|| श्री स्वामी समर्थ ||
Saturday, 30 January 2021
लहरींचा खेळ
Monday, 25 January 2021
February Jyotish Karyshala
|| श्री स्वामी समर्थ ||
आजवर ' हसत खेळत ज्योतिष शिकूया ' ह्या कार्यशाळेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल शतशः आभार. 2021 फेब्रुवारी महिन्यातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात विशेष आनंद होत आहे. पुढेही असाच प्रतिसाद लाभेल अशी आशा आहे.
Friday, 22 January 2021
|| श्री स्वामी समर्थ ||
वडीलधार्या माणसांचे आशीर्वाद म्हणजे प्रत्यक्ष देवाचेच आशीर्वाद असतात . आपल्या कुठल्याही चांगल्या कामात त्यांच्या आशीर्वादाने चार चांद लागतात .आपल्या पाठीवरून त्यांचा मायेचा हात फिरतो तेव्हा केलेले श्रम भरून निघतात आणि पुन्हा आकाशात उंचच उंच भरारी घेण्यासाठी बळ मिळते .
माझ्या हसत खेळत ज्योतिष शिकूया ह्या कार्यशाळेला आजवर अनेक वयोगटातील हुरहुन्नरी व्यक्तीमत्वानी हजेरी लावली . त्यातीलच एक हिरा म्हणजे सौ. मृदुला ताई . वय फक्त आणि फक्त ७३ वर्षे . त्यांच्या बकेट लिस्ट मध्ये ज्योतिष शिकणे हे होतेच आणि त्यांनी ह्या कार्यशाळेत भाग घेवून मला कृतकृत्य केले. त्या माझ्यापेक्षा सर्वार्थाने मोठ्या असूनही त्यांच्या वागण्याबोलण्यात माझ्या आणि ह्या शास्त्राबद्द्ल असलेला आदर मला सद्गदित करून गेला. त्यांनी ह्या Video मार्फत त्यांचा दिलखुलास अभिप्राय दिला आहे जो आपल्यासोबत शेअर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपल्यालाही तो आवडेल ह्याची खात्री आहे.
अस्मिता
मणिपूर चक्र आणि रामरक्षा एक अभ्यास
|| श्री स्वामी समर्थ ||
१ ) हे चक्र नाभिस्थाना जवळ असते. ह्याला दहा पाकळ्या असून सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु याची अधिष्ठात्री देवता आहे.
२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात गुरुत्वमध्य ह्याच चक्रात असतो.
३) ह्या चक्रावर धारणा केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.
४) धारणा म्हणजे काय? चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा...धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर धारणा म्हणजे concentration... किंवा एकाग्रता.
५) चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय.
६) महत्त्वाचं--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या चक्रावर ती धारणा केली असं म्हणतात.
७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात.
उदाहरणार्थ , आपल्या शरीरातील खालील अवयव/ग्रंथी मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असतात(आणि याचे आपल्याला अजिबात ज्ञान नसते) ..
-Liver
-Pancreas
-Small Intestine
-Kidney
- Adrenal Gland
-Gall bladder
आता मणिपूर चक्र बिघडलं की त्यासंबंधीत होणारे रोग पाहू या-----
-Indigestion
-Diabetes
-Acidity
-Ulcer
-Cholitis
-Appendicitis
-Kidney Stone
-Nephropathy.
High Blood Pressure
High Blood Sugar
Depression
अश्या परिस्थितीत आपण लगेच रामरक्षा स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो.... खरं ना ????? तर रामरक्षा च कां?
मणिपूर चक्राचं बीज अक्षर आहे रं. रं चा वारंवार उच्चार केल्याने आपलं मणिपूर चक्र आहत होतं आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व इंद्रिये / ग्रंथी उत्तेजीत होतात. सोप्या भाषेत सांगायचे तर charge होतात व त्यातून निघणारा स्त्राव regulated/ नियंत्रित होतो. परंतु नुसतं एकसारखे रं म्हणत राहिलो की कंटाळायला होईल.आपल्या ऋषीमुनींना याचं पक्क ज्ञान होतं. म्हणून त्यांनी रामरक्षा स्तोत्राची रचना केली.रामरक्षेत किती वेळा र अक्षर येतं ते मोजून पहा. त्याची आवर्तनं केलीत तर किती वेळा र चा उच्चार होईल याची कल्पना करा ! मग किती वेळा आपलं मणिपूर चक्र आहत होईल याचा विचार करा.
परंतु आपण यांत्रिक पणे रामरक्षा म्हणत राहतो त्यामुळे जितका फायदा व्हायला हवा तितका होत नाही . कारण आपण आधीच बघितलं आहे की कुठल्याही चक्राला activate करायचं असेल तर त्याच्यावर *धारणा करायची असते. आपण रामरक्षा म्हणताना डोळे मिटून मणिपूर चक्रावर आपलं चित्त एकाग्र केलं तर निश्र्चितच आपलं चक्र activate होईल आणि सतत र अक्षराच्या उच्चाराने निर्माण होणारी energy , त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे शुद्धीकरण व बळकटीकरण करेल... परिणामी त्याला संलग्न असलेले आजार पण मिटतील.
यापुढे रामरक्षा म्हणण्यापूर्वी -
१)एका जागी स्वस्थ बसा
(घरात इकडे तिकडे डुलत डुलत, घरातली कामं करताना, स्वयंपाक करताना रामरक्षा म्हटली तर त्याचा मणिपूर चक्रावर काहीच सकारात्मक परिणाम होणार नाही)
२) डोळ्यासमोर श्रीरामाची मूर्ती आणा ,
३) मणिपूर चक्रावर चित्त एकाग्र करा.
४) नंतर रामरक्षा पठण सुरु करा
५) ९० दिवसांत आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित organs वर काय positive फरक वाटतोय ते observe करा.
टीप:
योग, मेडीकल सायन्स आणि अध्यात्म असा हा समन्वय आपणास कुठल्याही पुस्तकात रेडीमेड मिळणार नाही. परत परत हा लेख वाचून समजून घ्या आणि अंमल करा
अत्यंत वाचनीय ( संग्रहित )
अस्मिता