Friday, 24 August 2018

"डेअर टू शेअर"..अनुभवसंपन्न कार्यशाळा

|| श्री स्वामी समर्थ ||




मंडळी ,
        आयुष्यभर आपण पोटाची खळगी भरण्यासाठी अविश्रांत मेहनत करत असतो. आयुष्याच्या अखेरपर्यंत आर्थिक दृष्टीने स्वावलंबी राहावे ह्यासाठी मिळालेल्या पैशाचे योग्य नियोजन करणे तितकेच गरजेचे असते .पूर्वीच्या काळी सरकारी नोकर्या मिळण्यासाठी आजच्या सारखी चढाओढ नसायची, त्यामानाने सहज मिळत असत. आज प्रायव्हेट सेक्टर मधील नोकर्यांत सुद्धा तितकेच challenges आहेत पण तिथे सरकारी नोकरी मध्ये असलेले अतिरिक्त फायदे जसे पेन्शन,फंड हे प्रकार नाहीत, त्यामुळे सुरवाती पासूनच आर्थिक नियोजनावर भर देणे संयुक्तिक ठरते.

     
        पूर्वी सरकारी बँकेमध्ये ,पोस्टात त्यातून मिळणारया व्याजासाठी गुंतवणूक केली जात असे.पण आता अलीकडच्या काळात भारतातील अर्थव्यवस्था पाहता बँकांतील ठेवीवर मिळणारे व्याजाचे दर बरेच कमी झाले आहेत. आज गुंतवणुकीसाठी  share मार्केट , Mutual Funds ,Comodity market, Gold investment हे विविध पर्याय समोर आहेत. पूर्वी मोठ्या कंपन्यातील समभाग म्हणजे share विकत घेण्याकडे लोकांचा अधिक कल नव्हता पण आज त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा नक्कीच वाढले आहे. असे असले तरीही बहुतांश वेळी आपल्याला शेअर मार्केट चा नुसता उल्लेख केला तरी “ तुला काय भिकेचे डोहाळे लागलेत का? ”, “ हे मोठ्यांचे खेळ”, “ आहेत तेही घालवून बसशील ” वगैरे मुक्ताफळे ऐकायला मिळतात. शेअर मार्केट म्हणजे हमखास पैसे बुडवण्याचे ठिकाण हा विचार जनसामान्यांमध्ये पूर्वापार रुजला आहे . पण आता आपला ह्या सर्वाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलायची नितांत गरज आहे. मुळात  ह्या सर्वांकडे अनेक पिढ्यांपासून पाहण्याची मानसिकता एकच आहे ती बदलली पाहिजे . फायदा सर्वाना हवा असतोच पण त्यासाठी लागणारी रिस्क घ्यायला कुणीही तयार नसते आणि त्याला पूरक ठरते ती आपली मध्यमवर्गीय विचारसरणी.

 
अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्या सोबत

 

        Mutual fund ,share मार्केट आणि त्यातील गुंतवणूक आपल्याला कशी करता येयील याविषयी या क्षेत्रातील अनेक दिग्गज ,तज्ञ मंडळी कार्यशाळा ,शिबिरे,चर्चासत्र घेवून ह्या विषयासंबंधी सखोल मार्गदर्शन करत आहेत.
           आज गेले कित्येक वर्षे ह्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या आणि आपल्या ज्ञानाने ह्या विषयातील समज गैरसमज दूर करून उत्तम मार्गदर्शन करणारया,  आजच्या पिढीचे नेतृत्व करणारा धडाडीचा तरुण “ निखिलेश सोमण “ ह्याचा अल्प परिचय ह्या लेखाच्या माध्यमातून आपणास करून देत आहे. निखिलेश स्वतः CA असून ह्या क्षेत्रातील उत्तम जाणकार आहे. गेली ३ वर्षे मुंबई, पुणे ,ठाणे, बोरीवली आणि दादर अश्या विविध ठिकाणी त्याने शेअर मार्केट ह्या  विषयावर कार्यशाळा घेवून लोकांची मानसिकता बदलवण्याचा जणू ध्यास घेतला आहे. मी स्वतः त्याच्या एका कार्यशाळेला उपस्थित राहिले. ह्यात उपस्थित राहिलेले ९० % लोक माझ्यासारखेच ह्या विषयातील अनभिज्ञ होते, पण निखिलेशने आपली उत्तम संवादशैली आणि व्यक्तिमत्वाने सर्वाना पहिल्या ५ मी. आपलेसे केले. 

कार्यशाळेचे  “ डेअर टू शेअर ” हे नाव किती समर्पक आहे हे मला सत्र संपल्यावर समजले. 


मुळात आपल्याला शेअर मार्केट मधील कामकाज कसे चालते आणि त्यातील बारकावे समजले पाहिजेत, आपल्याला नक्की कुठे थांबायचे ते माहित पाहिजे आणि सर्वात महत्वाचा हवा तो “ संयम ”. मार्केट चा सखोल अभ्यास करण्यासाठी आपल्याला स्वतःलाही थोडा वेळ दिला पाहिजे हे त्याने सहज सोप्या शब्दात पटवून दिले. मुळातच आपल्याला ह्यात तोटा का होतो ह्याचे उत्खनन करताना त्याने इथे घाई करून चालत नाही ,तसेच आपण कुठला stock घ्यायचा हे सांगणारा तितकाच जाणकार असला पाहिजे ह्यावर भर दिला. आपला ब्रोकर कसा शोधावा, तो शोधताना कुठल्या गोष्टी लक्ष्यात ठेवल्या पाहिजे तसेच DMAT खाते कसे उघडायचे ह्याविषयी उत्तम मार्गदर्शन केले.


             शेअर मार्केट बद्दलचे गैरसमज तर दूर झालेच पण आपल्याला किती अर्धवट ज्ञान होते ह्याची जाणीव झाली. सत्र चालू असताना विचारलेल्या अनेक शंकांचे अत्यंत संयमाने मार्गदर्शन करत असल्याने त्याने सर्वाना आपलेसे कधी केले समजलेच नाही. मुळात ह्या विषयावरील इतकी उत्तम माहिती त्याने दिली कि ह्या क्षेत्रात उतरायचे so called डेअरिंग सर्वांनाच झाले. नवशिख्या लोकांना ह्या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल ह्यात शंकाच नाही. निखिलेश एक उत्तम वक्ता तर आहेच पण सर्व वयोगटातील लोकांना एकत्र बरोबर घेवून जाण्याची त्याची शैली नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारले जात असतानाही त्याने संयम कधीच सोडला नाही. मुळातच आपली मराठी माणसे अजूनही मार्केट मध्ये अनेक गैरसमजांमुळे मोठ्या संखेने उतरत नाहीत , दडपण घेतात ह्याची खंत त्याने बोलून दाखवली.

   


          निखिलेश चे कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे. प्रसार माध्यमांनी सुद्धा त्याच्या ह्या कार्याची दखल घेतली आहे. अर्थतज्ञ श्री. चंद्रशेखर टिळक ह्यांनी तर त्याच्या कार्यशाळेला प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याची पाठ थोपटली आहे.
       
              शेअर मार्केट विषयी योग्य माहिती हवी असणार्यांनी ह्या कार्यशाळेचा जरूर लाभ घ्यावा. मंडळी, आपला एक मराठी मुलगा अत्यंत मनापासून, स्वतःला झोकून देऊन ह्या कार्यशाळा घेत आहे हे मनास भावले आणि म्हणूनच हा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला हा लेखन प्रपंच.

निखिलेश सोमण contact no 9594083769

लेखाबद्दल अभिप्राय जरूर कळवा.

Antarnad18.gmail.com