|| श्री स्वामी समर्थ ||
नवग्रहात असलेल्या राहू केतू बद्दल मानवाला प्रचंड भीतीयुक्त आकर्षण आहे. पत्रिका सोडवताना सगळ्यात बुचकळ्यात कोण टाकत असतील ते राहू केतू . त्यांच्या बद्दल निदान आणि ठाम निर्णय घेताना अभ्यासकांची खरच कसोटी लागते .
आयुष्यात प्रचंड वेगळेपणा देणारे हे ग्रह आहेत . राहू केतूचे भय आणि दडपण माणसावर प्रचंड आहे ह्याचे उदा म्हणजे आजकालच्या सोशल मिडीयाच्या प्रसारामुळे अनेक जातक माझी राहूची दशा कशी जाणार ? हा प्रश्न हमखास विचारतात तसेच राहू दशा चालू असेल तर भेदरलेले , संभ्रमात असलेलेही पाहायला मिळतात . राहू केतु हे ग्रह नसले तरी त्यांच्या प्रभाव मानवी जीवनावर विलक्षण आहे. आयुष्यातील अनेक उलथापालथ , जगावेगळे अनाकलनीय प्रसंग घटना घडतात तेव्हा पत्रिकेत कुठेतरी राहू चा प्रभाव असतोच .
प्रत्येक व्यक्तीचे एक घराणे , कुळ हे असतेच . घराण्याचा शाप म्हणजे राहू . प्रत्येक विधीत होणार्या अकल्पित घटना जसे प्रत्येक पिढीत कुणीतरी अविवाहित राहणे , निदान न होणारे मोठे आजार , अकल्पित मृत्यू , आकस्मित संकटे , पैशाचा अपव्यय , व्यसनाधीनता , मानसिक आर्थिक संघर्ष , सातत्याने येणारे अपयश , व्यसने ,जुगार , वाईट सांगत , स्मृतीभंश, घरात दडपण वेड लागणे , श्राद्ध न करणे ह्यामुळे गेलेल्या लोकांचे शाप पत्रिकेला लागतात . तुम्ही कितीही आधुनिकतेचा आव आणा आणि उड्या मारा पण ह्या गोष्टी सत्य आहेत . घराण्याला शाप , तळतळाट देणारा राहू , स्मृती जाणे , वंशवेल खुंटणे . एखाद्याच्या मृत्यू नंतर त्याचे क्रियाकर्म करणे हि त्याचा वंश चालवणार्यांची जबाबदारी आहे ते त्यांचे क्रिया कर्म केले नाही तर जाणार्या व्यक्तीला पुढे चांगली गती मिळत नाही . अनेक जण “ आमच्या वडिलांनी किंवा आईने किंवा जाणार्या व्यक्तीने सांगितले होते कि आमचे काहीही क्रिया कर्म १० १२ १३ करायचे नाही , म्हणून आम्ही नाही केले “ असे जेव्हा सांगतात तेव्हा अक्षरश कीव येते . आयुष्यभर ह्या व्यक्तींनी बरेच काही सांगितले असेल ते नाही ऐकले , आपल्या फायद्याचे हे बरोबर ऐकले . असो
कुटुंबातील एकमेकात प्रेम भावना ओढ नसणे , मनानेच नाती दुरावतात .घरात दडपण येणे , कुठल्याही गोष्टीत यश न मिळणे , विवाह न होणे झालाच तर संतती नाही . गैरसमज हा राहूचा हुकुमी एक्का आहे. गैरसमज निर्माण होवून आयुष्यभराची नातेसंबंध कायमचे संपुष्टात येतात . तात्पर्य असे कि राहू केतू ह्या अघोरी शक्ती आहेत आणि त्यांनी दिलेले भोग भागावेच लागतात . राहू स्थान हानी करतो हेही बघायला मिळते . सप्तम भावात राहू असेल आणि राहूची दशा असेल तर जोडीदारासंबंधी तीव्र फळे मिळतात मग तो कुठल्याही राशीत असो.
शुक्र राहू युती पत्रिकेत असता अनेकदा आंतरजातीय विवाह होतो किंवा वैवाहिक सुखाला ग्रहण लागते . प्रश्न कुंडलीत चंद्र राहू युती असेल तर व्यक्ती काहीतरी लपवून किंवा अर्ध सत्य सांगून प्रश्न विचारत आहे हे समजावे. कृष्णमुर्ती नि राहू केतुना अनन्यसाधारण महत्व दिले आहे .
राहू दशा अनेकदा आयुष्याची दशा करते. शिक्षण चालू असेल तर मुले आई वडिलांचे ऐकत नाहीत , बेभान पणे वागतात , सारखी मोबायील घेवून बसतील , सारखी घराबाहेर राहतील , वाईट सांगत व्यसनात अडकतील. धन स्थानात राहू असेल तर विशेष काळजी घ्यावी . राहू हा घराबाहेर भटकत ठेवतो त्यांना , अनेकदा सारखी झोप येते किंवा अजिबात येत नाही . भ्रमिष्ठ करतो राहू व्यक्तीला. संपूर्ण राहू दशीत व्यक्ती दडपणाखाली असते .
राहू हा फसवा , लबाड आणि मोहित करणारा आहे त्यामुळे राहूच्या नक्षत्रावर खरेदी टाळावी . विशेष करून इलेक्ट्रोनिक वस्तू विकत घेवू नये . त्या सदोष असतात . राहूचे आर्द्रा नक्षत्र अत्यंत वाईट आहे . आज राहूचे आर्द्रा नक्षत्र आहे म्हणून राहुबद्दल चा हा अभ्यास आपल्या समोर मांडण्यासाठी हे चार शब्द .
सर्व बंधने झुगारून मदमस्त जगणाऱ्या ह्या राहुबद्दल पुढील लेखात अधिक जाणून घेवूया.
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment