|| श्री स्वामी समर्थ ||
परमेश्वराने बुद्धी आणि विचार शक्ती सगळ्यांनाच दिलेली आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा हे अर्थात प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या आजूबाजूला अनेक माणसे रोजच्या जीवनात वावरताना दिसतात त्यातील काही विशाल हृदयाची , इतरांना मदत करणारी आणि दुसर्याच्या आनंदाने खुलणारी असतात . पण काही अत्यंत संकुचित मनाची , सतत एखाद्या गोष्टीची लपवा छपवी करण्याकडे कल असतो , स्वतःचे काहीही सांगायचे नाही पण दुसर्याच्या आयुष्यात खूप रस असणारी , दुसर्याचा सतत द्वेष करणारी , असूया , मत्सर , सतत दुसर्याला पाण्यात पाहणाऱ्या वृत्तीची असतात . अश्या व्यक्ती सतत राजकारण खेळत राहतात , ह्याचे त्याला त्याचे ह्याला , सतत सगळ्या बातम्या हव्या असतात त्यांना , कुणाबद्दल एक शब्द चांगल बोलणे ह्यांना जमत नाही किबहुना कुणाचे हि चांगले बघवत नाही , कुणाची प्रशंसा करणे तर खूप दूर राहिले. उलट दुसर्याचे वाईट झाले कि ह्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो .
मुळात हि वृत्ती येते कुठून ? तर आपल्याच आयुष्यात अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत कि समोरच्याचे सुख टोचू लागते. जसे सगळ्यांना लक्ष्मीप्राप्ती होते पण आपल्याला रोजचा प्रपंच सुद्धा चालवता येत नाही . शिक्षण नाही म्हणून धड नोकरी नाही , पराकोटीचा अहम त्यामुळे शनीचे फटके पदरी पडणारच , तो कुणालाच सोडत नाही . आयुष्याची संध्याकाळ झाली तरी देवदेव करूनही स्वतःचे राहते घर होत नाही . मग भाऊ बंदकी आली त्यात अत्यंत हृणास्पद खालच्या पातळीचे राजकारण करून संपत्ती जमीन जुमला हडपणे . कारण स्वतःच्यात काहीच करण्याची धमक नाही .
आपल्याला जे सुख आयुष्यात अपेक्षित असते ते दुरापास्त होते , अगदी रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टीत सुद्धा आनंद मिळत नाही तेव्हा माणसाची दुसर्यावर जळण्याची वृत्ती बळावते . दुसर्याचे कसे चांगले चालले आहे ते पाहवत नाही आणि त्यातूनच मग असूयेचा जन्म होतो आणि ती सर्वात प्रथम त्या व्यक्तीलाच मारते . अहो जो तो आपापल्या कर्माचा कारक , प्रत्येकाला देवाने बुद्धी आणि दोन हात दिलेले आहेत . कष्ट करा आणि सन्मार्गाने जगा , जे आहे त्यात समाधान माना आणि परमेश्वराच्या सान्निध्यात राहा . पण नाही भौतिक सुखाची तीव्र लालसा आणि काहीच पदरी पडत नसल्यामुळे येणारे नैराश्य . ह्याचा परिणाम असा होतो कि सगळी आजारपणे मागे लागतात . जेव्हा आपण दुसर्याचा मत्सर करतो तेव्हा आपले स्वतःचेच हार्मोन्स बिघडतात आणि विचार दुषित होतात , विचारांचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावर व्ह्यायला लागला कि तो आपल्याला अगदी स्मशानापर्यंत सोडत नाही .
अत्यंत छोटी सोच असणार्या ह्या व्यक्तींनी कितीही देवाचे केले तरी त्यांचे कलुषित मन त्यांना देवाच्या द्वारापर्यंत कधीच नेत नाही , परमेश्वराला त्यांची हाक सुद्धा ऐकू येत नाही . दुसर्याचे लुबाडून घरात राजकारण करून आपण संपत्ती हडपू पण पुढे काय ? त्याचा विचार केलाय का कधी ? याच देही याच जन्मी आहे सर्व . आपण आपल्यापुरते जगायला शिकले पाहिजे . जे आहे ते आहे रोजचा दिवस नवनवीन संधी देण्यासाठीच येतो त्या घेवून कष्ट करत राहिले पाहिजे . एक दिवस आपलाही येणारच ह्यावर विश्वास ठेवला पाहिजे . दुनियादारी सोडून जरा आपल्या प्रपंचात लक्ष्य दिले तर बरे होईल.
जे आपण पेरणार तेच उगवणार , तुम्ही जे देणार तेच तुम्हाला परत मिळणार त्यामुळे चांगले विचार मनात रुजवाल तर तुमचे विचार , देहबोली सर्वच सकारात्मक होयील ह्यात शंकाच नाही .
हि छोटी सोच कुठून येते ? तर पत्रिकेतील चंद्र दुषित असेल , बिघडला असेल , पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल , तर मनाच्या ठिकर्या उडतात . निर्णय क्षमता नसते , आई विक्षिप्त स्वभावाची , आजारी , मानसिकता बिघडलेली असते , गृहसौख्य , वाहन सौख्य नसते . सगळ्या सुखात उणीव .
घरात अशांतता जाणवते आणि ती व्यक्तिमत्वावर उमटते . अश्या लोकांनी योगासने , ध्यान , साधना करावी . आपले शब्द भांडार जरा जपून वापरावे , विचार आचाराचा मेळ घालावा . शांत ठिकाणी बसून अंतर्मुख व्हावे , आवडते संगीत ऐकावे त्याने विचारांचे परिवर्तन नक्कीच होईल. आपले छंद जोपासावे , सत्कर्मात आपले योगदान द्यावे जसे झाडे लावणे . सर्वात मुख्य आपल्या विचारांची दिशा आपणच ठरवावी . मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये किंवा बोलूही नये.
आपण दुसर्याचा केलेला तिरस्कार , मत्सर , हृणा , द्वेष , असूया अनेक अनेक आजारांच्या स्वरूपात दाम दुप्पटीने आपल्याच पदरात पडणार ह्याचा कदापि विसर पडू देवू नये .
चंद्र शुद्ध करण्यासाठी महादेवाचा जप आणि अभिषेक करावा . आकाशातील चंद्राला ओवाळावे . सोमवारी पांढर्या वस्तूंचे किंवा गोड पदार्थांचे गरजू व्यक्तीला दान करावे .
आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगता यावे ह्यासाठी कर्म शुद्ध ठेवली पाहिजेत आणि ते सर्वस्वी आपल्याच हाती आहे नाही का?
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment