|| श्री स्वामी समर्थ ||
“ मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका .. “ हे अभिवचन आपल्या समस्त भक्तगणांना देणारे महायोगी संत शिरोमणी “ श्री गजानन महाराज “ ह्यांनी वास्तव्य केलेल्या शेगाव मध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली . गणपती बोळवायला या हे सुतवाक्य त्यांनी आधीच केले होते. मानव जातीला जगण्याचा संदेश देण्यासाठी संतानी ह्या भूमीवर मनुष्य रुपात अवतार घेतले . आज त्यांचे पुण्य स्मरण प्रत्येक भक्त करत आहेच .
“ बोलण्यात पाहिजे मेळ , चित्त असावे निर्मळ “ हा साधा सोपा जीवनाचा मूलमंत्र देणारया आपल्या महाराजांची दिव्य ज्योत आजही भक्तांना प्रचीती देत आहे . आपल्या हृदयात विराजमान असणार्या आपल्या ह्या गुरूंची सेवा करण्याचे अहोभाग्य आपल्या सर्वाना ह्या जन्मी प्राप्त झाले आहे हि गुरुकृपाच आणि आपले पूर्व संचितच म्हंटले पाहिजे . हृदयापासून त्यांची सेवा करणे हेच आपले काम कारण आपला जन्मच मुळी त्यासाठी आहे. सेवा करा सेवेकरी व्हा , भक्तीत समरसून जा आणि जीवन मृत्युच्या फेर्यातून मुक्त व्हा.
महाराजांचे नुसते नाव घेतले तरी आपल्या डोळ्यातून अश्रू व्हावयास लागतात आणि हाच तर सगुण भक्तीचा अविष्कार आहे. श्री गजानन विजय पारायण , प्रदक्षिणा , नामस्मरण , मानसपूजा हे सर्व आपल्या व त्यांच्या हृदयापर्यंत नेणारे सेतू आहेत .
त्यांच्या लीला ह्या अवकाशातील चांदण्यापरीच आहेत ज्याची मोजदात होणे केवळ अशक्य आहे.
त्यांनी समाधी घेतली , शरीर वस्त्रापरी बदलले असले तरी ते आपल्यातच आहेत आणि आपल्यावर त्यांची कृपादृष्टी आहेत .अधिक काय लिहावे . शब्द संपल्यागत झाले आहे ....
आजवर सांभाळलेत अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हीच सांभाळा ...इतकेच मागणे आहे.
माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी ..
गजानन गजानन सांभाळ आपल्या भक्तजना
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment