|| श्री स्वामी समर्थ ||
विवाहात फसवणूक होईल का ?? हि चिंता आज प्रत्येक पाल्याला आहे . मुलाचे दुकान आहे, नोकरीत अमुक अमुक पगार आहे , घर स्वतःचे आहे , व्यसने अजिबात नाही असे सांगितले जाते पण विवाह झाल्यावर ह्यात विसंगती दिसून येते . मूळ पत्रिकेत फेरबदल करून जन्मतारीख आणि महिना तोच पण वर्ष बदलून पत्रिका दाखवणे अशी फसवणूक केली जाते . फसवणुक म्हणून मुलामुलींची १० १२ वी चा दाखला ,शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर जन्मतारीख असते त्याच्याशी पत्रिकेवरील तारीख निदान तपासून बघावी . कडक मंगळ असेल तर विवाहाला उशीर आणि अडचणी होतात म्हणूनही जन्म टिपण बदलले असते. अनेकदा नपुंसक जोडीदार मिळणे अश्या प्रकारे फसवणूक होते त्यात मुलाचा शारीरिक दोष लपवला जातो.
आज फसवणूक झाली आणि मग विवाहच नाही किंवा एकंदरीत लग्नाला उशीर होतोय म्हणून मनोरुग्ण होणारे मुले मुली आहेत . विवाहापूर्वी किंवा नंतर होणारे प्रेमसंबंध हे पण फसवणुकीचे कारण आहे. विवाहासाठी पत्रिका बघताना हर्शल नेप ह्या ग्रहांचा विचार झालाच पाहिजे. नेप हा मुख्यत्वे फसवणूक करवतो . सप्तम भावात जेव्हा हर्शल नेप येतात तेव्हा ह्या ग्रहांचा सखोल अभ्यास झाला पाहिजे . हर्शल आकस्मित घटना घडवतो अचानक विवाह ठरवतो आणि मोडतो सुद्धा. सप्तमातील नेप काहीतरी गूढ गोष्टी दर्शवतो . समोरचे लोक काहीतरी लपवा छपवी करण्याकडे कल असतो . मुलाचा आधी मोडलेला साखरपुडा किंवा प्रेमभंग तत्सम काहीतरी सांगत नाहीत आणि मग ते नंतर समजते .
बरेचदा नेप मुळे विवाहात नाट्यमय घटना घडतात . मंडपातून मुलगी पळून जाणे किंवा साखरपुडा झाल्यावर विवाह मोडणे . सप्तम स्थानात नेप हा हर्शल राहू शनी केतू मंगळा सोबत असेल तसेच तो आश्लेषा , जेष्ठा ,कृत्तिका ,मूळ ह्या नक्षत्रात असेल . लग्नस्थानात बिघडलेला नेप , सप्तमेशा सोबत बिघडलेला नेप असेल तर फसवणूक होऊ शकते. शुक्र हा नेप सोबत असेल किंवा शुक्र नेप प्रतियोग असेल आणि ती अशुभ नक्षत्रात चंद्र नेप युती किंवा प्रतियुती असेल आणि अशुभ नक्षत्रात झाली असेल तर . सर्वांच्या संमतीने जेव्हा विवाह ठरतो ,खरेदी होते , पत्रिकाही छापल्या जातात आणि अचानक विवाह मोडतो हि बाब अत्यंत क्लेशदायक आणि मनस्ताप देणारी असते .
नपुंसक जोडीदार मिळण्यासाठी शनी बुध हे ग्रह कारणीभूत आहेत तसेच फसवणूक होण्यास नेप कारणीभूत आहे .त्याचप्रमाणे हर्शल आणि मंगळ हे दोन ग्रह विवाह मोडण्यास कारणीभूत आहेत . हर्शल हा बुद्धिमान पण हेकट , आकस्मिक अनाकलनीय घटना घडवणारा ग्रह आहे. विवाहाच्या वेळी आकस्मित घटना घडवणे ,गोंधळाची स्थिती निर्माण करणे .ज्यांच्या पत्रिकेत सप्तमातील हर्शल हा पापग्रह युक्त , दृष्ट किंवा अशुभ नक्षत्रात असेल तर .चंद्र हर्शल युती किंवा प्रतियुती असेल आणि ते अशुभ नक्षत्रात असतील तर शुक्र हर्शल युती किंवा प्रतियोग विवाहसौख्याची हानी करतात . शुक्र वक्री असेल तर विवाहात अडचणी येणे , विवाह मोडणे हे होते . सप्तम स्थानातील वक्री ग्रह सुद्धा विवाह मोडण्यास कारणीभूत ठरतात . थोडक्यात शुक्र हर्शल युती प्रतियुती , मंगळाची पत्रिका ,सप्तमातील वक्री ग्रह , चंद्राशी असणारे हर्शल नेप चे कुयोग ,वक्री शुक्र ,कुयोगातील नेप ,वक्री सप्तमेश हे सर्व योग आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत आहेत का हे तपासून बघितले पाहिजेत .
वराचा सप्तमेश आणि वधूचा लग्नेश पहा. दोघांचे लग्न आणि चंद्र पुरुषाच्या पत्रिकेत चंद्र आणि शुक्र पहा . स्त्रीच्या पत्रिकेत मंगळ आणि रवी पहा . वैवाहिक सौख्य नसणे, वैवाहिक असमाधान , विवाह मोडणे , घटस्फोट असे काहीना काही प्रोब्लेम बरेचदा कर्क लग्नाच्या पत्रिकेत पाहायला मिळतात .कर्क लग्न हे विवाहासाठी बरेचदा दुर्दैवी ठरते कारण ७ आणि ८ व्या स्थानात शनीची रास येते तसेच शनी हा कर्क लग्नाचा शत्रूही आहे. कर्क लग्नात वैवाहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र हा बाधकेश होतो . ह्यामुळे कर्क लग्न हे वैवाहिक सुखात निरस असणार. सप्तमेश शनी हा आळशी , निरस ,नैराश्य वादी, पिडा देणारा पापग्रह आहे. थोडक्यात सौंदर्याचा अभाव मकर राशीत आहे. शनी हा विलंबाचा,दुक्ख ,दारिद्र्य ,दैन्य ,संकटे ,उदासीनता ,वैफल्य ,दीर्घ आजार देणारा विवाह सौख्यात परमोच्च आनंद देणाऱ्या शुक्राच्या फळाशी ह्याचा दुरचाही संबंध नाही शनी हा निग्रही , कष्टाळू ,सहनशील , विचारी , तत्वनिष्ठ ,ज्ञानी , प्रामाणिक, कायद्याच्या चौकटीत जगणारा ,काटकसरी ,दिर्घोद्योगी आहे. त्यामुळे हे गुणसुद्धा जोडीदारात दिसून येतील. कर्क लग्नाचा स्वामी चंद्र असल्यामुळे जातक चंद्राच्या गुणधर्माचा असणार आणि जोडीदार शनीच्या गुणांचा असणार.
चंद्र हा शीतल , सौम्य , शांत , प्रेमळ स्त्रीग्रह आहे. शनी च्या अगदी विरुद्ध तत्वाचा ग्रह आहे. कर्क लग्नाच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक , देखणे , मोहक , मादक , भावनाप्रधान , चंचल , कलासक्त , रसिक , प्रवासाची आवड असणारे ,कुटुंब वत्सल, स्वभाव रसिक , आनंदी हौशी असतो .व्यक्तिमत्व चारचौघात उठून दिसणारे असते त्याउलट जोडीदाराचे व्यक्तिमत्व असते कारण ते शनिप्रधान असते. ह्याच्या अगदी उलट स्वभाव हा जोडीदाराचा असतो .
कर्क लग्नाच्या व्यक्ती ह्या ऐहिक सुखाची लालसा असणार्या , महत्वाकांक्षी, परोपकारी असतात .लोकप्रिय असतात .ह्यांना पैसा , कीर्ती , वाहन , घर , नावलौकिक , प्रतिष्ठा सर्व सुखे मिळतात .मात्र वैवाहिक सौख्य मनाप्रमाणे मिळत नाही .सप्तमेश शनी असल्याने विवाह उशिरा होतो .शनी खरच दुषित असेल तर ३५ नंतर किंवा विवाह न झालेलाही दिसतो . सप्तमेश शनी ३ ७ ९ ११ ह्या स्थानात असेल तर वैवाहिक सौख्य तितके खराब नसते .
मध्यंतरी एका मुलीला एक स्थळ सांगून आले , दोघांची पसंती झाली. तिच्या सप्तमात हर्शल नेप . तिला त्याच्यात काहीतरी खटकत होते पण काय ते उमगेना . मी म्हंटले सगळे नीट वर्णन कर त्याचे , दिसतो कसा रंग उंची बोलणे कुठल्या विषयावर असते . केशवेशभूषा . त्यावर म्हणाली तो नेहमी फुलशर्ट घालतो. मी त्याला म्हंटले सुद्धा कि तुला नवनवीन कपडे घालण्याची आवड नाही का? असो तिला म्हंटले त्याला तसे सांग नाही तर एकदा त्याला न सांगता त्याच्या घरी जा. असो त्याच्या हातावर थोडे कोडचे डाग होते. आता हे आज ना उद्या समजणार .
विवाह हा सुखद असतो , पुढील संपूर्ण आयुष्य त्याच्या सोबत घालवायचे ती विवाहाची इमारत प्रामाणिक पानाच्या विटेवर उभी असावी. फसवणूक करून आपण आपले आणि समोरच्या व्यक्तीचेही आयुष्य धुळीला मिळवून आपल्याच कर्मात वाढ करतो . विचार करावा ....
श्री स्वामी समर्थ
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment