Showing posts with label समुपदेशन. Show all posts
Showing posts with label समुपदेशन. Show all posts

Monday, 21 September 2020

Keys For Your Happiness....

||श्री स्वामी समर्थ ||



मनुष्य सतत शोधात असतो ती मनाची शांतता.सर्व काही असूनही कधीकधी मन शांत नसणे हेच तर प्रारब्ध भोग. प्रापंचिक जीवनातून उसंत मिळणे कठीण त्यामुळे इच्छा असूनही परमार्थाची कास धरता येतेच असे नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आयुष्यभर झगडावे लागते .म्हणतात ना " There is no free lunch on the Earth " .अगदी मुलांच्या शाळेतल्या प्रवेशापासून ते पुढे उच्च शिक्षण , नोकरी , धंदा व्यवसाय , प्रपंच एक ना दोन ..ह्या स्पर्धात्मक युगात कितीही करा यश कधीतरी दुरापास्त होवून जाते आणि जीव थकून जातो.

मंडळी पण ह्या सर्वासाठी एक लहानसा उपाय आहे पहा जमल्यास नक्की करून बघा ,अगदी सोप्पा आणि बिनखर्चाचा आहे आणि अखंड यश देणारा सुद्धा.

आपण सर्वच बँकेचे व्यवहार करतो आणि आपले बँकेत लॉकर सुद्धा असतात .आपण त्या लॉकर ला आपली चावी लावतो पण जोवर बँकेच्या अधिकार्याची चावी त्यास लागत नाही तोवर तो उघडत नाही . दोन्ही चाव्या लावल्या कि सहज उघडतो. अगदी हेच सूत्र आपल्या आयुष्याशी निगडीत आहे .आपल्या प्रयत्नांची एक चावी पण आपल्या उपासनेची ,नामस्मरणाची दुसरी चावी आहे.

आपण ह्या दोन्ही चाव्या लावल्या तर नशिबाचे ,आयुष्यातील सर्व इच्छा आकांक्षा ,आनंद द्विगुणीत करणारे द्वार अगदी सहज उघडेल ,नाही का?

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

Monday, 7 September 2020

बॅड पॅच

|| श्री स्वामी समर्थ ||




खूप वेळा शांत असलेल्या पाण्यात अचानक तरंग उठावे ,निरभ्र आकाश अचानक ढगाळ व्हावे अगदी तस्सेच आपल्याही आयुष्यात होते . सगळे काही सुरळीत चाललेले असताना अचानक एखादी विलक्षण घटना घडते ज्यामुळे आपले संपूर्ण आयुष्याच बदलून जाते .

मग त्या वेळेला आपण "बॅड पॅच" म्हणू किंवा तत्सम काहीही. पण ती वेळ प्रत्येक जण कधी न कधीतरी अनुभवत असतोच परमेश्वर सारखा काही आपल्याला रडवत नाही असे लहानपणी आजी गोष्टी सांगताना म्हणायची. आपले संचित, क्रीयामाण आणि प्रारब्ध ह्यातून आपली सुटका नाही हेच खरे.

पण अश्या ह्या वेळी कुठल्याही परिस्थितीत निराश न होता ,अत्यंत संयमाने त्या परिस्थितीचा सामना करून त्यातून मार्ग काढून पुन्हा आयुष्य मार्गस्थ करणे ह्यासाठी आत्मविश्वास ,मनाची एकाग्रता ,परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केलेला अभ्यास आणि त्यानुसार घेतले गेलेले योग्य निर्णय गरजेचे असतात .

परवा Youtube वरती आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची एक मुलाखत पाहताना मनात असंख्य विचारांनी गर्दी केली होती. त्यांच्याही आयुष्यात असे अनेक चढउतार आले पण त्यांच्या ABCL ह्या कंपनीसाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय फसल्यावर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला ज्या गोष्टीना सामोरे जायला लागले त्याचे इतके हृद्यद्रावक विश्लेषण त्यांनी त्या प्रगट मुलाखतीत केले आहे कि ऐकत राहावे

कलेचा आणि साहित्याचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. अमिताभ बचन हे फक्त एक कलाकार नसून उत्तम वक्ते हि आहेत हे वेगळे सांगणे न लगे,अफाट वाचन ,बुद्धिमत्ता आणि त्यांचे प्रत्येक भाषेवर असलेले प्रभुत्व त्यांच्या वाणीतून ,लिखाणातून प्रत्ययास येते .सामान्य माणसावर आलेली हि परिस्थिती आणि सभोवताली लोकप्रियतेचे प्रचंड वलय असणार्या अश्या महानायकास अश्या अपयशाला सामोरे जाणे खचितच सोपे नाही . 

त्यांनी त्यावेळी असलेल्या भावना कमीतकमी शब्दात आपल्यापर्यंत इतक्या सहजतेने पोचवल्या आहेत ,अर्थात हेच त्यांचे वक्ता म्हणून कौशल्य आहे. त्यातील त्यांचा एक भाग आवर्जून सांगावासा वाटतो .त्याचबरोबर त्यांचे अत्यंत नम्र, मृदू बोलणे, बोलण्याची लकब, शब्दसंपदा ,हावभाव क्षणात समोरच्याला आपलेसे करून टाकतात. प्रगत मुलाखतीतील एक भाग आवर्जून सांगावासा वाटतो ,जेव्हा मला ABCL मुळे प्रचंड कर्ज झाले त्यावेळी मला सगळीकडूनच अपयश आले हे सांगताना ते म्हणतात एखाद्या गोष्टीत अपयश आले तर इतर कुठलीही गोष्ट करण्यास आपण समर्थ नाही असेच लोकांना वाटू लागते ,मी कर्जबाजारी झालो त्याचबरोबर मी एक उत्तम कलाकार नाही आणि चांगला माणूसही नाही असाच सर्वांचा दृष्टीकोण झाला आणि मला काम मिळाले नाही. कालांतराने श्री यश चोप्रा ह्यांच्या " मोहब्बते" ह्या चित्रपटाने त्यांचे पुनरागमन झाले .
 परंतु त्या काळातील सर्वच आठवणी त्यांना अस्वस्थ करणाऱ्या होत्या ,जवळच्या लोकांचे बदललेले चेहरे , शाब्दिक जखमा त्यांचे मन रक्तबंबाळ करून गेल्या...ह्या सर्व परिस्थितीवर मात करून आज फिनिक्स पक्षाप्रमाणे उंचच उंच उभारी घेवून पूर्वीच्याच ताकदीने ते आजही काम काम करत आहेत हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे .आयुष्यात खरतर पूर्वीपेक्षाही जास्ती यश तेही थोडक्या कालावधीत त्यांनी पुन्हा संपादन केले आहे. त्यावेळी झालेल्या चुकांमधून मी खूप शिकलो हि प्रांजळ कबुली त्यांनी दिली ...माणसे मोठी का होतात हे त्यांच्याकडे पहिले कि समजते....अमिताभ बच्चन यांचा वीर संघवी यांनी घेतलेली मुलाखत प्रेरणा देवून जाते ह्यात दुमत नसावे ..

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय द्यायला विसरू नका
antarnad18@gmail.com



#antarnad # bad patch #emotions #Loan #Depression #anxiety #lowfeel #bad mood #life #bad words
#अंतर्नाद #बॅड पॅच #मनातील भाव #कर्ज #मनाची अवस्था #चिंता #कमकुवत मन #वाईट शब्द प्रयोग #अपयश #वलय

Thursday, 13 August 2020

Interview Tips

|| श्री स्वामी समर्थ ||



शिक्षण पूर्ण झाले कि वेध लागतात ते नोकरीचे. नोकरीसाठीची पहिली पायरी म्हणजे “ Interview  ”. गेल्या अनेक वर्षात IT Recruitment ह्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे , Interview संदर्भातील माझे काही अनुभव आज आपल्यासोबत शेअर करत आहे.

आजकालच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळणे आणि तेही आपल्या आवडीच्या क्षेत्रात हा एक मोठा challange आहे. नोकरी तर करायचीच आहे पण कुठेलीतरी जाहिरात दिसली म्हणून नोकरीसाठी Interview द्यायला जाण्यात तसाही काही अर्थ नाही.

मुळातच शिक्षण संपले कि मुलांनी आपल्या पुढील आयुष्याबद्दल दिशा निश्चित करणे गरजेचे आहे. मी कुठल्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे आणि त्यानुसार नोकरीसाठी कुठली क्षेत्रे आहेत ह्याचा सर्वप्रथम अभ्यास केला पाहिजे. आपल्याला राहत्या शहरातच नोकरी करून स्थायिक व्हायचे आहे कि परदेशात जायचे आहे हे मनाशी पक्के करायचे .आपल्याला कुठल्या प्रकारचे काम करण्याची इच्छा आहे आणि अंदाजे आपण अर्ज करणार त्या पोस्ट साठी आपली पगाराची अपेक्षा काय असायला हवी.एखादी दिसली जाहिरात चालले Interview द्यायला असे केले तर पदरी निराशाच येयील.अभ्यासपूर्ण तयारीने गेले तरच निभाव लागेल.

वरील बाबींचा खोलवर अभ्यास झाला कि सर्वात पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे आपला “ अर्ज / Resume / Bio-Data ”. Resume इतका अर्थपूर्ण असावा कि समोरचा कमीतकमी प्रश्न विचारेल. Resume हा आपल्याबद्दलचे संपूर्ण तपशील थोडक्यात देणारा असावा . आपले संपूर्ण नाव , पत्ता , जन्मतारीख , राष्ट्रीयत्व ,फोन नंबर ,आपले शिक्षण (सर्वात अलीकडचे शिक्षण सर्वप्रथम असले पाहिजे ),माध्यमिक , उच्च माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण. आपण पूर्वी कुठे नोकरी केली असल्यास त्याचा तारखेवार तपशील. आपले छंद , इतर क्षेत्रात मिळवलेले प्राविण्य , आपल्याला ओळखत असणार्या २ व्यक्तींचे नाव आणि माहिती ह्या सर्व गोष्टी क्रमाने सूचित केल्या पाहिजेत.

आपला Resume हा दीड ते दोन पानापेक्षा अधिक असू नये. Resume पाहून आपल्याला Interview मध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे त्यातील तपशील हा मुद्देसूद ,तारीखवार आणि प्रमाणशील हवा. ज्यांच्या नावाचा Ref द्याल त्यांना त्याबद्दल कल्पना असायला हवी . Resume सोबत आपली सर्व प्रमाणपत्रे (Attested & True Copies) जोडावीत.

पुढील पायरी म्हणजे Interview ची तयारी. आपण ज्या कंपनीत Interview द्यायला जात आहोत त्याबद्दल जास्तीतजास्त माहिती असली पाहिजे. जसे कंपनी किती वर्ष कार्यरत आहे, त्याच्या किती शाखा आणि वार्षिक उलाढाल किती आहे. ह्या कंपनीचे शेअर्सची स्थिती ,भविष्यातील आलेख कसा असणार आहे. कॉर्पोरेट जगतात ह्या कंपनीला काय स्थान आहे. ह्या कंपनीत पुढील पाच वर्षांनी मी कुठल्या पदापर्यंत जावू शकतो तसेच आपल्याला अपेक्षित असणारे काम इथे आहे का ह्या सर्व प्रश्नांची मनासारखी उकल झाली तर आणि तरच ह्या कंपनीत intervew  देण्यात अर्थ आहे नाहीतर आपला आणि इतरांचाही वेळ फुकट .

आजकालच्या इंटरनेट युगात तार interview इंटरनेट च्या माध्यमातून घेतले जातात ,अश्यावेळी आपल्या देह्बोलीसोबत आपले संभाषण चातुर्य , आपल्या आवाजाची लय महत्वाची ठरते .आपल्या आवाजातील सकारात्मकता , आत्मविश्वास तिथे दिसणे अत्यावश्यक आहे.

“ Interview ” मध्ये काय बोलायचे नाही? हे समजणे म्हणजे  “ Interview  ” अशी साधी सोपी व्याख्या आपण करुया. Interview  मधली हीच तर मेख आहे. मुळात प्रत्येक Interview साठीची पूर्वतयारी परिपूर्ण असेल तर नोकरी हमखास मिळतेच . Interview च्या ठिकाणी गेल्यावर तिथे अनेक उमेदवार दिसले तर नर्व्हस न होता ह्या पोस्ट साठी मीच योग्य आहे असा मनात सकारात्मक विचार केला पाहिजे.


Interview मधे कसे बसावे ,उठावे काय बोलावे हेही महत्वाचे आहे कारण आपली देहबोली बरच काही सांगून जाते. आपले शिक्षण विचारले तर आपण पदवीधर आहोत हे उत्तर पुरेसे असते पण काहीजण त्यासोबत मी १० वी, १२ वी झालो आहे अशीही रीघ ओढतात . आपण पदवीधर झालो त्यातच १०वी १२वी झालो हे ओघानेच आले कि, ते वेगळे कश्याला सांगायचे. Interviewer ने विचारलेला प्रश्न निट समजून उत्तर द्यावे , प्रश्न समजला नाही तर तो पुन्हा विचारावा , समजून घ्यावा आणि उत्तर द्यावे कारण कधीतरी Interview चे panel असू शकते आणि एकापेक्षा अनेक माणसे Interview घेतात तेव्हा कधीतरी आपली तारांबळ उडते, दडपण येते आणि प्रश्न निट समजत नाही . चुकीचे उत्तर देण्यापेक्षा प्रश्न पुन्हा विचारावा ,त्यात काहीही गैर नाही. आपल्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर समजले नाही तर , मला माहित नाही हे अगदी खरे सांगावे कारण तेच जास्ती संयुक्तिक असते. आपल्याला किती पगार अपेक्षित आहे ह्या प्रश्नावर आपले काहीतरी उत्तर निश्चित असलेच पाहिजे कारण ह्या जगात प्रत्येक कामाची जशी किंमत आहे तशी प्रत्येक माणसाचीही आहे. तुम्ही द्याल तो पगार असे उत्तर चुकूनही देवू नये.

आपले प्रत्येक उत्तर आपल्या व्यक्तिमत्वाची आणि आपल्या विचारसरणीची ओळख करून देते हे लक्ष्यात असुदे. उत्तरे विचारपूर्वक द्यावीत त्यासाठी काही सेकंदांचा अवधी घ्यावा . Interview मध्ये जे विचारले आहे त्याला धरूनच मोजक्या शब्दात उत्तरे असावीत ,फार भापट पसारा नको. उत्तरे देताना अहंकार नको पण आत्मविश्वास मात्र हवा. कंपनीबद्दल माहिती विचारली तर अगदी लेटेस्ट माहिती द्यावी म्हणजे चांगले इम्प्रेशन पडते . आपल्या वाचनात किती सातत्य आहे हे Interviewer ला समजते.

Interview जाताना फार गडद कपडे न घालता शांत रंगाचे पण आपले व्यक्तिमत्व खुलवणारे कपडे घालावेत. आपले व्यक्तिमत्व छाप पाडणारे हवेच पण त्यासोबत आपले विचार , बोलण्याची शैली, ज्ञान , अभ्यास वृत्ती आपले त्या कंपनीतील स्थान पक्के करते.

एका मुलाला मी एका बहुचर्चित कंपनीत Interview साठी पाठवला तेव्हा आदल्या दिवशी त्याच्या वडिलांचा मला फोन आला . ते म्हणाले मुलाचा एक सुट आहे तो घालून जावूदे का Interview ला ? प्रथमदर्शनी मला हा प्रश्न अनपेक्षित होता पण समजल्यावर मी त्यांना म्हंटले अहो नको रोज जसा असतो तसा साधा पण नीटनेटका जावूदे. त्यांच्या ह्या प्रश्नामागे अनेक प्रश्न होते. ते निवृत्त होते आणि त्यांच्या मुलाची नोकरीच त्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देणार होती. म्हणून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी कुठलीही कसूर ठेवायची नव्हती. असे अनेक पालक आहेत जे मुलांच्या नोकरीसाठी हवालदिल आहेत.

हा लेख वाचणार्या आणि माझ्या IT मधील करिअर मध्ये सर्व मुलांना नेहमी एकच सांगत असे. मिळेल ती पहिली नोकरी घ्या आणि सुरवात करा. स्वतःवर विश्वास ठेवा , जीव ओतून काम करा आणि सदैव शिकण्याची तयारी ठेवा . स्वतःला सर्व काही येतंय हा खोटा अहंकार बाळगू नका आणि कुठल्याही कामाला कमीही लेखू नका. ह्या सर्वातून तावून सुखावून निघालात तर हिर्यासारखे चमकाल आणि दैदिप्यमान असे यश मिळवाल ह्यात शंकाच नाही.

नोकरी नसते तेव्हा आपल्याकडे फारसा choice नसतो. पहिली नोकरी कदाचित आपल्याला सर्व अपेक्षा पूर्ण करणारी नसेलही पण हीच तुमच्या करिअर ची इमारत रचणारी वीट असेल जी तुम्हाला अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात मदतगार ठरेल.

Interview देणारा आणि घेणारा ह्यांचे perfect tunning जमले कि तुमचे काम फत्ते झाले म्हणून समजा. Interview हि एक प्रोसेस आहे. पूर्वी एकच Interview होत असे पण आजकाल Adaptive टेस्ट , Group Discussion , Interview अश्या दिव्यातून पार व्हायला लागते.

बरेचदा मनासारखा Interview झाला तरी नोकरी मिळत नाही आणि मग मुले फार निराश होतात. पण कधीतरी आपलाही दिवस येणार हि सकारात्मक भावना मनात कायम जपली पाहीजे.नोकरी करायची मनापासून तळमळ आहे ना ? मग नक्की मिळणार.

पहिल्यापेक्षा अधिक जोमाने पुढील Interview ला सामोरे गेले पाहिजे. Interview process खरतर आपल्याला घडवत असते , अनेक गोष्टी त्यातून आपण शिकत असतो ज्या पुढे कधीना कधी उपयोगाला येतातच.आपण सोबत नेलेल्या सर्व प्रमाणपत्रांची सूची व्यवस्थित असली पाहिजे. आज जगात अशी लाखो माणसे आहेत जी आपल्या आवडीचे काम करत नाहीत पण अर्थार्जनासाठी त्यांना ते करावे लागते. कधीतरी आपल्या गुणवत्तेप्रमाणे आपली नोकरी आणि अर्थार्जन नसते ,त्यामुळेही मन निराश होते . ह्यावर उपाय म्हणजे सतत वाचन करत राहिले पाहिजे आणि लेटेस्ट ट्रेंड माहिती पाहिजेत. एक दिवस आपलाही असणारच आहे.पूर्वीच्या काळी लोक बहुधा सरकारी नोकरीत असत आणि अगदी एका टेबल वर 25 -30 वर्षे काम करत असत. आता मुले वर्षाला २-४  नोकर्या बदलताना दिसतात .

मला वाटते कितीही चांगली ऑफर आली तरी इतक्या सहजतेने नोकरी बदलू नये त्याचा वाईट परिणाम आपल्या करिअर वर नक्कीच होतो. आपल्या प्रोफाईल मध्ये स्थिरता दिसणे अति आवश्यक आहे.

नोकरी हा आजकाल ज्वलंत प्रश्न आहे, सामान्य कुटुंबातील मुलांना नोकरी मिळाली तर ते संपूर्ण कुटुंबच उभे राहते. एक नोकरी आपले आयुष्य घडवते म्हंटले तर वावगे ठरू नये. नोकरी मिळणे त्याहीपेक्षा मिळवणे हि एक प्रक्रिया आहे आणि वरील नमूद केलेले सर्व मुद्दे आपण अभ्यासले तर हे शिवधनुष्य आपण लीलया पेलू शकतो ह्यात दुमत नसावे.

कुठलीही गोष्ट सहज सोपी नाही ,पण सुयोग्य विचार , संयम आणि प्रामाणिक मेहनत आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवते . 


अस्मिता  


लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

Antarnad18@gmail.com


#antarnad #job #recruitment #interview #resume #biodata #profile #communication #first impression #salary #group discussion #market trend #company growth #competition #consultant
#अंतर्नाद #नोकरी #स्पर्धापरीक्षा #पगार #पदवी #आत्मविश्वास #सकारात्मक विचार #वाचन

Monday, 10 August 2020

काॅपी कॅट

||श्री स्वामी समर्थ ||




आपले अर्ध आयुष्य कायम दुसर्याची आपल्यासोबत तुलना करण्यातच जाते . ह्यामुळे ज्याच्याशी  तुलना करतो त्या व्यक्तीबद्दल  आपल्याही नकळत  एक असूया , मत्सर निर्माण होतो आणि आपण आपल्याच लोकांपासून दूर जातो. खरच आज एक प्रश्न स्वतःलाच विचारा " मी मला आवडत नाही का? माझे माझ्या स्वतःवर प्रेम नाही का ? " आहे ना ? मग कश्याला हवी हि तुलना ? आणि कॉपी?

कश्याला आपण सतत उठसुठ दुसर्यासोबत बरोबरी करत रहायची ? माझे केस हिच्यासारखे छान नाहीत. माझे घर माझ्या जावेसारखे  मोठे ,प्रशस्त  नाही , माझ्याकडे तिच्यासारखी साडी नाही , माझा मुलगा माझ्या बहिणीच्या मुलासारखा हुशार नाही . शेजार्यांनी घरात छान बाग केली आहे माझ्याकडे नाही .

आपले अर्धे आयुष्य नको त्या गोष्टीत खर्ची होते . असुदे कुणाकडे काही आणि ते आपल्याकडे नसले म्हणून बिघडले कुठे ? आपल्याकडे हि अश्या गोष्टी आहेत ज्या समोरच्याकडे नाही . अहो सतत च्या तुलनेने आपण स्वतःलाच कमी नाही का लेखत ?

आपण जसे आहोत तसे आहोत . प्रत्येकाला घडवताना परमेश्वराने काहीतरी विचार केलाच असेल. आता कावळा इतर पक्ष्यांसारखा छान रंगीत नाही म्हणून काय झाले ? आपल्याला पितरांचे पान ठेवतो तेव्हा नेमकी कुणाची आठवण येते बर ? म्हणजे कधी ना कधी त्यालाही महत्व आहेच कि . आपल्यात असंख्य चांगले गुण असतात पण ह्या तुलना करण्याच्या नादात आपण ते चक्क विसरून जातो .

आपण स्वतःकडून अवाजवी , नको नको त्या अपेक्षा करत राहतो .ह्या पूर्ण न होणार्या आणि गरज नसलेल्या अपक्षांचे ओझे बाळगताना आपण आपले आयुष्य जगायचेच विसरून जातो. प्रत्येकाला देवाने असे काही दिले आहे कि त्यामुळे प्रत्येक जण परिपूर्ण आहे. प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ आहे.एकमेकांसारखे दिसणे असलेच पाहिजे असा नियम नाही ,आणि ते नाही म्हणून इतर रंगांशी ओळख होतेय.


आपण जसे आहोत अगदी तस्सेच  स्वतःला स्वीकारा .
 परिचित ,आजूबाजूचे, सिनेमातील कलाकार अगदी कुणाशीही तुलना न करता जगा आणि तुम्हाला जाणवेल खरच आयुष्य किती सुरेख आहे .जगण्याचा आनंद द्विगुणीत होईल.


समोरचा आपल्याशी तुलना करत नाही मग आपण त्याच्याशी तुलना करून त्याचा आणि आपलाही खोटा अहंकार का बरे फुलवायचा ? पटतंय का ? नसतील आपले केस खूप छान पण मला चांगली दृष्टी आहे ज्याने मी हे छान सुंदर जग डोळे भरून पाहत आहे . माझी बाग नसेल हि पण मी माझे स्वयपाकघर  सुरेख ठेवले आहे .माझा मुलगा अगदी ९०% मिळवत नसेलही पण माणूस म्हणून तो चांगला आहे,मोठ्यांचा मान ठेवतो .

अहो विचार केलात तर ज्या गोष्टींसाठी तुमचे मन खट्टू झाले आहे त्याहीपेक्षा नितांत सुरेख गोष्टी तुमच्यापाशी देवाने दिल्या आहेत . त्याचा शोध घेतलात तर तुमच्या सारखे सुखी  तुम्हीच असे म्हणायची वेळ येयील.

आपण जसे आहोत तसेच स्वीकारण्यात मजा आहे, आपला रंग ,आपले दिसणे , हसणे आणि असणे सर्वात महत्वाचे . प्रत्येकाला देवाने वेगवेगळे घडवले आहे. सर्वांच्याजवळ सर्व नाही पण जे आहे ते आयुष्य आनंदाने व्यतीत करायला  नक्कीच पुरेसे आहे. मी लिहू वाचू बोलू शकते हे काय कमी आहे का?  प्रत्येकाला देवाने आनंदी राहण्यासाठीच इथे पाठवले आहे .

खरे सांगायचे तर कधीतरी तुलना हवीशी पण वाटते ,पण ती चांगल्या अर्थाने , आपल्यातील कमतरता भरून काढण्यासाठी ती नक्कीच उपयुक्त ठरते . पण ती तितक्याच Healthy Spirits ने घेतली पाहिजे .

तेव्हा तुलना करून आपले ,आपल्या कुटुंबाच्या आनंदला  ओहोटी आणू नका. तुलनेने आधीच परिपूर्ण असलेल आयुष्य निरस होयील ,सततच्या तुलनेने आपल्यातील आत्मविश्वास कमी होतो . त्यामुळे  दुसऱ्यातील गुण अवगुण पाहण्यापेक्षा माझ्यात जे जे आहे ते अधिक जास्ती सुंदर मला कसे करता येयील. मी स्वतः आणि इतरानाही आनंदी कसे करू शकेन ह्याचा विचार करा .

चित्रात जसे अनेक रंग असतात तशी सर्व प्रकारचे माणसेही हवीतच कि . जग विविधतेने नटलेले आहे आणि म्हणूनच ते मोहक आहे. 

आपले जीवन अधिकाधिक सकारात्मक करुया . थोडक्यात काय तर  "  काॅपी कॅट "  होण्यापेक्षा,जीवनावर प्रेम करा , मनसोक्त  जागा आणि आनंदाचे "  Brand Ambassador " व्हा. 


अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.
antarnad18@gmail.com


#अंतर्नाद # तुलना #आयुष्य #रंगहीन  # प्रेम #कुटुंब #असूया #मत्सर  #चित्र
#antarnad #comparison # colors  #love #family #jealous #guilt #picture 

Tuesday, 4 August 2020

आत्महत्या

|| श्री स्वामी समर्थ ||



माझ्या डोक्यात एखादा विषय आला कि त्यावर लिहायला मी नेहमीच उत्सुक असते .पण आज ह्या विषयावर लिहायचे म्हणजे खरच मनापासून नको वाटत आहे. तरीही लिहिणे आवश्यक वाटतेय कारण गेल्या काही दिवसात अनेकांनी “ आत्महत्या ” करून आपला जीवन प्रवास संपवल्याच्या बातम्या येत आहेत .तेव्हा मनात अनेक प्रश्न निर्माण होतात ,हे सर्व कश्यासाठी ?

जीवन म्हणजे परमेश्वरी देणगी आहे. ८४ लक्ष्य योनीतून गेल्यावर मनुष्य जन्म प्राप्त होतो असे म्हंटले जाते , म्हणजेच तो किती मोलाचा आहे नाही का?  देवाने आपल्याला ह्या पृथ्वीवर रडायला थोडेच पाठवले आहे.

आयुष्य अनमोल आहे आणि जीवन खूप सुंदर सुद्धा आहे.

मी जेव्हा कुणाच्या आत्महत्ये बद्दल ऐकते किंवा वाचते ,तेव्हा असे वाटते कि असे काय बरे कारण झाले असावे कि त्या व्यक्तीला आपले आयुष्यच संपवावेसे वाटले असेल ?

मनुष्य जन्म मिळणे हे भाग्याचेच लक्षण आहे, हि एक आनंद प्राप्तीच आहे. आयुष्य व्यतीत करताना अनेक अडचणी ह्या येणारच पण आपल्या सद्विवेक बुद्धीने, जिद्दीने , हुशारीने, ज्ञानाने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे साधनेने प्रत्येक प्रसंगातून आपण मार्ग काढू शकतो.

जगात अशी कुठलीही गोष्ट नाही ज्यावर मार्ग निघत नाही. इथे कुठलीही गोष्ट शाश्वत सुद्धा नाही . जिथे ऋतूही आपला क्रम बदलतात ,तिथे आपले आयुष्य ते काय ?सर्वच दरवाजे एकदम बंद होत नाहीत एक बंद झाला तर दुसरे अनेक उघडतातहि.

जन्म आणि मृत्यू अपरिहार्य आहे. इथे कुणी आमरणपट्टा घेऊन जन्माला आले नाही .आपली वेळ आली ,आपले इह लोकावरील काम संपले कि आपण इथून  पुढील प्रवासाला   जाणारच आहोत, पण त्याचा अट्टाहास कश्याला? ओढवून कश्याला घ्यायची संकटे ?

जगावेसेच वाटत नाही त्याला नक्कीच काहीतरी कारण असते. मान्य आहे. अशावेळी आपल्याला उपयोगाला येतो तो “ संवाद ”. मनावर विचारांचे ओझे घेऊन जगायचे नाही. आपल्या जवळच्या कुठल्यातरी व्यक्तीशी मन मोकळे करायचे.

आजकाल जग प्रचंड स्पर्धात्मक झाले आहे.
रोज आपल्याला आपले अस्तित्व ,आजकालच्या भाषेत  
“ Prove Yourself ,consitent Performance ” करावे लागते. 


कामाच्या ठिकाणी खूप राजकारण असते . बरेचदा आपल्याला एकटे पाडले जाते,आपली प्रगती ,यश अनेकांच्या डोळ्यात खुपते ,हवीतशी पदोन्नती, पगारवाढ न मिळणे ह्या गोष्टींमुळे आपण निराश होतो आणि आत्मविश्वास घालवून बसतो. पण आपण जर मनापासून काम केले असेल तर कदाचित इथे  नाही पण कधीतरी आपल्या श्रमांचे चीज हे होणारच ह्यावर आपला ठाम विश्वास असला पाहिजे . समाजातील प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक स्थरावर जीवघेणी स्पर्धा तर आहेच ह्यातून आपली सुटका नाही, त्यामुळे ह्यापासून पळून जाण्यापेक्षा ह्याला सामोरे कसे जायचे त्याचा विचार झाला पाहिजे.

जेव्हा नकारात्मक विचारांची गर्दी मनात होईल तेव्हा साधा उपाय म्हणजे पाणी पिणे आणि असाल तिथून उठून बाहेर जाणे . ४ क्षणात वातावरण बदलते. उदबत्तीच्या धुरासारखे असलेले आपले मन लगेच दुसरीकडे वळते .बाहेर कदाचित कुणीतरी भेटते ,दुसरा विषय निघतो आणि आपण मनाला त्रास होणार्या विचारांपासून थोडाकाळ दूर जातो. आपल्या जवळच्या मित्राशी /मैत्रिणीशी बोलणे हे सर्वोत्तम.

आयुष्यात प्रत्येक क्षण जसा आपला नसतो तसाच तो समोरच्याचाही नसतो. आज त्याचा दिवस तर उद्या आपला दिवस हे होणारच त्यामुळे एखाद्या गोष्टीने निराश होऊन अगदी जीवन संपवणे हे कितपत योग्य आहे ?प्रत्येक वेळी आपला पहिला नंबर कसा येणार ?एखाद्या क्षेत्रात आपली प्रगती नाही झाली तर खचून न जाता आपल्या आवडीचे दुसरे एखादे  क्षेत्र निवडावे  ,कुणी सांगावे त्यात आपली असामान्य प्रगती होयीलहि. आपल्या आवडीचे छंद जोपासणे हेही जीवनात आपल्याला खूप आनंद देते. एकाच गोष्टीचा अट्टाहास करू नये मग ती मिळाली नाही कि कमकुवत मनाची माणसे निराश होत जातात आणि पुढे आत्महत्येस प्रवृत्त होतात .

प्रेमप्रकरणात यश मिळाले नाही म्हणून आत्महत्या करणारे प्रेमी आहेत .पण एखाद्या मुलीने /मुलाने आपल्याला नाही म्हंटले म्हणून तिच्यासाठी आपले जीवन संपवण्यापेक्षा आपल्याला ज्यांनी जीवाचे रान करून लहानाचे मोठे केले , आपल्या आईवडिलांनी आपल्या आजारपणात रात्र रात्र उशाशी बसून टिपे गाळली त्यांच्यासाठी जगणे हे जास्ती संयुक्तिक नाही का? १-२ वर्ष ओळख असलेल्या मुलीसाठी जीव देण्यापेक्षा गेली 25 वर्ष आपल्यावर  प्रेमाचा वर्षाव करत आपल्यासाठी जगणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी जगा. 

एखादा संपूर्ण दिवस सुद्धा आपला नसतो . दिवसभरातील सर्वच घटना काही आपल्या मनासारख्या घडत नाहीत. बरेचदा आयुष्य मोठे Turning घेते. कित्येक वेळा गरिबी नंतर आलेली श्रीमंती माणसाला गर्विष्ठ , घमेंडी बनवते तसेच श्रीमंती नंतर आलेली गरिबी माणसाला असहाय बनवते ,हा धक्का माणूस सहन करू शकत नाही कारण त्याला हे सर्व अपेक्षितच नसते. जुळवून घेणे ,चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहणे म्हणजेच संयम ठेवणे हे आवश्यक आहे  आणि ह्या सर्वांसाठी आहे ती साधना ,ध्यानधारणा.

माझ्याही आयुष्यात अनेक कसोटीचे क्षण आले आणि गेले .पण मी माझे संपूर्ण आयुष्य स्वामी समर्थांवर सोडून दिले आहे. माझा ह्या शक्तीवर प्रचंड विश्वास आहे,मग कुणी काहीही म्हणो. समाज आपल्याला जगू देत नाही पण आपण सर्वांच्या नाकावर टिच्चून जगायचे आहे आणि तेही आनंदने हा धडा आपण गिरवायचा आहे. पटतंय ना? सगळेच जण मनाने खंबीर नसतात ,काही तितकेच हळवेही असतात ,मान्य पण म्हणून जीवन संपवायचे नाही. आत्महत्या करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करून जगायला हिम्मत लागते आणि ती सद्गुरुकृपेने आणि साधनेनेच येवू शकते. 

आत्महत्येचे विचार मनात येणे हि मनाची एक अवस्था आहे पण ती कायमस्वरूपी नाही. अध्यात्माने ह्यावर नक्कीच विजय मिळवता येतो .आजकाल योगासने , ध्यानधारणा ह्याचे महत्व जगभरातील सर्वाना समजू लागले आहे. मोठ्या प्रमाणात आज लोक ह्यात ओढले जात आहेत कारण ह्यातून मनशांती मिळतेय हे पटत आहे.

सर्वच ग्रहयोग इथे लिहिता येणार नाहीत .मनाचा इतका हळवेपणा किंवा कमकुवत पणा म्हणू हव तर असण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पत्रिकेत बिघडलेला चंद्र . चंद्रमा मनसो जातः हे सर्वश्रुत आहेच . पत्रिकेत त्रिक स्थानात असलेला चंद्र ,किंवा त्यासोबत असलेले केतू शनी राहू हे ग्रह चंद्र बिघडण्याचे मुख्य कारण आहे. अश्या व्यक्तींचा मानसिक समतोल ठीक नसतो . सतत नकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाचा अभाव अश्या लोकांत प्रामुख्याने दिसून येतो. अश्या व्यक्ती भरती आणि ओहोटीच्या वेळी तसेच अमावास्या , पौर्णिमेला आपले मानसिक संतुलन घालवून बसतात . 

असे ग्रहयोग असलेल्या लोकांना कुणाशी बोलावेसे वाटतच नाही. त्यांना आयुष्यातील मानसिक ताण ,संकटे असह्य होतात. घरातील तरुण मुले अचानक आत्महत्या करतात तेव्हा घरातल्यांशी त्यांचे सूर जुळलेले नाहीत हे त्रिवार सत्य आहे. पण जाणारा मागे अनेक प्रश्न ठेवून जातो ,जे मागे उरतात त्या कुटुंबियांचे काय ? त्यांच्यासाठी तर हा धक्का पचवत जगत राहणे हि आत्महत्येपेक्षाही मोठी शिक्षा असते .ह्या सर्वांचा विचार करून समाज अधिकाधिक जागृत झाला पाहिजे. अश्या कमकुवत मनाच्या लोकांना मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. आपल्या भोवताली किंवा ओळखीत अश्या व्यक्ती आपल्याला आढळल्या तर त्यांना मानसिक आधार देवून त्यांना जगण्याची उमेद देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपल्या समुपदेशाने एक आयुष्य वाचले तर ती एक ईश्वरी सेवाच आहे.

कुटुंब कश्याला म्हणतो आपण ? नुसती एका छताखाली ४ माणसे राहिली म्हणजे कुटुंब होत नसते . त्यांच्यात प्रेमाचा ओलावा हवा, एकमेकांशी संवाद हवा , एकमेकांच्या हालचाली, बोलणे वागण्यातून जरा फरक दिसला तरी तो इतरांच्या लक्ष्यात आला पाहिजे इतके सूर जुळले पाहिजेत .अश्या घरात जिथे मनाचा संवाद असतो, न बोलताही सर्व काही समजू शकते तिथे आनंद ,सौख्य नांदते आणि तिथे कुणाच्याही मनात आत्महत्येचे बीज रोवले जात नाही. 

आपल्या सीमेवर पहा पहाडी छाती घेऊन ऊनपावसात ,कडाक्याच्या थंडीत आपले जवान आपल्या देशासाठी प्राण पणाला लावत आहेत ,कित्येक महिने-वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर आहेत . कितीवेळा त्यांच्याही जीवावर बेतते पण हे धीराने उभे राहतात .

देवाने हि सुंदर सृष्टी निर्माण केली आहे पण ती पाहण्यासाठी त्याचा आनंद उपभोगण्यासाठी कित्येकांना दृष्टी नाही , कर्णबधीर आहेत , बोलूही शकत नाहीत त्यांनी काय करायचे मग ? आपल्याला सर्व अवयव धड आहेत मग रडताय कसले. रडायचे नाही तर लढायचे . आपणच आपले जीवन बदलू शकतो आपल्या निर्धाराने ,चांगल्या विचाराने आणि अर्थात संयमाने .काही गोष्टी खरच आपल्या हातात नसतात पण म्हणून आत्महत्या हा त्यावर पर्याय असूच शकत नाही.

जीवन हे देवाची देणगी आहे आणि ते सार्थकी लावणे हीच आपली कसोटी आहे .जीवन संपवणे हा तर पळपुटेपणा झाला, पण संकटांवर मात करून जीवन सुसह्य करणे हीच खरी परीक्षा आहे. देवाने अश्या कितीही परीक्षा पदोपदी घेतल्या तरी आपण पास होणारच हा विश्वास डगमगू द्यायचा नाही. सगळ्यांना सर्व मिळत नाही पण जे आहे ते हि नसते तर हा विचार आपण केला पाहिजे.

आजकाल अगदी वयात आलेली मुले आत्महत्येस प्रवृत्त होताना आपण पाहतो ,वाचतो . ह्यास आपणही कुठेतरी जबाबदार आहोत का? मुलांवर सतत अभ्यासाचे प्रेशर टाकणे , घरातील इतर मुलांशी किंवा अन्य मुलांशी त्यांची सतत बरोबरी करणे , त्यांना कमी लेखणे ,”तु काही कामाचाच नाहीस ”, तु जगायला नालायक आहेस ”, “ आम्ही तुला पोसतो आहोत ”, “एक पैसा कमवायची अक्कल नाही ” ह्या आणि अश्या कित्त्येक विधानांनी मुलांच्या मनावर खोलवर आघात होत असतात आणि पुढे ती कुटुंबाला मनाने दुरावतात , व्यसनाधीन होतात किंवा आत्महत्येस प्रवृत्त होतात . अहो आपल्याला तरी मिळाले होते का ९० टक्के मग मुलांकडून ह्या अपेक्षा काश्यासाठी ? आपण आहोत का सर्वगुणसंपन्न ,मग आपल्या मुलांकडून दुनियाभरच्या अपेक्षा का? कश्यासाठी ???? त्यांना नाहीनाही ते बोलून त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी का आपण त्यांना  जन्माला घातले आहे  ? प्रत्येकाचे आयुष्य , स्थिती , बुद्धी,क्षमता वेगळी आहे . प्रत्येकाला आपापल्या परीने जगायचे स्वातंत्र दिले पाहिजे. आपल्या अपेक्षांची ओझी वाहणारी गाढवे करू नका त्यांना ,नाहीतर एकदिवस ती त्या ओझ्याने पुरती दबतील आणि जगण्याचा आत्मविश्वास घालवून बसतील.

आज शेतकर्यांचेही तेच आहे, नापीक जमिनीतूनही सोने पिकवण्याची ताकद असलेले शेतकरी आर्थिक ओझे पेलू न शकल्याने आत्महत्या करत आहेत .आपणही सर्व कुठेतरी ह्यास जबाबदार आहोतच कि. कुठल्याही प्रश्नाला उत्तर नाही असे नाही .

Virus आहे तिथे Anti virus सुद्धा आहेच कि. जीवन हि परमेश्वराने दिलेली नितांत सुंदर भेट आहे, तिचा योग्य तो मान ठेवला पाहिजे .

आपल्या जवळच्या ओळखीच्या व्यक्ती ,नातेवाईक ह्यांच्याशी आपले मैत्रीचे , विश्वासाचे बंध घट्ट करूया जेणेकरून कुठल्याही संकटात एकमेकांना एकमेकांचा आधार राहील, एकमेकांशी संवाद साधता येयील , कुणालाही एकटे वाटणार नाही आणि  आत्महत्येसारख्या कृत्याचा विचारसुद्धा कुणाच्याही मनात येणार नाही .

म्हणूनच कितीही संकटे आली , मनाविरुद्ध घटनांची शृंखला असली तरी “ हेही दिवस जातील ” हि खुणगाठ मनात धरून ,जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करत आयुष्याचा सोहळा करता आला पाहिजे.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर आपला अभिप्राय जरूर पाठवा.
Antarnad18@gmail.com


#antarnad #sucide #psychiatric disorder #moon #high tide #low tide #saturn #depression
#अंतर्नाद #आत्महत्या #समुपदेशन #चंद्र #शनी #राहू #मनोधैर्य #मानसिक आजार #संतुलन #मनोविकार

Friday, 24 July 2020

गळा गाता झाला ...

||श्री स्वामी समर्थ ||



एक अविस्मरणीय अनुभव आज कथन करावासा वाटत आहे. २०१७ ला हिंदुजा मध्ये माझे Thyaroid चे ऑपरेशन झाले. आदल्या दिवशी अनेक फोर्म वरती सह्या करून घेतल्या. डॉक्टर उत्तम होते पण तरीही त्यांनी प्राथमिक सूचना म्हणून खुलासा केला कि तुमचा आवाज बदलू शकतो कारण तिथेच स्वरकोश, श्वसननलिका आहे. एक क्षणभर मनात विचार आला आपला आवाजच गेला तर ? काहीही होवू शकते.

लगेच जागेपणीच स्वप्नरंजन चालू झाले. मी वाण्याच्या दुकानात गेली आहे पण बोलता येत नाही म्हणून पाटीवर लिहून देते आहे “ एक किलो तुरडाळ ,तांदूळ द्या “.डोळ्यातून घळाघळा पाणी येवू लागले. आता पुढे काय वाढून ठेवले आहे. मनातून खूप घाबरले होते .रात्रभर तळमळत होते अर्थात सकाळी ऑपरेशन असल्यामुळे झोप न लागणे हे नैसर्गिकच होते. सकाळ झाली आणि का कोण जाणे फक्त एक क्षणभर स्वामिना डोळ्यासमोर आणले आणि होती नव्हती ती सगळी भीती पळून गेली. तारक मंत्रातील “ कितीदा दिला बोल त्यांनीच हात ”..आठवले आणि एकदम सगळी कात टाकल्यासारखी उठून बसले . 

स्वामी इतके मला सांभाळत असतानाही माझ्या मनात इतके चुकीचे विचार आलेच कसे ? माझी मलाच लाज वाटली . महाराजांना हात जोडले आणि मनापासून माफी मागितली ,त्यांच्या असण्यावरच मी शंका घेतली होती. त्यांनी मला माफ केलेच असणार कारण मी सामान्य माणूस आहे पण सर्व निष्ठा त्यांच्या चरणाशी अर्पण केल्या आहेत हे ते जाणतात . ऑपरेशन ला जायच्या आधी फक्त महाराजांना सांगितले..” माझा आवाज परत येऊदे. माझ्या मुखात फक्त स्वामी नाम असेल तेही अखेरच्या श्वासापर्यंत . ऑपरेशन अत्यंत यशस्वी झाले. मुलगा म्हणाला “अग तुझे ऑपरेशन करायला प्रत्यक्ष स्वामीच आले होते ,तुला कसे काय होवू देतील ते ?”. कितीही निरागस भक्ती हि त्याची जी मला जमली नाही .

काही दिवस माझा आवाज बदलला होता, खूप घोगरा झाला होता ,Speech Thearapy घ्या असे डॉक्टरांनी सुचवले होते पण त्याची कश्याचीही गरज लागली नाही . हॉस्पिटल मधून ३ र्या दिवशी घरी येवून सगळा स्वयपाक पण केला आणि पुन्हा एकदा माझ्या छोट्याश्या विश्वात रमून गेले.

आज माझा आवाज पुन्हा पहिल्यासारखा झाला आहे. आता मी तारक मंत्र ,गाणी सर्व काही पाहिल्यासारखे म्हणू शकते . कधीकधी वाटते स्वामी आपल्या इतके जवळ असूनही आपल्याला ते उमगत नाहीत खरच कुठे कमी पडतो आपण ?

पण माझी गाणे म्हणायची म्हणजे गुणगुणायची आवड महाराजांनी न मागताही पूर्ण केली आणि गळा गाता झाला.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती Click करून अभिप्राय जरूर द्या.


antarnad18@gmail.com


#antarnad # sound #voice #Thyaroid #operation # positivity #Sadguru #Faith #Trust #Speach Thearapy #Life #lifetime experience

#अंतर्नाद # आवाज #थायरोईड #ऑपरेशन # सकारात्मक #सद्गुरू स्वामी समर्थ # विश्वास #संभाषण कला #आयुष्य #गाणी #आयुष्यातील महत्वाचा क्षण 

Thursday, 23 July 2020

Ego less....

||श्री स्वामी समर्थ ||




आयुष्य हे अनेक चढ उतारांचे, नागमोडी वळणांचे आहे.. जन्मापासून ते आपल्या अखेरच्या क्षणापासून ते कसे घडवायचे ते अर्थात प्रत्येकाच्या हाती. आपले संचित ,क्रीयामाण आणि प्रारब्ध हे आपले सखे सोबतीच आहेत .आपल्या आयुष्यातील अनेक अनेक गोष्टीं किबहुना सगळ्याच गोष्टी आपल्या कर्मावर अवलंबून असतात .

लावणी सम्राद्नी श्रीमती सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते माणसाने नेहमी लव्हाळ्या सारखे असावे ,ताठ असू नये ,कारण जेव्हा वादळ येते तेव्हा ताठ असलेली माडाची झाडे उन्मळून पडतात पण लव्हाळी नाही. ती तग धरून असतात . आपल्यातील अहंकार हे आपल्या बहुतांश गोष्टींचे मूळ आहे ...मी ..माझे .मला हे शब्द आपली पाठ सोडताच नाहीत .मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना आपल्या आयुष्याला मेडिकल क्षेत्रातील "Cardiogram " चीच उपमा देईल.

आपले आयुष्य महादशांत विभागले गेलेय ...सर्व परिचित आणि जरा दशहत असणारी राहू महादशा येते तेव्हा काय होते ते ज्यांची राहू दशा चालू आहे किंवा संपली आहे त्यांना विचारा.सगळ संपलच असे वाटते ना वाटते तोच गुरु दशा येते आणि मग पुन्हा आशेची किरणे दिसू लागतात .

 गुरु दशेत माणसाचे स्वतःचे आणि समाजातील वजनही वाढते . मनासारख्या गोष्टी घडू लागतात .सकारात्मकता वाढीस लागते ,लाभ होतात ,मार्ग दिसू लागतो,धनप्राप्ती होते.शुभकार्य होतात .कदाचित ह्या सर्वांमुळे मनुष्याचा अहंकारही कळत नकळत वाढीस लागतो आणि म्हणूनच गुरु नंतरची दशा हि असते न्यायाधीशाची शनी महाराजांची. आपल्या सर्व बऱ्या वाईट कर्मांची फळे द्यायला शनी देव येतात. म्हणूनच वाटते आयुष्य हे "Cardiogram "सारखे आहे.आपले आहेत हेच दिवस कायम राहतील असे कधीही गृहीत धरू नये. ह्या तीनही दशा भोगलेली माणसे मी पहिली आणि त्यांचे आयुष्य जवळून पाहताना ह्याच गोष्टी प्रकर्षाने आढळल्या

राहुने झोडपून काढल्यावर आयुष्य सावरायला गुरु महाराज येतात पण जरा कुठे चांगले झाले कि आपल्याला आपल्या राहू दशेत काय काय भोगले आहे ह्याचा विसर पडतो आणि आपण उन्मत(सर्व नाही पण काही महाभाग आहेत ) ,माझ्यासारखा कुणी नाही असे वागू लागतो आणि मग अहंकाराची परिसीमा झाली कि परमेश्वराने नेमणूक केलेले शनिदेव आहेतच... म्हणूनच माणसाने आपले कर्म करत राहावे ,परिस्थिती नेहमीच बदलत असते आणि बदलत राहणार ,इथे काहीच शाश्वात नाही ऋतूही ,निसर्गही बदलतो ,आपले स्वतःचे अस्तित्वही अशाश्वत आहे तेव्हा अहंकाराचा वाराही लागू देवू नये.

उत्तम कर्म करावे आणि प्रभूचरणी ठेवावे ..उपासना ,अध्यात्म,उत्तम कर्म,कुळाचार ह्याने आयुष्य समृद्ध होतेच पण घरातील मोठ्यांचा मानसन्मान ,सर्वांचे उत्तम आदरातिथ्य ह्याने आयुष्याला चार चांद लागतात .प्रगती करताना त्याला अहंकाराची झालर नको लागायला....शानिदशेत आणि साडेसातीमध्ये सुद्धा शनिदेव काय दंड देतात ह्या साठी शनिमहात्म जरूर वाचावे.

सकारात्मकता आणि egoless आयुष्य आपल्याला आनंदाच्या मार्गावर नेते ह्यात दुमत नसावे.

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

#antarnad #Ego # Rahu # Saturn # Jupitor #Life #Karma # Positive vibes #Cardiaogram
#अंतर्नाद #अहंकार # राहू दशा # गुरु महादशा #आयुष्य #कर्मा #सकारात्मक न #आनंद

मैतर जीवाचा

|| श्री स्वामी समर्थ ||





आयुष्यात मैत्री टिकणे ,चांगली माणसे भेटणे ह्याचेही काहीतरी ग्रहमान असेलच कि . खरच अशी  कुठली ग्रहस्थिती असेल कि आयुष्यात माणसेच टिकत नाहीत ?


तसे पाहता मैत्री हि दोन्ही कडून तितक्याच ओढीने ,मनापासून असेल तर ती मैत्री ..ओढून ताणून एकतर्फी मैत्री खरच मैत्री असते का? शाळेत बेरीज वजाबाकी शिकवलेली आहेच आपल्याला , त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग करता आला पाहिजे...सगळ्यांनाच सगळे आवडले पाहिजेत असे काही नाही सारख्याशी मिळे सारखा.. ह्या युक्तीला धरून आपल्या स्वभावासारखी ,माणसे आपल्याला भेटतच जातातच कि..आणि पुढेही भेटणार आहेत...तेव्हा आपल्याला टाळणार्या व्यक्तींविषयी दुक्ख न करता ..आलात तर माझ्यासोबत नाहीतर तुम्हाला सोडून मी पुढे जाणार ..असा बाणा अंगी बाळगला पाहिजे ..उगीच हा बोलत नाही ती फोन करत नाही ..हवीत कश्याला हि विकतची दुखणी ..ते आपल्याशिवाय जगू शकतात तर आपणही त्यांच्याशिवाय जगू शकतो ...आणि तेही उत्तम.....अश्यांना आयुष्यातून आणि मनातूनही कायमचा वजा करा आणि मस्त आपल्याच धुंदीत तब्येतीत जगा ...मनात झालेली रिती जागा घ्यायला काही, अगदी तुमची असणारी माणसे वाट पाहत आहेत ...त्यांचे स्वागत करा आणि आनंदाने आयुष्य पुढे नेत राहा....


शेवटी इथेच सर्व सोडून जायचं...एकलाची चाले मी.....


अस्मिता


खालील लिंक वरती अभिप्राय नोंदवा 

antarnad18@gmail.com


#antarnad #friendship #bonding #people #stars #relations #love #humanity #gratitude
#अंतर्नाद #मैत्री #ग्रहयोग #नाती #माणुसकी #कृतज्ञता 



Wednesday, 22 July 2020

अनुबंध स्वयंपाकघराचे

||श्री स्वामी समर्थ ||  


समस्त स्त्रीवर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील “ स्वयपाकघर ”. आपली नाळ स्वयंपाकघराशी जोडलेली असते .आपला बायकांचा सगळ्यात जास्ती वेळ स्वयंपाकघरात जातो. येथील प्रत्येक गोष्टीत आपला जीव अडकलेला असतो. येथील वस्तू कितीही जुन्या झाल्या तरी त्याची रवानगी अडगळीच्या खोलीत किंवा माळ्यावर होते पण त्या टाकून देणे आपल्यासाठी केवळ अशक्य.

पूर्वी घरे मोठी होती आणि एकत्र कुटुंबे होती त्यामुळे स्वयपाकघरात अनेक पिढ्यातील स्त्रीवर्गाचा वावर असे आणि त्यांचे संसार असत . घरातील प्रत्येक पिढीतील सुना त्यांच्या माहेरूनही काहीना काही भांडी ,घेवून येतातच घरातील स्त्रियाही जितक्या एकोप्याने नांदत नसतील इतक्या स्वयपाकघरातील वस्तू पिढ्यानपिढ्या नांदत. प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली आणि त्या त्या जागी त्या अगदी मानाने राहत असत. जसे मोठी भांडी , हंडे , कळश्या ,पाटे ,जाती ,विळी, रोळी, खलबत्ता ई.

आधुनुकीकरणामुळे विभक्त कुटुंबे जन्माला आली आणि घरातील सामानसुमानही विभागले गेले. स्वयपाक घराचेही विभाजन झाले. बदलत्या काळाबरोबर मनात नसतानाही काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात त्यातलीच हि अपरिहार्य गोष्ट.


पूर्वीच्या काळी कुटुंबे एकत्र नांदत , पहिली पंगत घरातील पुरुष मंडळी आणि लहान मुलांची असे. त्यानंतर स्त्रीवर्ग आणि शेवटी गडीमाणसे. परसात केळी असत त्यामुळे केळीच्या पानावर जेवण वाढले जायचे. लेकीसुना सर्व वाढायला लागायच्या. वदनिकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे....म्हणून सुरवात व्हायची. पानात काहीही ठेवायचे नाही हा शिरस्ता असायचा. आग्रहाने वाढणेही व्हायचे आणि चवीने खाणेही .सणासुदीला ह्या पंक्तीना वेगळेच स्वरूप यायचे . केळीची पाने , त्याभोवती रांगोळी , उदबत्यांचा घमघमाट आणि  जिलब्या , मोदक , लाडू , खीरपुरी , पुरणपोळीचा खास बेत असायचा. मोठ्या सुनेच्या हातची खास डाळिंबी उसळ, काकुच्या हातची चवदार कढी, कुणाच्या हातची गरम भाकरी , चटणी अशी प्रत्येकाची खासियत असायची. स्वयपाकघरात कामे विभागली जायची आणि पंगत ठरलेल्या वेळीच व्हायची. त्यावेळी सोवळे खूप असायचे .प्रथम देवांना नेवैद्य मग पंक्तीभोजन होत असे.. प्रातःसमयी अंघोळी करून चूल आणि भोवतालची जमीन सारवणे हा नेम असे. पूर्वीच्या काळी आजकालच्या सारख्या मिक्सर , ओव्हन . अश्या आधुनिक सोयी नसत. जात्यावर धान्य दळणे , पाट्यावर चटण्या , मोठाल्या खलात मसाले कुटणे  ह्या कष्टाच्या कामामुळे स्त्रियांना आपोआपच खूप व्यायाम मिळत असे.  स्वयंपाकघर मोठे असे आणि तिथे घरातील स्त्रियांची आणि कधीतरी घरातील गडी माणसांची मागील दारातून जाये असे. मागील परसातील अळू वगैरे लावलेल्या भाज्या , पुजेची फुले काढून दे, चुलीसाठी लाकडे , झाडावरील नारळ उतरवून सोलून दे अशी सर्व कामे अगदी यंत्रवत होत असत .घरातील स्त्रीला घरातील भांड्याकुंड्यांची व्यवस्थित मोजदात असे. शेजारून काही पदार्थ आला तर त्यात काहीतरी पदार्थ घालूनच ते परत दिले जाई.


तेव्हा Gas च्या शेगड्या नसत. स्वयपाक चुलीवर होत असे आणि त्या चुलीवरच्या स्वयपाकाची चव खास असायची. अंघोळीच्या पाण्यासाठीही बंब असत .विरजण लावलेले ताक घुसळायला मोठे हंडे आणि फडताळाचे कपाट म्हणजे स्वयंपाकघराची खासियत असे. तांब्या पितळ्याची भांडी स्वयपाकघरात असत .आजकाल आपल्याला त्याचे महत्व समजू लागले आहे.  त्याकाळी फ्रीज नव्हते त्यामुळे दुध दुभत्याचे पदार्थ ह्या फडताळात सुरक्षित असायचे. पोतीपोती धान्य येवून धान्याच्या खोलीत पडायचे . धान्य ,भाज्या निवडणे , वर्षाची बेगमीची कामे ,मसाले कुटणे , जात्यावर दळण दळणे अशी कामे करताना घरातील स्त्रिया ओव्या , श्लोक म्हणत असत त्यामुळे घरातील सकारात्मक उर्जा वाढून नको त्या चर्चांना तिलांजली मिळत असे.
घरात अनेक पिढ्या एकत्र नांदत असल्याने अनेक वयोगटाची माणसे असत तरीही एकोपा होता . पूर्वीचा काळच वेगळा होता.
काळाबरोबर संकल्पना बदलल्या , शहरीकरण झाले आणि एकत्र कुटुंबे संपूर्ण नाही पण बर्याच प्रमाणत नामशेष झाली . स्वयंपाक घराचा चेहरा मोहरा बदलला. चुलींची जागा अत्याधुनिक cooking range ने घेतली, पाटे-वरवंटे ,खलबत्ते जावून मिक्सर आले तसेच दळणाची जातीही नामशेष झाली.



स्वयंपाकघर कात टाकून नव्याने सजले .कांदे बटाटे ,लसून ठेवण्यासाठी रंगीबेरंगी छान टोपल्या आल्या तर भांड्यांची रवानगी ट्रोली मध्ये झाली. स्वयपाक घरांच्या भिंती आकर्षक रंग लेऊन दिमाखात उभ्या राहिल्या . सगळ कसे चकाचक झाले. आधुनिकी करणाची छाप प्रत्येक कानाकोपर्यात दिसू लागली. स्त्रीवर्गाचे काम सोप्पे झाले , स्वयंपाक घरे आटोपशीर झाली .
स्वयंपाक घरातील गृहिणीचा वावर हा सर्वाधिक असल्याने तिथे मोकळेपणा आणि सुटसुटीत पणा पाहिजे. प्रत्येक स्वयपाकघरात त्या घरातील गृहिणीचे राज्य असते म्हंटले तर वावगे ठरू नये. तेथील अगदी चहासाखरेचे डबे ठेवण्याची ठिकाणेही ठरलेली असतात. आधुनिक स्वयंपाकघरांना  फ्रीज, ओवन,कुकिंग रेंज,मिक्सर ह्यासारख्या अत्याधुनिक गोष्टींचा साज चढला. ह्या सर्वांमुळे आज स्त्रीवर्गाचे कष्ट आणि वेळ वाचत आहे. जाती , पाटा ,उखळ ,ह्या गोष्टी आता नामशेष झाल्या .पूर्वीसारखे कष्ट ,उठबस कमी झाली आणि त्यामुळे पूर्वीच्या स्त्रियांचा दळणकांडण करताना नैसर्गिक आपोआपच व्यायाम व्हायचा तो आता होत नाही.

नवीन काळात पंक्तीभोजन , भारतीय बैठक घालून यथेछ्य ताव मारणे ह्या गोष्टी आता लोप पावत गेल्या. भारतीय बैठकीची जागा आता टेबलखुर्चीने घेतली. पूर्वी जेवताना म्हटले जाणारे “ वदनीकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे.”हे श्लोक आताच्या पिढ्यांना (काही अपवाद वगळता) माहीतसुद्धा नसतील. आता TV बघत जेवणे हेच बर्याचदा पाहायला मिळते. शहरात कार्यालयातून घरी येण्याच्या वेळाही बदलत्या असल्याने सहभोजन सुद्धा नावापुरतेच राहिले.पूर्वी घरचे जेवण ह्याला पर्याय नसे पण आता हॉटेल मध्ये जाऊन जेवले नाही तर आपण “out dated किंवा orthodox” ह्या कॅटेगरीत जाऊन बसतो. चुलीवरची बासुंदी ,भाजी भाकरी हे आता फक्त आठवणीत राहिले. पूर्वीच्या काळी स्त्रिया प्रथम चुलीची पूजा करून चूल पेटवत .अश्या कित्येक गोष्टी आता फक्त गावातच काही ठिकाणी पाहायला मिळतात .


पूर्वी स्त्रिया नोकरी करत नसत त्यामुळे हि सर्व कामे त्यांना दिवसभर पुरत ,पण आता स्त्रीचा बरासचा वेळ बाहेर जात असल्याने मनात असूनही अनेक गोष्टी शक्य होत नाहीत.
खरे सांगायचे तर “ स्वयंपाक घर ” आता “ Modular किचन ” झाले आहे . स्वयंपाकघराची संकल्पना जरी काळानुसार बदलली असली तरी स्त्रियांच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही. 50 -100 वर्षापूर्वीची स्त्रीही स्वयपाकघरात राबत होती आणि आजचीही तेच करते. स्वयंपाक घर हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. घरातील मंडळींच्या मनात शिरण्याचा मार्ग हा पोटातून असतो असे म्हंटले जाते ते उगीच नाही. घरातील स्त्री आनंदी असेल आणि तिने आनंदाने जीव ओतून स्वयंपाकघराची आणि स्वयंपाकाचीही धुरा व्यवस्थित सांभाळली तर घरात सकारात्मक , संतुलित उर्जा प्रवाहित होते, जी घराचे वेगळेपण , सौख्य जपते .अश्या  घराला कधीही कमी पडत नाही. दिवसभर दमून आलेल्या घरातील मंडळी दोन घास खाऊन तृप्त होतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हि घरातील स्त्रीसाठी मोठी पावतीच असते.

स्वयपाकघर जुन्या पद्धतीचे असो अथवा नव्या ,गृह्लक्ष्मीचा तेथील वावर तिथे प्रेमाचे शिंपण करते. स्वयपाकघरातील अगदी लहानसहान गोष्टींशी स्त्रीचे अनुबंध असतात , येथील प्रत्येक गोष्टीत ती अनेक नाती पाहत असते आणि त्यांच्या आठवणीत रमतहि असते .अमुकअमुक गोष्ट माझ्या आईने , काकूने दिली हे सांगताना तिचे डोळे कधी पाणावतात ,तिचे तिलाही उमगत नाही. कितीही आधुनिकीकरण झाले तरी स्वयंपाक घरात वावरणारी स्त्री आजही तितक्याच प्रेमाने सर्वांची उठबस करतेय  .घरातल्या सर्वाना ,आल्या गेलेल्यांना प्रेमाने खाऊ घालणारी गृह्लक्ष्मीच ह्या स्वयंपाक घराला मूर्त स्वरूप देते.

तर असे हे अनेक नाती जपणारे ,”अन्न हे पूर्णब्रम्ह ” म्हणत खाद्य संस्कृतीचा वारसा जपणारे आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या आपल्या पूर्वजांच्या आठवणी ,वारसा ह्जयाना उजाळा देणारे असे हे आपले “ शाही स्वयंपाकघर ” आजही तुमच्या आमच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

अस्मिता 

antarnad18@gmail.com

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

#antarnad #Modular kitchen Decor #women #diet Food #positive vibes  #relations #traditions
#अंतर्नाद #स्वयंपाकघर #घरगुती पदार्थ #स्त्री #सुगरण #स्वयंपाकघराची दिशा #सकारात्मक उर्जा
#बंध #नातीगोती #अन्न हे पूर्णब्रम्ह #परंपरा 



Tuesday, 14 July 2020

Show Must Go On....

|| श्री स्वामी समर्थ ||





आयुष्यात मैत्री टिकणे ,चांगली माणसे भेटणे ह्याचेही काहीतरी ग्रहमान असेलच कि ...अशी कुठली ग्रहस्थिती असेल कि आयुष्यात माणसेच टिकत नाहीत ?

तसे पाहता मैत्री हि दोन्ही कडून तितक्याच ओढीने ,मनापासून असेल तर ती मैत्री ..ओढून ताणून एकतर्फी मैत्री खरच मैत्री असते का? शाळेत बेरीज वजाबाकी शिकवलेली आहेच आपल्याला , त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग करता आला पाहिजे...सगळ्यांनाच सगळे आवडले पाहिजेत असे काही नाही ...सारख्याशी मिळे सारखा.. ह्या युक्तीला धरून आपल्या स्वभावासारखी ,माणसे आपल्याला भेटत जातातातच कि..आणि पुढेही भेटणार आहेत...तेव्हा आपल्याला टाळणार्या व्यक्तींविषयी दुक्ख न मागता ..आलात तर माझ्यासोबत नाहीतर तुम्हाला सोडून मी पुढे जाणार ..असा बाणा अंगी बाळगला पाहिजे ..

उगीच हा बोलत नाही ती फोन करत नाही ..हवीत कश्याला हि विकतची दुखणी ..ते आपल्याशिवाय जगू शकतात तर आपणही त्यांच्याशिवाय जगू शकतो ...आणि तेही उत्तम.....अश्यांना आयुष्यातून आणि मनातूनही कायमचा वजा करा आणि मस्त आपल्याच धुंदीत तब्येतीत जगा ..

.मनात झालेली रिती जागा घ्यायला काही अगदी तुमची असणारी माणसे वाट पाहत आहेत ...त्यांचे स्वागत करा आणि आनंदाने आयुष्य पुढे नेत राहा....शेवटी इथेच सर्व सोडून जायचं...एकलाची चाले मी.....

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.


उमीद पे दुनिया कायम है..

|| श्री स्वामी समर्थ ||




आपला अहंकार नेस्तनाबूत केलाय ह्या विषाणूने ....

करोडो रुपये असतीलही आपल्याकडे पण आज सगळे फोल ठरलंय...पैशाचा फायदा एकच त्यातल्यात्यात बर्या हॉस्पिटल मध्ये मृत्यू ..अजून काही नाही ...संपत्ती ऐश्वर्य ,मोठेपणा , बडेजाव सर्व एका क्षणात गुल झालय ...हतबत अवस्था झालीय आपली...जीवन किती क्षणभंगुर आहे ह्याचे हे जिवंत उदाहरण आहे.

किती लिहायचे आणि किती कुणाकुणाला बोलायचे ??? आज अशिक्षित सोडाच सुशिक्षित जास्ती डोकेदुखी झाले आहेत ,दिवसभर भटकंती चालू आहे .....स्वतः तर जातीलच बरोबर ५-50 जणांना घेवून जातील...कसले सुशिक्षित आपण ???? मास्क चे महत्व पण नाही कळत आपल्याला . काही लोकांकडे मास्क साठी हि पैसे नसतील....एक वेळच्या चहाची सुद्धा भ्रांत असेल .. कच्चीबच्ची काय खात असतील....त्यांना कुठे आहे 50 वेळा हात धुवायलाही पाणी आणि sanitizer ??? आणि ज्यांच्याकडे हे मुबलक आहे ते उंडारत आहेत...पोलीस यंत्रणा ,मेडिकल क्षेत्रातील लोक मुठभर आहेत ..आणि ती आपल्या जीवावर उदार होवून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य पणाला लावून दिवसरात्र लढत आहेत...आणि आपण ??? लाज वाटली पाहिजे आपल्याला.....प्रशासनाला आपण नावे ठेवतो पण आपणही त्याचाच एक भाग आहोत ना? काही देशात ventiletar नाहीत रुग्ण जास्ती आहेत ..तिथे lucky draw सारख्या चिठ्ठ्या टाकत आहेत नावांच्या ...ज्याचे नाव येयील त्याला ventilater....अंगावर काटा येतो...एव्ह्ड्यावर भागणार नाही आहे ..पुढील आर्थिक मंदी आणि सलग्न अनेक अनेक संकटाना आपल्याला सामोरे जायचे आहे जी अजून आपल्याला स्पष्ट दिसत सुद्धा नाही आहेत .... सगळ्याची सोंगे आणता येतात पण पैशाचे नाही ...

lockdown नंतर आपली खरी परीक्षा सुरु होईल ...प्रचंड दडपण असेल बाहेर जाताना ... प्रत्येकाकडे संशयाने पाहत राहू आपण.. ट्रेन ,बस ह्यासारख्या सार्वजनिक वाहनातून तेही मुंबईसारख्या ठिकाणी प्रवास करायचं आपल्याला ...हे सर्व चुटकी सरशी संपणारे नाही .त्याचे ओरखडे कित्येक महिने , वर्ष राह अनुभवत राहू आपण...अमेरिकेसारख्या देशात लाखोंच्या नोकर्या गेल्या आहेत जगभर हीच स्थिती आहे आणि होणार आहे त्यात आपणही वेगळे नाहीत ...

सर्व समजतंय आपल्याला....आपण स्वतःच हे सर्व थांबवू शकतो अगदी क्षणार्धार्त .आणि पुन्हा पाहिल्यासारखे आयुष्य अनुभवू शकतो ...म्हणूनच घरात राहा जेणेकरून आता पुन्हा lockdown वाढणार नाही .

ह्या सगळ्यातूनही आशेचा किरण आहेच कि ..आणि ते म्हणजे आपली स्वतःची मानसिकता...मला आणि माझ्या देशाला ह्यातून बाहेर काढायचेच आहे हे लहानसे आशेचे ,रोपटे घट्ट रुजायला हवे आहे मनात ....

उमीद पे दुनिया कायम आहे ... हा काही जगाचा शेवट नाही पण तो झाला तर किती भयानक असेल ह्याची हि एक झलक आहे...

आज मुंबई चे फोटो टीव्हीवर पाहताना खरच वाटत नाही इतकी सुंदर आहे आपली मुंबई ???? परदेशात गेल्यासारखे वाटावे , दृष्ट लागण्यासारखा आहे. आपला सगळाच देश ज्याची आपण आपल्या वाईट सवयी आणि बेशिस्त वागणुकीमुळे अक्षरशः वाट लावली आहे .हि लढाई फक्त पोलिसांची ,डॉक्टरांची , प्रशासनाची आहे का? हि आपल्या सर्वांची आहे....

लवकर स्वतःला सावरा नाहीतर ३ मे चे १५ मे मग १० जून झाले तर नवल वाटायला नको ...आणि त्याला आपणच जबाबदार आहोत ..

उमीद पे दुनिया कायम है .. हे फक्त बोलण्यापुर्तेच राहायला नको ....

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com


लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.

पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचारातील फरक...

|| श्री स्वामी समर्थ ||






एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते.
अचानक काही आठवलं म्हणून त्यानी एक कागद पेन घेऊन लिहायला सुरुवात केली ....

या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढून टाकलं आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळून रहावं लागलं .

याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पूर्ण केली आणि सेवानिवृत्त झालो. याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं दु:ख मला पचवावं लागलं

याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षेला मुकला, त्याच्या कार अपघातामुळे !
जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले. शिवाय गाडीचे नुकसान झालं ते वेगळंच ..!

आणि शेवटी त्यांनी लिहिलं..….
"खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरलं हे वर्ष माझ्यासाठी !!!

इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. भरलेले डोळे आणि विचारात गढून गेलेल्या आपल्या पतीकडे पहाताच त्याना काहीतरी वेगळं असल्याचा अंदाज आला.
सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला आणि काही न बोलता त्या खोलीतून निघून गेल्या.

थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता. तो कागद त्यानी त्यांच्या पतीच्या कागदा शेजारी ठेवला. लेखक महाशयानी तो कागद उचलून वाचायला सुरुवात केली.

त्यात लिहिलं होतं...

गेले कित्येक वर्षे मला त्रास देणारं पित्ताशय या वर्षात मी काढून टाकलं. आता मला कसलाच त्रास नाही. मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!

याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडली आणि एका चांगल्या नोकरीतून सन्मानाने निवृत्त झालो. आता अजून चांगलं आणि लक्षपूर्वक लिहायला माझ्याकडे भरपूर वेळ आहे...!!

याच वर्षात माझे तीर्थरूप वडील वयाच्या 95व्या वर्षी कोणताही आजार नसताना आणि कोणावर अवलंबून न रहाता इहलोकीची यात्रा संपवून शांतपणे मार्गस्थ झाले.!!

याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं,
जीवघेण्या अपघातातून. कार पूर्णपणे मोडीत निघाली तरी तो बचावला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ....!!!

आभारी आहे देवा ...!! किती सुंदर आणि चांगलं वर्ष दिलंस तू मला ..!!

बघा ... प्रसंग तेच पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!!
नकारात्मक विचार बाजूला सारून एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !!

आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात. त्यांची वाईट बाजू न पहाता चांगली बाजू, सकारात्मक बाजू डोळ्यांसमोर ठेवायला हवी. जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगल्यास जगणं अजून सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!

शेवटी चिडचिड करून जगायचं की आनंद घेत, हे प्रत्येकानं ठरवावं.

दु:खात सुख शोधावं, सुखात दु:ख नको !

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.

आभासी दिलजमाई??

|| श्री स्वामी समर्थ ||





माणूस आपल्या व्यस्त दिनक्रमातून घरी आला कि त्याचा सगळा थकवा जातो . खरतर मुंबई पुण्यासारख्या शहरात जिथे घरी येण्याची वेळ निश्चित नसते तिथे तर घरच्यांसोबत वेळ घालवणे म्हणजे कठीणच ...तशी संधी कदाचित फक्त सणासुदीलाच येत असावी. 

पण आज ह्या corona मुळे खरतर आपण आपल्या कुटुंबासोबत गुजगोष्टी ,गप्पा करायला , मुलांसोबत वेळ घालवायला .. निवांत वेळ आनायसे मिळाला आहे .खरतर ह्या संधीचे सोने केले पाहिजे . पण प्रत्यक्ष परिस्थिती मात्र काहीतरी वेगळेच सांगत आहे. मान्य आहे आपले आयुष्यभराच्या दिनक्रमाचे एक विशिष्ठ रुटीन ठरले आहे किबहुना ते आपल्या अंगवळणीच पडले आहे पण तरीही इतका छान वेळ सार्थकी लावायचा सोडून आपण भलतेच ऐकत आहोत. सुरवातीचे ५-६ दिवस छान गेले हक्काची अनायासे सुट्टी मिळाली ..सगळाच आनंद ..पण जसजसा lockdown वाढत गेला तसे हे चित्र झपाट्याने बदलू लागले .
घरात एकमेकांसोबत भांडणे होत आहेत . 


एकमेकांचा सहवासही नकोसा वाटत आहे. आणि मग हि भांडणे टाळण्या साठी (हे एक कारण ) बाहेर भटकत राहणे हे प्रकार घडत आहेत . आपण भारतीय भावनेत गुंतलेले आहोत परदेशियान्सारखी आपली संस्कृती नाही . तिथे घरगुती वादांमुळे हजारोनी केसेस कोर्टात गेल्या आहेत .पण आपल्या सारख्या एकोप्याची संस्कृती असलेल्या देशातही हे असे चित्र फार बुचकळ्यात टाकणारे आहे . म्हणजे इतर वेळा ऑफिस मधून सुद्धा चार चार वेळा love you, लवकर घरी ये असे म्हणणारे आपण ? आता आपल्याला आपल्याच कुटुंबाचा सहवासाचे अजीर्ण झालय कि काय असा प्रश्न निर्माण होतोय. नक्की काय खरे म्हणायचे ते कि हे चित्र? आपण फेसबुकला आभासी जग म्हणतो पण आता तर सर्व जगच आभासी आणि भावनाशुन्य झालेय असे वाटू लागले आहे . ग्राहसौख्याला आसुसलेले आपण आज ते भरभरून मिळत असताना त्यास वंचित होवू पाहत आहोत ... सगळीकडेच अशी स्थिती असेल असेही नाही ...पण सर्वसाधारण हेच चित्र आज बहुतांश समाजाचे आहे. 

माझी खोली माझा फोन आणि माझा laptop झाले संपले..गृहसौख्य , भावनिकता हे शब्द आता इतिहासजमा होवू लागले आहेत .भारतातील कुटुंबव्यवस्था ...जगाच्या पाठीवर कुठेच पाहायला मिळणार नाही .अनेक पिढ्या एकत्र राहणारी कुटुंबे आता नामशेष होवू लागली असली तरी त्याचे दाखले अजूनही काही प्रमाणत का होयीना आहेत .पण आज हे सर्वच चित्र धूसर होताना दिसत आहे. आपण खरच कुटुंबवत्सल आहोत का आहा प्रश्न आता आपण स्वतःलाच विचारायला हवा ...काय वाटते ?

गृहसौख्य आणि नात्यातील भावनिकता आपण २ किंवा ४ थे स्थानावरून पाहतो. ह्या सर्व परिस्थितीला नक्की काय ग्रहस्थिती कारणीभूत म्हणायची ?


अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com



लेखाच्या बाजूस तुमचा Email द्या तसेच Follow वरती Click करण्यास विसरू नका.


Thursday, 9 July 2020

Whatsapp University (व्यक्ती आणि वल्ली )

|| श्री स्वामी समर्थ ||







जानेवारी 2009 मध्ये  “ whatsapp ” युग सुरु झाले आणि जगभर त्याचा जोमाने प्रसार झाला. whatsapp साठी अमुक एक android system लागते म्हणून ती असणार्या फोन(handset) ची म्हणजेच स्मार्टफोन ची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विक्री आणि उत्पादन होवू लागले. प्रत्येक जण अगदी सहज वापरू शकेल अशी अत्यंत साधी आणि सुटसुटीत असलेली संकल्पना आहे.

“ whatsapp ” ची अभिप्रेत असलेली संकल्पना म्हणजे “काय कसे काय ?”. अगदी सर्व स्थरातील लोकांनी हि संकल्पना उचलून धरली आणि आज whatsapp आपल्या जीवनाचा अनन्य साधारण भाग झाला आहे. इमेल पेक्षाही fastest fast म्हणायला हरकत नाही . एकमेकांच्या तत्क्षणी संपर्कात येण्यासाठीचे हे एक उत्तम माध्यम आहे. इथे आपण एकमेकांशी आपल्या भाषेत बोलू शकतो ,कुणालाही सहज वापरता येयील अश्या ह्या whatsapp ची नाळ आज आधुनिक जगताशी घट्ट जोडली गेली आहे. जगात आपण कुठेही असलो तरी आपल्या कुटुंबीय , मित्रमैत्रिणींचा संपर्क अगदी एका क्षणात होऊ शकतो. फोटो , वीडीओ पाठवू शकतो. परदेशस्थ असणारे आपले आप्तेष्ट , मुले यांच्याशी ह्यावर संवाद साधता येतो , एकमेकांना पाहूही ,बोलू शकतो ,त्यामुळे बहुचर्चित आणि बहुढंगी असे हे whatsapp ह्यावर लिहावे तितके कमीच आहे. आज corporate जगतात अनेक गोष्टी ह्यामुळे सोप्प्या झाल्या आहेत . थोडक्यात whatsapp मुळे जग जवळ(?) आले आहे.

प्रत्येक वयोगटातील व्यक्तीस वरदान ठरलेले whatsapp , ह्यावर अनेक ग्रुप सुद्धा आता तयार झालेले दिसतात . कुटुंबातील एखाद्या समारंभाचे निमंत्रण प्रत्येकाला वेगळे देण्यापेक्षा कुटुंबाच्या whatsapp ग्रुप वर एक मेसेज करून आपले काम सोपे झाले आहे.परदेशी वारीचे फोटो, केलेले शॉपिंग , घरी केलेला पदार्थ इतकच नाही तर रोज केलेला walk , योगासने अगदी कश्याचेही फोटो बिनदिक्कत आपण whatsapp च्या माध्यमातून शेअर करू शकतो. आता ह्या whastapp वरती असंख्य ग्रुप करण्याची सोय असल्याने मग कुटुंबाचा , शाळेतील मित्रमैत्रिणींचा , कॉलेज चा, सोसायटीतील लोकांचा ,शाळा कॉलेज मधील विद्यार्थी , शिक्षक –पालक, भिशीचा , अध्यात्मिक , जपसंख्या मोजणारे , योग क्लास ,walk ग्रुपचा असे एक ना दोन, विविध कारणास्तव असंख्य ग्रुप तयार झाले आहेत.

घरी , रस्त्यात , ट्रेनमध्ये , शॉपिंग मॉल, भाजीमार्केट ,ठिकाण कुठलेही असो प्रत्येक जण whastapp वर व्यस्त असलेला दिसतो. कागदपत्रांची स्कॅन कॉपी पाठवणे ह्या गोष्टींसाठी हे एक उत्तम ,उपयुक्त माध्यम ठरले आहे. प्रत्येक गोष्टीला उणे अधिक बाजू असते, अर्थात whastapp ची सुद्धा त्यातून सुटका नाही .ह्याच्या जितक्या चांगल्या जमेच्या बाजू आहेत तितक्या त्रासदायक सुद्धा आहेत. मुंबईत पावसात पाणी जमले ,ट्रेन बंद पडल्या , कुठे पूल दरड कोसळली , एखाद्या सेलीब्रेटीचा वाढदिवस , राजकारणातील गरमागरम बातम्या , एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिचे देहावसानअश्या असंख्य बातम्या मिळण्याचे ठिकाण म्हणजे whatsapp. इतकेच काय पण भाड्याची जागा मिळण्यास ग्रुप वर पोस्त टाकली तर मदत नक्कीच मिळते ,एखादी व्यक्ती हरवली तर तिचे संपूर्ण वर्णन फोटोसकट शेअर केल्याने ती सापडण्यास मदत झाली अशी कित्येक उदाहरणे सुद्धा आहेत .

आजच्या covid काळात अनेक सोसायटीत भाजी विक्रीसाठी whatsapp ग्रुप तयार केले आहेत जे उपयुक्त आहेत .

 अश्या एक ना दोन असंख्य बातम्या whastapp युगात आपल्याला डोळ्यांची पाती लावते न लावते तोच मिळतात.

म्हणूनच कि काय whatsapp चे नामकरण आजकाल  “Whatsapp University” असे झाले असावे.

विषय कुठलाही असो इथे त्याचे अगदी पदवीपर्यंत शिक्षण मिळते . अहो उपहासाने नाही म्हणत खरच आहे ते . इथे राजकारण , क्रीडा , महागाई , शेअर मार्केट सगळ्या विषयांवर चर्चा रंगतात , त्यातून शिकायला मिळते , मते मतांतरे असतात ,पण अनेक पेहलू अभ्यासायला मिळतात . एकंदरीत काय तर अनेक महाभाग , कवी , लेखक ह्या “Whatsapp University” ने जन्माला घातले आहेत.

प्रत्येक गोष्ट प्रमाणात असेल तरच ती चांगली वाटते पण आजकाल त्याचा अतिरेक झाला आहे. सतत येणारे तेच तेच मेसेजेस चा आता वीट येवू लागला आहे .

“ whatsapp ” ह्या शब्दाचा खरा अर्थ कधीच काळाआड गेला आहे आणि आता फक्त त्याचा होणारा विपर्यास ह्याची देही ह्याची डोळा पाहणे चालू आहे. उगीचच रोज उठून प्रत्येकाला good morning , good night चे मेसेज करत आपण आपला आणि इतरांचा वेळ निव्वळ फुकटच घालवत असतो. रोज उठसुठ तेचतेच. आपल्या कुठल्यातरी नातेवाईकाच्या (ज्याला कुणीही ओळखत देखील नाही )लग्नाचे 25 फोटो टाकून आपली हौस भागवायची पण इतरांचे काय ? . अनेक ग्रुप मध्ये खूप खेळीमेळीचे वातावरण मी पहिले आहे. रोज नाही पण एखादा शनिवार रविवार मस्त गप्पा रंगतात . चांगले मित्रमैत्रिणी मिळून मैत्रीचे बंध फुलताना ,अधिक घट्ट होत जातात हा माझा स्वानुभव आहे .

चांगल्या, वाईट प्रसंगात क्षणात एकमेकांच्या संपर्कात येण्यासाठी चे हे खरे माध्यम पण काही काळापासून त्याच्या आपल्या आयुष्यावरील अतिक्रमण आपल्याला खरतर एकमेकांपासून दूर करत आहे कि काय ह्याची आता भीतीच वाटू लागली आहे. त्याचे जितके चांगले परिणाम तितकेच वाईट परिणामही समोर येत आहेत.
कुटुंबात संवाद कमी होतोय. प्रत्येक जण आपापला फोन मध्ये गर्क .काही दिवसांनी घरातील स्त्रीने “ जेवण तयार आहे , जेवायला या ” असा घरातल्या घरात मेसेज सर्वाना पाठवला तर नवल वाटायला नको.
काही अपवाद वगळता आता whastapp ग्रुप वरचे अनेक ग्रुप हि आता खरच डोकेदुखी व्हायला लागली आहे. कुठलाही मेसेज आला कि दुसरीकडे पाठवण्याची सदैव घाई असते जसे काही तो नाही पाठवला तर अक्षम्य गुन्हाच होणार आहे. तेच तेच मेसेज दिवसभरात कित्येक ग्रुप वरून येत राहतात त्यामुळे त्यातील वेगळेपण किंवा उत्सुकता लोप पावते .

आपण ग्रुप जॉईन करताना त्या ग्रुप मध्ये  असणारे विषय आणि तेथील लोकांची मानसिकता म्हणजे टेस्ट आपल्याला समजली तर आणि तरच ग्रुप जॉईन करणे हितावह असते, नाहीतर आपण पाठवलेल्या पोस्ट ला कुणी प्रतिसाद दिला नाही तर मग आपल्याला अगदी “odd man out” सारखे वाटायला लागते.

प्रत्येक ग्रुपला अद्मीन असतात . अद्मीन होणे म्हणजे काटेरी मुगुट घालणे. अद्मीन ला सर्वांची मने सांभाळता सांभाळता किती थकायला होते असेल ह्याचा विचारच न केलेला बरा. इर्षा , इगो ह्या सर्वातून शाब्दिक चकमकी आणि त्यातून मग ग्रुप सोडून जाणे हे नवीन नाही . ह्या सर्वाला इथेच पूर्णविराम मिळत नाही .पुढे मग बाहेर पडलेल्यांचा नवीन ग्रुप मग आधीच्या लोकांना कसे इथे वळवता येयील ह्याची केलेली रस्सीखेच. चार डोकी एकत्र नांदणे कठीण. बरेच वेळा एखाद्या मोठ्या ग्रुप चे अनेक पोट ग्रुप होतात. मग त्यात हेवेदावे , एखाद्यावर सतत टीका , अगदी हाड वैर म्हणा ना. एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला एकटे पाडणे , कुत्सित बोलून शब्दांनी दुखावणे हे प्रकार सर्रास होतात . खरतर आपण तिच्यासारखे नाही हेच दुखः जास्ती असते आणि ते सहन न झाल्यामुळे मग त्या व्यक्तीचा दुस्वास करणे आणि इतरानाही तो करायला भाग पाडणे ह्यात काही जण माहीर असतात . ह्यात एखादा किंवा एखादी खमकी असेल तर फरक पडत नाही पण एखाद्या कमकुवत मनाची म्हणजे इमोशनल व्यक्ती ह्यात तग धरू शकत नाही .अश्यांची फार घुसमट होते आणि त्यांच्या मनावर त्याचा अत्यंत घातक आणि विपरीत परिणाम होतो .अशी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यातील एखाद्या मैत्रिणीला एकटे पडून आपल्याला काय सुख ,आसुरी आनंद मिळतो ? बर्याच रिकामटेकड्या लोकांना हे सर्व उपद्व्याप करण्यास भरपूर वेळ असतो पण आपल्या ह्या ग्रुपिझम मुळे आपण कधीकधी दुसर्याचे किती भावनिक नुकसान करतो हे त्यावेळी त्यांना सांगुनही कळत नाही.अर्थात प्रत्येकाचा दिवस असतो त्यामुळे भविष्यात त्यांची हि कर्मे त्यांना त्यांच्या सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात सुद्धा अनेक समस्या निर्माण करणारी असतात .शेवटी म्हणतात ना करावे तसे भरावे .पण ह्या सर्वात ग्रुप ची मूळ संकल्पना, उद्देश बाजूलाच राहतो आणि नको त्या गोष्टीना पेव फुटते.

म्हणूनच ज्यांना ह्या सर्व व्यक्ती आणि वल्लीमध्ये वावरता येत नसेल त्यांनी ह्या ग्रुप नामक भानगडीपासून चार हात दूर राहावे. सगळ्यात असूनहि आपला रंग वेगळा हे ज्याला जमले तो तरला. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणे गरजेचे नसते. कधीतरीच मेसेज केला तर मानही राहतो. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हि भावना म्हणजेच अहंकार असे मला वाटते आणि हि भावनाच आपल्याला इतरांपेक्षा वेगळे करते. सर्वात सामावून जाणे मी मी म्हणणार्या व्यक्तींना कठीण जाते .इतर वेळा कुठलाही मेसेज न करणारे लोक कधीतरी एखाद्या विषयावर इतरांना अक्कल शिकवायला लागतात तेव्हा ग्रुप चा अगदी आखाडा होतो, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. इतर ठिकाणी असते तसे फेवरीझम पण असते बरे का इथे. कधीकधी अद्मीन स्वतःच एखादा नियम करतात आणि स्वतःच तोडतात मग अश्यावेळी कुणी बोलले तर त्यांनी आपली चूक मान्य करणे ह्याला पर्याय राहत नाही किबहुना तेच अपेक्षित असते . आपल्यापेक्षाही इतर अनेक जणांना सुद्धा चांगली समज आहे ,हे आपल्याला उमगले तर सर्वच सोप्पे होवून जायील नाही का? आणि ह्या whatsapp ग्रुप चा खराखुरा आस्वादही घेता येयील.

प्रत्येक गोष्टीत कुठे थांबायचे हे समजले तर त्यातील गोडवा दीर्घकाळ टिकतो . “Whatsapp University”मध्ये खूप शिकण्यासारखे आहे , इथे जोडलेली नाती , मैत्री आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला एकटेपणा जाणवू देणार नाहीत ,फक्त ती मोकळेपणाने जोडता आली पाहिजेत .मान द्यावा आणि घ्यावा हे साधे सोप्पे समीकरण आहे .ह्या whatsapp जगतात कोरडेपणाने वावरलात तर हाती काहीच नाही लागणार ,येयील तो अधिकाधिक एकटेपणा .

सकारात्मक राहून केलेला इथला वावर, आपल्या आयुष्यातील  आनंदाला चार चांद लावील ह्यात शंकाच नाही.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका.

Antarnad18@gmail.com

Sunday, 29 March 2020

आनंदाचे सॅशे (Sachet)...

||श्री स्वामी समर्थ ||





काळ जसा बदलत गेला तसे जीवन गतिमान होत गेले आणि रोजच्या जीवनातील गरजा वाढतच गेल्या. आधुनिकीकरण झाले आणि नवनवीन गोष्टी प्रचलित होवू लागल्या. मध्यंतरी दुकानात खरेदीसाठी गेले असता तेथील एका कोपर्याने लक्ष वेधून घेतले . तिथे प्रत्येक मोठ्या वस्तुसोबत त्याच वस्तूचे लहान पाकीट ज्याला आपण सॅशे म्हणतो ते होते . म्हणजे मोठी खोबरेल तेलाची बाटली त्याच्या शेजारी लहान खोबरेल तेलाचे सॅशे, मोठा सर्फ चा पुडा त्याच्याशेजारी लहानसे सर्फचे सॅशे. असे प्रत्येक गोष्टीसाठी एकेक सॅशे होते. 

खरय आजकाल एकत्र कुटुंब इतिहास जमा झाली आहेत त्यामुळे काही घरातून खूप समान भरण्याची प्रथा आता मोडीत निघाली आहे . शिवाय आजकाल हाकेच्या अंतरावर सर्व गोष्टी लगेच उपलब्ध होतात. तसेच कधीकधी लहानसहान प्रवासासाठी साबण, टूथपेस्ट,पावडर, खोबरेल तेल ह्या वस्तूंचे सॅशे सामानात सहज सामावले जातात आणि न्यायला सोपे पडतात. आजकाल कुठलीही वस्तू घ्या त्याचे सॅशे मिळतातच .

तिथून निघाले पण हे सॅशे प्रकरण मनात रुंजी घालत होते. घरी येवून चहाचा घोट घेताना लक्ष्यात आले अरेच्च्या ..हे सॅशे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. नकळत मी ह्याची तुलना आपल्या दैनंदिन आयुष्यातील आनंदाशी केली . आपल्या आयुष्यात पावलोपावली हे “ आनंदाचे सॅशे ” आपल्याला भेटतात . दिसायला लहान असले तरी आनंदाचा मोठ्ठा ठेवा असतो त्यात.

मंडळी हे “ आनंदाचे सॅशे ” अगदी सतत आपल्याला भेटत राहतात पण आपल्याला त्यातील आनंद लुटताच येत नाही .लहान सहान गोष्टी जसे अनेक वर्षांनी आपला खास मित्र किंवा मैत्रीण रस्त्यात किंवा घरी अचानक भेटायला येते आणि मग चहाच्या घोटासोबत आपण कित्येक वर्ष मागे जातो. 

आपल्यासहचारिणी सोबत एखादा छानसा सिनेमा पाहून घालवलेले चार सुखद क्षण, परदेशातून आपल्या मुलांचा अत्यंत काळजीपोटी आलेला फोन , मुलांना शाळा कॉलेज मध्ये मिळालेली बक्षिसे,सगळ्यात पहिल्यांदा आपण आजी आजोबा होतो तो क्षण.

आता तुम्ही गमतीने म्हणाल ,अग अस्मिता हि जेव्हा माहेरी चार दिवस जाते ते दिवस आमच्यासाठी खरे आनंदाचे सॅशे असतात. हो हो खरय तेही असतात. थोडक्यात असे सुखद क्षण जे आपल्या अंतर्मनात ओतप्रोत आनंद भरतील ते सर्व क्षण म्हणजेच आपले आनंदाचे छोटे छोटे सॅशेच असतात. आपल्याला हवे असलेले तिकिटाचे बुकिंग तात्काळ मध्ये होणे, एखादा वेगळा पदार्थ सहज उत्तम होणे, न मागता आले घातलेला वाफाळलेला चहाचा कप हातात येणे, खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस अलगद ओंजळीत घेणे ,बाहेरून येताना उशीर झाला तरी आपल्या आवडत्या सीरिअल च्या आधी घरात पोहोचणे , आजूबाजूच्या विभागातील लाईट जाणे पण आपले असणे, बस किंवा ट्रेन मध्ये खिडकीजवळ बसायला मिळणे .मनासारखी साग्रसंगीत पूजा होणे, देवदर्शन होणे , सणांच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने एकत्र हसतखेळत केलेले  सहभोजन. 

मुलांना नोकरी लागली कि त्यांनी पहिला पगार वडिलांच्या हातावर ठेवून आशीर्वाद घेणे (अर्थात आता हे फारच दुर्मिळ झाले आहे ) .आपल्या म्हातारपणी मुलाने काहीही न बोलता फक्त डोळ्यातूनच (आई बाबा मी आहे )दिलेला दिलासा . हिला न सांगता surprise म्हणून आणलेली साडी तिला प्रचंड आवडणे आणि मग तिच्या केसात माळलेला तो गजरा .एक न दोन असंख्य आनंदाचे हे सॅशे आपल्याला जगवत असतात, कित्येक दुक्खाच्या किंवा एकाकी क्षणी ह्यातील एखादा क्षण जरी आठवला तरी चेहऱ्यावरील उदासीनता , मरगळ निघून जाते . तुम्ही आम्ही सर्वच हे अनुभवत असतो ...

तर मंडळी, हे सर्व लिहित असताना माझ्याही मनात माझ्या आयुष्यातील अनेक अनेक आनंदाचे सॅशे रुंजी घालू लागले आणि डोळे पाणावले...मला मुलगा झाला आणि सर्वप्रथम मी त्याला हृदयाशी धरले ,लुकलुकत्या डोळ्यांनी त्याने मला आणि मी त्याला पाहिले तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण कारण त्या क्षणी त्याने मला “ आई ” केले होते. हे सर्व आनंदाचे सॅशे हृदयाशी कवटाळूनच माझा पुढील प्रवास मी करणार आहे ....

तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यातील पावलापावलावर विखुरलेले आनंदाचे सॅशे ओंजळीत साठवून ठेवा कारण हेच आपली आयुष्याची संध्याकाळ सुखद ,आनंदी करणार आहेत.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .

Antarnad18@gmail.com




Wednesday, 12 June 2019

“ संगती संग दोषेण ”



|| श्री स्वामी समर्थ ||




             एखाद्या व्यक्तीबद्दल मत ठरवणे तितकेसे सोप्पे नाही , पण तरीही कधी तशी वेळ आलीच तर त्या व्यक्तीची “ संगत ” पहा. ५०% काम तिथेच होईल. आपली संगत आपल्या व्यक्तिमत्वाचा काही अंशी तरी भाग असतेच . लहानपणापासून आपल्यावर घरातील मोठी मंडळी उत्तम संस्कार करत असतात जेणेकरून पुढील आयुष्यात आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींची पारख करता यावी. कित्येक कुटुंबांमध्ये सकाळी “ कराग्रे वसते लक्ष्मी ” पासून ते संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर “ शुभंकरोती , मनाचे श्लोक , परवाजा ” म्हणण्याची पद्धत पिढ्यान पिढ्या पासून चालत आली आहे. 


संध्याकाळी प्रार्थना म्हणून घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करून मगच जेवायला बसणे हि रीत आजही घरोघरी दिसते. काही जणांना हे ओल्ड फ्याशन  जरूर वाटेल पण आपल्या संस्कृतीचे ,रूढी  आणि परंपरा ह्यांचे जतन करणे आणि हा वसा पुढील पिढ्यास सुपूर्द करणे हे आपले परम कर्तव्य आहे . पूर्वी एकत्र कुटुंब होते घरात सदैव कुणीनाकुणी असायचे .घरातील वडीलधार्यांचे ऐकायचे हे वेगळे सांगायला लागत नसे. पूर्वी घराला कुलूप म्हणून नसायचे कधीच. पण बदलत्या काळाप्रमाणे जीवन गतिमान झाले, गरजा वाढल्या आणि स्त्री पुरुष दोघेही नोकरी व्यवसायानिम्मित्त घराबाहेर पडू लागले. अनेकविध कारणानी एकत्रकुटुंब पद्धतीचा ह्रास झाला आणि मग मुलांना “ पाळणाघरात /CRUSH ” ठेवायची वेळ आली.
दिवसातील ८-१० तास मुले पालकांपासून विभक्त झाली . आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली असतोच असतो. पालक मुलांना त्यांच्या संपर्कात राहावे म्हणून मोठे मोबाईल आणून देतात आणि त्यांना संपूर्ण जग खुले होते . त्यात जर नको त्या मुलांची संगत त्यांना लागली तर लहानपणीच नको असलेल्या गोष्टी त्यांना समजायला वेळ हा कितीसा लागणार.


आपल्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात आपली “ संगत ” फार मोलाची ठरते . ती आपल्याला शिखरावर सुद्धा नेऊ शकते आणि नेस्तनाबूत सुद्धा करू शकते. आपल्या आजूबाजूला असणार्या व्यक्तींचा प्रभाव आपल्यावरही असतोच.


एखाद्या चांगल्या घरातील निर्व्यसनी मुलाचे मित्र कदाचित काही प्रमाणत व्यसनी असू शकतात. पण ह्या संगतीचा परिणाम म्हणून आयुष्यात कुठल्याही कारणाने आलेल्या नैराश्यामुळे त्यालाही एखादे व्यसन लागू शकते हे नाकारता येणार नाही. परंतु अश्या वेळी प्रगल्भ विचारांची संगत असेल तर तो आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहू शकेल. म्हणूनच शेवटी संगत महत्वाची. वाईट संगतीचा परिणाम आपल्या मनावर विचारांवरही खोलवर होत जातो आणि आपल्या आयुष्यात मग कुकर्मांची जणू शृंखलाच तयार होते..कुसंगतीसारखा दुसरा आजार नाही जो आपल्याला अंतर्बाह्य पोखरून टाकतो. आजकाल महाविद्यालयीन परिसरात एक चक्कर टाकली तर कोवळ्या वयातील मुलीही सर्रास सिगरेट ओढताना दिसतात. आजची पिढी आधुनिक विचारांची ,हुशार ,इन्टरनेट युगातील आहे पण चुकीच्या संगतीने त्यांचे आयुष्य वेगळ्याच वळणावर जाण्याची भीती वाटते खरतर .त्याचबरोबर सोशल मिडिया आणि इतर प्रलोभने आहेतच भर घालायला . 
आंब्यांच्या पेटीतील एखादा कुसका आंबा संपूर्ण पेटी नासवतो अगदी तसेच आपली संगत फार महत्वाची .अगदी शालेय जीवनापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत. चांगले अभ्यासू मित्र मिळाले तर आपल्यालाही अभ्यासाची गोडी लागते , चांगल्या आचार विचारांचे आदानप्रदान होते, आयुष्याच्या शिखरावर जायची उमेद निर्माण होते आणि वाईट संगत लागली तर मग सगळा मार्गच चुकतो . 



अभ्यासातून लक्ष्य उडते आणि मग टिवल्याबावल्या ,नको ती व्यसने ,धंदे , मुलींची छेड काढ ,घरी खोटे सांगून सिनेमाला जा अश्या एक ना दोन वाईट गोष्टींची जणू शृंखलाच तयार होते आणि आपण त्यात अडकत जातो आणि आयुष्य उध्वस्त होते ,आईवडिलांचे संस्कार पार धुळीस मिळतात आणि परतीचा मार्ग धूसर होत जातो . हेच कश्याला पुढे महाविद्यालयात आणि नोकरीच्या ठिकाणीही जिथे आज खूप स्पर्धा आहे तिथे नको त्या राजकारणात आपण ओढले जातो .अत्यंत शिस्तीत ,मेहनतीने प्रामाणिक पणे काम करणारी एखादी व्यक्ती ह्या षडयंत्राला बळी पडते .करणारे राहतात नामानिराळे आणि चांगले सज्जन भरडले जातात म्हणूनच आपली उठबस कुणासोबत असायला हवी ह्याचा अभ्यास असला पाहिजे , माणसे वाचता आली पाहिजेत .सुरवातीला जड जातेच पण हळूहळू ओळख होते.
आपले स्वतःचे आप्तेष्ट , कुटुंब सुद्धा यातून सुटलेले नाही . आपल्या जवळच्या लोकांमध्येही छल कपट करणाऱ्या व्यक्ती असतात . आपल्याला काहीतरी कुणाबद्दल मनात काहीबाही भरवून आपले मन कलुषित करतात . म्हणूनच “ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ” ह्या रूढी समर्पक वाटतात . अश्या व्यक्तींची संगत , सहवास असला तर मग “ असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ ” अशी स्थिती निर्माण नाही झाली तरच नवल . अनेकविध प्रलोभने असलेल्या ह्या आधुनिक जगात आपल्या पाल्यासाठी प्रत्येक पालकाने जागृत राहिले पाहिजे. आपल्या मुलाचे/मुलीचे मित्र मैत्रिणी कोण आहेत ह्याची माहिती असलीच पाहिजे म्हणजे पुढील अनर्थ टाळता येयील. आजकाल शाळेतील मुले सुद्धा “Instagram ” वरती वावरताना दिसतात. इंटरनेट ने संपूर्ण जग जवळ अगदी घरात आले आहे पण त्याची एक दुसरीही बाजू आहे. ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला चांगल्या कामासाठी उपयोग करता आला पाहिजे.




म्हटलेच आहे ना “सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो " त्याप्रमाणे आपली संगत चांगलीच असली पाहिजे ,चांगल्या संगतीत चांगल् विचार रुजतात ,आयुष्यात मोठी झेप घेण्यास पाठबळ मिळते आणि आयुष्य फुलत जाते .ती नसेल तर मती भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही .दूर कश्याला जा ,whatsapp वरती एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीचे मेसेजचा अभ्यास करा . त्यांनी पाठवलेल्या मेसेज वरून सुद्धा त्यांची आवड आणि वृत्ती लक्ष्यात येते . लहानपणी आईला “ शुभंकरोती “ शिकवायला लागते पण वाईट गोष्टी फार लवकर आत्मसात होतात ,त्या शिकवायला लागत नाहीत. एकदा वाईट संगत लागली कि माणूस हिप्नोटाईझ झाल्यासारखा त्यात वाहवत जातो आणि नको त्या किनार्याला लागतो. आपल्यासोबत असणार्या लोकांच्या विचारांचा , त्यांच्या Vibration चा परिणाम आपल्या मनावर , विचारावर आणि एकंदरीत सर्वच आयुष्यावर होत असल्याने आपली संगत आणि आपली उठबस कुणासोबत असली पाहिजे हे ज्याचे त्याने ठरवायचे कारण त्यावरून आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख होते.वाईट आणि चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात आपण क्षणात भरकटले जाण्याची जास्ती शक्यता असते . त्याउलट उत्तम संगत आपल्याला आयुष्यात आपल्या ध्येयापर्यंत नेते आणि आईवडिलांनी आजवर घेतलेल्या कष्टाचे चीज होते. 



आयुष्य फार सुंदर आहे आणि ते आपल्या कुटुंबासोबत आनंदाने व्यतीत करायचे असेल तर आपली “ संगत “ पुनः पडताळून पाहणे ह्याला पर्याय नाही.


लेख आवडल्यास जरूर अभिप्राय कळवा

www.antarnad18.blogspot.in