Friday, 16 September 2022

उंबरठा - गोमुत्र हळद लेपण

 || श्री स्वामी समर्थ ||




घराचे घरपण जपणार्या आणि त्याचे अस्तित्व अबाधित ठेवणार्या घराच्या उंबरठ्याला विशेष महत्व आहे.  घराची ती लक्ष्मण रेषाच आहे. उंबरठ्या चे महत्व इतिहास पण शिकवतो. उंबरठा म्हणजे मर्यादा . पूर्वीच्या काळी स्त्रीवर्गाला उंबरठा ओलांडून नाही तर त्याच्या आजूबाजूस यायला सुद्धा मज्जाव असे. घरातील गडीमाणसे सुद्धा मागील दरवाज्याने येजा करत असत . सीतेने लक्ष्मण रेषा म्हणजेच घराचा उंबरठा ओलांडला आणि रामायण घडले म्हंटले तर वावगे ठरू नये. 


आजकाल अनेक नवीन वास्तूना उंबरठा नसतो . आपण घरात राहिल्या जाण्यापूर्वी घराला उंबरठा करून घ्यावा . उंबरठा नेहमी सागवान किंवा टिकवूड लाकडाचा असावा . घराची संपूर्ण चौकट ह्याच म्हणजे एकाच लाकडाची असावी . इतर तीन बाजू संगमरवर आणि उंबरठा फक्त लाकडाचा असेल तर घरात अनेक समस्या येतात म्हणून संपूर्ण घराची चौकट लाकडाचीच असावी . 


तर असा हा उंबरठा अनेक घरातून दुर्लक्षिला गेलेला असतो.  उंबरठा ओलांडून घरात येण्याची प्रथा आहे. उंबरठ्यावर उभे राहून किंवा त्यावर पाय ठेवुन घरात प्रवेश कधीही करू नये . अनेक स्त्रियाना उंबरठ्यावर किंवा त्याच्या जवळ किंवा त्यावर बसून शेजारणीशी दुनियेभरच्या गप्पा मारायचा छंद असतो . अश्या मुळे घरात कलह आणि आर्थिक हानी होते .उंबरठ्यावर लक्ष्मीचा वास असतो किभहुना ती सुद्धा तो ओलांडून आपल्या घरात प्रवेश करत असते त्यामुळे तो स्वछ्य असणे आवश्यक आहे. घराचा उंबरठा रोज व्यवस्थित पुसून त्यावर रांगोळी काढावी . हळद कुंकू घालून त्याचे पूजन करावे आणि उंबरठ्याला उदबत्तीने ओवाळावे. 


आज ह्या उंबरठ्या चे पूजन अजूनही कश्या प्रकारे करता येते ते पाहूया . प्रत्येक शनिवारी किंवा तुमच्या सोयीच्या दिवशी उंबरठा हळदीने सारवावा. आठवड्यातून एकदाच करायचा हा उपाय आहे. गोमुत्र आणि हळद ह्याचे सरसरीत म्हणजे उंबरठ्या वर सारवता येयील असे मिश्रण तयार करावे आणि उंबरठा स्वछ्य पुसून त्यावर ह्या हळदीचा लेप द्यावा. त्यावर नेहमीप्रमाणे हळद कुंकू फुल वाहून पूजन करावे पण हळद तशीच ठेवावी . दुसर्या दिवशी पुन्हा उंबरठा स्वछ्य करून नेहमीप्रमाणे पूजन करावे . अनेक जण फक्त शनिवारीच हळदीचा लेप लावून पूजन करतात . घराच्या उंबरठ्या सोबत घराच्या दरवाज्याला सुद्धा महत्व आहे. दरवाजा सुद्धा व्यवस्थित पुसलेला आणि नीटनेटका असावा.  घराच्या दरवाजात सुरेख सुबक लहानशी रांगोळी घालावी आणि उंबरठ्याचे पूजन केले तर घरात येणाऱ्या माणसाला सुद्धा प्रसन्न वाटेल. घरात लक्ष्मी स्थिरावेल ,घरातील लहरी सकारात्मक होतील. उंबरठ्यावर केलेला हा हळदीचा लेप हा घराला वेष्टण आहे. ह्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. हळद हि अनेक औषधी गुणांनी युक्त आहे .

अनेकवेळा वेळ नाही हि सबब पुढे करून उंबरठ्या चे पूजन केले जात नाही . ज्याला ह्या सर्व गोष्टींचे महत्व समजले आहे तो हे नक्की करेल अशी खात्री वाटते .  ह्या गोष्टी दिसायला लहान असल्या तरी त्याच आपले आयुष्य समृद्ध करत असतात . उंबरठ्या च्या आत आपले घर आणि त्यातील जिवाभावाची माणसे असतात . उंबरठ्या च्या बाहेर जग सुरु होते आणि तिथे खरतर आपले कुणीच नसते म्हणूनच घरातील माणसांना जपा. 

हळद आणि गोमुत्राचा लेप उंबरठ्यावर नक्की लावून बघा आणि आपले अनुभव नक्की शेअर करा .

संकलन : सौ . अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment