|| श्री स्वामी समर्थ ||
वडीलधार्या माणसांचे आशीर्वाद म्हणजे प्रत्यक्ष देवाचेच आशीर्वाद असतात . आपल्या कुठल्याही चांगल्या कामात त्यांच्या आशीर्वादाने चार चांद लागतात .आपल्या पाठीवरून त्यांचा मायेचा हात फिरतो तेव्हा केलेले श्रम भरून निघतात आणि पुन्हा आकाशात उंचच उंच भरारी घेण्यासाठी बळ मिळते .
माझ्या हसत खेळत ज्योतिष शिकूया ह्या कार्यशाळेला आजवर अनेक वयोगटातील हुरहुन्नरी व्यक्तीमत्वानी हजेरी लावली . त्यातीलच एक हिरा म्हणजे सौ. मृदुला ताई . वय फक्त आणि फक्त ७३ वर्षे . त्यांच्या बकेट लिस्ट मध्ये ज्योतिष शिकणे हे होतेच आणि त्यांनी ह्या कार्यशाळेत भाग घेवून मला कृतकृत्य केले. त्या माझ्यापेक्षा सर्वार्थाने मोठ्या असूनही त्यांच्या वागण्याबोलण्यात माझ्या आणि ह्या शास्त्राबद्द्ल असलेला आदर मला सद्गदित करून गेला. त्यांनी ह्या Video मार्फत त्यांचा दिलखुलास अभिप्राय दिला आहे जो आपल्यासोबत शेअर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपल्यालाही तो आवडेल ह्याची खात्री आहे.
अस्मिता
No comments:
Post a Comment