्न वाटेल.

         
घराचा दरवाज्यावर दिवाळीला लावलेले अनेक देवतांचे स्टीकर किंवा तत्सम गोष्टी कालांतराने अर्धवट फाटलेल्या अवस्थेत राहतात त्या पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत तसेच गुढी पाडवा किंवा इतर सणांच्या दिवशी घराच्या दरवाज्यावर लावलेले फुलांचे तोरण, आंब्याचा डहाळा पुढे कित्येक दिवस तसाच असतो . आपण रोज पूजा करताना आदल्या दिवशीची देवावर वाहिलेली फुले काढून ठेवतो आणि त्यालाच “ निर्माल्य” म्हणतो . त्याचप्रमाणे दरवाज्यावरील हे फुलांचे तोरण सुद्धा वेळीच काढून टाकले पाहिजे. घराच्या उंबरठ्यावर तसेच घराबाहेर लहानशी पण सुबक रंगसंगती असलेली रांगोळी काढावी. पूर्वीच्या काळी गावातील घराबाहेर जमीन शेणाने सारवलेली असायची. घरात सरपटणारे प्राणी किडामुंगी ,सर्प येवू नयेत म्हणून घराबाहेर पूर्वीच्या स्त्रिया रांगोळी काढत जेणेकरून ह्या प्राण्यांचा घरात प्रवेश होवू नये. त्याचबरोबर रांगोळी काढल्यामुळे लक्ष्मीचे घरात आगमन होते. प्रत्येक शुभकार्याच्या सुरवातीला गुरुजीही चौरांगाभोवती प्रथम रांगोळीच काढतात हे आपणास माहीतच आहे. दिवाळी, पाडवा, अश्या सणांना तर आवर्जून घरातील स्त्रिया घराबाहेर रांगोळी काढतात.

         
घराच्या दरवाजा जितका सुबक ठेवणे गरजेचे आहे त्याचबरोबर घराचा दरवाजा लावताना आणि उघडताना त्याचा कमीत कमी आवाज होणेही तितकेच गरजेचे आहे. बरेच वेळा घरातील येणारी किंवा जाणारी व्यक्ती रागाच्या भरात जोरात दरवाजा लावते. कालांतराने आपला राग शांत होतो पण वास्तुदोष मात्र नक्कीच निर्माण होतो आणि तोही कायमचा, तसेच दरवाज्यात आलेल्या कुणावरही बोलता बोलता त्याच्या तोंडावर दरवाजा लावणे ह्यासारखे दुसरे पाप नाही कारण परमेश्वर कुणाच्याही रुपात आपल्या वास्तूत प्रवेश करत असतो आणि तो आपल्या हाडामासाच्या माणसातच आहे. त्याला ओळखण्याची कुवत आपल्या पामारांमध्ये नाही त्यामुळे घरातील मूर्तीपूजा जितकी सद्भावनेने कराल तितक्याच प्रेमाने घरात येणाऱ्या प्रत्येकाचे आनंदाने स्वागत करावे तरच हि वास्तुदेवता प्रसन्न होईल,नाहीतर सर्व व्यर्थ आहे. घराच्या दरवाज्यात उभे राहून आतबाहेर गप्पा मारणे आणि तेही नको त्या विषयावर हेही वर्ज करावे कारण त्यामुळे वास्तुच्या प्रवेशद्वारावरच नकारात्मक ऊर्जा तयार होवून दोष निर्माण होतो. पुढे हीच  नकारात्मक ऊर्जा घरात येते आणि परिणामी कालांतराने घरातील व्यक्तीस मोठे आजारपण, पैशाचा ओघ कमी होणे ह्या गोष्टींची प्रचीती अनुभवयास मिळते. सुख दुखःच्या गोष्टी घरात बसून जरूर कराव्यात पण घराचा उंबरठा हे शिळोप्याच्या गप्पा मारण्याचे ठिकाण नक्कीच नाही.
           
            मंडळी, ह्या लेखात आज वास्तूच्या प्रवेशद्वाराबद्दल लिहिताना आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो “शनी शिंगणापूर” चा ,जिथे कुठेही घराला दरवाजे दिसणार नाहीत. कुठेही चोरी किंवा तत्सम घटना घडत नाहीत इतकी शनी महाराजांची कृपा तिथे आहे.

            पूर्वीच्या काळी घरात येणाऱ्या व्यक्तीस काहीही कारणाने उशीर झाला तर ती लवकर  यावी म्हणून घरातील स्त्रिया उंबरठ्यावर भांडे उपडे घालत असत किंवा घरातील मुख्य दरवाज्यास कोयंडात लोखंडी कालथा घालून ठेवत असत, जेणेकरून घराबाहेर गेलेली व्यक्ती घरी लवकर परतावी.
मुंबई पुण्यासारख्या शहरातून अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे आपली वास्तू मिळणे भाग्याचेच लक्षण आहे. आपण नेहमी ऐकतो , “ माझे घर ५०० -१००० square feet चे आहे ” , खर सांगायचे तर आपल्याला राहायला ३ बाय ६ इतकीच जागा लागते उरलेल्या जागेत असतो तो आपला अहंकार ,दुर्दैवाने आपल्या घराच्या क्षेत्रफळ पाहून आपल्याशी हितसंबंध जोडणारे so called हितचिंतक बरेच असतात,  असे आपल्या घरात तर प्रवेश करतील पण आपल्या हृदयात प्रवेश करू शकणार नाहीत, असो.            
             

          
           
            मंडळी , आपले राहते घर मग ते पूर्व पश्चिम ,उत्तर दक्षिण कसेही असावे घरात आनंद ,लक्ष्मी, मांगल्य आणणारे प्रवेशद्वार अबाधित, सुबक , आकर्षक ,प्रसन्न असेल त्याचबरोबर घरातील देवपूजा , सकाळ संध्याकाळ घरात केलेला घंटानाद, स्वछ्यता, घरात वेळोवेळी पाळले जाणारे कुलाचार, घरातील आनंदी वातावरण तसेच घरात येणाऱ्या प्रत्येकाचे आनंदाने केलेले स्वागत आपली वास्तूच काय तर आपले संपूर्ण जीवन आनंदाने उजळून टाकेल यात शंकाच नाही.

अभिप्रायासाठी संपर्क साधा खाली दिलेल्या संकेत स्थळावर

antarnad18@gmail.com

https://www.facebook.com/antarnad18/



Sunday, 8 April 2018

देवघरातील देवांना घेऊदे मोकळा श्वास..


 ॥ श्री स्वामी समर्थ॥




         देवघरातील देवांना घेऊदे मोकळा श्वास...



काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाला भेटण्याचा योग आला.. घरातील देवघराकडे सहज लक्ष्य गेले. मनात असंख्य विचार आले ते तुमच्यासमोर मांडत आहे ...
       आपल्या वास्तूत देवघराला अनन्यसाधारण महत्व आहे... घराचे क्षेत्रफळ कसेही असो परंतु घरात देवघर नसेल तर त्या वास्तूत खऱ्या अर्थाने मांगल्य असणार नाही. देवघराचा आकार तसेच ते लाकडाचे कि संगमरवराचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे....पण त्यातील देवाचे स्थान हाच आजचा आपला विषय आहे.
        मी ज्या घरी गेले होते तिथे मला अनेक देवांच्या मूर्ती त्यांचे फोटो देवघरात दिसले. अनेक वेळा आपण तीर्थक्षेत्री गेलो कि तिकडची आठवण म्हणून किंवा हौस, आवड म्हणून किंवा त्या देवतेवरील श्रद्धा काहीही म्हणा तेथील मूर्ती ,फोटो घेऊन येतो आणि घरी आल्यावर ती देवघरात ठेवतो. कधी कुणी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती, देवीची फ्रेम, चांदीचे देवांचे चित्र असलेले नाणे देतात आणि आपण ते सरळ देवघरात ठेवतो. अश्या प्रकारे मग एकाच देवघरात एकाच देवतेचे अनेक फोटो, मूर्ती होतात...एकाच घरातील चार व्यक्ती वेगवेगळ्या गुरूंची आराधना करत असतील तर त्या सर्व गुरुंचेही फोटो ,मूर्ती ह्यांचाही समावेश देवघरात असतो ...अश्या देवघराकडे पाहून असे वाटते कि खरच येथील देवांना तेथे मोकळा श्वास तरी घेता येत असेल का? त्यात पुन्हा अनेक देवांच्या मूर्ती एकतर प्रचंड मोठ्या असतात कि मागचे देवच दिसत नाहीत किंवा इतक्या लहान असतात कि अगदी microscope  घेवूनच बघायला लागेल.
         बरेचदा विधिपूर्वक प्रतिष्ठापना न करता  देवघरात देव ठेवले जातात .घरात भिंतींवर इतरत्रही सद्गुरूंचे किंवा इतर देवांचे फोटो असतात. कधीकधी त्या देवांच्या फ्रेम , आरसे दुभंगलेले असतात...देवघरातील देवांची कित्येक ठिकाणी रोज पूजाही होत नाही आणि झालीच तर देव गुदमरतील आणि त्यांचे मुखही दिसणार नाही इतकी भारंभार फुले त्यांना वाहिलेली असतात. त्या देवतेला ना कधी नेवैद्य दाखवला जात ना कधी त्यांच्या नावाचा जप केला जातो. कित्येक वेळा आपल्या सद्गुरुंची जयंती, पुण्यतिथीहि माहित नसते, हि खेदाची बाब आहे.
         आपण स्वतः दिवसभरात निदान एकदा तरी अंघोळ करतोच पण हल्ली बरेच ठिकाणी वेळेअभावी दिवसेंदिवस देवघरातील देवांना पाणी हि लागत नाही. “अहो कुठे वेळ असतो हे सोपस्कार करायला आम्ही आमच्या कामातच परमेश्वर बघतो..”हि उत्तरे ऐकायला मिळतात ...पण मग तसे असेल तर मग घरात देवघर तरी कश्याला हवे ? सांगायचे तात्पर्य जर पूजा व्यवस्थित होत नसेल तर इतके देव देवघरात ठेवण्याचा अट्टाहास कश्याला आणि वंशपरंपरागत असलेले देव देवघरात असतील तर social media वरचा थोडा वेळ कमी करून देवपूजा जरूर करावी त्याने आपलेच आयुष्य सुसह्य आणि सुखकर होईल ह्यात तीळमात्रहि शंका नाही . हल्ली अनेक घरात देवांच्या so called antic मूर्ती पाहायला मिळतात आणि निरांजनाच्या ऐवजी zero चा bulb लावलेला असतो.  निरांजनाचे कार्य zero चा bulb खरच करेल का? मुलाचे लग्न झाले कि मुलगी सासरी येताना अन्नपूर्णा ,श्री गणेशाची मूर्ती घेवून येते म्हणजे पुन्हा देवघरातील देवांच्या संखेत वाढ ..आजच्या आधुनिक काळात आपली विचारसरणी आणि life style सुद्धा modest झाली आहे ,तेव्हा मुलीने सासरी येताना माहेरून देवांच्या ऐवजी उत्तम संस्कार आणावेत ज्यामुळे तिचाच संसार सुखाचा होईल असे मला वाटते.
             पूर्वीच्या काळी “देवघरासाठी” अगदी वेगळी खोलीच असे. तिथे सोवळे पाळले जात असे, पूर्वीचा काळ वेगळाच होता . आताच्या modern युगात सगळ्याच संकल्पना बदलत चालल्या आहेत. कुठलीही जागा घेताना किबहुना ती निश्चित झाल्यावर सर्वसाधारण व्यक्ती on a priority  Interior Designer  ला बोलावते. अर्थातच महिला वर्ग पुढाकार घेवून मग स्वयपाकघर व अन्य खोल्यातील Furniture ची रचना करण्यात गुतून जाते. सर्व सुशोभीकरण झाले कि मग उरलेल्या जागेत निर्विकारपणे एकदाचे त्या परमेश्वराला स्थान मिळते हुश्श.....पण मंडळी ,ज्या विधात्यामुळे आपल्याला ह्या वस्तूचा लाभ होतो आहे त्याचे स्थान वास्तुत सर्वप्रथम निश्चित करणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य आहे, पण आपण त्याबाबतीत उदासीन आहोत..एवढ्यावरच भागत नाही तर त्यात आपल्या अज्ञानाचीही (जे आपल्याला प्रगल्भ ज्ञान वाटते ) भर असते ....बहुतेक वेळी पूर्व पश्चिम किंवा उत्तरदक्षिण देवघर ठेवले जाते .
              मंडळी, ईशान्य दिशा हि देवांची दिशा मानली आहे म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील देवघराचे योग्य स्थान इशान्य दिशेस असावे जेणेकरून आपण नमस्कार करताना आपले तोंड ईशान्य दिशेस येयील. परंतु तसे शक्य नसेल तर  देवघर हे उत्तरेपासून  पुर्वेपर्यंत कुठेही असले तरी चालते. कुठेतरी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात अडगळीत देवघर ठेवू नये . ज्या परमेश्वराने ह्या सृष्टीची निर्मिती केली आहे त्याची दृष्टी अमृततुल्य आहे तेव्हा त्याची दृष्टी कुठे आहे ह्याची काळजी न करता आपली दृष्टी कुठे असणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे.
                     परमेश्वराचे अस्तित्व अणुरेणूत आहे...जसा भाव तसा प्रत्यय..देवाला आपल्यासारखा संवाद साधता येत नसेल तरी आपल्या चुकांची जाणीव तो आपल्याला करून देतोच देतो. अनेक जाणकारांशी ह्यावर चर्चा करताना  “ चुकीच्या जागेवर असणारे देवघर “ हेच घरातील अनेक समस्यांचे मूळ असल्याचे सांगितले.
                     आपल्या घरातील देवघर बसवताना त्याचे शास्त्र नीट समजून घ्या. त्यासाठी आपल्या घरातील गुरुजी किंवा जाणकार मंडळींचे मार्गदर्शन घ्या. देवघरात हिंदूंचे आराध्य दैवत ज्याच्या पूजेनेच आपण सर्व गोष्टींचा श्री गणेशा करतो तो श्री गणेश , आपली कुलस्वामिनी , कुलदैवत ,अन्नपूर्णा , गोपालकृष्ण आणि आपले इष्ट दैवत याचा समावेश असावा. देवांच्या मुर्तीही सुबक असाव्यात ,शक्यतो मूर्ती ह्या पंचधातूच्या असाव्यात (त्यात शिसे आणि लोखंड नसावे कारण ते प्रेताचे प्रतिक मानले जाते) परंतु त्याला अमुक एक नियम नाही चांदीच्याही ठेवू शकता पण त्या अगदी लहान किंवा अगदी मोठ्या नसाव्यात. देवघरात देवांच्या मूर्तीची जागा सारखी बदलू नये तसेच देव आसनावर ठेवावेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रोज साग्रसंगीत पूजा करायला सगळ्यांनाच वेळ मिळत नाही पण निदान रोज देवांवर हळद कुंकू आणि एखादे फुल धूप दीप उदबत्ती ,घंटानाद आणि एका लहानश्या वाटीत साखर ठेवली ,नित्याची प्रार्थना ,नामस्मरण केले तर देवघराचे मांगल्य तर वाढतेच पण घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. रोजच्या TV वरील तासंतास चालणाऱ्या मालिका साठी जितका वेळ आपण देतो किबहुना त्यापेक्षा कितीतरी कमी वेळ पुजेस लागतो. रोजच्या व्यवहारात आपण घरी येताना ब्रेड –बटर, भाजी , maggi न विसरता आणतो ना तितकाच किबहुना त्याहूनही कमी वेळ पुले आणायला लागतो..
               देवांची पूजा शक्यतो प्रातःकाळी मन प्रसन्न ठेवून करावी.  आपण देवळात दर्शनाला जातो तेव्हा तेथील देवांची पूजा झालेलीच असते ,नाही का?? तसेच घरातील देवांचेही आहे ..आरामात उठून पेपर वाचन चहा नाश्ता टीव्ही वरील सर्व कार्यक्रम (जे नंतरही पाहता येतात )पाहून त्यानंतर देवांचीं पूजा ,मग ती अगदी साग्रसंगीत का असेना,  केली तर अश्या घरात कालांतराने काय परिस्थिती निर्माण होत असावी याचा विचार न केलेलाच बरा. देवघरातील देवांच्या मूर्तींमध्ये ती देवता आपल्या पूजेने, नामस्मरणाने प्रत्यक्ष वास करू लागते आणि घराला मांगल्य प्राप्त होते...आपण पूजा करत असलेल्या देवतेवर आपली निस्सीम श्रद्धा हवी. दिवसभरात अनेक जप न करता ठरलेला एकच जप एकाग्रतेने भक्तीने करणे हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. काही लोकांची एकापेक्षा अधिक घरे आहेत त्यांनी ज्या वस्तुत आपण राहत नाही तिथे देवाची मूर्ती न ठेवता शक्यतो फोटो ठेवावा.
               तसेच कुठल्याही कारणामुळे घरातील देवांची पूजा व्यवस्थित होत नसेल तर यथाशक्ती त्यांचे विसर्जन करावे .. ज्या देवांचे विसर्जन करायचे आहे त्या मूर्ती ,फोटो पाटावर ठेवून त्यांची धूप दीप नेवैद्य( दही भाताचा) ठेवून पूजा करावी, विसर्जनाचे कारण देवास सांगावे आणि सन्मानाने नेवैद्या सकट वाहत्या पाण्यात (कुठल्यातरी नाल्यात ,माहीमच्या खाडीत नाही) यथाशक्ती विसर्जन करावे.
          
 वर्षातून एकदा आपल्या कुलदेवता व कुलदेवी यांच्या दर्शनास अवश्य जावे व कुळाचार पाळावेत. जेणेकरून आपल्या पुढील पिढीलाही आपले कुलदैवत ,कुलस्वामिनी,गोत्र ह्याची ओळख होईल. घरातील देवपूजा म्हणजे घरातील फक्त वृद्ध माणसांची जबाबदारी नाही आणि ते वेळ घालवण्याचे साधनही त्याहूनही नाही. ”बाबा आता काय तुम्ही retire झाला आहात तेव्हा देवपूजेत वेळ जाईल तुमचा .” ..असे न म्हणता खरतर आजकालच्या तरुण पिढीनेच ती करावी म्हणजे मन शांत एकाग्र राहील आणि दिवसभरातील Stress कधीही Stress वाटणारच नाही. करून तर पहा..रोजची देवपूजा हेच आपले मोठे Fixed Deposite आहे जे अखेरी उपयोगाला येणार आहे .
              
                खरतर , आपण so called option ला टाकलेली देवपूजाच आयुष्याच्या अखेरी आपल्याला तारणार आहे आणि त्याने दिलेले हे दोन हात शेवटी त्याच्याच समोर जोडून नतमस्तक व्हायचे आहे हे विसरू नका. शेवटी काय तर काळ कितीही बदलला तरी पूर्वापार चालत आलेल्या काही संकल्पना ,जसे घरातील देवघर व देवपूजा, ह्याशिवाय आपली वास्तू आणि पर्यायाने आपले आयुष्य हि अपूर्णच राहणार कारण देव आहेत , देव होते आणि देव राहणारच...शुभं भवतु. 

अभिप्रायासाठी

https://www.facebook.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6-350841195427839/?ref=bookmarks


OR

antarnad18@gmail.com