|| श्री स्वामी समर्थ ||
सिंह राशी किंवा सिंह लग्नाच्या लोकांना सध्या जरा शारीरिक मानसिक विवंचना आहेत . सिंह राशीच्या समोर येणारी कुंभ हि वायुतत्वाची रास आणि राशीस्वामी शनी सध्या त्यात विराजमान आहे. सिंह लग्नाला तर तो शश योग करत आपले अस्तित्व दर्शवत आहे. जरी शनी केंद्रात योग करत असला तरी दृष्टी लग्नावर आहे . लग्न म्हणजे आपण स्वतः . त्यात शनी षष्ठेश त्यामुळे अनेकांना त्वचेच्या समस्या जसे त्वचा कोरडी पडणे , केस गळती , मानसिक चिंता ,विलंब , लहान सहान तब्येतीच्या इतर कुरबुरी आहेत . त्यात लग्नेश रवी आणि दशमेश शुक्र सुद्धा शनी सोबत आहेत .वायुतत्वाचा शनी लग्नाकडे पाहत आहे विचारांचा वेग , काहीतरी करून दाखवण्याची भावना मनात आहे पण मार्ग मिळत नाही .. हे सर्व अगदी ढोबळ मानाने आहे , अर्थात प्रत्येकाच्या दशा अंतर्दाशेवर सुद्धा गोष्टी अवलंबून आहेत . तुमचेही असेच अनुभव असतील तर जरूर शेअर करावेत म्हणजे अभ्यासात भर पडेल .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment