Thursday, 29 September 2022

शनी आणि प्राणायाम

 ||श्री स्वामी समर्थ ||




आपल्या अज्ञानाने आपण शनीला आपला शत्रू समजतो पण तो आपला खरा सोबती सखा मित्र आहे. आयुष्यात आपले Critics म्हणजेच आपले टीकाकार हे आपले खरे मित्र असतात . शनी आपले काम चोख बजावत असतो त्यात कुणाचीही हयगय नाही. साडेसातीत आपले आयुष्य खर्या अर्थाने फुलते कारण असंख्य चढ उतारांमुळे आपल्याला आपली ओळख नव्याने होत जाते . आयुष्य म्हणजे काय आणि ते कसे जगावे ह्याचे सगळे धडे शनी आपल्याकडून साडेसाती मधेच गिरवून घेतो.

जसा घरात आपल्याला कुणाचा तरी धाक हवाच ...तसाच आयुष्यात शानिचाही आहे हे मान्य ,कारण तोच आपल्या आयुष्याला लगाम घालू शकतो. बुधाची मंगळा ची साडेसाती नसते पण शनीची साडेसाती आली कि झोप उडते .

साडेसाती आली कि आपण जो सांगेल ते उपाय करायला लागतो. का? कश्यासाठी इतकी भीती ? हि भीती सर्वाधिक अश्याच व्यक्तीना असते ज्यांना बरोबर आपण केलेल्या दुष्कृत्यांची  , चुकांची आणि अक्षम्य कृत्यांची जाणीव असते .त्यांना आता आपला पापाचा घडा भरलाय आणि आता शनिदेव दंड देणार ह्याची पुरेपूर जाणीव होते आणि म्हणूनच मग मंगळवार शनिवार उपवास पूजा , मारुतीला तेल अर्पण करा , हे करा आणि ते करा सर्व चालू होते. पण ज्याने ह्यातील काहीच केले नाही किंवा जो आनंदाने निर्लेपपणाने खरेपणाने आपले जीवन व्यतीत करत आहे तो निजानंदी आपल्याच विश्वात रमलेला असतो आणि जीवनाचा प्रवास करत राहतो. आपल्या सद्गुरूंच्या सेवेमुळे त्याच्या दुक्खाचे परिमार्जन कधी होते ते त्याला समजत सुद्धा नाही .असो .

तर सांगायचे असे कि साडेसाती मध्ये उपायांची अगदी खैरात होते . प्रत्येक जण काहीना काही उपाय करत राहतात . आपल्यावर संकटांची मालिका बरसणार ह्याची जणू त्यांना खात्रीच असते. पण ह्या सर्वापेक्षाही संकट येवूच नये ह्यासाठी आपले कर्म शुद्ध ठेवणे आवश्यक आहे .

एखाद्या मुलाला अचानक मार्क कमी मिळू लागले किंवा त्याचे अभ्यासात लक्ष्य उडाले तर आपण काय करतो ? काय करणे गरजेचे आहे? तर त्याच्या ह्या वागण्याचे मुळ शोधून काढणे आवश्यक आहे . मग ते काहीही असो . शाळेत कुणी त्याला त्रास देत आहे का? कुणी खेळायला घेत नाहीय का? त्याला एकटे पाडत आहेत का? घराच्या कुठल्याही परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम होतो आहे का? कि खरच त्याला अभ्यासात काही अडचणी येत आहेत का? अश्या विविश प्रश्नांची उत्तरे आपल्याला समस्येच्या मुळाशी नेतील . अगदी तसेच शनीला समजून घेतले ,त्या ग्रहाचे कारकत्व , त्याचा स्वभाव , पिंड त्याला काय अभिप्रेत आहे हे समजून घेतले तर साडेसातीच काय संपूर्ण आयुष्य सुकर होयील.

शनी हा वायूतत्वाचा ग्रह आहे. निरस आहे संथ आहे , प्रत्येक गोष्टीत विलंब लावून आपला संयम शिकवणारा आहे . आपल्या शरीरात पंचतत्वांचा अविष्कार आहे . कुठलेही तत्व असंतुलित झाले तर शरीर नामक यंत्र बिघडते आणि आजारपण येते . शनी हा वायूतत्व दर्शवतो . आपल्या शरीरातील हाडे तसेच खालच्या भागांवर प्रामुख्याने त्याचे नियंत्रण आहे . आपण खाल्लेले अन्न हे पोटापर्यंत नेण्याचे काम शरीरातील वायू करतो तसेच प्रत्येक अवयवाची हालचाल सुद्धा वायू नियंत्रित करतो म्हणूनच वायू तत्व बिघडले तर शरीराचा एखादा भाग जसे हात पाय वाकडे होणे , डोळा तिरळा होणे किंवा मलमुत्र विसर्जन संस्था बिघडणे पोट बिघडणे , अर्धांगवायू , अस्थमा , श्वसनाचे आजार होणे ह्या सारखी आजारांना आपल्या सामोरे जावे लागते .

ह्या सर्वांवर उत्तम उपाय म्हणजे “ प्राणायाम “ . प्राणायाम म्हणजेच “ .शनी म्हणजेच प्राण ,कारण शेवटचे श्वासाचे बटण तोच दाबणार आहे . आपण कितीही टिमक्या वाजवल्या तरी आपण किती श्वास घेणार हे त्याच्याच तर हाती आहे. आपल्या मनाच्या अवस्थेचा सुद्धा श्वासाचा गतीवर परिणाम निश्चित होतो. नियमित प्राणायाम करून शरीरातील वायू तत्व कंट्रोल करता येते . एकदा ते व्यवस्थित झाले तर वरती उल्लेख केलेल्या अनेक आजारांना तिलांजली मिळेल .

प्राणायाम करताना शरीराची श्वसनाची लयबद्ध हालचाल होत असते. मनाची शांतता जीवन समृद्ध करते , विचार अधिक आणि बोलणे कमी होते त्यामुळे अविचाराने केल्या जाणार्या अनेक कृतींवर बंधने येतात . थोडक्यात माणूस निर्णयक्षम होतो, आपली कर्मे सुधारतात आणि शनिदेव आपले मित्र होतात . अजून काय हवे ? शरीरात प्राणवायू व्यवस्थित खेळता राहिला तर श्वसन क्रिया आणि पचनसंस्था सुधारते. मनाचे आणि शरीराचे शुद्धीकरण होऊन संपूर्ण शरीराचे संतुलन राहते. गेल्या काही वर्षातील करोना काळ पाहिला तर फुफुसाचे कार्य व्यवस्थित असणे किती आवश्यक आहे ते समजेल. 

प्राणायाम केल्याने मनाला एकप्रकारे निस्सीम शांतता अनुभवता येते त्यामुळे योग्य दिशेने विचारचक्रे धावतात , चिडचिड कमी होते. ज्या लोकांना सतत Hyper किंवा कुठल्याही कारणाने लगेच रागावण्याची सवय आहे त्यांनी नक्कीच प्राणायामाचा अनुभव घ्यावा. 

शनी आणि श्वास ह्याचा किती घनिष्ठ संबंध आहे आणि तो सुरळीत राहण्यासाठी  प्राणायाम हा लाख मोलाचा सहज सोपा प्रत्येकाला घरी कुठलेही पैसे खर्च न करता येण्यासारखा उपाय आहे हे विषद करण्यासाठी हा लेखनप्रपंच .

ओं शं शनैश्चराय नमः 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क    : 8104639230


Friday, 16 September 2022

उंबरठा - गोमुत्र हळद लेपण

 || श्री स्वामी समर्थ ||




घराचे घरपण जपणार्या आणि त्याचे अस्तित्व अबाधित ठेवणार्या घराच्या उंबरठ्याला विशेष महत्व आहे.  घराची ती लक्ष्मण रेषाच आहे. उंबरठ्या चे महत्व इतिहास पण शिकवतो. उंबरठा म्हणजे मर्यादा . पूर्वीच्या काळी स्त्रीवर्गाला उंबरठा ओलांडून नाही तर त्याच्या आजूबाजूस यायला सुद्धा मज्जाव असे. घरातील गडीमाणसे सुद्धा मागील दरवाज्याने येजा करत असत . सीतेने लक्ष्मण रेषा म्हणजेच घराचा उंबरठा ओलांडला आणि रामायण घडले म्हंटले तर वावगे ठरू नये. 


