Showing posts with label ज्योतिष. Show all posts
Showing posts with label ज्योतिष. Show all posts

Friday, 25 September 2020

ज्योतिष- एक अनुभूती

||श्री स्वामी समर्थ ||




मंडळी , ज्योतिष हे पूर्वापार अनादि काळापासून चालत आलेले शास्त्र. प्रत्येक व्यक्तीस मग तो कुणीही असो आपल्या भविष्यात काय दडलय हे जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता असतेच असते. ज्यांचा ह्या शास्त्रावर विश्वास नाही त्यांना काहीच सांगणे नाही.असो.

तर अथांग महासागरा सारखे ह्या शास्त्रात जितके खोल शिराल तितके कमीच आहे.ज्योतिष शास्त्राचा नेमका उपयोग करून आपण आपले जीवन नक्कीच अधिकाधिक आनंदी करू शकतो, परंतु त्याचा नेमका उपयोग कधी आणि कसा करायचा ह्याबाबत अनभिज्ञता दिसून येते. ह्या शास्त्रावर खूप पुस्तके, CD, ebook सर्व काही उपलब्ध आहे ,तसेच ह्या शास्त्राची ओळख करून देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था हि आहेत. पण हे सर्व करून ,४ पुस्तके वाचून खरच ज्योतिषी होता येते का....तर नाही. ह्या शास्त्राचा सखोल अभ्यास , साधना, अध्यात्मिक बैठक आपल्याला जातकाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देण्यास मोलाची ठरते.

एखाद्याच्या आयुष्यावर बोलणे खरच इतके सोप्पे आहे का ? अनेक वर्ष ह्या क्षेत्रात कार्यरत असूनही समोर आलेल्या प्रश्नकर्त्याच्या “मला नोकरी कधी मिळेल ? “किंवा “माझा विवाह कशी होईल ? अश्या किंवा तत्सम प्रश्नाचे उत्तर अचूक देता आले नाही तर काय उपयोग ??
आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रश्नांना सामोरे जाताना बरेचदा जीव मेटाकुटीला येतो, मन निराश, दिशाहीन होते आणि हा गुंता सोडवण्यासाठी बरेचदा आपण ज्योतिष शास्त्राचा आधार घेतो. पण खरोखरच आत्यंतिक गरज असल्याशिवाय ह्या शास्त्राचा उपयोग करू नये. लोकांना हल्ली खूप कमी पेशन्स राहिला आहे ,चालायचंच हल्ली Instant चा जमाना आहे ना , ”त्यामुळे पी हळद हो गोरी “ ह्या उक्तीला धरून ज्योतिषाला आपल्या प्रश्नाचे त्वरित उत्तर पाहण्यास अगदी भंडावून सोडणारे कित्येक जण आपल्याही परिचयाचे असतील. ज्योतिष शास्त्राला जशी बंधने आहेत तसेच आपल्या प्रश्नांनाही मर्यादा असणे गरजेचे आहे. 

मुळात आपण ज्योतिषाला कुठला प्रश्न विचारत आहोत याचे भान असणे गरजेचे आहे.
एखाद्या मुलाचा अनेक वर्ष विवाह ठरत नसेल ,स्थळे पाहणे चालू असेल पण सुयोग्य जोडीदार मिळत नसेल आणि अश्यावेळी त्यांनी विवाहासंबंधी प्रश्न विचारला तर योग्य, परंतु त्याच्याच बरोबर आपल्या दुसरयाही मुलाची ,जो अजून शालेय शिक्षण घेत आहे त्याचीही “आलेच आहे तर त्याचीही पत्रिका जरा बघून घ्या .त्याच्या विवाहाचे काय “ असे सलग्न प्रश्न विचारणे अत्यंत चुकीचे आहे. जिथे तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न करून त्यानंतर ह्या शास्त्राची मदत घेतलीत तर अयोग्य नाही ,उलट अश्यावेळी हे शास्त्र तुम्हाला दैवी मार्गदर्शन करेल पण उगीच चाळा, timepass म्हणून ह्या शास्त्राकडे कदापि पाहू नका हि माझी सर्व जातकांना विनंती आहे. नसेल विश्वास त्यांनी तर वळूनही बघू नका पण त्याचबरोबर टिंगलहि करू नका ...सोडून द्या .जगात सर्वच गोष्टी सर्वाना पटल्याच पाहिजे असा कुणाचाच अट्टाहास नसावा.

ज्योतिष शास्त्रात विवाह होईल का नाही हे ठरवणारे असंख्य योग आहेत .. त्यामुळे ह्या शास्त्राचा खरच गाढा अभ्यास असणे तितकेच आवश्यक आहे. माझ्या ओळखीचे एकजण मला म्हणाले कि माझ्या मुलाचा प्रेमविवाह होणार असे एकाने सांगितले आहे ,बघुया चिरंजीव आता काय दिवे लावतात शेवटी कलियुग आहे . मी म्हटले अहो ते सर्व ठीक पण प्रेमविवाहाचा योग आहे हे सांगणाऱ्याने आधी मुळ पत्रिकेत विवाहाचाच योग आहे का ते पाहिलंय का? सांगायचे तात्पर्य कि मुळात पत्रिकेत जर विवाहाचाच योग नसेल तर प्रेमविवाह कसा होईल ? बयाच लोकांना सवय असते समोरच्याला ज्योतिष येतंय ह्याची नुसती कुणकुण जरी लागली तरी त्याच्या मागे हात धुवून लागतात .अहो माझ जरा बघा ..अहो काय बघा? उगीच..खेळ आहे कि काय हा? . आज समाजातील घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे .विवाह ठरण्या पूर्वी अगदी पत्रिकेतील ३६ गुण जुळवून केलेली लग्नेही काही कालावधीनंतर न टिकणे हि एक समस्याच आहे. पत्रिकेत गुण मिलनापेक्षा ग्रह मिलन होणे गरजेचे आहे पण तेच न केल्याची काय परिणीती होते ते आपण पाहतोच आहोत.

बरेच लोक दर दोन दिवसांनी कुठल्याना कुठल्या तरी ज्योतिषाच्या घराची पायरी चढताना आपण पाहतो ,ऐकतो. असे का होत असावे ? कारण पहिल्याने जे सांगितले त्याने कदाचित त्यांच्या मनाचे समाधान झाले नसावे.आणि समाधानाची त्यांची व्याख्या म्हणजे त्यांना सुखावणारी ,अपेक्षित असणारी उत्तरे. आपण ज्या ज्योतिषाकडे पत्रिका दाखवायला जात आहोत तो ह्या शास्त्रातील पूर्णतः जाणकार आहे ह्याची खात्री पटवून मगच गेले पाहिजे, मुळात ह्या शास्त्रावर आपली श्रद्धा ,विश्वासही असायला हवा त्याचबरोबर ज्योतिषाबद्दल सुद्धा मनात कुठलाही संदेह नसावा मग पुन्हा पुन्हा अनेक जणांकडे जाऊन पत्रिका दाखवायची वेळच येणार नाही.

ह्या शास्त्राचा सखोल अभ्यासक ,जाणकार हा तुम्हाला अपेक्षित उत्तर सांगणार नाहीत तर तुमच्या नशिबात जे आहे ते खर सांगतील किबहुना त्यांच्याकडून तेच अपेक्षित आहे एखादी पत्रिका बघताना ती बघणाऱ्याच्या ज्ञानाचाही कस लागतोच .खरतर एखाद्याच्या पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तर ज्योतिषाने योगच नाही हे खरे सांगून टाकावे. जातकाचा अपेक्षाभंग, मानसिक त्रास जरूर होईल पण कालांतराने त्याचे मन घट्ट होवून तो आपल्या आयुष्यातील reality स्वीकारेल, तसेच अजून अनेक ज्योतिषांना पत्रिका दाखवणे तरी थांबवेल. मुळात विवाह योग नसताना उगीचच तुमच्या पत्रिकेत गुरु लग्नस्थानात आला कि विवाह होईल हे सांगण्यात काहीच अर्थ नाही ,कित्येक वेळा गुरु लग्नी किंवा सप्तमेशावरून जाऊनही विवाह होत नाही आणि मग अश्यावेळी ह्या शास्त्रावरून प्रश्नकर्त्याचा विश्वासही उडू शकतो. तुमचा विवाह येत्या २-३ वर्षात होईल अशी चुकीची उत्तरे दिल्याने समोरच्या आशाही वाढतात आणि तश्या घटना न घडल्यामुळे पुढे त्या व्यक्तीस जास्त त्रासदायक ठरू शकतात , त्यामुळे प्रामाणिक उत्तर देवून ह्या शास्त्राचा सन्मान वाढवावा असे माझे मत आहे.

“Stars Plays a major role in life” ग्रहतारे आपले काम करतच असतात .मुळात पत्रिका म्हणजे काय ? तर आपल्या जन्मवेळी अवकाशात असणाऱ्या ग्रहांची स्थिती म्हणजेच आपली पत्रिका. आणि ह्या पत्रिकेतील ग्रहांची मूळ कधीही बदलत नाही. त्यामुळे त्या पत्रिकेबद्दलचे भाकीतही कसे बदलेल हे साधे logic आहे. पत्रिका हि खाजगी आणि तितकीच अत्यंत पवित्र बाब आहे, दर दोन दिवसांनी कुणाला न कुणाला ती दाखवून त्याचा अवमानच होतो हे लक्ष्यात घ्या.

सर्व साधारणपणे आपली कमाल आयुमर्यादा हि १२० वर्ष मानली जाते ह्यात प्रत्येक ग्रहाचा ठरलेला काल जसा चंद्र १० वर्ष , राहू १८ वर्ष ,मंगल ७ वर्ष , शनी १९ वर्षे याप्रमाणे असतो ह्याला आपण “ महादशा “ म्हणून संबोधतो. जेव्हा एखाद्याला मंगळाची महादशा आहे असे म्हणतो याचाच अर्थ तो ७ वर्षाचा कालावधी त्याच्या आयुष्यात मंगळाच्या अधिपत्याखाली असतो आणि त्या ग्रहाचे बलाबल पत्रिकेत कसे आहे त्याप्रमाणे त्याचा फलादेश असतो.
सारांश असा कि ज्योतिष हे एक महान शास्त्र असून हा फावल्या वेळातील timepass चा विषय नक्कीच नाही. ह्या दैवी शास्त्राचा योग्य तो सन्मान ठेवून त्याचा मार्गदर्शन म्हणून आपल्या जीवनात उपयोग करून घेतला तर आयुष्यात अनेक गोष्टी टाळता येवू शकतात, अर्थात सांगणाराहि ह्या शास्त्रात माहीर ,उत्तम जाणकार हवा हे वेगळे सांगायला नकोच. योग्य प्रकारे ह्या शास्त्राचा आपल्या जीवनात उपयोग केलात तर हे शास्त्र तुमच्या आयुष्याचा उत्तम वाटाड्या होईल यात शंकाच नाही.

एखाद्या गोष्टीसाठी अथक प्रयत्न करून खरोखरच यश नाही मिळाले आणि त्यानंतर ह्या शास्त्राचा आधार घेतलात तर अगदी योग्य perfect उत्तर मिळणार ह्यात शंकाच नाही ...अनुभूती घेवून बघा.


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com
लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

Sunday, 6 September 2020

मोक्षकारक ...केतू

|| श्री स्वामी समर्थ ||

समुद्र मंथन

राहूच्या बरोबर १८० अंशात समोर केतू असतो . राहू आणि केतू दोघेही नेहमी वक्री असतात हे आपल्या सर्वाना माहितच आहे.वक्री म्हणजे मागे जाणे. आपले काही काम राहिलेले असते तेव्हा आपण मागे फिरतो ,अगदी त्याचप्रमाणे राहुकेतु वक्री चालून  मागील जन्मातील अपूर्ण कर्म आणि वासना दर्शवतात . मागील लेखात आपण राहूचे आभासी जग पाहिले आज केतू बद्दल अधिक जाणून घेवूया. पत्रिकेत राहू आणि केतू एकटेच असावेत असे नेहमी म्हंटले जाते .

अश्विनी ,मघा , मूळ हि केतूची ३ नक्षत्रे आहेत . कारण ते ज्या भावात किंवा ज्या ग्रहासोबत असतात त्याच्या फळात न्यूनता आणतात . केतू हा मंगळा प्रमाणे फळे देतो. अध्यात्मातील प्रमुख ग्रह म्हणून केतू कडे पहिले जाते. गुरु केतू युती हि उच्च साधना दर्शवते. केतूची हि सकारात्मक बाजू आहे पण केतू कॅन्सर चाही कारक आहे. केतूची दशा कुठल्याही लग्नाला आणि कुठल्याही वयात परीक्षा पाहणारीच असते. केतू जर प्रथम म्हणजे लग्नस्थानात असेल तर व्यक्तीचे आरोग्य चांगले राहत नाही. दुसर्या स्थानातील केतू दातांच्या समस्या दर्शवतो तर ३ र्या स्थानातील केतू नातेवाईकांशी फारशी सलगी दाखवत नाही .चतुर्थात केतू वास्तू तसेच मातृसुखालाही ओहोटी लावतो.चंद्र जर अश्विनी , मघा किंवा मूळ ह्यापैकी कठल्याही नक्षत्रात असल्यास केतूची दशा जन्मतःच असते.

केतूच्या महादशेत मंगळाची उपासना करावी. चंद्राच्या नक्षत्रातील केतू प्रकृतीस त्रासदायक असतो.
राहू आणि केतू म्हंटले किंवा त्यांच्या महादशा ह्या सदासर्वदा वाईट जात नाहीत किबहुना कुठल्याही ग्रहाची महादशा हि संपूर्ण वाईट जात नाही. त्यातील शुभग्रहांच्या अंतर्दशा शुभफळे प्रदान करतात. त्यामुळे फक्त राहुं केतू मुळेच आयुष्यात काही वाईट घडते हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे . तीच बाब साडेसातीचीही आहे. संपूर्ण आयुष्यात अश्या अनेक वाईट ,त्रासदायक गोष्टी घडतात जेव्हा राहुकेतु किंवा शनी चा प्रभाव कुठेच नसतो ,त्या अन्य ग्रहांच्या परिणामामुळे घडत असतात . म्हणूनच पत्रिका बघताना नवग्रहांचा विचार केला जातो ,त्यांची स्थाने ,राशी , महादशा इत्यादी अनेक गोष्टी एकत्रित पाहूनच फलादेश काढता येतो.

केतुला अंक शास्त्रात ७ हा नंबर दिला आहे. केतू दशाही सात वर्षाची असते. ७ ह्या अंकास जीवनात विशेष स्थान आहे जसे ७ सूर ,७ रंग , सप्तपदी ,७ दिवस, ७ परिक्रमा , सप्तशती आणि शरीरातील ७ चक्रे. ह्यावरून समजेल कि केतू किती महत्वाचा आहे. केतू आपल्या आजोळचा कारक आहे.

राहू केतू आपल्या पूर्वजन्मातील घटनांचा लेखाजोखा ठेवतात. केतू ज्या स्थानात असतो त्या स्थानातील फळापासून आपल्याला वंचित ठेवतो आणि त्या स्थानातील लाभांपासुनही वंचित ठेवतो ,आसक्ती कमी करतो. उदा. केतू जर ३ र्या स्थानात असेल तर भावंडापासून विरक्त करतो. मोक्षाचा कारक केतू आहे. केतू शरीराचा खालचाच भाग आहे त्याला धड नाही. राहूच्या अगदी उलट कारण राहु ला धड आहे पण शरीराचा खालचा हिस्सा नाही . केतू पाहूच शकत नाही त्यामुळे तो ज्या ग्रहासोबत असेल त्याचीच फळे देयील . केतुला मनाचा कारक मानला आहे .राहू मायाजाल आहे तर केतू अध्यात्माका कडे नेणारा ग्रह आहे .

गुरु केतू युती किंवा केतूवर गुरूची दृष्टी असेल तर मोक्षापर्यंतचा प्रवास होतो .शनी केतू युती पिशाच्चपिडा देते आणि अशी ग्रहस्थिती असलेल्या लोकांना व्यसन लागले तर ते कधीच सुटत नाही. नशा चांगली किंवा वाईट असू शकते. गुरुसोबत केतू असेल तर परमेश्वराचे ,अध्यात्माचे वेड लागते आणि मंगळ ,शानिसोबत असेल तर दारूचे व्यसन लागते. केतू चंद्राला ग्रहण लावतो ,विचारांपासून परावृत्त करतो. केतू सर्जरी चा कारक असल्याने मंगळ केतू हे डॉक्टरांसाठी महत्वाचे आहे. पुलिस खात्यातील लोकांसाठी जिथे धडाडी ,त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे तिथे मंगळ केतू युती उत्तम काम करेल. कुत्रा चावणे, सर्पदंश, चुकीच्या औषधामुळे त्रास हे सर्व केतूच्या प्रभावामुळे होते .

केतू स्वतःच्या नक्षत्रात येतो तेव्हा व्यक्तिगत आणि जागतिक स्थरावर बदल घडवून आणतो . सध्याच्या महामारीच्या काळात केतू मूळ नक्षत्रात होता. अमेरिकेत ट्वीन टॉवर वरती हल्ला झाला तेव्हा केतू मूळ नक्षत्रात होता. हिरोशिमा नागासाकी हि मोठी शहरे उद्ध्वस्त झाली तेव्हा केतू मूळ नक्षत्रात होता. केतू त्याच्या दशा महादशा अंतर्दशेत मोठे बदल घडवून आणतो. केतू शकुनाचा आणि Intution चाही कारक आहे. ज्योतिष  शास्त्रा सारखे अतेंद्रीय ज्ञान केतूच्या अधिपत्याखाली येते. छल जुगार खेळणार्यांचा कारक केतूच.

राहू Expansion करतो तिथे केतू contraction . केतू आपल्याला जीवनातील मोह, आसक्ती पासून कट करून विरक्तीकडे नेतो. त्यागामध्ये सुख आहे आणि केतू त्याग करायला शिकवतो. आयुष्यात आपण अनेक गोष्टींचा संचय करत जातो , आपला हव्यास कधीच संपत नाही ,काहीनाकाही हवेच असते आपल्याला पण हा संचय आपल्याला समाधान नाही देवू शकत पण तिथेच एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती कमी होणे , परावृत्त होणे ,विरक्त होणे ह्या गोष्टी आंतरिक समाधान मिळवून नक्कीच देतील. म्हणूनच जेव्हा आपण हव्यासातून दूर जातो ,विरक्त होतो ,कश्यातच आसक्ती उरत नाही तेव्हाच आपला अध्यात्मिक प्रवास आयुष्यात एक उंची गाठतो आणि आपल्याला मोक्ष मिळतो. केतुजवळ धड आहे पण शीर नाही त्यामुळे तो विचारच करू शकत नाही . म्हणूनच बुधासारख्या विचारवंताशी त्याचे जमणे कठीण.


ज्योतिष शास्त्र गहन आहे पण अशक्य नाही . थोडे logic लावले तर आपण नक्कीच सहज शिकू शकतो. तुमची पत्रिका तुम्हाला माहित असली पाहिजे. नवीन शहरात गेलो कि रिक्षावाला कसा सगळीकडे फिरवून  आणतो कारण त्याला समजलेले असते आपण ह्या शहरात नवीन आहोत .मग जिथे 30 रुपये होणार तिथे ७० होतात ते कसे तर हे असे. हाच नियम आयुष्यात प्रत्येक गोष्टीत लागू आहे. आपण एखाद्या विषयात अनभिद्न्य आहोत हे समोरच्याला समजायचा अवकाश पुढे न बोलणे योग्य . पण तुम्ही त्या विषयातील जाणकार आहात आणि तशीच २-३ वाक्ये टाकलीत तर समोरचा सांभाळून बोलेल ,अगदीच टोपी नाही लावू शकणार आपल्याला ,पटतंय ना? म्हणून आपली पत्रिका आपल्याला माहित असावी .

समजा आपली मंगळाची दशा चालू आहे आणि मंगळ मकरेत उच्चीचा आहे तर ह्या दशेत आपले घराचे स्वप्न पूर्ण झालेय का ? ब्रोकर म्हणून काम करत असाल आणि कर्म स्थानात मकरेचा मंगळ असेल तर व्यवसाय तेजीत चालतोय कि व्यवसायाचे काही खरे नाही .हे तपासून तुमचे तुम्हीच पाहू शकता . संपूर्ण दशेत ज्या घडामोडी आयुष्यत घडतील त्यावरून त्या ग्रहाने कायकाय फळे दिली त्याचा अभ्यास होवू शकतो. म्हणजे तो ग्रह आपल्या पत्रिकेत शुभ म्हणायचं कि अशुभ हे समजेल. करून पहा. सगळेच पूर्णतः कळणार नाही पण निदान थोडे समजले तरी पुरे. मग ह्या अभ्यासाची सवय लागेल. गुरु कितीवेळा लग्नी आला आणि लग्नेशावर दृष्टी टाकून गेला तरी विवाह जमला नाही ,का? ह्याचे उत्तर तुम्हालाच समजेल. लग्नी गुरु आला की विवाह संपन्न होयीलच असे नाही,कारण महादशास्वामी . तो जर विवाहाची स्थाने देत नसेल तर सर्व फोल आहे. असो तर सांगायचे असे कि राहू केतू शनी मंगळ ह्यांना आपले शत्रू समजू नका कारण ते प्रत्येक वेळी वाईटच फळे देत नाहीत .

अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक निडर असतात. केतू म्हणजे मन , हृद्य आहे म्हणूनच त्याचा संबंध अनाहत चक्राशी संबंध आहे. हृदयात आत्मा आणि परमात्मा दोन्ही आहे. कुठलाही ग्रह केतूच्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि जर त्या ग्रहाची दशा असेल तर विष्णूचा जप केला तर फायदेमंद होतो. केतूचे मघा नक्षत्र अधिकार देते पण मघा नक्षत्राच्या लोकांनी घमंडा पासून दूर राहावे .मघा नक्षत्राचा संबंध आज्ञा चक्राशी आहे , ओमकाराचा जप करणेही लाभ देते. मूळ नक्षत्र मूलाधार चक्रात आहे जिथे आपली कुंडलिनी शक्ती विसावलेली आहे. मूळ नक्षत्रात असेलेल्या ग्रहाची दशा अंतर्दशा चालू असेल तर गणेशाची उपासना फलदायी ठरते. केतूच्या ७ वर्षाच्या महादशेत आयुष्यात अनेक स्थित्यंतरे होताना दिसतात म्हणून केतुकडे दुर्लक्ष करून चालत नाही .वृश्चिक ,धनु आणि मिनेतील केतू चांगली तर वृषभेत तितकी चांगली फळे देणार नाही. सुर्यासोबत केतू असेल तर ग्रहण योग होतो. सूर्य आपला आत्मा आहे ,वडिलांशी संबंध चांगले राहत नाहीत. कार्यक्षेत्रातही अश्या व्यक्ती पुढे येत नाहीत. चंद्रासोबत सुद्धा ग्रहण दोष होतो. चंद्र केतू आईसोबत संबंध चांगले नसतात. चंद्र केतू युती गुरूच्या राशीत योग साधनेस उपयुक्त. केतू बुधासोबत चांगली फळे देत नाही .पण बुधाच्या उच्च राशीत हि युती झाली तर असे लोक अनेक भाषा शिकणारे असू शकतात .शनी केतू युती प्रेतशाप योग आहे. केतू फारच त्रासदायक होत असेल तर केतूच्या बीज मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेने जप करावा.गणेशाच्या आराधनेने केतू शांत होतो त्यामुळे श्री गणेशाची पूजा ,जप ,आराधना ,अथर्वशीर्ष पठन फलदायी ठरेल.

प्रत्येक ग्रह हा शुभ आणि अशुभ परिणाम देणारा आहे. त्यामुळे पत्रिकेचा अभ्यास करताना प्रत्येक ग्रहाच्या शुभ अशुभत्वाचा अभ्यास करणेही आवश्यक असते नाहीतर आपले भविष्य चुकू शकते. राहू केतूच्या प्रभाखालील घटना आकस्मिक होतात. राहुकेतुचा संबंध पुर्व जन्माशी जोडला गेलाय .गेल्या जन्मात ज्या गोष्टी भोगण्याच्या राहून गेल्या त्याचे भोग ह्या जन्मात राहू दाखवतो तर गेल्या जन्मात अनेक गोष्टी भोगून झाल्या आणि त्याचा आपल्याला उबग आलाय त्या गोष्टींपासून ह्या जन्मात आपण परावृत्त राहतो , त्या केतू दर्शवतो.

साधनेचा ग्रह केतू आहे. दोन्ही ग्रहांना स्वतःची अशी रास नाही ते छाया ग्रह आहेत . जसे एखाद्या वृक्षाची सावली आपल्यावर असते पण आपण तिथून दूर गेल्यावर वृक्षाची सावलीही दूर जाते अगदी तसेच. सूर्य आणि गुरु हे प्रकाशाचे ,सात्विकतेचे ग्रह आहेत , ह्या ग्रहांना बलशाली केले तर राहुकेतुचा प्रभाव कमी होत जातो. म्हणूनच आपण अध्यात्माची कास धरली पाहिजे. सात्विक जीवन जगलो मोहापासून वंचित राहिलो तर राहूकेतूचा नकारात्मक परिणाम कमी जाणवेल. राहुकेतुचा सगळ्यात मोठा प्रभाव म्हणजे जीवनाचे काहीच रुटीन नसणे. सकाळी उशिरा उठणे ,कुठल्याही वेळी भोजन वगैरे करणे ,दिनक्रमास शिस्त नसणे ,दाढी वाढवणे ,केस न कापणे , अस्वछ्य राहणे अश्यानी राहुकेतूचे उपाय अवश्य करावेत, बेशिस्त जीवनाला वळण लावावे .आपल्या देवघरात केतुला स्थान आहे त्यामुळे देवघर आणि तेथील जागा स्वछ्य ठेवणे हे महत्वाचे आहे. आजपण केतूची बरीच माहिती घेतली.

माझे गुरु श्री(कै) गोगटे काकांकडे एक वयस्कर गृहस्थ यायचे. त्यांचा राहू केतूंचा खूप अभ्यास होता आणि त्यांचे वाचनही दांडगे होते. त्या दोघांच्या ह्या विषयावर खूप गप्पा होत . गोगटे काकांनी ३५ वर्ष ज्योतिष केलेले त्यामुळे त्यांना तर बर्याच कुंडल्या पाठही होत्या . त्यावेळी मी अगदीच प्राथमिक धडे गिरवत असे. काका सांगत अग लिहून घेत जा ,पण मला तेव्हा भूक लागलेली असायची,झोप आलेली असायची ,दुनियाभरचा कंटाळा आलेला असायचा. आज ह्या गोष्टींचे महत्व समजते पण ते दुर्दैवाने तेव्हा अजिबात नव्हते हे कबुल करायला लाज वाटत नाही. जे आहे ते आहे . आज ह्या गोष्टी आठवल्या कि वाटते तेव्हा खूप शिकून झाले असते .

असो तर आज आपण केतू आणि आपली कुंडली कशी monitar करायची ते शिकलो. ह्या महान शास्त्राचा जुजबी अभ्यास तरी प्रत्येकाने करावा असे मला आपल्याला कळकळीने सांगावेसे वाटते. इथे अनेक जाणकार आहेत.

त्यांनी सध्याची परिस्थिती पाहता online क्लास सुरु करावेत म्हणजे ज्योतिष शास्त्राचे प्राथमिक धडे सर्वाना गिरवता येतील.

एखादा शब्द कमी अधिक झाल्यास क्षमस्व....सर्वांच्या पत्रिकेतील केतू शुभ फळे प्रदान करो आणि सर्वाना मोक्ष मिळूदे हीच प्रार्थना.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका


antarnad18@gmail.com


#antarnad #moksh #rahuketu #7chakra #ketumangal#saturnmars#twin tower#hiroshima
#अंतर्नाद #मोक्ष#केतू #राहू #परमार्थ#शरीरातील चक्रे #धुमकेतू #मंगळ केतू #शानिकेतू#शकुनी मामा#ट्वीन टॉवर #हिरोशिमा 


Friday, 28 August 2020

हनुमान वडवानल स्तोत्राचे महत्व

||श्री स्वामी समर्थ ||



हनुमान वडवानल स्तोत्र हे अद्भुत ,त्वरित फलदायी होणारे स्तोत्र आहे. एखादे काम किंवा मोठी समस्या असेल तर हे स्तोत्र वाचतात. अनेक दिवस प्रयत्न करून काम मिळत नसेल तर संकल्प सोडून आपले काम होईपर्यंत ह्या स्तोत्राचे पठण करावे. आपले काम झाल्यावर मारुतीच्या किंवा शनी महाराजांच्या देवळात जावून तिथे ११ काळे उडीद , तेल , रुयीच्या पानाचा हार अर्पण करावा. त्यानंतर ह्या स्तोत्राचे पठण करू नये. काही लोक पुढेही वाचन सुरु ठेवतात . आपल्याला ताप आला तर आपण क्रोसिन घेतो पण ताप गेल्यावर ती घेत नाही तसेच आहे हे . काम झाल्यावर वाचन सुरु ठेवू नये.

प्रचीती घेवून बघा. हे सर्व उपाय वरवर साधे वाटत असले तरी त्यात सर्वात महत्व आहे ते “ मनातील भाव आणि श्रद्धा ” . अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने वाचन केल्यास ते फळ देणार ह्यात शंकाच नाही . अनुभव घ्या आणि श्री हनुमंताच्या कृपेस पात्र व्हा.

सध्या धनु राशीला शेवटची अडीचकी, मकरेस मधली आणि कुंभ राशीस पहिली अशी साडेसाती चालू आहे. शनीचा जप , हनुमान चालीसा वाचल्यास त्रास कमी होईल आणि मार्ग मिळेल .

सर्वांवर शनी महाराजांची कृपा राहो हीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना.

ओं शनैश्चराय नम:


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर अभिप्राय नक्की पाठवा .


Antarnad18@gmail.com


#antarnad #saturn #shani #hanuman vadvanal stotra #sadesati #faith #reverence
#अंतर्नाद #शनी #हनुमान वडवानल स्तोत्र #साडेसाती #श्रद्धा #विश्वास #प्रचीती 
#शनी कि ढय्या

Sunday, 2 August 2020

ज्योतिष्याची आचारसंहिता

|| श्री स्वामी समर्थ ||




ज्योतिष शास्त्र हे अथांग महासागर सारखे आहे. जितके खोलात शिरावे तितकी ज्ञानप्राप्ती अधिक. ज्योतिष शास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. ते घटना कधी घडतील ह्याबद्दल ठोकताळे दर्शवते. आपण आपले उत्तम कर्म करत राहावे आणि कधी गरज पडल्यास ज्योतिषाचे मार्गदर्शन घ्यावे. असे केल्याने काही घटनांचा आधीच वेध घेतला जातो आणि त्याची दाहकता कमी करण्यास मदत होते हे निश्चित .

शेवटी प्रारब्ध भोग चुकले नाहीत ,ते भोगूनच संपवावे लागतात . आपल्या भविष्यात कायकाय दडले आहे जे जाणून घ्यायची उत्सुकता नाही असा माणूस विरळा.त्यामुळे ज्योतिष शास्त्राबद्दल जनमानसात सदैव आकर्षण आहे.


भविष्यकथन म्हणजेच दुसर्याच्या आयुष्यावर बोलणे ,जे खचितच सोप्पे नाही . त्यासाठी ह्या शास्त्राचा तितकाच मुरब्बी जाणकार हवा .शास्त्राचा खरा अभ्यासक, उपासकच उत्तम भविष्यकथन  करू शकतो.

गेल्या काही दशकात ज्योतिषशास्त्राचा प्रसार अनेक माध्यमातून वेगाने होत आहे. ज्योतिष हा विषय शिकवणार्या  शिक्षणसंस्था कार्यरत आहेत ज्याचा लाभ अनेकांना हे शास्त्र शिकण्यास होतो आहे. ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज , जाणकारांनी ह्या विषयावर आपली पुस्तके प्रकाशित केली आहेत . अनेक नियतकालिके , दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. ज्योतिष संमेलने भरवली जातात त्यायोगे ह्या विषयाची माहिती आणि प्रसार होतो.

ज्योतिष शास्त्राचा अवाकाच मुळी इतका प्रचंड मोठा आहे कि त्याचा अभ्यास करण्यास एक जन्मही अपुरा पडेल. ह्या शास्त्राचा सखोल अभ्यास न करता वर्तवलेले भविष्य चुकीचेच ठरते आणि जातकास योग्य असे मार्गदर्शन मिळत नाही . ह्याचा परिणाम म्हणजे ज्योतिषी आणि ज्योतिष शास्त्र ह्यावरून सामान्य माणसाचा विश्वास उडत आहे. 

ज्योतिष कथन करणाऱ्या व्यक्तीची उपासनेची बैठक अत्यंत भक्कम हवी. ह्या शास्त्रावर संपूर्ण विश्वास, चिंतन मनन ,उपासना असेल तर भविष्य कथनास दैवी मार्गदर्शन लाभते आणि वर्तवलेले भविष्य अचूक ठरते.

ज्योतिष शास्त्राच्या आधारे कुठल्या उंचीपर्यंत  भविष्य कथन होवू शकते ? परवा मी कै. श्री श्री भट ,पुणे ह्यांचे एक प्रवचन ऐकले. त्यात त्यांनी असे म्हंटले आहे कि ज्योतिषाने शास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास करावा. आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या जन्माच्या आधीच त्यांनी नावे काय असतील आणि त्यांचा जन्म कधी होईल हे भविष्यकथन करता येते इतकी ह्या शास्त्राची उंची आहे अर्थात त्याचा तितकाच सखोल अभ्यासकच हे वर्तवू शकतो .

मुळात जातकाचा म्हणजे प्रश्नकर्त्याचा ह्या शास्त्रावर आणि ज्योतिष्यावर संपूर्ण विश्वास हवा. एखादी समस्या निर्माण झाली तर आणि तरच ज्योतिष मार्गदर्शन घेतले तर त्याला अर्थ आहे. आपला मुलगा शाळेत शिकत असताना त्याची पत्रिका ज्योतिषाला दाखवून त्याच्या विवाह संबंधी प्रश्न विचारणे योग्य ठरेल का? तर नाही. पण अनेक स्थळे पाहून विवाह जमत नसेल अडथळे येत असतील तर अश्या वेळी प्रश्न विचारणे योग्य ठरेल आणि उत्तरही अचूक येयील. काहीजण अनेक ज्योतिषांना प्रश्न विचारून स्वतःचा संभ्रम करून घेतात .पूर्वीच्या काळी राज ज्योतिषी असत. घराण्यातील सर्वांचे भविष्यकथन ते कथन करत असत.

प्रश्नकर्त्याने मनापासून, तळमळीने प्रश्न विचारला तर  प्रश्नकुंडलीत  विचारलेल्या प्रश्नाच्या भावात चंद्र असतो. म्हणजे घरासंबंधी प्रश्न असेल तर चंद्र ४थ्या भावात पाहायला मिळतो. ज्योतिष कथन करताना विषयाचे गांभीर्य हवे, उगीच मध्येच विषयांतर करून शिळोप्याच्या गप्पा मारू नये. विषयास धरून बोलावे आणि शास्त्राला न्याय आणि सन्मान द्यावा.

समोरच्याला बरे वाटावे म्हणून न सांगता पत्रिकेत जे खरे आहे ते भविष्य ज्योतिषाने कथन करावे .ज्योतिषाची उत्तम उपासना , साधना असेल तर त्यामुळे मिळालेल्या अंतस्फूर्तीनेहि ज्योतिष कथन होते आणि ते खरेही होते. अर्थात त्यासाठी तितकीच उपासना हवी ह्यात दुमत नसावे.

ज्योतिषाने कायम विध्यार्थी दशेतच राहावे. ज्ञानपिपासू राहावे. सातत्याने ज्योतिष शास्त्रातील नवीन घडामोडी , उत्खनन  ह्यांचा अभ्यास करत राहावा. सातत्याने पत्रिकांचा अभ्यास करत राहावे म्हणजे ज्ञान अधिक परिपक्व होत जाते.

उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे. ध्यानधारणा ,उपासना ह्याद्वारे अधिकाधिक अंतर्ज्ञान प्राप्त होते त्यामुळे ह्या वर अधिक भर द्यावा. ज्ञान, ध्यान आणि जप हि उपासनेची अंगे आहेत .ज्ञानाशिवाय ध्यान नाही आणि ध्यानावाचून जपाची सार्थकता नाही.

ज्योतिषशास्त्रात अनेक ग्रहयोग आहेत त्यामुळे भविष्यकथन करताना ज्योतिषाच्या ज्ञानाचा  खरा कस लागतो. प्रश्नकर्त्यास उत्तराची नेहमीच प्रतीक्षा असते पण ज्योतिषाने भविष्यकथनास पुरेसा वेळ घ्यावा आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करावे .,


काही लोकांचा ह्या शास्त्रावर अजिबात विश्वास नसतो. काहीच हरकत नाही पण विश्वास नाही म्हणून निदान त्याची टिंगल करणे , ह्या शास्त्रास कमी लेखणे हे तरी करू नये.  ह्या अगाध शास्त्राचे उपासक आणि समर्थक जगभरात आहेत , सतत संशोधने होत आहेत , नवनवीन नियम सिद्धांत पुढे येत आहेत . इतर अनेक शास्त्रांसारखे हे शास्त्र आहे आणि ते मानवी जीवन सुखी करण्यासासाठी वेळोवेळी “ वाटाड्या ” म्हणून मार्गदर्शन करत असते.

त्याचा कसा आणि कितपत उपयोग करून घ्यायचा ते ज्याचे त्याने ठरवायचे. शेवटी ज्योतिष सांगणारा हि माणूसच आहे. कधी त्याचेही निदान, केलेले तर्क चुकू शकतात . अश्यावेळी ज्योतिषाने आपला अहंकार बाजूला ठेवून आपली चूक कुठे झाली ह्याचा अभ्यास पुन्हा करावा हेच योग्य. शेवटी चुकांमधुंनच आपण शिकतो आणि परिपक्व होत जातो. पत्रिकेत सर्व ग्रहस्थिती व्यवस्थित असूनही एखादी घटना घडत नाही ,असे का होते ? तिथेच ज्योतिषाचा खरा अभ्यास सुरु होतो.

मी माझे ज्योतिषशास्त्राचे धडे श्री.(कै)वसंतकाका गोगटे ह्यांच्याकडे गिरवले. ते नेहमी म्हणत उत्तम ज्योतिषाच्या हातात पत्रीका आली कि संपले मग त्यानेच बोलावे हे उत्तम.ज्योतिषाचा अभ्यास हा एक्सरे मशीन सारखा असला पाहिजे. पत्रिकेच्या माध्यमातून जातकाचे आयुष्य आरपार दिसले पाहिजे.

सर्वात महत्वाचे ते ज्योतिषाचे मानधन. ज्योतिषाने किती मानधन घ्यावे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. पण मानधन जरूर घ्यावे आणि प्रश्नकर्त्यानेही ते आनंदाने , मनात आकस न बाळगता त्वरित द्यावे.मानधन देण्यास टाळाटाळ करणे हा ह्या शास्त्राचा आणि ज्योतिष कथन करणार्या ज्योतीषाचाही  अपमान
आहे. 

आपल्या आयुष्यातील प्रश्नांचा गुंता आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने अचूक सोडवणाऱ्या ज्योतिषाचे मानधन हे दिलेच पाहिजे ह्यात दुमत असण्याचा प्रश्नच येत नाही .ज्ञान फुकट दिले किंवा घेतले तरी ते लाभणार नाही त्यामुळे मानधन जरूर द्यावे.

खरतर भविष्य आपल्याला माहित नाही म्हणून जगण्यात आनंद आहे. ज्योतिष शास्त्राचा  उपयोग आयुष्य सुखी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून करावा पण त्यात वाहवत जावू नये.

ज्यांनी  गुरु केले आहेत किंवा अध्यात्मात आहेत त्यांनी पत्रिका बघूच नये. ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि अध्यात्मातील लोकांनी पुन्हा मागे वळून पाहू नये. गोगटे काका  म्हणत “आपण आपल्या आणि कुटुंबियांच्या पत्रिका पाहू नये ,त्या आपले गुरु पाहतील. आपल्या निष्ठा एकदा गुरुपदी वाहिल्या कि मग ते करतील ते योग्य ह्यावर आपली नितांत श्रद्धा हवी. त्यामुळे अश्यानी ज्योतिषाच्या फंदात पडू नये. 

ज्योतिष हे वेळ घालवायचे साधन नाही त्यामुळे त्याकडे उगीचच टाईमपास म्हणूनही पाहू नये.ज्योतिषाने सांगितलेले भविष्य खरे झाले तर त्याचे अभिनंदन करावयास अजिबात विसरू नये.

आपल्या स्वतःच्या उपासनेची बैठक इतकी भक्कम करावी कि आपले प्रश्न आपल्याच साधनेद्वारे सुटतील.

ज्योतिष शास्त्रात संयम हवा . आज ज्योतिष शिकलो आणि उद्या लगेच भविष्यकथनास सुरवात असे होत नसते.

एखाद्याच्या आयुष्यावर जबाबदारीने बोलणे ह्याला विषयाचा दांडगा अभ्यास लागतो ,तो आत्मविश्वास असल्याशिवाय ज्योतिष कथन करण्यास प्रारंभ करू नये.  ज्योतिषाची हि एक खूप मोठी जबाबदारी आहे.

ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे त्याचा योग्य तो सन्मान करावा हेच खरे.


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नोंदवा .


Antarnad18@gmail.com


#antarnad #astrology #astrologer #respect science #remedies #sixth sence #vision #meditation 
#sadhna #spirituality #sadhguru #zodiac chart #prarabdh karma #karma #confidence 
#अंतर्नाद #ज्योतिष शास्त्र #ज्योतिषी #मानधन #सन्मान #भविष्यकथन #अंतर्ज्ञान #ध्यानधारणा #उपासना #अध्यात्म #सद्गुरू #पत्रिका #कुंडली मिलन #प्रारब्ध 

Saturday, 25 July 2020

सूर्योपासना

||श्री स्वामी समर्थ ||





नवग्रहांतील महत्वाचा ग्रह “ रवी ”. रवी तारा असला तरी त्याला ज्योतिष शास्त्रात ग्रह म्हणूनच संबोधले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये रविला म्हणजेच सूर्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पत्रिकेत रवी शुभस्थितीत असेल तर सरकारी नोकरीचे योग येतात तसेच राजमान्यता प्राप्त होते. राजकारणातील व्यक्तींच्या पत्रिकेत प्रामुख्याने रवी सुस्थितीत आढळतो . स्त्रियांच्या पत्रिकेत शुक्र , मंगळासोबत रवी चांगला असेल तर पती चांगला मिळून वैवाहिक सौख्य चांगले मिळते .रवी हा आत्मा आहे तसेच त्याला पित्याचाही कारक  मानला आहे.

आपल्या शरीरातील आत्मा जितका महत्वाचा तितकाच रवी आपल्या आयुष्यातहि महत्वाचा. शरीरातील प्रतिकार शक्ती तसेच आपल्या शरीराचे तेज रविवरून ज्ञात होते .रवी एका राशीत अंदाजे महिनाभर भ्रमण असतो.
आपली संपूर्ण जीवसृष्टी रवीवर म्हणजेच सूर्यावर अवलंबून आहे. विचार करा एकदिवस सूर्य उगवलाच नाही तर काय होईल ? ह्यावरूनच सूर्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व समजते.

पूर्वीच्या काळी घरातील स्त्रिया सूर्योदयापूर्वी उठून सोवळ्याने सडासंमार्जन करत असत. दारात सुशोभित रांगोळी काढून तुळशीचे पूजन केले जात असे. घरातील पुरुषमंडळी आणि मुले सूर्यनमस्कार घालत असत.

सूर्योपासना करून आपण सामर्थ्यवान होवू शकतो. आपल्या पत्रिकेत रवी क्षीण असेल तर ह्या उपासनेने त्याचे बळ वाढू शकते .अर्थात ह्यात सातत्य हवे. रवी महादशा असेल त्यांनी तर हे अवश्य करावे.

सूर्याची १२ नावे घेऊन सूर्यनमस्कार घालून सूर्योपासना करता येते. सूर्यनमस्कार हे सर्वांगीण आसन आहे. 


आजकाल सूर्यनमस्कार घालणाऱ्या लोकांचे समूह आढळतात जे नियमाने रोज सूर्यनमस्कार घालतात .
नियमितपणे गायत्री मंत्र म्हणणे हि सुद्धा एक साधनाच आहे. ह्यामळे शरीर निरोगी होऊन सुर्यासारखे तेज प्राप्त होते. तसेच सूर्याला जल (Arghya) देणे ही सुद्धा एक उपासना आहे. नित्याने केल्यास त्याचे असंख्य फायदे आहेत . सूर्यास जल दिल्याने आत्मविश्वास वाढतो , शरीर तेजपुंज होते.

