Friday, 15 October 2021

तेजोमय सूर्य ( रवी )

|| श्री स्वामी समर्थ ||

सूर्योदय निसर्गाचा अविष्कार 

ग्रहमालिकेतील महत्वाचा पिवळाधमक तारा म्हणजेच  “सूर्य” . सुर्यमालीकेत मध्यभागी सूर्य असून त्याभोवती पृथ्वीसकट सर्व ग्रह फिरत असतात .सूर्य स्थिर असतो आणि पृथ्वी फिरत असते म्हणून  सूर्य उगवला , सूर्यास्त झाला असे म्हंटले जाते. सूर्य प्रत्येक राशीत महिनाभर असतो. १४ जानेवारीला सूर्य सर्व राशीतून भ्रमण करून म्हणजेच  संक्रमण करून मकरेत येतो ती मकर संक्रांत .सूर्यामुळे आपल्याला ऋतू आणि दिवस , वार ,वर्ष ह्याचे ज्ञान होते . सूर्याचा अंमल पाठीच्या कण्यावर आहे.  सूर्याची रास सिंह असून मेष राशीत तो उच्चीचा आणि तूळ राशीत निचीची फळे देतो. सूर्य आपला आत्मा आहे. सृष्टीमधील सजीवतेचा  कारक सूर्य आहे. विचार करा एक दिवस सूर्योदय झालाच नाही तर? असा हा सूर्य एक तप्त गोळा आहे. सूर्य हा ब्रम्हांडाचा आत्मा आहे.सूर्य म्हणजेच राजा .सूर्य चांगला असेल तर व्यक्ती पराक्रमी असते आणि राजकारणात यश मिळवते.

सूर्य पत्रिकेत अशुभ असल्यास शरिर कमजोर असते . शारीरिक उर्जा , स्फूर्ती कमी असते . वडिलांशी न पटणे किंवा त्यांचे छत्र हरपणे म्हणजे रवी बिघडल्याचे लक्षण कायम आळस भरलेला असतो. इच्छाशक्ती कमी असते, तसेच धैर्य , निर्णयक्षमता नसते. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास ह्यामध्ये सुद्धा सूर्य कमजोर असेल तर कमतरता असते. स्वतःला व्यक्त करू शकत नाहीत महत्वाकांक्षा नसणे , खोटा अहंकार असणे. आपल्या करिअर साठी महत्वाचा ग्रह सूर्य आहे . नोकरीवर वरिष्ठांशी न पटणे तसेच केलेल्या कामाचे चीज न होणे , पद प्रतिष्ठा अधिकार न मिळणे हे सूर्य बलहीन असल्याची लक्षणे आहेत .सूर्य कमकुवत असेल तेव्हा प्रचंड अहंकार असतो आणि अश्या व्यक्ती स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत .

आपली  त्वचा सूर्याच्या किरणांमुळे चांगली राहते . परदेशात जवळ जवळ ८ महिने सूर्य दर्शन नसते ,बर्फ पडत असतो त्यामुळे सूर्य किरणांचा अभाव असतो . त्यामुळे त्यांची त्वचा  शुष्क असते. विटामिन D हे सूर्यामुळेच मिळते.

सूर्य कमकुवत असेल तर हृद्य रोग , शरीरातील हाडे ठिसूळ असणे ,बिपी च्या तक्रारी , डोके दुखणे ,पित्ताचे विकार ,ज्वर ,डोके दुखणे हे आजार संभवतात. कुठल्याही कामात यश नाही आणि सतत चिडचिड होते. रक्तासंबंधी समस्या , विटामिन D ची कमतरता , कल्शियम ची कमतरता. डोळ्यांची समस्या ,रोगप्रतिकारक शक्ती कमी ,प्रोटीन ची कमतरता  निर्माण होते.

सूर्य शुभ असेल तर जीवनशक्ती उत्तम असते. राजमान्यता ,लोकमान्यता मिळते. स्त्रियांच्या पत्रिकेत पतीचा कारक सूर्य. सरकारी नोकरी मिळते .नेतृत्व गुण असतात .आत्मविश्वास , जिद्द ह्याची कमी नसते. रवी शुभ असल्यास वक्तशीरपणा ,चालीरीती मानणारा , मानी ,उद्दात्त विचार , धर्म रूढी मानणारा ,मातृपितृ भक्त , विद्येचा व्यासंग असणारा ,मदत करणारा असतो. – शुभ सूर्य असलेल्या व्यक्ती आपल्यापेक्षा हलक्या दर्जाच्या लोकांमध्ये मिसळत नाहीत . सूर्य उत्तम असणार्या व्यक्ती मंत्री ,गावाकडचे मामलेदार , पाटील ,जमीनदार , खंडणी प्रतिष्ठित अश्या असतात.

अस्मिता

antarnad18@gmail.com 

No comments:

Post a Comment