Thursday, 18 March 2021

रेशीमगाठी -उन्हाळ्याच्या सुट्टीतील खास वर्ग

 || श्री स्वामी समर्थ ||




लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात विवाह मात्र पृथ्वीवर संपन्न होतात. काळासोबत विवाहाच्या संकल्पनाही बदलत चालल्या आहेत . पाश्चिमात्यांचे अनुकरण करताना आज तरुण पिढीचा कल विवाह न करण्याकडे किंवा लिव इन रिलेशन कडे झुकत आहे. विवाहसंस्था हि आपल्या समाजाचा मुलभूत पाया आहे आणि तो टिकवणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. आज “ ती दोघे ” एका छताखाली एकत्र नांदणे हेच विवाहाचे यश म्हंटले तर वावगे ठरू नये . त्या दोघांचे मनोमिलन झाले कि मग दोघांचे आप्तेष्ट , मित्रमंडळी आणि समाज. आधुनिक काळात माणसाच्या गरजा ,विवाहाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सगळच बदलत चालले आहे त्यामुळे आता आधुनिक काळात गुणमिलना पेक्षा योग्य पद्धतीने केलेले पत्रिका मिलन अधिक फलदायी ठरेल असे वाटते .३६ गुण कसे आले ?त्याचे महत्व काय ? ग्रह मिलन आणि गुण मिलन ह्यातील फरक ? Match Making कसे करायचे ? विवाहापूर्वी आणि नंतर समुपदेशनाचे महत्व ,प्रेमविवाह ,घटस्फोटांचे वाढते प्रमाण ह्या सर्वांचा उहापोह तसेच सेलेब्रेटीच्या पत्रिकांचे सोदाहरण स्पष्टीकरण समाविष्ट केलेल्या “ रेशीमगाठी ” ह्या विवाह कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा . योग्य पत्रिका मिलन तसेच विवाहपूर्वी समुपदेशन करून एखादे जोडपे आणि पर्यायी कुटुंब आनंदी केले तर तीही एक उत्तम समाजसेवाच आहे.

Registration 8104639230 (Gpay)

अस्मिता

No comments:

Post a Comment