Wednesday, 27 October 2021

अजि सोनियाचा दिन

 || श्री स्वामी समर्थ ||



आज गुरुपुष्यामृत आहे. गुरु हा आकाश तत्वाचा ग्रह आहे. आकाश जसे सर्वाना सामावून घेते तसेच गुरु प्रधान व्यक्ती ह्या सुद्धा तुही माझा तीही माझी असे करत प्रत्येकाला आपल्यात सामावून घेत आयुष्याचा प्रवास करत असतात . निसर्ग कुंडलीत सुद्धा गुरूच्या राशी ह्या आपल्या उत्तर आयुष्यात येतात म्हणजेच भाग्य स्थानात आणि व्यय भावात . आपले भाग्य घडवण्याची ताकद आपल्या गुरूंमध्येच आहे हेच तर नवम भाव आपल्याला सुचवत असतो. तसेच व्यय भाव हा आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणारा आहे. आपल्या प्रापंचिक जीवनातून जगताना पारमार्थिक जीवनाची चव चाखायला लावणारा हा गुरु  ह्या जन्माचा नाही तर जन्मोजन्मीचा आपला सखा आहे. 

गुरुप्रधान व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार करणाऱ्या आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल  करणाऱ्या असतात .परोपकार ,दया ,परमेश्वरावरील निस्सीम श्रद्धा  ह्या लोकात अगदी ठासून भरलेली असते. 

देव एकवेळ आपल्यावर रागवेल पण गुरु आपल्या भक्तांवर रागावणे केवळ अशक्य . त्यांचा हात जेव्हा आपल्या मस्तकावर असतो तेव्हा कितीही मोठ्या संकटातून आपली नाव पैलतीराला जाते.

आज गुरूंप्रती समर्पित होण्याचा दिवस आहे. श्री दासगणू महाराजांनी सुद्धा श्री गजानन विजय ग्रंथात लिहिले आहे कि गुरुपुष्य योगावर जो ह्या ग्रंथाचे भावभक्तीने पारायण करेल त्याच्या घरी अनुपम भाग्य येयील. आज पारायण , नामस्मरण , ध्यानधारणा , साधना  ह्यात आपल्याला झोकून देवूया .

whatsapp , instagram आणि सोशल मिडिया हि भुते काहीकाळ बाजूला ठेवून पारमार्थिक आनद लुटुया .

अस्मिता

फेसबुक पेज : @yashasweejyotish




   


No comments:

Post a Comment