Wednesday, 16 July 2025

थोडक्यात वाचले

 || श्री स्वामी समर्थ ||


गुणमिलन आणि ग्रहमिलन हा सखोल अभ्यास आहे . नुसते २६ २९ ३५ गुण जुळले तर लग्न ठरवू नये हे माझे प्रामाणिक मत आहे. आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय इतक्या घाईत घ्यायची अजिबात गरज नाही. तसेही मुलांना लग्नाची घाई नसते , घाई असते ती पालकांना .एका जातकाला सांगून आलेल्या पत्रिकेचे विश्लेषण बघूया .


मुलाचे धनु लग्न आणि मुलीच मिथुन . वरवर पाहता ह्या पत्रिका अगदी made for each other म्हणाव्यात अश्या . सम सप्तकातील लग्न . असो . मुलीच्या पत्रिकेत लग्नेश बुध वक्री आणि षष्ठ भावात शनीच्या नक्षत्रात आणि केतूच्या उपनक्षत्रात  . शनी अष्टमेश आणि लाभ भावात  मेष राशीत निचीचा . केतू अष्टम भावात हर्शल नेप सोबत .मुलाची पत्रिका मंगळाची नाही कारण मंगळ लाभ भावात पण मुलीला कडक मंगळ . सप्तम भावात धनु राशीत मंगळ शुक्राच्या नक्षत्रात . शुक्र व्ययेश आणि पंचमेश . शुक्र मंगल आकर्षण योग आणि वैवाहिक सुखासाठी चांगला असे पाहून कुणीतरी पत्रिका उत्तम जुळते आहे असे सांगू शकते. पण हा शुक्र जो वैवाहिक सुखाचा प्रमुख कारक लग्न कुंडलीत कन्या राशीत पण तो फळे देत आहे सिंह राशीची . सप्तमाच्या अष्टमात राहू त्यावर सप्तम भावातील मंगलाची दृष्टी .

मुलीच्या पत्रिकेत सप्तम भाव पाप कर्तरी योगात , मुलीला मंगळ पण मुलाला नाही .चतुर्थेश षष्ठ भावात वृश्चिक राशीत वक्री आणि प्लुटो सोबत .कुटुंब भावात राहू त्यावर मंगळाची दृष्टी . धनेश चंद्रासमोर नीच शनी गुरु . सप्तमेश गुरु केतूच्या नक्षत्रात  केतू अष्टम भावात आणि गुरु स्वतः वक्री शनी सोबत लाभात . अजून खोल शिरता असे अनेक ग्रहयोग आहेत जे वैवाहिक सुख प्रदान करणार नाहीत असे आहेत . गुण सुद्धा माफक आहेत . 

आपल्या एका निर्णयावर जातक विश्वासाने सोयरिक जुळवणार आहे  हे कधीही विसरून चालणार नाही. आपला अभ्यास आणि उपासना सुद्धा वाढवण्याची नितांत आवश्यकता भासते हे कळकळीने सांगावेसे वाटते . पुढे सर्व सुज्ञ आहेतच .  


ह्या पत्रिका एकमेकांशी उत्तम जुळत आहेत ? खरच ? 


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment