|| श्री स्वामी समर्थ ||
“ डायटिंग साठी जन्म आपुला “ तुम्ही म्हणाल आता हे काय भलतच ,खरय पूर्वी “ खाण्यासाठी जन्म आपुला “ असे म्हंटले जात असे. काळाप्रमाणे ह्या सज्ञा आपण बदलल्या पाहिजेत . आता श्रावण सुरु झाला आहे. हिंदू संस्कृतीत श्रावण सुरु झाला कि व्रत वैकल्यांची रेलचेल असते आणि मग पुढे नवरात्र दसरा दिवाळी असे करत नववर्ष दरवाज्यावर कधी दस्तक देते ते समजतच नाही. ह्या सगळ्या सणासुदीच्या दिवसात आपले आहाराकडे बर्यापैकी दुर्लक्ष होते . अनेक प्रकारचे नेवैद्य जेवणाचा भाग बनतात . वर्षभर वर्ज केलेले सर्व गोड पदार्थ एकामागून एक हजेरी लावतात . त्यामानाने व्यायाम होत नाही , पर्यायाने वजन बेसुमार वाढते आणि अनेक आजारांना निमंत्रण देते.
गेले दीड वर्षाहून अधिक काळ आपण करोनाविरुद्ध लढत आहोत . करोना च्या ह्या आकस्मिक संकटात आपण घरात बंदिस्त झालो आणि जगात , समाजात , आपल्या माणसात वावरणे बंदच झाले. नोकर्यांचे टेंशन आणि इतरही काही बाबींमुळे आपण भयग्रस्त झालो. मोकळ्या वातावरणात फिरण्याच्या आनंदाला मुकलो . अनेकांची शुगर ह्यामुळे वाढली आणि काहींना होऊ घातली . चिंताग्रस्त मने,आर्थिक दडपण आणि भविष्यातील अंधार ह्यामुळे माणूस मनाने आजारी पडला . पुढे काय ? हा प्रश्न सतत भेडसावत असणार्या तुमचे आमचे स्वतःच्याच तब्येतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. वाढणारे वजन हि वाढीव समस्या निर्माण झाली. चालणे कमी झाले आणि पर्यायाने तब्येत हा यक्षप्रश्न सर्व वयोगटाना भेडसावू लागला.
आज हळूहळू बर्याच गोष्टी पूर्ववत होत असल्या तरी त्याला काही काळ निश्चित लागणार आहे. आज अनेक लोक घरातून काम करताना दिसतात म्हणजेच “ Work From Home “ हि संस्कृती आणि हे शब्द आता परवलीचे झाले आहेत . पण त्याचे अत्यंत वाईट परिणाम आपल्या तब्येतीवर होत आहेत.
आधीच निराशा त्यात वाढलेले वजन , बेढब झालेले शरीर आपली मानसिकता बिघडवण्यास अजूनच हातभार लावत आहे. परिस्थिती काहीही असो आपली मानसिकता आणि आहार सांभाळण्याचे कौशल्य आपल्याला पराकोटीचे प्रयत्न करून जमवायचेच आहे.
म्हंटलच आहे ना “ आरोग्यं धनसंपदा “ . मग हे आरोग्य टिकवायचे तरी कसे.
आपले सर्वांचे स्नेही मित्र डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्याला ह्यातून सतत मार्गदर्शन करत आहेत . आज Instant चा जमाना आहे. आपल्यातील संयम संपुष्टात आलेला आहे. सगळ कमी वेळात आपल्याला हवे आहे . पण वजन जितके लवकर वाढते तितक्या लवकर ते कमी होत नाही हे आपल्याला माहितच आहे. ह्या सर्वातून दिलासा देणाऱ्या डॉक्टरांच्या अगदी लहानलहान Video Clips आता आपल्याला Youtube वरती बघायला मिळतील. हे Video कमालीचे असून त्यात डॉक्टरांनी अगदी लहान सहान गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे ते आपल्याला नक्कीच प्रेरणा देतील.
आपल्या वयानुसार वजन किती असले पाहिजे , वाढलेले वजन कसे कमी केले पाहिजे , आपला आहार कसा असला पाहिजे , काय खावे कधी खावे किती खावे हे सर्व बारकावे सांभाळणारे त्यांचे हे Video आपल्याला प्रेरणा देतील ह्यात शंकाच नाही. बाहेर चालायला जाता येत नसेल तर आहारावर कंट्रोल ठेवून सुद्धा वजन कमी करता येयील. आपल्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत केली तर अशक्य असे काहीच नाही.
वजन कमी करणे आणि मधुमेहावर नियंत्रण ह्या दोन्ही गोष्टी सलग्न असल्यामुळे दोघांसाठी टू इन वन उपाय योजना त्यांनी अगदी सोपी करून सांगितली आहे.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या उक्तीला धरून सर्वप्रथम ह्या Clips सर्वांनी बघितल्या आणि त्याचा अवलंब केला तर आपल्या वाढलेल्या वजनामुळे बेढब झालेले शरीर आणि त्रासलेले मन ह्यावर ताबा मिळवता येयील इतकेच नाही तर मधुमेहावर सुद्धा नियंत्रण होईल .
डॉक्टरांनी आज “ भारताला मधुमेह मुक्त “ करण्याचा जो वसा घेतला आहे आणि त्यासाठी त्यांची संपूर्ण टीम रात्रंदिवस परिश्रम करत आहे. आज लोकांकडून त्यांच्या संकल्पनांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जनजागृती होत आहे. सर्व वयोगटातील लोक त्यात उत्स्फूर्त पणे सामील होताना दिसत आहेत ....चला आपणही ह्या उदात्त कार्यात खारीचा वाटा उचलुया आणि ह्या आंदोलनाचा एक भाग होवुया .
शेवटी आपली तब्येत आपणच सांभाळायची आहे. उत्तम शरीरसंपदा हीच खरी आपली श्रीमंती आहे.
अस्मिता
#अंतर्नाद#डॉ.जग्गनाथदीक्षित#आहार#वजनाचेनियंत्रण#मधुमेहमुक्तभारत#सकसआहार#व्यायाम
डॉ. जगन्नाथ दीक्षित ह्यांचे खालील Video नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
https://www.youtube.com/watch?v=WC6ZxF9e8CY
https://www.youtube.com/watch?v=VyXYUHNYW-8
No comments:
Post a Comment