सूर्य नारायणाला जल(Arghya) देतो तेंव्हा त्याची सप्तरंगीं किरणे आपल्या डोक्यापासून पायापर्यंत पडून सर्व अवयवाना प्रभावित करतात. दृष्टीदोष जाऊन निर्णयशक्ती,  आत्मविश्वास तर वाढतो. शरीरातील पचनेन्द्रीये सुधारतात आणि जीवनशक्ती मिळून आरोग्याच्या तक्रारी दूर होतात .सूर्य किरणे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात. अर्ध्य दिल्याने शरीरातील 7 चक्रे उत्तेजित होतात. बुद्धी कुशाग्र होऊन सकारात्मकता वाढते .चैतन्य लहरी शरीरात प्रवाहित होतात .

सूर्याला जल(Arghya) कसे द्यावे.


एक फुलपात्र किंवा तांब्याचे भांडे पाणी भरून घ्यावे . त्यात लाल फुल किंवा कुंकू घालावे.काहीच नसेल तर नुसते पाणी घ्यावे . सूर्याला जल देताना भांड्यातील पाण्याची धार आणि आपण ह्यातून आपल्याला सूर्यदर्शन होयील इतपत भांडे वरती घ्यावे आणि सूर्यास सूर्याचा मंत्र किंवा गायत्री मंत्र म्हणत अर्ध्य द्यावे म्हणजे आपण आणि सूर्य ह्यामध्ये बरोबर पाण्याची धार असली पाहिजे . सूर्यास जल(Arghya) सावकाश घालावे जेणेकरून १२ वेळा सूर्यमंत्र म्हंटला जायील. मनोभावे नमस्कार करावा. सूर्योपासना नक्कीच फलदायी आहे.

लहान मुलांना सूर्यनमस्कार,गायत्री मंत्र  आणि सूर्यास जल देणे हे लहानपणापासूनच शिकवावे जेणेकरून त्यांचे आयुष्य अधिक सक्षम ,तेजोमय होयील आणि आत्मविश्वास वाढून बुद्धी तल्लख होयील. जीवनातील चढ उतारांवर ते डगमगणार नाहीत .काही मुले सारखी जरा ऋतू बदलला तरी आजार पडतात ,नाजूक प्रकृतीची असतात . अश्यांना निरोगी आयुष्य प्राप्त होण्यासाठी हि उपासना उत्तम आहे.

आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून आपले आयुष्य सतत प्रकाशमान करणारा हा तेजस्वी तारा म्हणजे सूर्य .चला तर मग सूर्योपासना करून आपण आपले जीवन अधिक तेजोमय , प्रकाशमय आणि उर्जामय करुया.

केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून चला सुरु करुया “ सूर्योपासना ”.

अस्मिता

लेख आवडल्यास आपले अभिप्राय खालील लिंकवर किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा .

Antarnad18@gmail.com

#antarnad #sun #water #copper vessel #kunku #immunity #positive thinking #confidence #brillient
#अंतर्नाद #सूर्य #उपासना #अर्घ्य #तांब्याची भांडी #कुंकू #जीवनशक्ती #सकारात्मक #आत्मविश्वास #तेजोमय

Tuesday, 14 July 2020

चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा..

|| श्री स्वामी समर्थ ||





आपण सर्वच उठसुठ शानिमहाराजाना वेठीला धरतो ...साडेसाती आली आणि त्यात जरा वाईट झाले कि लग्गेच साडेसातीवर खापर आणि चांगले झाले कि श्रेय स्वतःला...असे नसते ..साडेसातीवर शनी वरती प्रश्नांची सरबत्ती असते ,अनेक लेख ह्यावर येतात अनेक प्रश्न विचारले जातात पण सर्व निष्फळ जोवर आपण आपले स्वतःचे कर्म तपासून पाहत नाही ...शनी हा न्यायी ग्रह आहे तो उगीच कुणालाही त्रास देत नाही आणि शिक्षाही ठोठावत नाही .तुमचे कर्म उत्तम असेल तर तो कश्याला तुम्हाला त्रास देईल. 

स्वामी समर्थांचे पट्टशिष्य आनंदनाथ महाराजांच्या स्तोत्रात त्यांनी लिहिले आहे कि " कायिक वाचिक आणि मानसिक " सर्व पापे झाली जी अनेक ती माफ कर गुरुराया .म्हणजेच कायेने वाचेने आणि अगदी मनानेही मी कुणाचे वाईट चिंतले असेल तर ते मला माफ कर ...इतके सत्कृत्य आपल्या हातून चांगले झाले तर साडेसाती हे आपल्याला वरदान ठरेल ह्यात शंकाच नाही . माझी रास हि आणि माझा हा ग्रह इथे आहे आणि तिथे आहे हे बंद करा. प्रश्न थांबवा आणि उपासना सुरु करा .

 साडेसातीत तसेच राहू दशेत माणसाने समाजत जास्ती मिसळू नये . कमीतकमी बोलावे म्हणजेच कमी बोलले कि प्रश्न आणि संकटे निर्माण होणार नाहीत .जास्तीत जास्त जप करावा.. रोज स्वतःचे सिंहावलोकन करावे रोज रात्री झोपताना जे जे काही दिवसभरात झाले ते सद्गुरुचरणी ठेवावे म्हणे सकाळी उठाल तेव्हा तुमच्याकडे काहीच राहणार नाही मग अहंकारही येणार नाही कारण सर्व तुम्ही देवालाच देवून टाकले मग अहंकार कसला ? रोज नवीन अध्याय सुरु करा बघा आयुष्यातील वाईट दिवसही चुटकिसरशी निघून जातील....करून पहा... 

माझ्या राशीला साडेसाती कितवर आहे ? हे आणि असे अनेक प्रश्न नकोत ... काहीच कुणालाच विचारू नका हे माझे वैयक्तिक मत आहे...परमेश्वराने तुम्हाला रामबाण उपाय दिलाय सर्व दुक्खावर...नामस्मरण तो सोडून आपली जगभ्रमंती चालू असते ... नाम घ्यावयास लागा बघ काय चमत्कार होतो आयुष्यात ...
सध्या धनु , मकर  आणि  कुंभ ह्या राशींना साडेसाती चालू आहे .धनूची शेवटची अडीचकी मकर राशीची मधली आणि कुंभेची पहिली चालू आ

हे.  शनी महाराज अत्यंत न्यायी ग्रह आहे पण मिजासखोर लोकांना ते अजिबातच सोडत नाहीत . साडेसाती आयुष्यातील अत्यंत उत्तम काळ असतो ज्यात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतात जसे अनेकांची घरे होतात ,विवाह संपन्न होतात ,परदेशगमन ई तसेच आपण स्वतःही अंतर्मुख होतो . 

अनेक मनासारख्या गोष्टी होतात पण ज्यांच्यासाठी जे विनयाने ,नम्रतेने वागतील. ...शनिचा जप तुम्हाला संयम शिकवतो ,पैशाने सर्व सुखे मिळतील पण माणसे पैशाने विकत घेता येत नाहीत ती आपल्या स्वभावाने जोडावीच लागतात हि शिकवण मिळते . शनी सिंहावलोकन करायला शिकवतो ,आपल्या चुका आपल्यालाच उमजतात मग. 

पण काही जणांना आपल्या कामासाठी माणसे वापरून फेकून देण्याची सवय असते ती साडेसातीचे फटके खावूनही जात नाही . देवळात जा नाहीतर जप करा त्यांच्या स्वभावात काहीही फरक पडत नाही ..आणि मग शनी देवांच्या शिक्षेस ते पात्र ठरतात. 

भल्याभल्यांची झोप उडवणारे शनी महाराज इतके फटके मारून सुद्धा काडीचाही माज न उतरलेले लोक पहिले कि आठवतात ह्या ओळी ...चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा...

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.

शकून अपशकून

|| श्री स्वामी समर्थ ||


माणसाचे मन फार विचित्र आहे. एखादी गोष्ट आपण सहजासहजी स्वीकारत नाही पण जर ती सतत आपल्या मनावर बिंबवली गेली तर त्याचे थरावर थर साचून ती आपल्या मनात कायमची घर करून राहते . काही कल्पना मनात खोलवर रुजतात आणि त्या तश्याच पुढील पिढीस सुपूर्दहि केल्या जातात.

शकून आणि अपशकून ह्याबद्दलच्या संकल्पना मानवी मनात पिढ्यानपिढ्या घर करून आहेत . अपशकून झाला असे समजणे हे दुबळ्या मनाचे द्योतक आहेत का? भारतीय संस्कृती विज्ञान निष्ठ असली तरी भावनाप्रधान .रूढी परंपरा जपणारी आणि ईश्वरी अधिष्ठान मानणारी आहे . आज “अपशकून” ह्या मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या संकल्पनेबद्दल जाणून घेवूया आणि चर्चाही करुया. आजकालच्या आधुनिक युगात मुंबई पुण्यासारख्या शहरात ह्याचे प्रमाण खूप कमी आढळते ,पण ग्रामीण भागातून कदाचित ह्या संकल्पना अजूनही मानल्या जातात असे दिसून येते .

नवविवाहित सून घरी आली आणि घरातील कुणाचा नजीकच्या काळात मृत्यू झाला ,किंवा तत्सम घटना घडली ,कुणाचे मुल दगावले किंवा कुणाच्या धंद्यात खोट आली , नोकरी गेली तर त्याचे खापर सून वाईट पायाची आहे असे म्हणून तिच्यावर फोडले जाते. पण लग्न तर तुम्ही मुहूर्त पाहून केले ,आधी तर आमच्या मुलाला अशी बहुगुणी बायको मिळाली म्हणून तुम्हीच मुलीला डोक्यावर घेवून मिरवले होते .मग आता १-२ घटनांमुळे , ज्याचा वास्तविक तिच्याशी तिळमात्रही संबंध नाही , तिला का दोषी मानले जाते ? घटनांचे आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला हवे तसे अर्थ लावायचे का? अजून तिच्या हातावरील मेहेंदीचा रंग हि नाही उतरला तर तिचा सासुरवास सुरु होतो.

रस्त्यात मांजर आडवी गेली तर ७ पावले मागे जा अपशकून झाला आता कामात अडथळे येणार . त्यात काळी मांजर असेल तर अजूनच वाईट .अगदी खरे सांगते मी रस्त्यातून जाताना कधी मांजर आडवी गेली तर मी काही ७ पावले मागे जात नाही पण एक क्षण अरे बापरे मांजर आडवी गेली असा विचार मनात येतो ह्याची प्रांजळपणाने कबुली देते .पण बरेचदा मांजर आडवी गेली तरी मी ज्या कामास जात आहे ते झाले आहे हेही खरे .मांजर आडवी गेली कि काहीतरी वाईट अपशकून झाला हे इतके मनात खोलवर रुजले आहे कि कितीही आधुनिकपणाचा आव आणला तरी मनात विचार येतोच .

जाताना डोक्यावर कावळ्याने विष्ठा टाकली , घरातून बाहेर पडताना विधवा बाई समोर आली तर अपशकून होतो म्हणे. रात्री कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आला ,पाल दिसली कि अपशकून, बाहेर जाताना “कुठे निघालात “ असे कुणी विचारले कि आपल्या कपाळाला आठ्या पडतात .कावळे आकाशात घिरट्या घालू लागले ,मांजर रडू लागले तर मन धास्तावते ,मनाची चलबिचल होते . डोळ्याची पापणी फडफडली कि अपशकून ,अंगावर पाल पडली ,तिन्हीसांजा लहान मुल रडले ,प्रार्थना म्हणताना किंवा ओवाळताना निरांजन विझले ,देवाजवळची समई विझली ,घड्याळ बंद पडले ,घुबड दिसले(गावात शक्य आहे.मुंबईत हल्ली चिमणी दिसली तरी पुरे ),ह्या आणि अश्या कित्येक घटना म्हणजे अपशकून मानतो आपण .

त्याउलट एखादे काम होणार असेल आणि त्या दिवशी घरी कुठल्यातरी देवाचा प्रसाद आला तर तो आपण शकून समजतो . आपल्याला हवे तसे आणि हवे तेव्हा अनेक घटनांचे आपल्याला अपेक्षित असणारे अर्थ लावत असतो आपण.

प्रातःसमयी कोकिळेचा आवाज ऐकू आला , भारद्वाज पक्षी दिसला तर शकून समजतो आपण. रस्त्यात हत्ती दिसला तर धनलाभ होतो असेहि ऐकून आहे.

प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या स्वानुभवावरून सर्व ठोकताळे बांधत असतो ,पण त्याच्या किती आहारी जायचे हे आपण ठरवले पाहिजे. परमेश्वर सर्वत्र आहे ,चांगले वाईट ,पाप पुण्य ह्या सर्व ठिकाणी देव आहेच. एखाद्या घटनेकडे पाहताना सर्व बाजू विचारात घेतल्या पाहिजेत ,एकांगी विचार उपयोगाचा नसतो .

शकून अपशकून हे मानवी मनाचे खेळ आहेत कि त्यात खरेच काही तथ्य आहे मला नाही माहित .पण आपण फार सामान्य आयुष्य जगतो त्याही पलीकडचे इतकच मला माहित आहे.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com


लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.

Monday, 15 June 2020

आयुष्याचा लेखाजोखा ,ग्रह काय सांगतात ??

|| श्री स्वामी समर्थ ||






लेख क्र. 3.

ग्रह काय सांगतात ??


मंडळी, आपण सर्वच परिचित आहोत ते नवग्रहांशी .अनेक जण रोज नवग्रह स्तोत्रही म्हणतात . गेल्या काही वर्षात हर्शल , नेपचून , प्लुटो ह्या ग्रहांचा शोध लागला. अजूनही असंख्य ग्रह अंतराळात असतील ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असावा , पण ते अजूनही आपल्याला ज्ञात नाहीत . हे सर्व ग्रह आपल्या जीवनावर परिणाम करत असतात आणि म्हणूनच आपल्या पत्रिकेत त्यांना अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त आहे. असंख्य ग्रहयोग आहेत जे सर्व पाहणे शक्य नाही पण त्यातील काहींचा अभ्यास करुया . आज आपण काही ग्रहयोग बघू.


बुध हा ग्रहमालिकेतील सर्वात लहान तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे . चंद्र, शुक्र , बुध , रवी , गुरु ह्या ग्रहांना शुभ तर शनी , मंगळ, राहू आणि केतू ह्या ग्रहांना पाप ग्रह मानले जाते . ह्यामध्ये राहू आणि केतू हे पातबिंदू आहेत ज्यांना कुठलीही रास नाही . ते ज्या राशीत असतात त्या ग्रहाच्या अनुषंगाने फळ देतात . काही ज्योतिषी रवी ह्या ग्रहाला सुद्धा पापग्रह समजतात .

प्रत्येक ग्रह आपल्या जीवनावर परिणाम करतो . प्रत्येक ग्रहाचे चांगले वाईट परिणाम होतात . शुभ ग्रहसुद्धा बिघडले तर वाईट फळे देवू शकतात . चंद्र हा प्रत्येक राशीत सव्वादोन दिवस असतो तर शनी हा एका राशीत अडीच वर्ष. लग्नेश कुठलाही ग्रह असो तो ६ ८ १२ ह्या स्थानात असेल तर त्याचे कारकत्व कमी करतो. कर्क लग्नाचा ग्रह चंद्र जर हर्शलाच्या युतीत किंवा कुयोगात असेल तर व्यक्ती विक्षिप्त असते. लग्नेश ग्रह कुठल्याही कुयोगात बिघडला असेल तर आयुष्य काही प्रमाणत अयशस्वी , कष्टप्रद असते. चंद्र हा मातेचा तसेच मनाचाही कारक आहे . चंद्रावरून मनाची आंदोलने पाहतात तसेच भरती आणि ओहोटीही पहिली जाते . चंद्र जर बुधाच्या कुयोगात युतीत अथवा प्रतियोगात असेल तर त्वचारोग होवू शकतो. चंद्र अष्टमात भाग्येशासोबत असेल तर आयुष्य कमी असते. अर्थात बाकीचे योगही पाहावे लागतील. चंद्र हा शुक्र मंगल बुध ह्यांच्या नवपंचम किंवा लाभ योगात शुभफळ देतो. चंद्र जर राहू केतू ह्यांच्या युतीत असेल तर त्यास ग्रहणदोष म्हंटले जाते .


रवी हा आत्मकारक ग्रह आहे आणि पित्याचाही कारक आहे. पुरुषांच्या पत्रिकेत चंद्रावरून भार्या तर स्त्रियांच्या पत्रिकेत रविवरून पती पहिला जातो.मेष राशीत रवी उच्चीचा तर तुळेत निचीचा मानला जातो. रवी शनी युती वडिलांचे सौख्य दर्शवत नाही ,वडिलांशी पटत नाही. तसेच रवीसोबत राहू किंवा केतू हा ग्रहण दोष दर्शवतात .


मेष किंवा सिंह राशीत रवी दशमात सरकारी नोकरीचा योग आणतो. पत्रिकेत रवी हा मानमरातब आणि लौकिकाचा कारक आहे. मंगळ हा ग्रह सेनापती असून स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ बिघडला असेल तर मासिक पाळीचे त्रास असतात . मंगळ धडाडी आणि नेतृत्व गुण दाखवतो . मंगळ भावंडांचाही कारण आहे त्यामुळे मंगळ राहू केतू शनी ह्यांनी दुषित असेल तर भावंड सुख मिळत नाही. स्त्रियांच्या पत्रिकेत मंगळ सौभाग्याचा कारक आहे. द्वितीय स्थानात मंगळ असेल तर वाणी दाहक असते , चिडून संतापून बोलणे मंगळामुळे होते. त्यासोबत हर्शल असेल तर बघायलाच नको.


पत्रिकेत सप्तमेश मंगळ हर्षलाच्या कुयोगात युतीत अथवा प्रतीयुतीत असेल तर वैवाहिक सुखाचे काही खरे नाही . बुधाच्या राशीत मंगळ चांगला नाही आणि मंगळ बुध युती , शनी बुध युती खोटेपणा दर्शवते. मंगळ व्ययस्थानात असता आर्थिक नुकसान , उधळपट्टी ह्यामुळे कर्जबाजारीपणा येतो. शुक्र मंगळ युती हि प्रेमविवाहास पोषक आहे. पत्रिकेतील १२ १ ४ ७ ८ ह्या स्थानात मंगळ असेल तर पत्रिका मांगलिक आहे असे म्हंटले जाते . वयाच्या साधारण 28 नंतर मंगळ कमी त्रासदायक होतो.


शुक्र हा आयुष्यातील सौंदर्याचा , विलासाचा आणि आनंदाचाही कारक आहे. स्त्रियांच्या पत्रिकेत कन्या राशीतील शुक्र वैवाहिक सुखात कमतरता दाखवतो . तसेच शुक्र राहू युती परजातीय संबंध येवून विवाह दर्शवते. शुक्र हर्शल , शुक्र राहू ,शुक्र केतू ,शुक्राचे कारकत्व कमीच करतात . सिंह राशीत म्हणजेच रवीच्या राशीत शुक्र चांगली फळे देत नाही. पती आणि पत्नी दोघांच्याही पत्रिकेत विवाहाचा कारक ग्रह शुक्र शुभ स्थितीत असेल तर विवाह लवकर योग्य वयात होतो.

पंचमातील शुक्र बुध युती कालाप्रांतातील यश देते. बुध हा वाणीचा कारक ग्रह वाचास्थानात असेल तर बोलण्याचे काम असेल ते व्यवसायात यश देतो. बुध राहूच्या नक्षत्रात असेल तर खोटे बोलणे किंवा बुद्धिचतुर असतो.बुध बिघडला असता मज्जासंस्थेचे विकार होतात . शनी आणि बुध लग्नी असता विवाह सुखाचा होत नाही .

शनी मंगळाच्या युतीत फळ चांगले देत नाही . शनी अष्टमात असेल तर आयुष्य वृद्धी करतो. व्ययस्थानात बिघडलेला शनी तुरुंगाची हवा खाण्यास लावतो पण त्यासाठी पूर्ण पत्रिकेतील सर्व ग्रहांचा अभ्यास तसेच गुरु चा अभ्यास आवश्यक आहे. शनी आणि मंगळ हे बांधकाम क्षेत्राचे कारक आहेत .

शनी बिघडला असता कंपवात , लकवा ,अर्धांगवायूचा झटका ,फुफुसात पाणी होणे ह्या गोष्टी होवू शकतात .शनी दशा आणि साडेसाती शनी बिघडला असता खडतर जाते. शनी हा न्यायी ग्रह आहे . शनीची साडेसाती म्हंटले कि भल्याभल्यांची झोप उडते. पण शनी कारण नसताना त्रास देत नाही. तुम्ही चूक अपराध केला तरच शनी महाराज दंड सुनावतात .शनी आपला मित्र आहे तो आपल्याला आयुष्याचा उपभोग घेवून विरक्तीकडे नेतो. ह्या शरीराची चिमुटभर राख होणार आहे ह्याची जाणीव आपल्याला लवकर होईल तितका त्रास कमी. तेव्हा आता शनी महाराजांना आपला मित्र करायचे कि शत्रू हे तुमचे तुम्हीच ठरवा .

आपल्या संपूर्ण शरीरात एकच अवयव असा आहे ज्याने अनेक समस्या उद्भवतात आणि तो म्हणजे आपली वाचा . आयुष्यातील बरेच प्रोब्लेम आपल्या बोलण्याने होतात. त्यामुळे साडेसातीत कमीतकमी बोलावे, लोकांत कमीतकमी मिसळावे. मनन चिंतन अधिक करावे. उपासनेचे फळ निरंतर टिकणारे आहे त्यामुळे उपासनेकडे , ध्यानाकडे अधिक लक्ष्य द्या .


गुरु हा ग्राहमालीकेतील सर्वात मोठा ग्रह. शिक्षण , मुले होणे , विवाहसौख्य, उपासना ह्या सर्वासाठी पत्रिकेत गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरु केतू युती हि अध्यात्मिक उपासना दर्शवते .गुरुचे कारकत्व बुधाच्या राशीत कमी होते . गुरु जर राहूच्या नक्षत्रात असेल तार त्यास चांडाळ दोष म्हणते जाते .ह्या योगात सुद्धा गुरूची जोरदार फळे मिळत नाहीत .

हर्शल प्लुटो आणि नेपचून हे ग्रह नवग्रहात गणले जात नाहीत . १२ व्या स्थानातील हर्शल परदेशगमनाचे योग आणतो. हर्शल हा मंगलापेक्षाही १०० पटीने जास्ती दाहक आहे. धनस्थानातील हर्शल सांपत्तिक स्थिती फार उंचावत नाही. नेपचून हा शुभ असेल तर अध्यात्मिक प्रगती , भविष्यातील घटनांचे संकेत देतो. सप्तमेश ग्रह हा ६ ८ १२ मध्ये असू नये, वैवाहिक सुखात कमतरता निर्माण होते. मंडळी असे असंख्य ग्रहयोग अभ्यासता येतील. कुठल्याही एका ग्रहामुळे आयुष्यात घटना घडत नाही. त्यामागे ग्रहस्थिती , महादशा , कुयोग अनेक गोष्टी पाहायला लागतात .

त्यामुळे माझा रवी इथे आहे आणि माझा शुक्र इथे आहे तर काय होईल असे बाष्कळ प्रश्न कुणालाही विचारू नयेत कारण एक ग्रह म्हणजे आयुष्य नाही.

ज्योतिष शास्त्र शिकायला अवघड नाही पण त्याचा आवाका खूप जास्ती आहे त्त्यासाठी आवड आणि सवड दोन्ही पाहिजे . ते शिकताना संयम असणे गरजेचे आहे तसेच संशोधक वृत्ती हवी . त्याहीपलीकडे अर्धवट ज्ञान हे अतिशय वाईट असते. त्यापेक्षा अज्ञानी असणे केव्हाही उत्तम.

मुल झाले नाही अश्या लोकांच्या काही पत्रिका , विवाह झाला नाही , शिक्षणात अडथळे आले अश्या अनेक पत्रिका घेवून त्याचा सखोल अभ्यास आपल्याला नियमांपर्यंत पोहोचवतो.

ग्रह आपापली कामे चोख बजावत असतात ते पक्षपाती पणा करत नाहीत ,म्हणूनच म्हंटले आहे “ Stars Plays a Major Role In Life ”.

आता आपल्या लक्ष्यात आले असेल आपण आपली पत्रिका ज्योतिषास दाखवली कि त्यालाही किती सखोल अभ्यास करावा लागत असेल ,कारण एखाद्याच्या आयुष्याबद्दल अभ्यासपूर्ण , अधिकाराने बोलणे खचितच सोपे नाही, पटतंय ना ?

लेख आवडला तर अभिप्राय लिहायला विसरू नका .


antarnad18@gmail.com


अस्मिता

Monday, 8 June 2020

विचार पत्रिकेतील १२ स्थानांचा.

||  श्री स्वामी समर्थ ||


पत्रिकेतील  १२ स्थाने काय दर्शवतात 

लेख क्र. 2.



मंडळी , पत्रिकेचे विभाजन १२ भावात (स्थानात) झाले आहे आणि ह्या पलीकडे आपले आयुष्य नाही. सोबत असलेल्या पत्रिकेत प्रथम स्थानात १ अंक आहे ,जे प्रथम स्थान दर्शवते . अश्या प्रकारे पत्रिकेतील १२ स्थाने आहेत . १२ अंक हा व्ययस्थान  शेवटचे स्थान दर्शवतो. प्रत्येक स्थान विशिष्ठ गोष्टी सूचित करते . जसे प्रथम स्थानावरून आपले स्वतःचे व्यक्तिमत्व समजते. अश्याप्रकारे प्रत्येक स्थान आणि त्यातील ग्रह आपल्याला बर्याच गोष्टी सूचित करतात . 

जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवणारी रास म्हणजे आपले लग्न किंवा लग्नराशी . प्रथम स्थानात चंद्र किंवा शुक्र असेल तर व्यक्ती देखणी , रंगाने गोरी असते . चेहरा गोल असतो . हर्शल ह्या स्थानात असता व्यक्तीचा स्वभाव विक्षिप्त असू शकतो. २रे स्थान आपले कुटुंब ,वाणी आपले बोलणे, कुटुंबाकडून मिळणारे धन आणि आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी सांगते.चंद्र शुक्र गुरु असतील तर गोड बोलण्याकडे आणि खाण्याकडे कल असतो तर येथील मंगळ वाणी जहाल करतो तसेच तेलकट चमचमीत खाणे पसंत असते. येथील राहू व्यसनेही दर्शवतो. शनी असल्यास मितभाषी आणि वेळ प्रसंगी मनावर जखमा करणारे कायद्याची भाषा बोलणारे असणारे असतात . हर्शल असेल तर आर्थिक स्थिती आयुष्यभर तशीच राहते. ३ र्या स्थानात शनी मंगळ ,किंवा रवी , राहू असता व्यक्ती पराक्रमी , धीट असते. ह्या स्थानातील पाप ग्रह आपल्याला पराक्रमी बनवतात पण शेजार्यांशी ,भावंडांशी संबंध चांगले ठेवत नाहीत. ३र्या स्थानावरून जवळचे प्रवास पहिले जातात ,इथे चंद्र असेल तर आयुष्यात पुष्कळ प्रवास होतात . ३र्या स्थानातील अशुभ ग्रहांची युती जास्तीकरून मंगळाशी भावंडांच्या बाबत एखादी अशुभ घटना दर्शवते . लहान भावंडांशी पटणे कठीण होते . 

पराक्रम स्थानात गुरु सारखा ग्रह काही अंशी निष्फळ ठरतो परंतु गुरु सारखा शुभग्रह हस्ताक्षर सुरेख वळणदार आणि मोठे असते . पापग्रह असतील तर अक्षर वाचताही येत नाही . इथे पापग्रह असता म्हातारपणी कमी ऐकू येते. ४थ्या स्थानाचा स्वामी जर ३ र्या स्थानात असेल तर मानले तर सुख असेच म्हणायला लागेल. कारण चतुर्थेश चतुर्थेशाच्या व्ययात . चतुर्थ स्थानावरून मातेचे सुख , वाहन , घर आणि शिक्षण पाहिले जाते.. तिथे गुरु किंवा शुक्र ह्यासारखे ग्रह उत्तम वाहन आणि घराचे सौख्य देतात .तिथे बुधासारखा ग्रह एकापेक्षा अनेक वास्तू प्रदान करतो. पण चतुर्थ स्थानात जर शनी मंगळ युती राहू मंगळ युती शनी केतू युती ह्या सारख्या युती नमूद केलेल्या गोष्टीत न्यूनता आणतात . ४थ्या स्थानात मंगळ धुमसत राहतो , घरात सतत मनाविरुद्ध घटना ,वाद होतात . येथे हर्शल असता आई मुलाच्या नात्यात वैचित्र्य असते . स्वयपाकघरात काम करताना काळजी घ्यावी लागते. ३र्या स्थानावरून आपले अंतर्मन सुद्धा पहिले जाते  आणि ४थ्या स्थानावरून आपले मन . ५ वे स्थान संतती ,प्रेम प्रणय विद्या दर्शवते. येथील पंचमेश ७व्या स्थानात किंवा सप्तमेशा सोबत पंचमात किंवा सप्तमात असेल तर प्रेमविवाह होण्याची शक्यता अधिक असते. ५ व्या स्थानात चंद्र ,गुरु किंवा शुक्र असेल तर संतती बुद्धिमान आणि आज्ञाधारक, देखणी असते. ५ वे स्थान हे पुर्व कर्माचेही स्थान आहे . 

सट्टा बाजार ह्यातील यशापयश येथून पहिले जाते . तिथे राहू ,राहू नेप युती असेल किंवा राहू असेल तर संतती सौख्य मनासारखे मिळत नाही. तिथे रवीबुध असतील तर संतती हुशार असते. ६ व्या स्थानावरून आजार , स्पर्धात्मक परीक्षात मिळणारे यश आणि सवत पहिली जाते .६ वे स्थान म्हणजे रोग ऋण आणि शत्रू स्थान . ६ व्या स्थानात राहू असेल तर सर्वाना पुरून उरतो. इथे राहू मंगळ युतीत असतील तर पोटाचे विकार ,आणि एकदातरी टायफॉईड होण्याची शक्यता असते .आयुष्यातील शत्रु ह्या स्थानावरून पाहतात तसेच घरात काम करणारे नोकरचाकर सुद्धा ह्य्च स्थानावरून पाहतात . ७ व्या स्थानात हर्शल किंवा हर्शल नेप असतील तर लग्न जमताना व्यवस्थित चौकशी करावी कारण फसवणूक होण्याची शक्यता असते , नुसता हर्शल असेल तर विवाहात वैचित्र्य आढळते तसेच पती किंवा पत्नी विजोड असतात . कधीकधी आकस्मिक विवाह होतो तर कधी होतही नाही. इथे शनी सारखा ग्रह असेल तर विवाहास विलंब सर्वसाधारण पणे वयाच्या 30 नंतर विवाह होतो . चंद्र असेल तर पत्नी चांगली मिळते . अर्थात हे सर्व ग्रह कुठल्या राशीत आहेत ह्यावरही बरेच काही अवलंबून आहे . विवाह हा खूप मोठा विषय आहे त्यावर आपण पुढे अभ्यास करणारच आहोत.

८ व्या स्थानात शनी असेल तर तो आयुष्य वृद्धी करतो . अष्टमेश उत्तम स्थितीत किंवा अष्टमात असेल वडिलोपार्जित इस्टेट मिळतेच . अष्टम स्थान हे मृत्युस्थान म्हणून ओळखले जाते. गंडांतर योग ८ व्या स्थानातून पाहतात .पण अष्टमेश कुठला ग्रह आहे हेही महत्वाचे.  ९ वे स्थान म्हणजे भाग्यस्थान. ह्यातील गुरु शनी केतू  हे ग्रह अध्यात्मिक प्रगती दर्शवतात . राहू भाग्यात अडथळे निर्माण करतो पण तो साधना अध्यात्मिक प्रगतीही दाखवतो. ९ व्या स्थानावरून वडिलांचा बोध होतो. १० व्या स्थानावरून नोकरी व्यवसाय पहिला जातो. इथे जर हर्शल नेप सारखे ग्रह असतील तर अनेक वेळा नोकरीमध्ये बदल होतात . १० वे स्थान हे मान सन्मानाचेहि आहे . ११ व्या स्थानाला लाभ स्थान म्हणतात . हे पत्रिकेतील महत्वाचे स्थान कारण  आयुष्यात होणारे सर्व लाभ हे ११ व्या स्थानावरून समजतात . मोठा भाऊ इथून पाहतात .इथे चंद्र असेल तर स्त्री वर्गाकडून लाभ होतो . ११ वे स्थान हे मुख्यत्वे मित्रांचे स्थान आहे. ११ व्या स्थांनामध्ये शुक्र हर्शल  किंवा शनी मंगळ ह्यासारखे ग्रह असतील तर कदाचित चुकीच्या संगतीने आयुष्य वेगळ्या वाटेवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवनात संगत फार महत्वाची आहे. आपल्या बरोबर असलेल्या लोकांवरून आपली ओळख होत असते. १२ वे स्थान म्हणजे व्यय स्थान . १२ व्या स्थानावरून परदेशगमन, तुरुंगवास, दवाखाना ज्ञात होतात. १२ व्या स्थानात गुरु राहू शनी परदेश गमनास पूरक असतात . शनी , गुरु असेल तर पश्चिमेकडील देश ,राहू असल्यास यवनांचे देश यात भाग्योदय होतो. २र्या स्थानाचा मालक जर १२ व्या स्थानात असेल तर अश्या व्यक्तीकडे पैसा टिकत नाही त्याचा व्यय होतो. 

प्रथम स्थानापासून बारावे स्थान ज्याला व्यय स्थान म्हणतो तिथपर्यंत प्रत्येक स्थान आपल्याला काय देते हे ह्या कोष्टकात लिहिलेले आहेच. आपली पत्रिका उघडून पहिलीत तर अनेक गोष्टींचा खुलासा तुमचा तुम्हालाच होईल. 

मंडळी, शनी हा प्रत्येक गोष्टीत विलंब करतो. चंद्र हा अत्यंत जलद गतीने जाणारा ग्रह आहे म्हणूनच चंद्र एका राशीत सव्वा दोन दिवस तर शनी एका राशीत अडीच वर्षे असतो . शनीचे लग्न म्हणजेच मकर किंवा कुंभ लग्न असेल तर ज्योतिषाला सुद्धा अश्या जातकाची पत्रिका करायला आणि बघायलाही काही ना काही कारणाने विलंब होतो. शनी ज्या स्थानात असेल त्या गोष्टीस विलंब करतो . जसे ५ व्या स्थानात असेल तर संतती होण्यास विलंब होतो तसेच ८ व्या स्थानात असेल तर दीर्घायुष्य देतो. अश्याप्रकारे आपण आपल्या पत्रिकेचा अभ्यास स्वतःच करू शकतो. आपल्या ओळखीत अगदी वयाची ९० वर्षे पार करणाऱ्या लोकांच्या पत्रिकेत बहुतांश वेळेला शनी ८ व्या स्थानात असेल. शनीचे लग्न म्हणजेच मकर किंवा कुंभ असणार्या व्यक्ती सडपातळ बाधा असणार्या आणि सावळ्या ,उंच असतात.  पत्रिकेत ८वे स्थान वडिलोपार्जित संपत्ती दर्शवते अर्थात ती जमीनजुमला किंवा आर्थिक म्हणजे रोख रक्कम ह्या स्वरूपातही असते आणि ८ व्या स्थानाचा मालक ग्रह सुस्थितीत असेल तर ती मिळते अन्यथा नाही. कधीकधी ती मिळूनही तिचा उपभोग घेणे नशिबात नसते. वडिलोपार्जित संपत्ती वरून घरे पेटतात आणि नात्यात दरी निर्माण होते तीही कायमची हे सर्वश्रुत आहे. 

मंडळी तर आज ह्या १२ भावांचा अभ्यास करताना तुमच्या हे नक्कीच लक्ष्यात आले असेल कि आपले प्रश्न हे ह्या भावांशी निगडीत असतात . नोकरी व्यवसायाचा प्रश्न १० भावावरून तर लग्नाचा २ ७ ११ ह्या भावांवरून , आजारपण , परदेशगमन १२ व्या भावावरून तर वाहनसौख्य ४ ११ ह्या भावांवरून पहिले जाते. नोकरी जाणे किंवा स्वेछ्येने सेवानिवृत्ती घेणे ह्यासाठी ९ आणि २ भावांचा विचार होतो. उच्च शिक्षणासाठी ९ वा भाव आणि परदेशातील उच्च शिक्षणास ९ १२ हे भाव विचारात घ्यावे लागतात .प्रत्येक भाव किंवा स्थान पुढील भावाचे अथवा स्थानाचे सुख देत नाही . जसे ६ वे स्थान कार्यान्वित झाले तर स्पर्धात्मक परीक्षेत यश येयील पण विवाह जमण्यास अडचणी कारण ६ च्या पुढील स्थान म्हणजे ७ वे स्थान त्याचे फळ मिळणार नाही. 

जेव्हा आपण नोकरीचा प्रश्न पाहतो तेव्हा अर्थात १० व्या स्थानाचा विचार करतो . १० व्या स्थानाचा संबंध ३  ९ किंवा १२ शी येत असेल तर नोकरीचे स्थान दूरवर किंवा फिरतीचे असते ,त्याउलट ४ त्या स्थानाशी संबंध येत असेल तर नोकरी घराजवळ असू शकते. सर्व करारमदार, अग्रीमेट ३ र्या स्थानावरून पहिले जातात तसेच मिडिया क्षेत्र हे ३ र्या स्थानावरून पहिले जाते. मेडिकल आणि इंजिनियरिंग ह्यातील शिक्षणासाठी ८ वे स्थान पाहतात .

काही माणसे आयुष्यात कधीच एकही पैसा न मिळवता हि उत्तम आयुष्य जगतात कारण त्यांचे पूर्वसुकृत . आणि कधी कधी अत्यंत कष्टात आयुष्य असणार्यांच्या पदरी काडीचेही सुख नसते. चंद्र मनाचा कारक त्यावरून आपल्या मनाची बैठक समजू शकते. ५ स्थान आपले पूर्वसुकृत दर्शवते . ५ स्थानावरून प्रथम संतती पाहायला मिळते . त्या स्थानात राहू किंवा नेप ,राहू , शनी राहू असतील तर त्या स्थानाच्या सुखात म्हणजेच संततीच्या सुखात वैगुण्य पहावयास मिळते. 

९ स्थानावरून उच्चशिक्षण पाहतात. आजकाल MBA , MTch, MS असे  उच्च शिक्षण घेताना CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षा द्याव्या लागतात . स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी ६ वे स्थान आवश्यक आहे तसेच ९वे स्थानही . आजकाल ह्या परीक्षां साठी बरीच मोठी फी आकारण्यात येते त्यामुळे ह्या परीक्षेस बसण्यापूर्वी ज्योतिष सल्ला घ्यायला हरकत नाही . माझ्या घरातच उदाहरण आहे, माझा मुलगा नोकरी सांभाळून MBA चा अभ्यास करत होते ,खूप कष्ट घेत होता पण त्या वर्षी त्याला गुरूचा पाठींबा नव्हता . हि परीक्षा पुढील वर्षी दिलीस तर नक्कीच जास्ती चांगेल यश मिळेल हे त्याला सांगितल्यावर त्याने अभ्यास स्थगित केला पण परीक्षा दिली तेव्हा त्याला CET मध्ये ८३ % मार्क मिळाले आणि यानंतर च्या वर्षात ९९.४% इतके मार्क मिळवून यश मिळाले. मुद्दा हा कि आपल्या आयुष्यातील उत्तम काळ समजला आणि त्यावेळी कष्टांची जोड दिली तर तीच गोष्ट जास्ती चांगली होवू शकते . ८ व्या स्थानाशी मंगळाचा संबंध आला तर technical शिक्षण होवू शकते तसेच . ८ व्या स्थान हे मृत्य स्थान म्हंटले आहे. ८ व्या स्थानाशी निगडीत महादशा असेल तर विमा एजंट ची नोकरी किंवा तत्सम व्यवसाय लाभेल . मृत्युपश्चात अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दुकान सुद्धा चालू शकेल किंवा एखादे पौरोहित्य करणारे गुरुजी असतील तर मंगळागौर , सत्यनारायण ह्या पुजेऐवजी त्यांनी अन्तेष्टी दहावे तेरावे चे विधी करावेत . ६ , ७  आणि १० ह्या स्थानाचा संबंध असेल तर व्यक्तीचा ओढ व्यवसायाकडे असू शकतो. बांधकाम क्षेत्रात किंवा बांधकाम क्षेत्रातील agent म्हणून काम करताना पत्रिकेतील मंगळ उत्तम लागतो. 

पत्रिकेत प्रत्येक स्थानाचे एक वेगळे वैशिष्ठ आहे आणि त्या भावानी दर्शवलेल्या गोष्टींसाठी त्या त्या भावाचा विचार करावा लागतो. पत्रिका बघताना आपले logic पावरावे लागते . एकदा आपल्याला प्रत्येक स्थान काय देते हे समजले कि पाया भक्कम होतो आणि मग प्रश्न सोडवताना बरोबर त्याच स्थानाचा आणि त्या स्थानाने दर्शवलेल्या गोष्टींचा विचार केला जातो. जसे ७ व्या स्थानाचे म्हणजे विवाह स्थानाचे भाग्यास्थान ३रे स्थान आहे. त्यामुळे विवाहसौख्य किंवा वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न आला आणि ३र्या स्थानात पापग्रह ठाण मांडून बसले असतील तर ज्योतिषी काय समजायचे ते समजतो. 

असंख्य गोष्टींचा अभ्यास, अनेक नियम, ग्रहांची स्थिती ,महादशा  आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करून ज्योतिषी एखादा निष्कर्षा पर्यंत येवू शकतो . प्रश्नकर्त्याला नेहमीच उत्तराची घाई असते . वरील विवेचनावरून हा अभ्यास किती सखोल आहे ह्याची झलक पाहायला मिळाली असेल .  ज्योतिषाकडून एखाद्या प्रश्नासंबंधी मार्गदर्शन घेताना कारण नसताना घोड्यावर बसून जावू नका , त्याला त्याचा वेळ घेवू द्या , अभ्यास करूदेत नाहीतर अपुर्या अभ्यासामुळे आणि तुम्ही केलेल्या लगीन घाईमुळे उत्तर नक्कीच चुकू शकते ..मग ज्योतिषाच्या नावाने बोंबलायला आपण मोकळे ..तसे होवू नये म्हणून आपणही काळजी घेतली पाहिजे. कारण त्याच्या उत्तरावर पुढचे बरेच काही अवलंबून असते . इथे पी हळद हो गोरी हा नियम लागू पडत नाही. विशेष करून लग्नाच्या पत्रिका पाहताना अनेक गोष्टींचा विचार करायला लागतो . अगदी प्रेमविवाह असेल तरी जोडप्याने ज्योतिष मार्गदर्शन घ्यावे असे आजकालची परिस्थिती पाहून वाटते .

लग्न ह्या विषयावरील लेखात त्या सर्व गोष्टी आपण पाहूच. 

चलातर मग आपापल्या पत्रिकेतून स्थानाचा अभ्यास करण्यास सुरवात करुया . पुढील लेखात पत्रिकेतील ग्रह आणि त्यांच्या योगां बद्दल जाणून घेवूया.


अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर लिहा 

antarnad18@gmail.com



आयुष्याचा लेखाजोखा

|| श्री स्वामी समर्थ ||



श्री गणेशाय नमः

लेख क्र. 1.

ज्योतिष शास्त्राची व्याप्ती आणि आवाका प्रचंड मोठा आहे. जितके शिकावे तितके कमी आहे . एखाद्या माणसाला हे शास्त्र शिकण्यास त्याचा जन्मही अपुरा पडेल इतके अथांग महासागरासारखे हे शास्त्र आणि त्याचे असंख्य अभ्यासक आहेत. संपूर्ण जगभरात ह्या शास्त्रात प्रत्येक क्षणी काहीना काही नवीन संशोधन होत असते . ह्या शास्त्रास माता पार्वतीचा शाप आहे म्हणून ह्या शास्त्रास शापित शास्त्रही म्हंटले जाते. 

ज्योतिष शास्त्रा बद्दल कुतूहल नाही असा माणूसच विरळा. आपले आयुष्य हे सुख दुक्ख , विवंचना , आनंद ह्या सर्वांनी भरलेले आहे. अनेक  चांगल्या वाईट घटना आयुष्यात घडतच असतात. अनेक गोष्टीनी आपण त्रस्त होतो मार्ग मिळत नाही मग अश्यावेळी आपण ज्योतिष महाशयांच्या घराच्या पायर्या चढतो . हेतू हाच कि मार्गदर्शन मिळावे. 

मंडळी, ज्योतिष हे आपल्या आयुष्यात वाटाड्याचे काम करत असते . ह्या शास्त्रानुसार मिळालेले बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला वाट दाखवत असते. अंधारातून प्रकाशाकडे नेत असते. आपली अडखळत चालणारी आयुष्याची गाडी आपल्या ज्ञानाने ,मार्गदर्शनाने मार्गस्थ करणाऱ्या ज्योतिषाचे मानधन देण्यास मात्र आपण कुरबुर करतो . नेमका त्याच वेळी आपण संकुचित राहतो . देवाकडून घेताना आपण दुप्पट ,पाचपट घेतो . आपण कधीही देवा आता मजला पुरे, अधिक नको मी समाधानी आहे असे म्हणत नाही . घेताना हजार हातानी घेतो पण देताना संकुचित वृत्ती. देवानेही आपल्याला देताना हात आखडता घेतला तर ? असो.

आपल्यापैकी प्रत्येकालाच कुंडलीची प्राथमिक ओळख आहे. कुंडली म्हणजे काय तर तुमचा स्वतःचा जणू आरसा . माझे गुरु श्री वसंतराव गोगटे नेहमी म्हणत असत अग पत्रिका म्हणजे XRAY Machine असते . एखाद्या उत्तम जाणकाराच्या हातात तुमची पत्रिका आली कि त्याला आरपार सर्व दिसते , समजते पण प्रत्येकाच्या पत्रिकेवर किती, काय आणि कसे भाष्य करायचे ते त्या ज्योतिषावर अवलंबून असते. असो .आपण जन्माला आलो त्यावेळी आकाशात असणारी ग्रहस्थिती म्हणजे तुमची स्वतःची कुंडली. जी एकदाच लिहिली जाते, त्यात बदल होत नसतो . आपण आपले प्रारब्ध जन्माला घेवून येतो. आपले पूर्वसंचीत आपले ह्या जन्मात फळते मग ते चांगले वाईट काहीही असो. अर्थात ह्या जन्मात आपल्या हाती असते ते म्हणजे उत्तम कर्म करत राहणे आणि काही भोग असतील तर ते ह्याच जन्मी भोगूनच संपवून टाकणे .

तर सांगायचे असे, कि आपली पत्रिका काय सांगते ह्याचा खोलात नाही पण जुजबी अभ्यास प्रत्येकाने जरूर करावा. प्रत्येकाला आपली पत्रिका अंशतः तरी माहिती असलीच पाहिजे. ह्यामुळे आपले प्रश्न कमी होतील, आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचे मार्गदर्शन आणि क्रम ह्याचे अवलोकन आपल्याला होईल आणि प्रश्न हि कमी होतील. काही उदाहरणे पाहू , जसे आपल्या आयुष्यात पैसा येतो पण टिकत नाही हे समजले तर तसे का होतेय ? बरेच वय उलटून गेले तरी आपला विवाह होत नाही ,असे का? मग तो होणार का ? आणि होणार तर त्याचा योग्य कालावधी काय असेल ? बरेचदा संतती सुख प्राप्त होत नाही ,अश्यावेळी भारतीय समाजात बहुतांश वेळी स्त्रीवर त्याचे खापर फोडले जाते ,पण सत्य काही वेगळेही असू शकते . एखाद्या मुलाचे अभ्यासात लक्ष्य नसते पण त्याचवेळी एखाद्या कलेत तो नैपुण्य मिळवत असेल आणि पुढे तो त्या कलेतून अर्थार्जनही करू शकेल पण पालक नेमके ह्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि मुलाचे नुकसान होते . एखाद्या मुलाला वाईट संगतीमुळे व्यसने लागतात आणि मग गोष्टी हाताबाहेर गेल्या कि मग अश्यावेळी ज्योतिषी तरी काय सांगणार ? त्यापेक्षा वेळेच्या आधी मुलाची पत्रिका माहित असेल तर पालक अपत्यावर लक्ष्य ठेवून घडणाऱ्या घटनांना काही अंशी करी लगाम घालू शकतील. तर अश्या असंख्य गोष्टी माहिती असण्यासाठी आपली पत्रिका आपल्याला माहित असावी .आपल्या पत्रिकेतील ग्रह आणि योग पाहूया पुढील लेखात ...

ज्योतिष शास्त्र आणि ज्योतिषी म्हणजे काही जादूची कांडी नाही कि क्षणात ते तुमचे आयुष्य बदलतील . मुळात हे शास्त्र मार्गदर्शक म्हणून वापरायचे आहे. काही जणांचा ह्या शास्त्रावर अजिबात विश्वास नसतो , तर काही ह्यात नको तितके भावनिक रीत्या वाहवत जातात. तर काही योग्य मार्गदर्शन घेतात त्यात आपल्या उपासनेची भर घालतात आणि आपले आयुष्य आनंदी करतात . ह्या अनुषंगाने आज इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. 

एकदा एक स्त्री साईबाबांच्या दर्शनाला गेली तेव्हा त्यांनी तिला तिच्या मुलासंबंधी विचारपूस केली. त्यावर डोळ्याला पदर लावून ती म्हणाली एका ज्योतिषाने मुलाची पत्रिका पाहून भाकीत केले आहे कि ह्यावर्षी ग्रहमान चांगले नाही आणि म्हणून तो परीक्षेला बसलाच नाही . त्यावर साईबाबा स्मित हास्य करत म्हणाले हि उदी घे त्याला लाव आणि सांग खुशाल परीक्षेला बस. आश्चर्य म्हणजे मुलगा परीक्षेला बसला आणि अपेक्षेपेक्षा जास्तीच मार्क मिळवून पास झाला. अध्यात्म , आपले गुरु आपले आयुष्य बदलवू शकतात ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. ह्यावर अनेक तर्क वितर्क आहेत. असो . 

मंडळी ,ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि अध्यात्मात गेलेल्या लोकांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवू नये. संपूर्ण विश्वास आपल्या गुरूंवर ठेवावा मग जे होईल ते त्यांच्या इच्छेने आणि कृपेने . ज्योतिष पाहणार्यानीही ह्या शास्त्राचे मार्गदर्शन जरूर घ्यावे पण त्याबरोबर त्यास आपल्या उत्तम कर्माची जोडही द्यावी. एखाद्या ज्योतिषाने सांगितले कि हे वर्ष तुला चांगले आहे ,ह्याचा अर्थ अभ्यासच करायचा नाही असे नाही ,तर उलट जास्ती अभ्यास करून चांगल्या ग्रहस्थितीचा उत्तम महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी उपयोग करून घ्यायचा असा अर्थ अभिप्रेत आहे.

पुढील लेखातून कुंडलीतील स्थाने , ग्रहस्थिती , महादशा ह्यांचा अभ्यास आपण करणार आहोत जेणेकरून प्रत्येकाला आपली पत्रिका काही अंशी तरी समजेल. 


अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा .

antarnad18@gmail.com

Wednesday, 3 June 2020

चंद्रमा मनसो जातः

||श्री स्वामी समर्थ ||



मनाचा कारक चंद्र 

आज नुसते गुगल सर्च केले तर आपले मन स्थिर कसे राहिल , चिंतन मनन किती गरजेचे आहे, मनाचा समतोल राखणे कसे आवश्यक आहे , ह्या आणि अश्या अनेक विषयावर बरीच माहिती वाचण्यास मिळते. ह्यासर्व गोष्टींचा आपल्याला नक्कीच फायदा होतो पण अंशतः. कुठलीही  अन्य व्यक्ती तुमचे मन संतुलित करू शकत नाही . मग हे कुणी करायचे असते तर तुम्ही स्वतःच . 

मन हे उदबत्तीच्या धुरासारखे सतत सैरभैर होत असते ,चंचल असते. मनाचा कारक चंद्रमा ..चंद्रमा मनसो जात: .मन स्वतःच्या काबूत असणे हे अवघड आहे परंतु अशक्य नाही . आपल्या आयुष्याचा संपूर्ण लगाम आपल्याच तर हातात आहे . 

चंद्र मनाचा कारक . मनाचे सौंदर्य चंद्रावर अवलंबून आहे. मन आणि अंतर्मन ह्यात सतत घालमेल होत असते . भरती ओहोटी सुद्धा चंद्रावरून बघितली जाते . ज्योतिष शास्त्राचा आधार घेता  चंद्र रवी युती हा अमावास्या योग दर्शवते . चंद्र रवी एकमेकांसमोर असतात त्यास पौर्णिमा म्हंटले जाते. चंद्ररवी युती हि ६ ८ १२ मध्ये असू नये. चंद्रासोबत जर हर्शल , शनी , राहू , केतू , बुध ह्यापैकी एखाद्या ग्रहाची युती असेल तर चंद्र बिघडतो आणि त्याची फळे म्हणजे मनाची अस्थिरता , वैफल्य ,नकारात्मक विचार ह्या गोष्टी दर्शवते . चंद्र नेपचून शुभयोगात व्यक्ती अध्यात्मिक ,गूढ विद्येची अभ्यासक आणि दृष्टी असते. चंद्र हर्शल युतीत आकस्मित मनाचा तोल जावून अचानक संतापणे ह्या गोष्टी अनुभवयास मिळतात. 


मन थार्यावर असले , शांत असले तर संपूर्ण शरीरही स्वस्थ्य राहते. अत्यंत बिघडलेला चंद्र मनाची असंतुलित अवस्था दर्शवतो तसेच अश्या व्यक्ती अमावस्या पोर्णिमा च्या आसपास सैरभैर होताना दिसतात . अर्थात ह्या सोबत चंद्र दुषित होण्याची अन्य कारणेही असू शकतात . अशांत मनामुळे वैफल्य , मानसिक आजार निर्माण होतात जे दिसत नाहीत . काही व्यक्ती कधी शांतच नसतात सतत hyper उद्विग्न झालेल्या असतात .मनाचा समतोल ढळला तर माणूस व्यसनाकडेही झुकू शकतो पुन्हा इथे नमूद करावयासे वाटते कि ह्यास अन्य ग्रहस्थिती सुद्धा कारणीभूत असते . प्रत्येक वेळी चंद्र बिघडला तर माणूस व्यसनी असेलच असे नाही .प्रत्येक वेळी परीस्थितीही कारणीभूत असते . घरात आपले वडील रोज घरी दारू पिऊन आईला मारतात ,धिंगाणा घालतात ह्याचा परिणाम घरातील चिमुकल्या जीवांवर नाही झाला तरच नवल.अश्यावेळी लहानपणापासून पाहिलेल्या गोष्टींचा इतका खोलवर परिणाम असतो कि ह्या मुलांचेसंगोपन करताना , भविष्य घडवताना विशेष काळजी घ्यावी लागते .

एखाद्यावेळी चंद्र फारच बिघडला असेल तर मग अनेक मानसिक आजार निर्माण होतात आणि मग अश्यावेळी मानसोपचार तज्ञांची गरज भासू शकते. 

मन आजारी असेल तर शरीरही आजारी पडते. काही व्यक्तींचा चंद्र इतका बिघडलेला असतो अश्यावेळी ह्या व्यक्ती आपल्यासमोर गप्पा मारत बसल्या असल्या तरी त्यांचे लक्ष्य भलतीकडेच म्हणजे मन सैरभैर झालेलं असते आणि त्यांच्या चेहऱ्यावरूनच ते आपल्याला समजते आणि आपण नकळत विचारतो “ लक्ष्य कुठे आहे ?”

 आपल्याला ह्या सर्व गोष्टीतून मार्ग नक्कीच काढता येतो . उपासना ह्यातून आपल्याला बाहेर काढते. रोज सकाळी लवकर उठून आपल्या दिनक्रमास सुरवात करण्याआधी जर नियमित उपासना केली तर आपले मन हळू हळू एकाग्र होण्यास मदत होते. सर्व गोष्टी लगेच होणार नाहीत पण संयम आणि विश्वास ह्या दोन शस्त्रांनी आपण मनाची लढाई जिंकू शकतो हे नक्की . मी मनाने कमकुवत आहे आणि मला खंबीर व्हायचे आहे हे सर्वप्रथम आपल्या मानाने स्वीकारले पाहिजे . तसे झाले तर आणि तरच केलेले उपाय फळास येतील. आपण स्वतःचाच अभ्यास केला पाहिजे . नक्की कधी ,कुठल्या परिस्थितीत किंवा कुठल्या गोष्टींमुळे  मला राग येतो ? किती वेळ राग टिकतो ? मी रागावतो आणि लग्गेच शांत होतो कि मी माझ्या रागावर अजिबात संयम मिळवू शकत नाही. मग त्या काळात मी कसा वागतो ? मनात कल्पविकल्प येतात का? रागाच्या भरात माझे सर्व शरीर कापत असते का ? मी उगीचच एकटाच शून्यात पाहत बसतो का? मनात कुढत बसतो का? मी व्यक्त होवू शकत नाही का ?एखादी गोष्टी माझ्या मानाविरुद्ध झाली कि मला संताप अनावर होतो कि मी सदैव चिडलेलाच असतो ? ह्या आणि अश्या  अनेक प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःच अभ्यासायला सुरवात करावी. काही व्यक्तींचा चेहराच इतका गूढ असतो कि त्यांच्या मनात काय चालू आहे ह्याचा थांगपत्ताही कधीच लागत नाही. 

विशेष करून लहान मुलांना अगदी लहानपणापासून सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला कि मनाचे श्लोक , रामरक्षा , शुभंकरोती ह्या गोष्टी आवर्जून शिकवल्याच पाहिजे त्यामुळे त्यांना देवाचीही गोडी तर लागतेच व मनाची बैठक तयार होते .आत्मविश्वास निर्माण होतो आणि मनाची एकाग्रता होवून अभ्यासातही प्रगती होते. काही मुले भयंकर हट्टी असतात, जरा त्यांच्या मनाविरुद्ध झाले कि घर डोक्यावर घेणे, डोके जमिनीवर आपटून घेणे , घरातून निघूनच जाणे ,अनेक उपद्व्याप करतात आणि मग त्यांना आवर घालता घालता शेवटी घरातील मंडळी त्यांच्या मनासारखे वागू लागतात जेणेकरून मूळ रडायचे थांबेल पण हा तात्पुरता उपाय झाला. आपण रडलो कि आपल्या मनासारखे होते हे मुलास समजते आणि मग ते निगरगट्ट होते .सर्व घरास वेठीस धरते किंवा आपल्या मनासारखे वागण्यास प्रत्येकाला भाग पाडते .अश्या गोष्टीना सुरवातीपासूनच आळा घातला पाहिजे .ओमकार आणि गायत्री मंत्र मुलांना लहानपणापासून शिकवला पाहिजे.


आपले कुलदैवत , कुलस्वामिनी , इष्ट दैवत ह्यापैकी कुठल्याही एकाचा जप करत असाल म्हणजे कराच तर त्यात सातत्य ठेवा . प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी आपल्या सत्कार्मांची , निष्ठेची आणि सातत्त्याची आहुती द्यावी लागते तरच त्याची फळे चाखावयास मिळतात . आपण जसे कपडे बदलतो तसे  देवही बदलतो . आज काय ह्याने सांगितले म्हणून हे केले मग उद्या दुसर्याने काही भलतेच सुचवले मग ते केले असे न करता आपल्याला आवडणाऱ्या देवतेची किंवा आपली पत्रिका उत्तम जाणकार ज्योतिषास दाखवून( अर्थात प्रथम त्याचे मानधन देवून ) योग्य मार्गदर्शन घ्यावे , किंवा सर्वात उत्तम आपल्या इष्टदेवतेचा जप करावा . पण जो कराल त्यात सतत बदल नको. अत्यंत निष्ठेने , एकाग्र चित्ताने ,आणि सर्वात मुख्य म्हणजे समर्पणाची भावना ठेवून करावा. खात्रीने सांगते ह्या सारखा उपाय नाही .मुहूर्त पाहून जपास प्रारंभ होतो पण काही दिवसांनी पुन्हा येरे माझ्या मागल्या कारण संयम नाही . रिझल्ट लग्गेच हवा असतो आणि त्यासाठी आवश्यक असणारा संयम मात्र अजिबात नसतो. 
कमकुवत चंद्र चांचल्य देतो आणि मनाची अवस्था कमकुवत करतो . अश्या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणत नैराश्य ,संभ्रमावस्था आणि त्या अनुषंगाने होणारे मानसिक विकार होतात . त्यांना खर्या आयुष्याला सामोरे जावून लढायची ताकद नसते आणि मग अश्यातच व्यसनाच्या आहारी जावून आपल्याच कोशात धुंद राहणे ,आत्महत्या करणे प्रसंगी दुसर्याचाही जीव घेणे ह्या टोकाच्या गोष्टी होवू शकतात . 
आपल्या मनावर जर ताबा मिळवायचा असेल तर तो स्वतःला आणि त्यासाठी साधनेची तपश्चर्येची , निश्चयाची आणि दुर्दम्य इच्छा शक्तीची गरज आहे जी तुम्हाला तुमची उपासना देवू शकते. ज्या देवतेचा जप करता तीच तुमची नैया पार करू शकते .


प्रत्येक गोष्ट सहजप्राप्त होत नाही पण मला ह्यातून बाहेर पडायचेच आहे हा निश्चय आणि अर्थात कुटुंबाचा पाठींबा तुमचे आयुष्य नक्कीच फुलवू शकते.. ह्या सर्वच उच्चाबिंदू म्हणजे ध्यान धारणा . ध्यानाने मन एकचित्त होते, स्थिर राहते  . सुरवातील जमत नाही अगदी २ मिनिटे सुद्धा आपण बसू शकत नाही . पण हळूहळू हे करायचेच हे एकदा मनी ठरवले कि मग सर्व अपोआप होवू लागते . सुरवातीला मनात खळबळ निर्माण होते . असंख्य विचारांची भाऊगर्दी होते आणि मन सैरभैर होते . कपाळावर असंख्य आठ्या घेवून नकोच ते असे सुरवातीला होते अगदी  बसलो कधी आणि उठलो कधी हे समजतच नाही . पण थोडा धीर धरला तर आयुष्यातल्या खर्या आनंदाला आपण मुकणार नाही हे नक्की. नियमित केलेला सराव आपल्याला मन शांत होण्यास मदत करते . काही दिवसांनी मग ध्यानाचीही गोडी लागायला लागते आणि मग हळूहळू त्याचा वेळ वाढू लागतो आपल्याही नकळत . आपण केलेल्या उपासना , ध्यानधारणा ह्याचा खचितच उल्लेख करू नये त्याने आपल्या साधनेत व्यत्यय येतात , त्यात खंड पडतो आणि आपल्याही नकळत अहंकार फुलतो. बाह्य जगापेक्षा आपल्या आतील जग हे कितीतरी जास्त पटीने सुंदर आहे ह्याची ह्याच देही ह्याच डोळा प्रचीती आपल्याला ध्यानातच येते. 
ध्यानामुळे सहज समाधी अवस्थाही प्राप्त होते आणि मग आपण ह्या विश्वाचाच एक भाग आहोत वेगळे काही उरतच अशी मनाची सहज अवस्था प्राप्त होते . 
अशक्य असे काहीही नसते ..केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.

अस्मिता


लेख आवडल्यास अभिप्राय जरूर लिहा 

Antarnad18@gmail.com





Monday, 23 April 2018

ज्योतिष- एक अनुभूती.



॥ श्री स्वामी समर्थ॥


मानवी जीवनावर परिणाम करणारे अंतराळातील ग्रह


ज्योतिष- एक अनुभूती.


मंडळी ,

       ज्योतिष हे पूर्वापार अनादि काळापासून चालत आलेले शास्त्र. प्रत्येक व्यक्तीस मग तो कुणीही असो आपल्या भविष्यात काय दडलय हे जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता असतेच असते. ज्यांचा ह्या शास्त्रावर विश्वास नाही त्यांना  काहीच सांगणे नाही.असो.

       तर अथांग महासागरा सारखे ह्या शास्त्रात जितके खोल शिराल तितके कमीच आहे. ज्योतिष शास्त्राचा नेमका उपयोग करून आपण आपले जीवन नक्कीच अधिकाधिक आनंदी करू शकतो, परंतु त्याचा नेमका उपयोग  कधी आणि कसा करायचा ह्याबाबत अनभिज्ञता दिसून येते. ह्या शास्त्रावर खूप पुस्तके, CD, ebook सर्व काही उपलब्ध  आहे ,तसेच ह्या शास्त्राची ओळख करून देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था हि आहेत. पण हे सर्व करून ,४ पुस्तके वाचून खरच ज्योतिषी होता येते का....तर नाही. ह्या शास्त्राचा सखोल अभ्यास , साधना, अध्यात्मिक बैठक आपल्याला जातकाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देण्यास मोलाची ठरते. 

       एखाद्याच्या आयुष्यावर बोलणे खरच इतके सोप्पे आहे का ? अनेक वर्ष ह्या क्षेत्रात कार्यरत असूनही समोर आलेल्या प्रश्नकर्त्याच्या “मला नोकरी कधी मिळेल ? “ किंवा “माझा विवाह कशी होईल ? अश्या किंवा तत्सम प्रश्नाचे उत्तर अचूक देता आले नाही तर काय उपयोग ??

       आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रश्नांना सामोरे जाताना बरेचदा जीव मेटाकुटीला येतो, मन निराश, दिशाहीन होते आणि हा गुंता सोडवण्यासाठी बरेचदा आपण ज्योतिष शास्त्राचा आधार घेतो. पण खरोखरच आत्यंतिक गरज असल्याशिवाय ह्या शास्त्राचा उपयोग करू नये. लोकांना हल्ली खूप कमी पेशन्स राहिला आहे ,चालायचंच हल्ली Instant चा जमाना आहे ना , ”त्यामुळे पी हळद हो गोरी “ ह्या उक्तीला धरून ज्योतिषाला आपल्या प्रश्नाचे त्वरित उत्तर पाहण्यास अगदी भंडावून सोडणारे कित्येक जण आपल्याही परिचयाचे असतील. ज्योतिष शास्त्राला जशी बंधने आहेत तसेच आपल्या प्रश्नांनाही मर्यादा असणे गरजेचे आहे. मुळात आपण ज्योतिषाला कुठला प्रश्न विचारत आहोत याचे भान असणे गरजेचे आहे.


      एखाद्या मुलाचा अनेक वर्ष विवाह ठरत नसेल ,स्थळे पाहणे चालू असेल पण सुयोग्य जोडीदार मिळत नसेल आणि अश्यावेळी त्यांनी विवाहासंबंधी प्रश्न विचारला तर योग्य, परंतु त्याच्याच बरोबर आपल्या दुसरयाही मुलाची ,जो अजून शालेय शिक्षण घेत आहे त्याचीही “आलेच आहे तर त्याचीही पत्रिका जरा बघून घ्या .त्याच्या विवाहाचे काय “ असे सलग्न प्रश्न विचारणे अत्यंत चुकीचे आहे. जिथे तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न करून त्यानंतर ह्या शास्त्राची मदत घेतलीत तर अयोग्य नाही ,उलट अश्यावेळी हे शास्त्र तुम्हाला दैवी मार्गदर्शन करेल पण उगीच चाळा, timepass म्हणून ह्या शास्त्राकडे कदापि पाहू नका हि माझी सर्व जातकांना विनंती आहे. नसेल विश्वास त्यांनी तर वळूनही बघू नका पण त्याचबरोबर टिंगलहि करू नका ...सोडून द्या .जगात सर्वच गोष्टी सर्वाना पटल्याच पाहिजे असा कुणाचाच अट्टाहास नसावा.
      
       ज्योतिष शास्त्रात विवाह होईल का नाही हे ठरवणारे असंख्य योग आहेत .. त्यामुळे ह्या शास्त्राचा खरच गाढा अभ्यास असणे तितकेच आवश्यक आहे. माझ्या ओळखीचे एकजण मला म्हणाले कि माझ्या मुलाचा प्रेमविवाह होणार असे एकाने सांगितले आहे ,बघुया चिरंजीव आता काय दिवे लावतात शेवटी कलियुग आहे . मी म्हटले अहो ते सर्व ठीक पण प्रेमविवाहाचा योग आहे हे सांगणाऱ्याने आधी मुळ पत्रिकेत विवाहाचाच योग आहे का ते पाहिलंय का? सांगायचे तात्पर्य कि मुळात पत्रिकेत जर विवाहाचाच योग नसेल तर प्रेमविवाह कसा होईल ? बयाच लोकांना सवय असते समोरच्याला ज्योतिष येतंय ह्याची नुसती कुणकुण जरी लागली तरी त्याच्या मागे हात धुवून लागतात .अहो माझ जरा बघा ..अहो काय बघा? उगीच..खेळ आहे कि काय हा? . आज समाजातील घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे .विवाह ठरण्या पूर्वी अगदी पत्रिकेतील ३६ गुण जुळवून केलेली लग्नेही काही कालावधीनंतर न टिकणे हि एक समस्याच आहे. पत्रिकेत गुण मिलनापेक्षा ग्रह मिलन होणे गरजेचे आहे पण तेच न केल्याची काय परिणीती होते ते आपण पाहतोच आहोत.
       
      बरेच लोक दर दोन दिवसांनी कुठल्याना कुठल्या तरी ज्योतिषाच्या घराची पायरी चढताना आपण पाहतो ,ऐकतो. असे का होत असावे ? कारण पहिल्याने जे सांगितले त्याने कदाचित त्यांच्या मनाचे समाधान झाले नसावे.आणि समाधानाची त्यांची व्याख्या म्हणजे त्यांना सुखावणारी ,अपेक्षित असणारी उत्तरे.  आपण ज्या ज्योतिषाकडे पत्रिका दाखवायला जात आहोत तो ह्या शास्त्रातील पूर्णतः जाणकार आहे ह्याची खात्री पटवून मगच गेले पाहिजे, मुळात ह्या शास्त्रावर आपली श्रद्धा ,विश्वासही असायला हवा त्याचबरोबर ज्योतिषाबद्दल सुद्धा मनात कुठलाही संदेह नसावा मग पुन्हा पुन्हा अनेक जणांकडे जाऊन पत्रिका दाखवायची वेळच येणार नाही.  

     ह्या शास्त्राचा सखोल अभ्यासक ,जाणकार हा तुम्हाला अपेक्षित उत्तर सांगणार नाहीत तर तुमच्या नशिबात जे आहे ते खर सांगतील किबहुना त्यांच्याकडून तेच अपेक्षित आहे  एखादी पत्रिका बघताना ती बघणाऱ्याच्या ज्ञानाचाही कस लागतोच .खरतर एखाद्याच्या पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तर ज्योतिषाने योगच नाही हे खरे सांगून टाकावे. जातकाचा अपेक्षाभंग, मानसिक त्रास जरूर होईल पण कालांतराने त्याचे मन घट्ट होवून तो आपल्या आयुष्यातील reality स्वीकारेल, तसेच अजून अनेक ज्योतिषांना पत्रिका दाखवणे तरी थांबवेल.  मुळात विवाह योग नसताना उगीचच तुमच्या पत्रिकेत गुरु लग्नस्थानात आला कि विवाह होईल हे सांगण्यात काहीच अर्थ नाही ,कित्येक वेळा गुरु लग्नी किंवा सप्तमेशावरून जाऊनही विवाह होत नाही आणि मग अश्यावेळी ह्या शास्त्रावरून प्रश्नकर्त्याचा विश्वासही उडू शकतो.  तुमचा विवाह येत्या २-३ वर्षात होईल अशी चुकीची उत्तरे दिल्याने समोरच्या आशाही वाढतात आणि तश्या घटना न घडल्यामुळे पुढे त्या व्यक्तीस जास्त त्रासदायक ठरू शकतात , त्यामुळे प्रामाणिक उत्तर देवून ह्या शास्त्राचा सन्मान वाढवावा असे माझे मत आहे.



पत्रिकेतील १२ स्थाने


“Stars Plays a major role in life” ग्रहतारे आपले काम करतच असतात .मुळात पत्रिका म्हणजे काय ? तर आपल्या जन्मवेळी अवकाशात असणाऱ्या ग्रहांची स्थिती म्हणजेच आपली पत्रिका. आणि ह्या पत्रिकेतील ग्रहांची मूळ कधीही बदलत नाही. त्यामुळे त्या पत्रिकेबद्दलचे भाकीतही कसे बदलेल हे साधे logic आहे. पत्रिका हि खाजगी आणि तितकीच अत्यंत पवित्र बाब आहे, दर दोन दिवसांनी कुणाला न कुणाला ती दाखवून त्याचा अवमानच होतो हे लक्ष्यात घ्या.
          
       सर्व साधारणपणे आपली कमाल आयुमर्यादा हि १२० वर्ष मानली जाते ह्यात प्रत्येक ग्रहाचा ठरलेला काल जसा चंद्र १० वर्ष , राहू १८ वर्ष ,मंगल ७ वर्ष , शनी १९ वर्षे याप्रमाणे असतो ह्याला आपण “ महादशा “ म्हणून संबोधतो. जेव्हा एखाद्याला मंगळाची महादशा आहे असे म्हणतो याचाच अर्थ तो ७ वर्षाचा कालावधी त्याच्या आयुष्यात मंगळाच्या अधिपत्याखाली असतो आणि त्या ग्रहाचे बलाबल पत्रिकेत कसे आहे त्याप्रमाणे त्याचा फलादेश असतो.
                   
                   सारांश असा कि ज्योतिष हे एक महान शास्त्र असून हा फावल्या वेळातील timepass चा विषय नक्कीच नाही. ह्या दैवी शास्त्राचा योग्य तो सन्मान ठेवून त्याचा मार्गदर्शन म्हणून आपल्या जीवनात उपयोग करून घेतला तर आयुष्यात अनेक गोष्टी टाळता येवू शकतात, अर्थात सांगणाराहि ह्या शास्त्रात माहीर ,उत्तम जाणकार हवा हे वेगळे सांगायला नकोच. योग्य प्रकारे ह्या शास्त्राचा आपल्या जीवनात उपयोग केलात तर हे शास्त्र तुमच्या आयुष्याचा उत्तम वाटाड्या होईल यात शंकाच नाही. 

                    एखाद्या गोष्टीसाठी अथक प्रयत्न करून खरोखरच यश नाही मिळाले आणि त्यानंतर ह्या शास्त्राचा आधार घेतलात तर अगदी योग्य perfect उत्तर मिळणार ह्यात शंकाच नाही ...अनुभूती घेवून बघा.


लेख आवडल्यास खालील पत्त्यावर नक्की अभिप्राय द्या

antarnad18@gmail.com

https://www.facebook.com/antarnad18/?ref=bookmarks