|| श्री स्वामी समर्थ ||
एकदा एक भक्त महाराजांकडे गेला आणि त्याने स्वतःची अमुक अमुक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आग्रह केला. महाराज मी आपल्या सेवेत निरंतर आहे त्यामुळे प्रसाद म्हणून माझी हि एव्हडी इच्छा आपण पूर्ण करावी असा हट्टच तो धरून बसला. महाराज धर्मसंकटात पडले कारण त्याची इच्छा हि त्या भक्ताच्या हिताची अजिबात नव्हती.
संत हे त्रिकालज्ञानी आहेत पण त्याला आत्ता काहीही सांगण्यात अर्थ नाही हे महाराजांनी जाणले.
महाराज म्हणाले हात्तीच्या इतकच ना ,करू कि तुझ्या मना सारखे पण एक गोष्ट तुला करावी लागेल. ह्या जगात प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते तेव्हा तू तुझ्या इच्छा पूर्तीसाठी एक लक्ष जप कर आणि मग माझ्याकडे ये. त्या भक्ताला अतिशय आनंद झाला आणि महाराजांना नमस्कार करून तो निघून गेला. पुढे काही काळ लोटल्यावर तो पुन्हा महाराजांकडे आला. महाराजांना मनोभावे चरणस्पर्श केल्यावर महाराज म्हणाले अरे झाला का जप पूर्ण . त्याने होकारार्थी मान डोलावली . त्यावर महाराज हसून उद्गारले चला तर आता तुझी इच्छा बोलल्या प्रमाणे मला पूर्ण करायला हवी. मी वचनबद्ध आहे. त्यावर भक्त ढसाढसा रडू लागला आणि महाराजांच्या चरणांवर त्याने लोटांगण घातले.
महाराजांनी त्याला उठवून काय झाले असे विचारल्यावर भक्त म्हणाला . महाराज आपली लीला अपरंपार आहे. माझी मनोकामना मलाही फळणारी नव्हती हे आपण अंतर्मनाने कधीच ओळखले होते पण तरीही मला वचन दिलेत . मी जपाला सुरवात केल्यापासून मला क्षणोक्षणी आपण मनात धरलेली इच्छा किती चुकीची आहे ह्याची प्रचीती येत गेली , तरीही मी जप पूर्ण केला. महाराज ह्या जपाने मला चांगल्या आणि वाईटातील फरक कसा ओळखायचा ते शिकवले. आपल्या गुरूंकडे असा हट्ट करून त्यांना धर्म संकटात टाकण्याचे पाप माझ्या हातून झाले आहे ह्याची मला शरम वाटते.
नामस्मरणात गेलेला हा काळ मला खूप काही शिकवून गेला आणि म्हणूनच मला आता काहीही नको . फक्त आपल्या चरणापाशी मला थोडी जागा असुदे इतकच मागीन.
महाराजांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले अरे वेड्या आपल्या भाग्याप्रमाणे आणि कर्माप्रमाणे योग्य वेळी आपल्याला त्याचे फळ मिळतच असते. आपण काहीच मागू नये कारण मागणे म्हणजे भिक आणि जे न मागता मिळते तो आशीर्वाद असतो. आपण आशीर्वादाचे अभिलाषी असावे . संत आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतात पण त्या आपल्याला पेलणार्या आणि आपल्या हिताच्या असतील तरच .उठसुठ काहीही मागाल तर महाराजांच्या हातात सोटा आहेच .
संत आपल्या वाणीला कधीही बट्टा लावून देत नाहीत . आपल्या विचारांचे परिवर्तन करण्याची ताकद भक्तिरसात निश्चित आहे.
एका संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आण, सत्य एक त्यांनाच कळे.
संकलन : अस्मिता
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment