|| श्री स्वामी समर्थ ||
आपली निसर्ग कुंडली किती विचारपूर्वक केलेली आहे बघा. धन भावावरून आपण आपले खानपान बघतो कारण तिथे मुख आणि जिव्हा आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडी समजतात . म्हणजेच इथे अन्न ग्रहण केले जाते . त्याच्या समोरचे अष्टम स्थान जिथे आपली जननेंद्रिये आहेत . इथून शरीरातील नको असलेल्या गोष्टी म्हणजे मलमूत्र आणि विष्ठा बाहेर टाकली जाते . अष्टम भाव तितकाच महत्वाचा नाही का? जर शरीरातील नको असलेले मलमूत्र शरीराबाहेर टाकले गेले नाही तर अनेक आजार शरीरात उत्पन्न होतील . एक दिवस आपले पोट साफ नाही झाले तर दिवसभर बेचैन होते आपल्याला. पत्रिकेतील प्रत्येक भाव किती महत्वाचा आहे हे ह्यावरून विषद होते . ज्योतिष किती साधे सोपे आहे . सामान्य माणसाने सामान्य माणसासाठी केलेले आहे , उगीच त्याचा बागुल बुवा केला जातो .सहमत ???
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment