|| श्री स्वामी समर्थ ||
Monday, 29 March 2021
Friday, 26 March 2021
तळतळाट ,हाय,शाप
|| श्री स्वामी समर्थ ||
आज आपण एकविसाव्या शतकात आहोत त्यामुळे ह्या विषयाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आज तंत्रज्ञान ,विज्ञान युगात असणार्या आपल्यासारख्या लोकांची ह्याबाबत अनेक मतांतरे असू शकतात .
मानवी मनाचे कंगोरे आजवर कुणालाच समजले नाहीत . आपल्या आयुष्यात बर्या वाईट घटना घडतच असतात . हत्या वैर आणि ऋण चुके ना कुणा – हे श्री गजानन विजय मधील वाक्य चिंतन मनन करण्याजोगे आहे. आपल्या उभ्या आयुष्यात कधीना कधी आपले कुणाशी वैमनस्य होते कधी अगदी नुसतीच पेल्यातील भांडणे तर कधी त्याचे रूप हाडवैरामध्ये कधी होते ते आपल्याही कळत नाही .
पूर्वीच्या काळी एखाद्या घराशी असणारे वाद हे पिढ्यानपिढ्या चालू असत. मग अनेक पिढ्या त्या अमुक एक घराला सर्वार्थाने वंचित राहत असत . मग त्या घरातील सर्व कार्ये ,जाणेयेणे सर्व काही वर्ज केले जात असे.
पिढ्या बदलल्या तरी माणसाची वृत्ती काही बदलली नाही. वारसाहक्काने मिळालेली संपत्ती , जमीन जुमला ,द्रव्य दागदागिने ह्यातील हक्कांसाठी आजही लोक कोर्टाची पायरी चढताना दिसतात . हे खरेतर न संपणारे वाद आहेत . 4 गुंठे जागा आणि तोळाभर सोन्यासाठी आयुष्यभर जपलेली नाती माणूस क्षणात संपवतो. जमीन आणि दागिने मरणांती आपल्यासोबत नेता येणार नाहीत हे माहित असूनही त्यासाठी धडपड करत राहतो .
आयुष्यभर ज्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो ते सर्व एका क्षणात विसरतो आणि ती नातीही परकी करून टाकतो. जमीन जुमला , शेतजमीन , घर ह्यावरून होणार्या वाटणीमधून जर एखाद्याला कमी वाटा मिळाला किंवा त्याला जाणूनबुजून डावलले गेले तर त्याच्या मनाला झालेले दुक्ख हे त्याच्या तोंडून निघालेल्या शापवाणीत परावर्तीत होते . त्याच्या हक्काचे त्याला मिळाले नाही म्हणून त्याचा जीव जळतो आणि अश्यावेळी ज्यांनी त्याला हे हक्क मिळू दिले नाहीत त्यांना ह्याची अक्षरशा हाय लागते .
आयुष्यात आपण अनेकासाठी अनेक गोष्टी जीव ओतून करत असतो ,प्रसंगी स्वतःचा पैसा खर्च करूनही आपण कुठलाही विचार न करताही जीवाचे रान करून मदत करतो . पण प्रसंग निभावला कि समोरची व्यक्ती सोयीस्कर रीतीने हे सर्व विसरून जाते . आपल्याला साधी ओळख सुद्धा दाखवत नाही . अश्यावेळी आपल्याला अत्यंत मानसिक वेदना आणि क्लेश होतात. जगातील सगळ्या चांगल्या गोष्टींवरचा आपला विश्वास निघून जातो . ह्या मानसिक वेदनातून तोंडातून मग कधीतरी शब्दांच्या भावनांच्या रुपात निघालेले तळतळाट मात्र त्यांना भोवल्याशिवाय राहत नाहीत .
कधीतरी आपल्या मैत्रिणी किंवा संबंधितांशी आपले काही काळापुरते बिनसते पण जसा काळ जातो तसे पुन्हा सर्व नाती पहिल्यासारखी होतात . पण मधल्या काळात जर आपल्याकडे हळदीकुंकू असेल आणि फक्त त्यावेळी मनात राग असल्यामुळे त्या मैत्रिणीला आपण बोलावले नाही तर ते नक्कीच चांगले नाही. कारण आपला राग हा क्षणाचा असतो. जिला आपण ह्या कार्यक्रमातून वगळले तीच स्त्री खरतर आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी उभी राहिलेली असते . पदराचा पैसा खर्च करून आपल्याला मदत केलेली असते . पण आपल्याला त्याचा विसर पडतो आणि १० बायकांना आमंत्रण जाते पण तिला नाही . अश्यावेळी तिचे मन दुखावते आणि तिचे तळतळाट आपल्याला भोवल्याशिवाय राहत नाहीत .
काही काही लोकांना आपल्या कामासाठी माणसे वापरून घ्यायची आणि मग ती फेकून द्यायची सवय असते .हा त्यांचा स्वभाव त्यांना नक्कीच घातक ठरू शकतो.
आपल्या क्षणिक रागापोटी आपण आपले आयुष्यभराचे नुकसान करत असतो . आताच्या कलियुगात आई वडिलांनी आपल्या मृत्युपत्रात लिहिलेल्या गीष्टींची पूर्तता सुद्धा न करणारे महाभाग आहेत . मृत्यू पत्रातील जाणार्याने लिहिलेल्या गोष्टींचे पालन करणे म्हणजे त्याच्या अंतिम इच्छेचे पालन करणे मग आपल्याला ते आवडो अथवा न आवडो . आपण त्याच्याशी सहमत असू अथवा नसू . असे न केल्याने आपण त्याचे शाप तळतळाट ओढवून घेतो . ते आपल्यापुरते सीमित न राहता आपल्या पुढील पिढ्यानाही भोगावे लागतात .
पैसा हा मायावी आहे तो भल्या भल्यांची मती गुंग करणारा आहे . पण त्याच्या मोहात पडून आपल्याच रक्ताच्या नातेवाईकांशी जन्माचे वितुष्ट आणले तर तो पैसा आपल्याला खरच किती समाधान , रात्रीची शांत झोप मिळवून देयील ह्याचा विचार ज्याचा त्यानेच केलेला बरा.
ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासात आपल्याला राहू हा पूर्वजांचा शाप तळतळाट दाखवतो .
अनेक शापित कुंडल्या बघितल्या तर कुठेना कुठे तरी राहूचा संदर्भ लागतोच.
एखाद्याची राहती जागा छलकपट करून किंवा खोटे दस्तावेज करून हडपणे, एकट्या स्त्रीला तिच्या परिस्थितीचा फायदा घेवून मानसिक शारीरिक छळ करणे , राहत्या घरातून आपल्याच आईवडिलांना त्यांच्या वार्धक्याचा फायदा घेवून हाकलून देणे किंवा त्यांच्या मनाविरुद्ध वृद्धाश्रमात ठेवणे , त्यांचे औषधपाणी , रोजच्या गोष्टींची हेळसांड करणे , एखाद्या वृद्ध व्यक्तीला त्यांच्या अगदी शेवटच्या काळात राहत्या जागेसाठी शिव्याशाप देणे ,ती जागा आपल्या नावावर करून घेण्यासाठी त्यांना मानसिक क्लेश देणे ,फसवून एखाद्या मुलीचे लग्न एखाद्या व्यंग असणार्या मुलाशी लावणे इतकच नव्हे तर सामाजिक जीवनात लोकांच्या पैशाची अफरातफर करणे , ह्या सर्वाचे परिणाम म्हणून लोकांचे किंवा तत्सम व्यक्तीचे तळतळाट शाप ,त्यांची हाय आपल्याला आणि पर्यायाने आपल्या कुटुंबियानाही लागते आणि ती आपल्याला भोगावीच लागते. त्यांच्या दुखावलेल्या मनातून आलेले हे शाप आपले आयुष्य उध्वस्त करतात .
ह्याचा परिणाम म्हणजे प्रत्येक पिढीत एखादा अविवाहित राहणे, विवाह मोडणे , कुटुंब कालांतराने लहान होत जाणे ,घरात धार्मिक कार्ये न होणे ,मुले न जगणे , कुटुंबात कुणालाही एकमेकांप्रती प्रेम जिव्हाळा नसणे ,राहत्या घरात वास्तुदोष ,असह्य विलंबी आजार ,आकस्मिक संकटे येणे ह्या गोष्टींची जणू शृंखलाच तयार होते.
आपल्या कुलस्वामिनी आणि कुलदैवताचे सुद्धा नित्य उपासना पूजा करणे हे आपले कर्तव्य आहे. हा देवधर्माचे सुद्धा पालन नीट झाले नाही तर त्यांच्या कृपादृष्टीस आपण अपात्र ठरतो . त्यामुळे आपल्या घराण्याचे रीतीरिवाज , परंपरेचे पालन आपले विज्ञान आणि आधुनिकता बाजूला ठेवून अवश्य करावे.
आपण काहीतरी कर्म करायला इथे आलो आहोत आणि ते झाले कि आपण इथून निरोप घेणार हे विधिलिखित आहे. त्यामुळे शाप , कुणाची हाय ,तळतळाट लागणे ह्यावर विश्वास असो अथवा नसो , मुळातच आपले कर्म शुद्ध सात्विक असावे. संपत्ती मिळवावी पण आपल्या कष्टाने कारण तीच लाभते आणि तीच आपल्याला शांत झोप सुद्धा देते .
आधुनिक काळातील अनेकांचा ह्यावर विश्वास नसतो पण जसजसे आयुष्यातील संकटांचे डोंगर वाढू लागतात आणि ती अडथळ्याची शर्यत पार करताना आपली दमछाक होते तेव्हा आपण मग जो सांगेल तो उपाय करायला सज्ज होतो. त्यापेक्षा आधीच ह्या घटना घडू नयेत म्हणून सतर्क राहिले पाहिजे.
आपण आपले नित्य कर्म करत राहावे .कुणाचे काहीतरी हिरावून घेवून पदरी काय पडते ते आपण पहिलेच . त्यामुळे आशीर्वाद कमी मिळाले तरी चालतील पण कुणाच्या शाप ,तळतळाटाला कारणीभूत न होणे हे तरी नक्कीच जमेल आपल्याला ,त्यासाठी प्रयत्नशील राहूया.
आपलेही अनुभव अवश्य लिहावे.
अस्मिता
antarnad18@gmail.com
Thursday, 18 March 2021
रेशीमगाठी -उन्हाळ्याच्या सुट्टीतील खास वर्ग
|| श्री स्वामी समर्थ ||
Tuesday, 16 March 2021
दैनंदिन ग्रहसंकेत एप्रिल कार्यशाळा
|| श्री स्वामी
समर्थ ||
आयुष्यातील अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारे ज्योतिष हे एक दैवी शास्त्र आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात क्षणोक्षणी मदत करणार्या ह्या शास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे . नक्की कुणी शिकावे हे शास्त्र ? त्याचा कधी कसा उपयोग आपल्याला होऊ शकतो ? हे शास्त्र शिकायला वयाची अट असते का? हे शास्त्र शिकायला अंकगणित उत्तम लागते का ? चला तर ह्या सगळ्या प्रश्नांची उकल करून घेवूया हसत खेळत “ दैनंदिन ग्रहसंकेत ” ह्या ज्योतिष कार्यशाळेत .
अस्मिता
antarnad18.blogspot.com
Wednesday, 10 March 2021
हसत खेळत ज्योतिष शिकूया कार्यशाळा ..उन्हाळ्याच्या सुट्टीचे खास वर्ग
||श्री स्वामी समर्थ ||
उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्यावर्षी नवीन काय करायचे ? . मुलांच्या परीक्षा (online) लवकरच संपतील . चला तर मग रोजच्या जीवनात आपला सखा सोबती असणारे आणि आपल्याला प्रत्येक क्षणी मार्गदर्शन करणारे ज्योतिष शास्त्र शिकूया .
आजवर आपण माझ्या कार्यशाळांना उत्तम प्रतिसाद दिलात. काही जणांना ह्या शास्त्राचा सखोल परिपूर्ण अभ्यास करायचा असतो तर काहीना शास्त्राची तोंड ओळख करून घ्यायची असते . आपल्याच सूचनांचा विचार करून एक Basic आणि एक Advanced अश्या दोन कार्यशाळांचे आयोजन करत आहे.
इच्छुकांनी जाहिराती मध्ये दिलेल्या क्रमांकावर whatsapp करावे .
अस्मिता
whatsapp 8104639230
#ज्योतिष #ज्योतिषशास्त्र #ग्रह #भविष्य #भविष्यकथन #कुंडली #राशी #वेध
Monday, 8 March 2021
दैनंदिन ग्रहसंकेत हि कार्यशाळा
|| श्री स्वामी समर्थ ||
आजची दैनंदिन ग्रहसंकेत हि कार्यशाळा चांगली झाली. आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार .
अस्मिता
Monday, 1 March 2021
गुरु से बडा गुरु का ध्यास
|| श्री स्वामी समर्थ ||
लहानपणी गजानन महाराजांचा प्रगट दिन जवळ आला कि माझा मुलगा मला म्हणत असे आई महाराज निघाले असतील का ग शेगाव हून इथे मुंबईला यायला . तूच म्हणतेस ना कि ते आपल्या भक्तांना भेटायला येतात . हा निरागस प्रश्न म्हणजेच भक्ती ,श्रद्धा आणि आपल्या गुरुंबद्दल वाटणारे निस्सीम अपार प्रेम. महाराज कसे येणार ह्या गर्दीतून हे असे प्रश्न अश्या निरागस जीवांनाच पडू शकतात.
५ मार्च, २०२१ रोजी संत शिरोमणी श्री गजानन महाराज ह्यांचा प्रगट दिन आहे. आज हे आठवले आणि वाटले महाराज पण अधीर असतील आपल्या सर्व भक्तांना भेटायला. घराघरातून सर्व भक्तजनांची महाराजांच्या स्वागताची तयारी जोरात सुरु झाली असणार , महाराजांच्या सेवेत काहीच कमी नको पडायला , पोथी वाचन , नामस्मरण , पारायण ..भक्तीला श्रद्धेला अपरंपार पूर येयील जणू . महाराजांना तरी कुठे करमत आपल्या लाडक्या भक्तांशिवाय तेही तितकेच आतुर असतील .
आज आधुनिक जगात तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे पण पूर्वी तसे नव्हते. महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्याबद्दल सांगितले आणि भक्तांचे लोंढे शेगावकडे येऊ लागले.
शेगावला महाराजांच्या दर्शनाला जायचे म्हंटले कि अगदी तिकीट काढल्यापासून आपण तिथेच असतो महाराजांच्या गादिशी. काहीच सुचत नाही आपल्याला. कधी एकदा त्यांचे दर्शन घेतो असे वाटते.
शेगाव ला गेल्यावर तेथील वातावरण मंत्रमुग्ध करते. मंदिराचा शांत परिसर , संस्थानातील शिस्त , संयम , महाराजांच्या आरतीच्या वेळी एकाच वेळी सर्व ठिकाणाहून होणारा घंटानाद ..महाराजांना सलामी ठोकत त्यांना मानवंदना देणारे त्यांचे गज ,अश्व खरच डोळ्यांचे पारणे फिटते.
नुसते डोळे मिटले तरी शेगाव आणि उघडले तरी शेगाव अशी प्रत्येकच भक्ताची अवस्था असते. देवळाच्या परिसरात घातलेल्या १०८ प्रदक्षिणा , महाप्रसाद काय लिहू आणि किती लिहू असे झालेय मला. . महाराजांच्या सेवेचे हे मोठे दान त्यांनी आपल्या पदरात टाकले आहे खरच ज्यांना ज्यांना हे भाग्य मिळाले आहे , त्यांनी ह्यामागील अर्थ जाणून घ्यावा ,नित्य त्यांच्या सेवेत राहावे आणि आपले जीवन कृतकृत्य करावे. महाराजांच्या शाळेत एकदा नाव घातले कि मग ते जे करतील ते. नित्य सेवा करावी आपल्याला पाहिजे तेव्हा नाही तो व्यवहार झाला. महाराजांना आपला भाव समजतो ,आपल्या अंतकरणातील तळमळ सगळे त्यांना समजते त्यांना काहीच सांगायला नको.
आजही आपली सर्व भक्तांची अवस्था काय वर्णावी ,महाराजांच्या शिवाय आता काही दिसेना असेच झाले आहे. प्रगट दिन कसा करायचा ,महाराजांच्या आवडीचे कुठले पदार्थ करायचे ,त्यांच्या फोटोला मूर्तीला कसे सजवायचे, महाप्रसादाला काय करायचे अहो एक ना दोन नुसती लगीनघाई झाली आहे.
हा जो काय आनंद आहे तो मला खरच आज शब्दांकित करायला शब्दच सुचत नाहीत .हा ज्याचा त्यानेच अनुभवायचा आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात ते अगदी खरे आहे. आपल्या आनंदाला पारावर राहत नाही . महाराजांच्या येण्याकडे आपले डोळे लागले आहेत . प्रगट दिनाला मंगलसमयी सनई च्या मंगल सुरात धूप दीप निरांजने लावून महाराजांची मानसपूजा मग महाराजांच्या सेवेत पूर्ण दिवस कसा जायील कळणार नाही. डोळे भरून त्यांना पाहत राहणे. महाराजांच्या आवडीचे पदार्थ ,त्यांची दुपारी वामकुक्षी ,त्यांचे रात्रीचे भोजन त्यानंतर त्यांना आवडणारा विडा ,एक ना दोन . ह्या सगळ्यामध्ये माझे तर देहभान हरपले आहे.
महाराजांनी मला भरभरून दिले आहे. माझी कुणाशी स्पर्धा नाही आणि मला काहीच मिळवायचे नाही त्यामुळे मनाची शांतता मी सतत अनुभवत असते. आपल्या गुरूंची सेवा ह्या लिखाणाच्या माध्यमातून मी करायचा प्रयत्न करत असते. अत्यंत शांत तृप्त समाधानी आहे. जीवनाचा खरा अर्थ घेण्यात नाही तर देण्यात आहे हे मला ह्या अध्यात्मानेच शिकवले आहे. श्री गजानन महाराज आणि स्वामी समर्थ ह्या माझ्या दोन्ही गुरूंची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले हे मी माझे भाग्य समजते .त्यांच्यासाठी किती आणि काय करू असे मला होवून जाते . त्यांना विचारल्याशिवाय मी आयुष्यात काहीच करत नाही आणि करणारही नाही.
त्यांच्या सेवेत भक्तीत जेव्हा एकरूप होतो तेव्हा बोलण्यासारखे सांगण्यासारखे काही उरत नाही . मग आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी दासगणू महाराजांनी गजानन विजय ह्या ग्रंथात म्हणले आहे कि “ संतांच्या जे जे येयील मनी तेते येयील घडोनी भरवसा त्यांच्या चरणी ठेवून स्वस्थ राहावे .”
“ आम्ही इथेच आहोत , कुठेच गेलो नाही ” हे महाराजांनी भक्तांना दिलेल्या वाचनाची आजही प्रचीती येते .क्षणोक्षणी महाराज मला सांभाळत आहेत आणि माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत तेच मला बघणार हा माझा विश्वास अभेद्य आहे.
अपेक्षा विरहित केलेली सेवा आणि भक्ती हि महाराजांच्या जवळ आपल्याला लवकर घेवून जाते . आपल्या भक्तीत १६ आणे खरेपणा हवा हे मात्र खरे. ज्यांना महाराज समजले त्यांन जीवनात सर्वच मिळाले असे मी म्हणीन . आताही मी लिहिताना ते वाचत आहेत पोरगी काय लिहितेय आणि तुम्ही सर्व वाचतानाही ते पाहणार आहेत . महाराजांच्या प्रगट दिनाची ,आपण शेगावला त्यांच्या दर्शनाला जाण्याची आपण डोळ्यात प्राण आणून वाट पहात असतो ..मी नेहमी शेगावला जाताना विचार करते कि मी महाराजान मी हे सांगीन ते सांगीन असे बोलीन तसे बोलीन पण प्रत्यक्ष ते समोर आल्यावर काहीही सुचत नाही ...त्यांची मूर्ती दिसली कि डोळ्यातून माझ्याही नकळत अश्रू वाहू लागतात . त्यांच्याकडे पहिले कि ते खुदकन हसून जणू सांगत आहेत कि “ अग काहीच बोलू नकोस ..आपली भेट झाली ...” . महाराजांच्या भेटीची आस लागणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे.
नुसते पारायण करून होणार नाही तर त्यावर चिंतन ,मनन ,त्यातील प्रत्येक ओवीवर विकॅह्र होणे आवश्यक आहे. आजही घरात आपण अन्न फुकट घालवतो , फ्रीज मध्ये भाज्या ,फळे फुकट जातात . आपल्याला आपल्या मनाविरुद्ध घटना घडली तर राज अनावर होतो , आपल्या तोंडूनही कधी अशुभ कथन होते. म्हणूनच आपण किती नामस्मरण केले किती पारायणे केली त्याहीपेक्षा त्यातून आपण काय बोध घेतला हे महत्वाचे आहे. आपण सामान्य माणसे आहोत आणि आपल्यात षडरिपू आहेतच .आपल्यात सुधारणा एका रात्रीत होणे अशक्य आहे. म्हणूनच २१ रुपी अध्यायाचा हा मोदक रुपी श्री गजानन विजय नामक प्रसाद आपल्याला महाराजांनी दासगणू महाराजांच्या हस्ते पाठवला आहे. त्याचा स्वीकार करून त्यांच्या सेवेत रुजू होवून आपले आयुष्य आणि मिळालेला जन्म सार्थकी लावणे हेच आपले काम .
गुरुंपेक्षाही त्यांच्या भेटीसाठी होणारी तळमळ ,त्यांच्या भेटीचा लागलेला ध्यास हीच सर्वात मोठी गुरुसेवा आहे.
श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या आपल्या सर्वाना मनापासून शुभेच्या . आपल्या सर्वांच्या मनोकामना श्री कृपेने पूर्ण होवूदेत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
अस्मिता
ह्या गजाननरुप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ,ते ते मिळणार आहे परत ,बहुत होऊनी तुम्हाला.