Friday, 29 October 2021

शुभ दीपावली 2021

 || श्री स्वामी समर्थ ||


दीपावली हा आपला सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. लक्ष लक्ष दिवे लावून अंधकार दूर करून आयुष्यात नव चैतन्य निर्माण करणारा आणि आपल्याला आयुष्य नव्याने जगण्याची प्रेरणा देणारा हा आनंदाचा उत्सव .

दिवाळीचा फराळ, उटणे , फटाक्यांची आतषबाजी , रांगोळ्या , रोषणाई , आकाश कंदील , रंगीबेरंगी पणत्या आणि ज्ञानप्राप्ती करून देणाऱ्या दिवाळी अंकांची मेजवानी ,दिवाळीचा आनंद वृद्धिंगत करते .

सर्वाना हि दीपावली अत्यंत सुखासमाधानाची ,  मनातील सर्व इच्छा फलद्रूप करणारी , आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारी , नवीन योजनांना दिशा देणारी , सकारात्मकतेची , उत्तम आरोग्याची आणि स्वतःला सिद्ध करणारी असुदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना .

शुभ दीपावली

अस्मिता

संपर्क : 8104639230

फेसबुक पेज : @yashasweejyotish


Wednesday, 27 October 2021

अजि सोनियाचा दिन

 || श्री स्वामी समर्थ ||



आज गुरुपुष्यामृत आहे. गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह आहे. आकाश जसे सर्वाना सामावून घेते तसेच गुरु प्रधान व्यक्ती ह्या सुद्धा तुही माझा तीही माझी असे करत प्रत्येकाला आपल्यात सामावून घेत आयुष्याचा प्रवास करत असतात . निसर्ग कुंडलीत सुद्धा गुरूच्या राशी ह्या आपल्या उत्तर आयुष्यात येतात म्हणजेच भाग्य स्थानात आणि व्यय भावात . आपले भाग्य घडवण्याची ताकद आपल्या गुरूंमध्येच आहे हेच तर नवम भाव आपल्याला सुचवत असतो. तसेच व्यय भाव हा आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणारा आहे. आपल्या प्रापंचिक जीवनातून जगताना पारमार्थिक जीवनाची चव चाखायला लावणारा हा गुरु  ह्या जन्माचा नाही तर जन्मोजन्मीचा आपला सखा आहे. 

गुरुप्रधान व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार करणाऱ्या आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल  करणाऱ्या असतात .परोपकार ,दया ,परमेश्वरावरील निस्सीम श्रद्धा  ह्या लोकात अगदी ठासून भरलेली असते. 

देव एकवेळ आपल्यावर रागवेल पण गुरु आपल्या भक्तांवर रागावणे केवळ अशक्य . त्यांचा हात जेव्हा आपल्या मस्तकावर असतो तेव्हा कितीही मोठ्या संकटातून आपली नाव पैलतीराला जाते.

आज गुरूंप्रती समर्पित होण्याचा दिवस आहे. श्री दासगणू महाराजांनी सुद्धा श्री गजानन विजय ग्रंथात लिहिले आहे कि गुरुपुष्य योगावर जो ह्या ग्रंथाचे भावभक्तीने पारायण करेल त्याच्या घरी अनुपम भाग्य येयील. आज पारायण , नामस्मरण , ध्यानधारणा , साधना  ह्यात आपल्याला झोकून देवूया .

whatsapp , instagram आणि सोशल मिडिया हि भुते काहीकाळ बाजूला ठेवून पारमार्थिक आनद लुटुया .

अस्मिता

फेसबुक पेज : @yashasweejyotish




   


Saturday, 23 October 2021

संत सेवाच मत परिवर्तन करू शकते

 || श्री स्वामी समर्थ ||



एकदा एक भक्त महाराजांकडे गेला आणि त्याने स्वतःची अमुक अमुक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आग्रह केला. महाराज मी आपल्या सेवेत निरंतर आहे त्यामुळे प्रसाद म्हणून माझी हि एव्हडी इच्छा आपण पूर्ण करावी असा हट्टच तो धरून बसला. महाराज धर्मसंकटात पडले कारण त्याची इच्छा हि त्या भक्ताच्या  हिताची अजिबात नव्हती.
संत हे त्रिकालज्ञानी आहेत पण त्याला आत्ता काहीही सांगण्यात अर्थ नाही हे महाराजांनी जाणले. 

महाराज म्हणाले हात्तीच्या इतकच ना ,करू कि तुझ्या मना सारखे पण एक गोष्ट तुला करावी लागेल. ह्या जगात प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते तेव्हा तू तुझ्या इच्छा पूर्तीसाठी एक लक्ष जप कर आणि मग माझ्याकडे ये. त्या भक्ताला अतिशय आनंद झाला आणि महाराजांना नमस्कार करून तो निघून गेला. पुढे काही काळ लोटल्यावर तो पुन्हा महाराजांकडे आला. महाराजांना मनोभावे चरणस्पर्श केल्यावर महाराज म्हणाले अरे झाला का जप पूर्ण . त्याने होकारार्थी मान डोलावली . त्यावर महाराज हसून उद्गारले चला तर आता तुझी इच्छा बोलल्या प्रमाणे मला पूर्ण करायला हवी. मी वचनबद्ध आहे. त्यावर भक्त ढसाढसा रडू लागला आणि महाराजांच्या चरणांवर त्याने लोटांगण घातले. 

महाराजांनी त्याला उठवून काय झाले असे विचारल्यावर भक्त म्हणाला . महाराज आपली लीला अपरंपार आहे. माझी मनोकामना मलाही फळणारी नव्हती हे आपण अंतर्मनाने कधीच ओळखले होते पण तरीही मला वचन दिलेत . मी जपाला सुरवात केल्यापासून मला क्षणोक्षणी आपण मनात धरलेली इच्छा किती चुकीची आहे ह्याची प्रचीती येत गेली , तरीही मी जप पूर्ण केला. महाराज ह्या जपाने मला चांगल्या आणि वाईटातील फरक कसा ओळखायचा ते शिकवले. आपल्या गुरूंकडे असा हट्ट करून त्यांना  धर्म संकटात टाकण्याचे पाप माझ्या हातून झाले आहे  ह्याची मला शरम वाटते. 

नामस्मरणात गेलेला हा काळ मला खूप काही शिकवून गेला आणि म्हणूनच मला आता काहीही नको . फक्त आपल्या चरणापाशी मला थोडी जागा असुदे इतकच मागीन.

महाराजांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले अरे वेड्या आपल्या भाग्याप्रमाणे आणि कर्माप्रमाणे योग्य वेळी आपल्याला त्याचे फळ मिळतच असते. आपण काहीच मागू नये कारण मागणे म्हणजे भिक आणि जे न मागता मिळते तो आशीर्वाद असतो. आपण आशीर्वादाचे अभिलाषी असावे . संत आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतात पण त्या आपल्याला पेलणार्या आणि आपल्या हिताच्या असतील तरच .उठसुठ काहीही मागाल तर महाराजांच्या हातात सोटा आहेच . 

संत आपल्या वाणीला कधीही बट्टा लावून देत नाहीत . आपल्या विचारांचे परिवर्तन करण्याची ताकद भक्तिरसात निश्चित आहे.

एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आण, सत्य एक त्यांनाच कळे.

संकलन : अस्मिता
संपर्क : 8104639230


Wednesday, 20 October 2021

@yashasweejyotish फेसबुक पेज चे अनावरण

 || श्री स्वामी समर्थ ||


नमस्कार ,
सद्गुरू श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज ह्यांच्या कृपेने आज माझ्या सर्व ज्योतिष विषयक कार्यशाळांची माहिती देणारे तसेच ज्योतिष शास्त्राची सखोल माहिती देणारे @yashasweejyotish ह्या फेसबुक पेज चे अनावरण करताना मला आनंद होत आहे. आपण सर्वांनी आजवर माझ्या ब्लॉग ला तसेच कार्यशाळांना उत्तम प्रतिसाद दिलात तसाच भविष्यातही द्याल अशी अपेक्षा करते. आपली सर्वांची माझ्या ह्या पेज वरील उपस्थिती माझ्यासाठी अनमोल आहे तेव्हा @yashasweejyotish ह्या पेज ला जॉईन करावे हि विनंती.
आपल्या सूचना नेहमीच स्वागतार्ह आहेत.

अस्मिता

संपर्क : 8104639230
@yashasweejyotish

Friday, 15 October 2021

तेजोमय सूर्य ( रवी )

|| श्री स्वामी समर्थ ||

सूर्योदय निसर्गाचा अविष्कार 

ग्रहमालिकेतील महत्वाचा पिवळाधमक तारा म्हणजेच  “सूर्य” . सुर्यमालीकेत मध्यभागी सूर्य असून त्याभोवती पृथ्वीसकट सर्व ग्रह फिरत असतात .सूर्य स्थिर असतो आणि पृथ्वी फिरत असते म्हणून  सूर्य उगवला , सूर्यास्त झाला असे म्हंटले जाते. सूर्य प्रत्येक राशीत महिनाभर असतो. १४ जानेवारीला सूर्य सर्व राशीतून भ्रमण करून म्हणजेच  संक्रमण करून मकरेत येतो ती मकर संक्रांत .सूर्यामुळे आपल्याला ऋतू आणि दिवस , वार ,वर्ष ह्याचे ज्ञान होते . सूर्याचा अंमल पाठीच्या कण्यावर आहे.  सूर्याची रास सिंह असून मेष राशीत तो उच्चीचा आणि तूळ राशीत निचीची फळे देतो. सूर्य आपला आत्मा आहे. सृष्टीमधील सजीवतेचा  कारक सूर्य आहे. विचार करा एक दिवस सूर्योदय झालाच नाही तर? असा हा सूर्य एक तप्त गोळा आहे. सूर्य हा ब्रम्हांडाचा आत्मा आहे.सूर्य म्हणजेच राजा .सूर्य चांगला असेल तर व्यक्ती पराक्रमी असते आणि राजकारणात यश मिळवते.

सूर्य पत्रिकेत अशुभ असल्यास शरिर कमजोर असते . शारीरिक उर्जा , स्फूर्ती कमी असते . वडिलांशी न पटणे किंवा त्यांचे छत्र हरपणे म्हणजे रवी बिघडल्याचे लक्षण कायम आळस भरलेला असतो. इच्छाशक्ती कमी असते, तसेच धैर्य , निर्णयक्षमता नसते. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास ह्यामध्ये सुद्धा सूर्य कमजोर असेल तर कमतरता असते. स्वतःला व्यक्त करू शकत नाहीत महत्वाकांक्षा नसणे , खोटा अहंकार असणे. आपल्या करिअर साठी महत्वाचा ग्रह सूर्य आहे . नोकरीवर वरिष्ठांशी न पटणे तसेच केलेल्या कामाचे चीज न होणे , पद प्रतिष्ठा अधिकार न मिळणे हे सूर्य बलहीन असल्याची लक्षणे आहेत .सूर्य कमकुवत असेल तेव्हा प्रचंड अहंकार असतो आणि अश्या व्यक्ती स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत .

आपली  त्वचा सूर्याच्या किरणांमुळे चांगली राहते . परदेशात जवळ जवळ ८ महिने सूर्य दर्शन नसते ,बर्फ पडत असतो त्यामुळे सूर्य किरणांचा अभाव असतो . त्यामुळे त्यांची त्वचा  शुष्क असते. विटामिन D हे सूर्यामुळेच मिळते.

सूर्य कमकुवत असेल तर हृद्य रोग , शरीरातील हाडे ठिसूळ असणे ,बिपी च्या तक्रारी , डोके दुखणे ,पित्ताचे विकार ,ज्वर ,डोके दुखणे हे आजार संभवतात. कुठल्याही कामात यश नाही आणि सतत चिडचिड होते. रक्तासंबंधी समस्या , विटामिन D ची कमतरता , कल्शियम ची कमतरता. डोळ्यांची समस्या ,रोगप्रतिकारक शक्ती कमी ,प्रोटीन ची कमतरता  निर्माण होते.

सूर्य शुभ असेल तर जीवनशक्ती उत्तम असते. राजमान्यता ,लोकमान्यता मिळते. स्त्रियांच्या पत्रिकेत पतीचा कारक सूर्य. सरकारी नोकरी मिळते .नेतृत्व गुण असतात .आत्मविश्वास , जिद्द ह्याची कमी नसते. रवी शुभ असल्यास वक्तशीरपणा ,चालीरीती मानणारा , मानी ,उद्दात्त विचार , धर्म रूढी मानणारा ,मातृपितृ भक्त , विद्येचा व्यासंग असणारा ,मदत करणारा असतो. – शुभ सूर्य असलेल्या व्यक्ती आपल्यापेक्षा हलक्या दर्जाच्या लोकांमध्ये मिसळत नाहीत . सूर्य उत्तम असणार्या व्यक्ती मंत्री ,गावाकडचे मामलेदार , पाटील ,जमीनदार , खंडणी प्रतिष्ठित अश्या असतात.

अस्मिता

antarnad18@gmail.com 

Wednesday, 13 October 2021

विजयादशमीच्या शुभेछ्या

 || श्री स्वामी समर्थ ||

विजया दशमीच्या  शुभेछ्या



नमस्कार , 

“ अंतर्नाद “ च्या सर्व वाचकांना विजयादशमीच्या मनापासून शुभेछ्या.  आपल्या सर्वाना पुढील वर्ष अत्यंत सुख समाधानाचे जाऊदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.

अस्मिता

संपर्क 8104639230