|| श्री स्वामी समर्थ ||
श्री गणेश चतुर्थी च्या सर्वाना लक्ष लक्ष शुभेछ्या . उद्या घरोघरी गणरायाचे आगमन होत आहे आणि सगळेच ह्या मोरेश्वराच्या स्वागताच्या जय्यत तयारीत आहेत . आबाल वृद्ध सर्वांचेच लाडके आणि हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपती म्हणजेच श्री गजानन . गेल्या दोन वर्षात करोनामुळे आलेले मळभ ह्या सिद्धिविनायकाच्या आगमनाने दूर झाले आहे आणि सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे . प्रत्येक जण आपापल्या परीने ह्या बल्लाळेश्वराच्या सेवेत पुढील १० दिवस रुजू होणार आहे . पण तरीही हि सेवा करत असताना कुणालाही मोठ्या ध्वनीचा त्रास होऊ नये ह्याची काळजी सुद्धा आपणच घ्यायची आहे.
वरदविनायक हे बुद्धीचे दैवत आहे म्हणूनच त्याच्याकडे आपण सर्वाना सुबुद्धी दे अशी प्रार्थना करुया . हे चिंतामणी गेल्या दोन वर्षात अर्थव्यवस्थेची मोडलेली घडी पुन्हा व्यवस्थित करण्यास आम्हाला मदत कर अशी करुणा भागताना त्याच्या चरणी विनम्रतने नतमस्तक होवुया . हे गिरिजात्मका प्रत्येकाला सुख समृद्धी दे आणि अखंड विश्वात शांतता राहुदे .
हे विघ्नेश्वरा तुझा वरदहस्त आणि कृपा आम्हा सर्वांवर सदैव राहूदे , आयुष्यातील विघ्ने तुझ्या येण्याने दूर होऊन प्रत्येकाला आपपल्या कार्यात यश मिळूदे . महागणपती च्या आगमनाने नैराश्य , काळजी चिंता दूर होऊन आयुष्यात पुन्हा एकदा सकारात्मकतेची किरणे आम्हा सर्वाना अनुभवायला मिळूदेत हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
जप : ॐ गं गणपतये नमः
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment