|| श्री स्वामी समर्थ ||
भारतीय संस्कृती मध्ये वास्तुशास्त्रास अनन्यसाधारण महत्व
आहे. पूर्वीची घरे चौसोपी असत. पुढे ओटी त्यामागे ओसरी ,माजघर ,स्वयपाकघर आणि मागे
पडवी अशी प्रशस्त घरे असता . पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरे प्रशस्त
असत ,अनेक पिढ्या ह्या घरांच्या छत्र छायेत गुण्यागोविंदाने राहत. आज शहरीकरण
झाल्यामुळे गावच्या घरातल्या वास्तव्यास शहरातले लोक पारखे झाले आहेत. पूर्वी घरे
शेणाने सारवलेली असत ,अगदी स्वयपाकघरातील चूल सुद्धा . दारासमोर सारवलेल्या
जमिनीवर सुबक रांगोळी असे.
ह्या सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे “ घराचा उंबरठा
“. घरातल्या बायका रोज घराचा उंबरठा स्वछ्य पुसून त्यावर रांगोळी काढून त्याला
पुजत.
वास्तुशास्त्रात देशील उंबरठा महत्वाचा मानला आहे . घर
गावातले असुदे किंवा शहरातील घरास उंबरठा नाही असे घर नाही. आपल्या आणि बाहेरील जगामध्ये
उभा ठाकणारा हा उंबरठा. घरात आपली हक्काची नाती असतात ,उंबरठा ओलांडला कि बाह्य जग
सुरु होते आणि तिथे आपले कुणी नसते. आपण कितीही रागावलो कसेही वागलो तरी आपल्याला
सांभाळून घेणारी माणसे उंबरठ्याच्या आतच असतात हेच जणू त्याला सुचवायचे असावे.
तर घरात प्रवेश करताना ओलांडावा लागणारा हा उंबरठा महत्वाचाच
आहे .उंबरठा आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देतो,आपल्या अब्रूचे रक्षण
करतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना उंबरठा ओलांडून बाहेर जाण्यास परवानगी नसे .
मागील पडवीतून त्यांचे येणे जाणे चालत असे. स्त्रीने उंबरठा ओलांडू नये हि
पूर्वापार चालत आलेली रीत.
उंबरा ओलांडलास तर वाकडे पाऊल पडू नये ,आपली अब्रू धुळीस मिळू नये हि त्यामागील
भावना . शेतीवर काम करणारी गडीमाणसे इतर कुणीही हा उंबरठा ओलांडून आत येत नसत ,बाहेरील
ओसरी ,पडवीत बसून त्यांना गुळपाणी दिले जाई. उंबरठ्याबाहेर चपला सुद्धा वेड्यावाकड्या
ठेवू नयेत . घरातून बाहेर जाणर्या आणि येणाऱ्या प्रत्येकाची दाखल जणू हा उंबरठा
घेतो त्यामुळे मनास बांध बसतो . कुठलेही वाईट कृत्य करताना आपण हा उंबरठा ओलांडून
घरात कसे जाणार हा धाक बसतो . तर अश्या ह्या उंबरठ्यास घराची लक्ष्मण रेषा म्हंटले
तर वावगे ठरू नये.
घरात येणाऱ्या पै पाहुण्याची वर्दी आपल्याला सर्वप्रथम उंबराच
देतो . आपल्या चांगल्या वाईट सर्वच गोष्टींची दखल उंबरठा घेत असतो . आपले वैभव,
समाधान ,चारित्र ,आचार विचार ,वर्तन ,आपल्या मर्यादांचे पालन करा हेच जणू हा
उंबरठा मूकपणाने आपल्याला सांगत असतो .
उंबरठा आपल्या घरातील मानसिकतेचेही प्रतिक आहे . घरात कुणी आले तर त्याचे स्वागत आनंदाने करावे. काही घरास हल्ली सेफ्टी डोर असते ,आतील दरवाजा उघडून काहीजण प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर ठेवून दरवाजा उघडतात .अहो काहीतरी काम असल्याशिवाय कोण कश्याला येयील तुमच्याकडे . सर्वांचे आनंदाने स्वागत करा नाहीतर स्वगत करायला कुणी येणारच नाही अशी वेळ नको यायला .वेळीच सावध व्हा. घराला २ दरवाजे आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत . लोकांचा अपमान करायला नाही . घराच्या
उंबरठ्यातून आत बाहेर करताना उंबरठ्यावर चुकूनही पाय ठेवू नये तर तो ओलांडून जावा.
घरात येणार्या लोकांना आपण तसे सांगावे नाहीतर काहीजण चक्क उंबरठ्यावर चपला घालून
पाय ठेवून छान गप्पा मारत उभी राहतात. उंबरठ्याच्या आत बाहेर शेजार्यांची गप्पा
मारत तासतास उभे राहणाऱ्या घरांमध्ये नक्कीच आर्थिक समस्या उद्भवणार . तसेच
उंबरठ्यावर शिळोप्याच्या गप्पा मारू नये त्यासाठी हि जागा योग्य नाहीच.
तर अश्या ह्या उंबरठ्याचे रोज हळदीकुंकू वाहून पूजन केले पाहिजे. उंबरा पुसून त्यावर लक्ष्मीची पाऊले( पाऊले आत येणारी असावीत ) . त्यावर रांगोळी घालून उदबत्ती दाखवावी .संध्याकाळी दिवे लागणीस सुद्धा देवाजवळ दिला लावल्यावर उंबरठ्यास ओवाळावे. उंबरठ्या जवळ केर कचरा ठेवू नये .
प्रत्येक चांगल्या गोष्टीस विलंब नको म्हणूनच श्रावण
महिन्यापासून ,प्रत्येक घरास घरपण देणाऱ्या ह्या उंबरठ्याचे पूजन करून त्याचा
यथाशक्ती मान ठेऊया.
लेख आवडल्यास जरूर कळवा
antarnad18@gmail.com