आजकाल अनेक नवीन वास्तूना उंबरठा नसतो . आपण घरात राहिल्या जाण्यापूर्वी घराला उंबरठा करून घ्यावा . उंबरठा नेहमी सागवान किंवा टिकवूड लाकडाचा असावा . घराची संपूर्ण चौकट ह्याच म्हणजे एकाच लाकडाची असावी . इतर तीन बाजू संगमरवर आणि उंबरठा फक्त लाकडाचा असेल तर घरात अनेक समस्या येतात म्हणून संपूर्ण घराची चौकट लाकडाचीच असावी . 


तर असा हा उंबरठा अनेक घरातून दुर्लक्षिला गेलेला असतो.  उंबरठा ओलांडून घरात येण्याची प्रथा आहे. उंबरठ्यावर उभे राहून किंवा त्यावर पाय ठेवुन घरात प्रवेश कधीही करू नये . अनेक स्त्रियाना उंबरठ्यावर किंवा त्याच्या जवळ किंवा त्यावर बसून शेजारणीशी दुनियेभरच्या गप्पा मारायचा छंद असतो . अश्या मुळे घरात कलह आणि आर्थिक हानी होते .उंबरठ्यावर लक्ष्मीचा वास असतो किभहुना ती सुद्धा तो ओलांडून आपल्या घरात प्रवेश करत असते त्यामुळे तो स्वछ्य असणे आवश्यक आहे. घराचा उंबरठा रोज व्यवस्थित पुसून त्यावर रांगोळी काढावी . हळद कुंकू घालून त्याचे पूजन करावे आणि उंबरठ्याला उदबत्तीने ओवाळावे. 


आज ह्या उंबरठ्या चे पूजन अजूनही कश्या प्रकारे करता येते ते पाहूया . प्रत्येक शनिवारी किंवा तुमच्या सोयीच्या दिवशी उंबरठा हळदीने सारवावा. आठवड्यातून एकदाच करायचा हा उपाय आहे. गोमुत्र आणि हळद ह्याचे सरसरीत म्हणजे उंबरठ्या वर सारवता येयील असे मिश्रण तयार करावे आणि उंबरठा स्वछ्य पुसून त्यावर ह्या हळदीचा लेप द्यावा. त्यावर नेहमीप्रमाणे हळद कुंकू फुल वाहून पूजन करावे पण हळद तशीच ठेवावी . दुसर्या दिवशी पुन्हा उंबरठा स्वछ्य करून नेहमीप्रमाणे पूजन करावे . अनेक जण फक्त शनिवारीच हळदीचा लेप लावून पूजन करतात . घराच्या उंबरठ्या सोबत घराच्या दरवाज्याला सुद्धा महत्व आहे. दरवाजा सुद्धा व्यवस्थित पुसलेला आणि नीटनेटका असावा.  घराच्या दरवाजात सुरेख सुबक लहानशी रांगोळी घालावी आणि उंबरठ्याचे पूजन केले तर घरात येणाऱ्या माणसाला सुद्धा प्रसन्न वाटेल. घरात लक्ष्मी स्थिरावेल ,घरातील लहरी सकारात्मक होतील. उंबरठ्यावर केलेला हा हळदीचा लेप हा घराला वेष्टण आहे. ह्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. हळद हि अनेक औषधी गुणांनी युक्त आहे .

अनेकवेळा वेळ नाही हि सबब पुढे करून उंबरठ्या चे पूजन केले जात नाही . ज्याला ह्या सर्व गोष्टींचे महत्व समजले आहे तो हे नक्की करेल अशी खात्री वाटते .  ह्या गोष्टी दिसायला लहान असल्या तरी त्याच आपले आयुष्य समृद्ध करत असतात . उंबरठ्या च्या आत आपले घर आणि त्यातील जिवाभावाची माणसे असतात . उंबरठ्या च्या बाहेर जग सुरु होते आणि तिथे खरतर आपले कुणीच नसते म्हणूनच घरातील माणसांना जपा. 

हळद आणि गोमुत्राचा लेप उंबरठ्यावर नक्की लावून बघा आणि आपले अनुभव नक्की शेअर करा .

संकलन : सौ . अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230