|| श्री स्वामी समर्थ ||
Saturday, 27 February 2021
दैनंदिन ग्रहसंकेत
Thursday, 25 February 2021
पुष्य नक्षत्र
|| श्री स्वामी समर्थ ||
आज पुष्य नक्षत्र आहे. हे शनीचे
नक्षत्र आहे . गुरुवारी चंद्र जेव्हा पुष्य नक्षत्रात येतो त्या दिवसाला गुरुपुष्य
म्हणतात . शनी हा दाता आहे. आपण केलेल्या
कर्माचा लेखाजोखा शनीकडे असतो . मग रस्त्यात कुणाला मुद्दामून मारलेला धक्का असो
कि पत्नीला केलेली मारझोड असो अगदी लहानसहान गोष्टींची नोंद शनी महाराज करत असतात
.
एखादि व्यक्ती १० रुपये चोरते
काहीच वाईट घडत नाही तेव्हा तिचा आत्मविश्वास बळावतो मग १० चे शंबर मग हजार आणि
लाख कधी होतात ते समजत नाही .शिशुपालाचेही१०० अपराध भरले तेव्हाच शिक्षा झाली . आपला वाईट काळ
आयुष्यात एकदा सुरु झाला (महादशा ) कि आपण केलेली सर्व वाईट कर्मे आपल्यासमोर हात
जोडून उभी राहतात आणि त्यासाठी शनी महाराज
शिक्षा सुनावतात .
म्हणूनच निदान कुणाचे चांगले
करायचे नसले तर निदान वाईट तरी करू नये. शेवटी सुटका कुणाचीच नाही बघा . एखाद्याला
मारले आणि तासभर जप केलात तरी सुटका नाही . तुम्ही मारले त्या कुकर्माची शिक्षा
मिळणार आणि नामस्मरणाचे फळ सुद्धा देव देणार पण नामस्मरणामुळे मारल्याची शिक्षा
कदापि कमी होणार नाही . ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
ह्या सर्व गोष्टींची जाणीव मनुष्याला
जसजशी व्हायला लागते तसतसे आपण उच्चारलेला
प्रत्येक शब्द ,केलेली प्रत्येक कृती ह्यावर त्यांचे लक्ष आहे ह्याची खुणगाठ मनात
बसते आणि हातून होणार्या चुकांचे प्रमाण कमी व्हायला लागते .
हिच आपली अध्यात्माच्या खडतर
वाटेवर होणारी सुरवात असते.
श्री स्वामी समर्थ
अस्मिता
Wednesday, 24 February 2021
सर्वांसाठी अनिवार्य वास्तु, ज्योतिष, अध्यात्म, रूढी, परंपराविषयक नियम
|| श्री स्वामी समर्थ ||
ग्रहपीडानिवारणार्थ नवग्रहांची रत्नं महादेवाला श्रद्धापूर्वक, प्रार्थनापूर्वक अर्पण करावीत.
(महादेवाच्या पिंडीला रत्नस्पर्श करून मंदीराच्या दानपेटीत टाकावीत)
तसेच एक गोमेद बालाजीला अर्पण करावा. (हुंडीत टाकावा)
(लहान आकारातील, पैलू न पाडलेले, तसेच उच्च प्रतिचे नसले तरी चालतील)
(वर्षातून किमान एकदा विषेशतः कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी, स्वतःचा वाढदिवस, महत्त्वाच्या कार्यारंभी तसेच सूर्यग्रहणकाळी रत्नार्पण करण्याचे विशेष फळ आहे.)
आजच्या जीवनशैलीचा विचार करता जप, अनुष्ठान उपासना करणे हे इच्छा असली तरी शक्य होत नाही त्यामुळे उपरोक्त उपाय हा सहज सोपा आणि परिणामकारक असा आहे. सर्वांनी अवश्य अनुभव घ्यावा.
यामध्ये समुद्रार्पण हे सर्वोत्तम आहे. ते शक्य नसेल तर नदीच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करावेत. किंवा वर सांगितल्याप्रमाणे ईश्वरार्पण करावे.
त्यानंतर आपल्याला शुभ असलेल्या ग्रहाचे रत्नं ज्योतिष्याच्या सल्ल्याने श्रद्धापूर्वक वापरावे.
आपल्याला सुचविण्यात आलेले रत्नच वापरावे. त्याशिवाय इतर कोणतेही रत्न वापरू नयेत.
घराण्यातील कुलधर्म, कुलाचार श्रद्धापूर्वक पाळावेत.
पितरांचे श्राद्ध, पक्ष न चुकता करावेत.
आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या सुखदु:खात अवश्य सामील व्हावे. विशेष निमित्तप्रसंगी त्यांनाही आपल्या घरी बोलवावे. त्यांचे आदरातिथ्य करावे. असे केल्याने त्यांच्या आशिर्वाद, शुभेच्छांचा सकारात्मक प्रवाह सदैव आपल्या सोबत राहातो.
पंचमहाभूते आणि सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम, आदरभावना ठेवावी. निसर्गाचे हितचिंतक, मित्र बनण्याचा प्रयत्न करावा.
केवळ आपल्या कुलदेवतेचे पंचायतन पूजेत असावे. याबद्दल आपल्या कुलपुरोहितांचा सल्ला घ्यावा.
आपल्या कुलदेतेच्या पंचायतनाशिवाय इतर देव घरात आणून ठेऊ नयेत.
कुलदेवतेचे वर्षातून किमान एकदा तरी दर्शन घ्यावे.
तसेच कुलदेवतेच्या प्रतिमेचे दर्शन/प्रार्थना/नित्य उपासना इ.नियमितपणे करावे.
(यांविषयी अधिक माहिती संबंधित देवतेच्या मंदीरातून घ्यावी)
काहीच करणे शक्य नसल्यास, किमान आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण तरी सतत अवश्य करीत राहावे.
कलियुगात नामजपाचा महिमा सर्वाधिक आहे.
आपल्या कुलदेवतेशिवाय अन्य कुठल्याही देव, साधु-संत, महाराज इत्यादींचे फार करू नये तसे केल्यास आपल्या कुलदेवतेचा कोप होतो.
कुलदेवता साधारणपणे तीन वर्ष वाट पाहते नंतर आपल्याला आठवण होईल असे प्रसंग जीवनात वारंवार घडतात.
आपल्या पूर्वजांनी या देवतेची उपासना केलेली असल्यामुळे ती आपल्याला केवळ दर्शनानेही प्रसन्न होते.
कोणत्याही मूर्ती, फोटो, प्रतिमा एकाहून अधिक नसाव्यात. शोपीसच्या स्वरूपातील देव इ. घरात ठेवू नयेत.
७ इंचाहून मोठी मूर्ती घरात नसावी.
मूर्ती अभंग असाव्यात.
पितरांचे फोटो/ प्रतिमा/ टाक देवासोबत मांडू नयेत.
आपले आई-वडिल हयात आहेत तोपर्यंत कोणतेही अध्यात्मिक गुरू करण्याची आवश्यक्ता नाही.
आपल्या घराण्यात पूर्वापार नसलेली उपवासादी व्रतवैकल्ये करू नयेत.
कोणत्याही तीर्थयात्रेला किंवा धार्मिक स्थळी गेले असता देवांचे फोटो, मूर्त्या आणून वाटू नयेत.
फक्त प्रसाद, अंगारा/ कुंकू आवश्यक तेवढेच आणावे आणि त्याचा आदर राखावा.
वास्तुपरिक्षण करून घ्यावे. काही वास्तुदोष असतील तर त्यावर उपचार करून घ्यावेत.
उपवर मुलींचा वावर, वास्तव्य, बिछाना घराच्या वायव्य दिशेला असावा.
झोपताना नेहमी उत्तर किंवा पश्चिमेकडे पाय करून झोपावे.
दररोज सकाळी व संध्याकाळी देव, तुळस, गाय, घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या सर्वांना तसेच पूर्वजांच्या प्रतिमांना अवश्य नमस्कार करावा.(आदर आणि श्रद्धापूर्वक)
कोणाची चेष्टा, निंदा, चुगली, तक्रार इ. दुष्कर्म करू नयेत.
सर्वांशी प्रेमाने व प्रामाणिक राहावे.
अनावश्यक अडगळ, भंगार, टाकाऊ वस्तु, रद्दी, बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळं, यंत्रसामुग्री, फुटलेले आरसे, वापरात नसलेले, फाटलेले जुने कपडे, पादत्राणे, वाचनात नसलेल्या पोथ्या, पुस्तकं इत्यादी वस्तु घरात अकारण बाळगू नयेत. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा वाढते.
वापरात असलेले कपडेही (विशेषतः अंतर्वस्त्र) फाटलेले किंवा छिद्र पडलेले कदापिही नसावेत. नसता हमखास दारिद्य्र (अर्थिक/ मानसिक/ वैचारिक/ बौद्धिक) येते.
संन्याशाने एक दिवसाचा, गृहस्थाने एक महिन्याचा तर राजाने एक वर्ष पुरेल एवढा धन/ वस्तुसंग्रह केल्यास तो निर्दोष समजला जातो.
वस्तु विनिमय पद्धती पूर्णपणे निर्दोष होती. पैशाचा वापर सुरू झाला आणि पैशासोबत विकृति आणि दोषही सुरू झाले. कितीही प्रामाणिकपणे, घाम गाळून कमावलेला पैसा असला तरी त्यात दोष हे असतातच. त्यावर उपाय म्हणजे आपल्या एकूण उत्त्पन्नाच्या १०% गुप्तदान करावे असा शास्त्राचा संकेत आहे.
असे केल्याने पैशासोबत येणारे दोष केवळ कमी होतात. नाहीसे होत नाहीत.
गुप्तदान म्हणजे कुठेही वाच्यता न करणे, त्याची पावती न घेणे इ.
टॅक्स बेनिफिटकरिता केलेले दान यात गृहित धरू नये.
धनसमृद्ध होण्याचे हे एकमेव रहस्य आहे.
आपण किमान १% पासून गुप्तदानाची सुरूवात करून अनुभव घ्यावा.
अस्मिता
( संग्रहित )
॥शुभं भवतु॥
Monday, 22 February 2021
सेवेचा अधिकार सर्वोत्तम
||श्री स्वामी समर्थ ||
कलियुगात माणसाचे आयुष्य अनेक संकटांनी युक्त आहे . दुक्ख गळ्याशी आले कि पाऊल अध्यात्मात पडते हे म्हणतात ते खोटे खचितच नाही . स्वामी समर्थ , साईबाबा ,गजानन महाराज हि नावे घेण्याची पात्रता सुद्धा आपल्या अंगी नाही खर तर .हि नुसती नावे नाहीत तर त्यात ओतप्रोत भरलेले आहे ते गुरुतत्व . ते समजे पर्यंत आपली वर जायची वेळ येयील.
अश्या ह्या अवलियांची सेवा मग माध्यम काहीही असो ग्रंथाचे पारायण असो किंवा नामस्मरण , लेखन चिंतन ,प्रवचन काहीही असो त्यांचे नाम आपल्या मुखातून जाते आहे हि केवळ आणि केवळ त्यांची कृपा आहे आणि आपण त्या कृपेचेच तर अभिलाषी आहोत . अहो आपल्या सारख्या सामान्य भक्ताला अजून हवय तरी काय ?
आपण त्यांच्या सेवेत आहोत किबहुना ते आपल्या कडून सेवा करून घेत आहेत हा मान आपल्याला मिळणे हेच आपले अहोभाग्य म्हंटले पाहिजे . पण ह्या भाग्याचा खरा अर्थ आपल्याला समजत नाही आणि आपला विठोबा घाटोळ होतो. हे जरा फक्त जपले पाहिजे नाही का?आपल्याला विठोबा नाही तर पितांबर ,जणू गवर्या व्हायचे आहे ह्याचे भान ठेवले पाहिजे .
आपल्या सेवेमुळे आपण जसजसे महाराजांच्या जवळ जावू लागतो तसा आपण त्यांच्यावर अधिकार (अर्थात प्रेमाने ) सांगू किंवा गाजवू लागतो . विठोबा घाटोळ ने हेच केले. त्याचा उद्देश वाईट नव्हता पण पण दिशा , कृती चुकली हे नक्कीच.
आणि म्हणूनच अध्यात्मात येणे जितके कठीण त्याहीपेक्षा तिथे टिकून राहणे हे त्याहून कठीण. प्रत्येक क्षणी महाराज परीक्षा घेतात . मला तर रोजच पेपर असतो त्यांचा पण मी त्यांचे पाय सोडत नाही हीसुद्धा त्यांचीच कृपा आहे.
अध्यात्म आपल्याला कात टाकल्यासारखे बदलून टाकते ,नवीन दिशा आणि आशा देते . जीवनाकडे पाहण्याचा मोठा दृष्टीकोण सुद्धा देते. मी मी म्हणणाऱ्या आपल्या देहाची सुद्धा चिमुटभर राख होणार आहे . आपल्या शरीरातून आत्मा निघून गेल्यावर आपल्या शरीराला “ बॉडी ” म्हंटले जाते . आपले नाव सुद्धा घेतले जात नाही हे सारे जितके आपल्याला लवकर समजेल तितके बरे.
ह्या मोहजालात मी अडकणार नाही हा निर्धार मनी जागृत ठेवणे आणि तो टिकवण्या साठी कष्ट घेणे हि सुद्धा परीक्षाच असते.
महाराजांच्या अनेक परीक्षांमध्ये आपण जसजसे उत्तीर्ण होत जातो तसतसा आपण म्हणजे कुणी वेगळे आहोत हा अहंकार मनात फुलायला लागतो आणि तोच आपल्या कसोटीचा क्षण असतो . महाराजांना त्यांच्या हातातील सोटा उचलायला लावला तो विठोबा घाटोळ ह्याने, म्हणूनच प्राण गेला तरी आपण आपला विठोबा होऊ द्य्याचा नाही हि खुणगाठ मनात पक्की बांधली पाहिजे .
सेवेचा अधिकार हा सर्वोत्तम आहे . आपण महाराज व्हायला नाही जायचे .आपला जन्म हा सेवा करण्यासाठी झालेला आहे ह्याचा क्षणभर देखील विसर पडू न देणे हीच आपली परीक्षा आहे आणि ते भान आपल्याला कायम असले पाहिजे . मग बघा महाराज काय काय देतील तुम्हाला. हा जन्मच काय तर पुढील कित्येक जन्म सत्कारणी लागलेच म्हणून समजा.
ह्याच देही ह्याची डोळा महाराजांचे दर्शन नाही झाले तरच नवल. आणि हे मिळवणे सोप्पे नाही त्यासाठी उभा जन्म वेचावा लागतो .कश्यासाठी तर फक्त सेवेसाठी आणि तीसुद्धा निष्कपट मनाने, अपेक्षा विरहित केली पाहिजे . आपल्या मनीचा भाव ते जाणतात . अहो हे सर्व बोलायला सोपे असले तरी प्रापंचिक जीवन जगताना माणूस हताश होतो आणि शेवटी त्यांच्यासमोर हात जोडतो . पण अध्यात्मिक आयुष्य जगताना हळूहळू माणसाचे मन शांत होते आणि मनात विश्वासाचे रोपटे मूळ धरू लागते. मग त्यांच्याकडून सतत काहीतरी मागणे कमी होऊ लागते . प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती आली कि ते सर्व देणार , आपल्याला हवे होते त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर देणार हा विश्वास एकदा बसला कि मग सगळे सोप्पे होवून जाते. मग आपण आणि महाराज हे दोन वेगळे असे उरतच नाही .
अवघा रंग एक झाला ...रंगी रंगला श्रीरंग ...अशीच अवस्था आपली होते . पण ह्या सर्वासाठी फक्त आपल्याला एकच करायचे आहे आणि ते म्हणजे महाराज व्हायला जायचे नाही .2-4 पारायणे केली म्हणून आपल्याला लई शाने समजायचे तर अजिबातच नाही. महाराजांचा भक्तपरिवार अनगीणत होता पण त्यांच्या सेवेचा अधिकार बोटावर मोजण्याइतक्याच भक्तांना होता .तेच त्यांची उठबस करत .किती भाग्य थोर असेल नाही त्यांचे .
म्हणूनच फक्त सेवा करत राहायचे आणि तीही आजन्म अखेरच्या श्वासापर्यंत कारण .....सेवेचा अधिकार सगळ्यात मोठा असतो .
अस्मिता
antarnad18@gmail.com
Sunday, 21 February 2021
असामान्य दृष्टीकोण
||श्री स्वामी समर्थ ||
तुझे रूप चित्ती राहो... मुखी तुझे नाम
दर महिन्याला १ ते २१ तारीख असे २१ अध्यायाचे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करायचे असा संकल्प २०२१ साठी केला आणि महाराजांना सांगितले कि मला सेवेची संधी द्या. काल २१ तारखेला ह्या महिन्यातील पारायण पूर्ण झाले. महाराजांना मनोभावे नमस्कार केला आणि खुदकन हसायला आले.
कालच मी माझ्या ज्योतिष कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सांगत होते कि ज्योतिष हे अथांग सागर आहे. किती शिकाल तितके कमीच आहे बघा . कायम ह्या नवग्रहांचे वाचन करत राहा. प्रत्येक वेळी बुध शुक्र तुम्हाला नव्यानेच भेटतील आणि वाटेल अरेच्च्या शुक्रातील हि रसिकता किंवा बुधाचे हे कंगोरे मला नव्यानेच उलगडत आहेत. प्रत्येक ग्रह आणि स्थान आपण रोजच्या जीवनात जगतच असतो आणि म्हणूनच ज्योतिष आणि आपले आयुष्य हे वेगळे असूच शकत नाही .पत्रिकेतील भाग्य स्थानाचा विचार करताना असे वाटते कि मला ज्या वेळी एखादी गोष्ट हवी आहे ती त्या वेळी मिळणे हेच भाग्य नाही तर अजून काय आहे? प्रचंड पाऊस पडत असताना घरी जायला नेमकी रिक्षा मिळणे , मला हवी त्या रंगाची साडी किंवा लिपस्टिक खरेदीला जाताना मिळणे , ठरवलेले सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडणे ,लाडवांचा एक तारी पाक मस्त होणे हे सर्व मी माझे भाग्याच समजते. ५० लोक मुलाखतीला असताना मला जेव्हा नोकरी मिळते तेव्हा ते माझे भाग्यच असते. असो बरेच विषयांतर होत आहे. म्हंटले ना ज्योतिष आणि आपले आयुष्य एकच आहे ते हे असे बर का.
तर सांगायचे असे कि पोथी वाचताना ह्याही वेळी मी श्री गजानन विजय हा ग्रंथ अत्यंत वेगळ्या रुपात मी अनुभवला . त्यातील एक दोन वाक्य वाचताना असे वाटले अरे ह्याआधी इतका सखोल विचार ह्यावर आपण ह्या पूर्वी कधीच केला नव्हता .
प्रत्येक वेळी हा ग्रंथ मला एक वेगळा दृष्टीकोन देत आहे हा आणि अगदी असाच विचार आपण रोजच्या आयुष्यातील घटनांकडे पाहताना केला तर ? अनेक वेळा आपण ज्या गोष्टीसाठी खूप चिडतो त्या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने शांतपणे पाहिले तर असे लक्ष्यात येते कि ह्यात इतके चिडण्यासारखे खरच काहीच नव्हते आणि मग आपले आपल्यालाच बरेच काही उमजते . असे सारखे चिडून रागवून आणि त्यातून होणारे गैरसमज ह्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील अनेक लहान सहान आनंदाना स्वतःचे पारखे होत असतो .हो कि नाही ? आले ना तुम्हाला माझ्याच सारखे हसू ?
आपण पोथी वाचताना त्यात जितके समरसून जाऊ , तितकी ती प्रत्येक वेळी आपल्याला नव्याने भेटत जायील आणि आयुष्यातील अनेक आनंद कसे मनमुराद उपभोगायचे ह्याचे बाळकडू सुद्धा मिळेल. पोथी वाचन हीसुद्धा महाराजांची सेवा आहे आणि त्याचे अपरिमित फायदेच आहेत .जसे आपण तासभर पोथी वाचणार ,नामस्मरण करणार म्हणजे आपला तोंडाचा पट्टा तासभर बंद. आपली वाचा म्हणजेच जिव्हा तिला जरा विश्रांती . कुणाबद्दल काहीच चांगले वाईट बोलण्यापासून तासभर तरी परावृत्त झालो आपण तसेच तासभर कुणी आपल्याशीही बोलणार नाही म्हणजे गावगप्पांना तिलांजली . बघा किती फायदे आहेत . ह्या वाचनाचा आपल्या Aura आणि विचारांवर वर सुद्धा चांगलाच परिणाम होतो ,देखा फायदेच फायदे है.
आज जवळजवळ २१ वर्ष श्री गजानन विजय ग्रंथ महाराजांच्या कृपेने ते माझ्याकडून वाचून घेत आहे , ह्यासाठी मी महाराजांची खरच ऋणी आहे. संत वांग्मय शेवटी काय शिकवते आपल्याला तर आयुष्य कसे जगायचे ? अशी साधी सोपी सुटसुटीत व्याख्या मला करावीशी वाटते . संतानी समाज सुधारणे साठीच मनुष्य देह धारण केला आणि जिवनाची सूत्री आपल्याला शिकवली.
म्हणूनच जेव्हा प्रत्येक वेळी मला ग्रंथ वाचताना नव्याने एखादी ओळ दिसते तेव्हा मला उमजते कि हेच सूत्र मी खर्या जीवनात पण वापरले पाहिजे. एखादी घटना अशीच का घडली किंवा एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगात अशीच का वागली ह्याचा लगेच वेडावाकडा अर्थ न काढता त्याकडे वेगवेगळ्या नजरेने पहिले तर त्यातून वेगळा बोध आणि अर्थ निघेल जो कदाचित आपल्याला अभिप्रेत सुद्धा नसेल. म्हणूनच सरसकट कुणालाही पटकन वाईट ठरवून त्याला बोल लावणे आपण बंद केले पाहिजे नाही ? अश्याने नाते संबंधातील प्रेम मायेचा ओलावा टिकून राहील आणि नाती अधिक परिपक्व होतील.
हा दृष्टीकोन देण्यासाठीच ग्रंथातील प्रत्येक ओवी आपल्याला रोज नव्या रुपांत भेटत असावी .आपले आयुष्य किती साधे सोप्पे असते नाही आपण आपल्या खोट्या अहंकाराने आणि अविचाराने ते उगीचच गुंता गुंतीचे करत असतो त्यामुळे नाती तर दुरावतातच पण पर्यायी सगळे मानसिक आजार ओढवून घेतो. मी मैत्रीणीला २ वेळा फोन केला पण तिने नाही केला फोन परत , झाल मोडला पापड आपला लगेच . कारण राग आपल्या नाकावर घेवूनच फिरत असतो कि आपण. तिला असेल काही अडचण ,कुणी आजारी असेल काहीही असू शकते ,पण फक्त मी आणि माझे ह्या कोशातून बाहेर येऊ तेव्हा ना हा वेगळा विचार करायला सुचेल ,पटतंय का? आणि जेव्हा तिचा कालांतराने खरच फोन येतो आणि तिच्या संकटांची शृंखला आपल्याला समजते तेव्हा तिने फोन केला नाही म्हणून आपण काढलेल्या चुकीच्या अर्थाची आपल्याला मनात लाज वाटते हेही तितकेच खरे आहे. जसे हा ग्रंथ रोज आपल्याला नव्याने भेटतो अगदी तसेच आपले स्वतःचे आयुष्य आणि आपल्या जवळच्या माणसांचे सुद्धा आहे. त्यांची रंग रूपे स्वभाव आपल्याला रोज नव्याने उलगडत असतात त्यामुळे खरतर कुठल्याही गोष्टीचा पटकन चुकीचा अर्थ काढूच नये . थोडे थांबलो नाही तर मोठ्या आनंदाला आणि खर्या मैत्रीला ,प्रेमाला पारखेच होऊ आपण. शेवटी आयुष्य म्हणजे काय आपल्या आजूबाजूची कुटुंबातील माणसेच कि. त्याहून वेगळे असे काहीच नसते .त्यांच्या सोबतचा हा जीवनाचा प्रवास आनंदी करण्यासाठी आपला रोजचा चष्मा बदलला पाहिजे .प्रत्येक घटनेकडे वेगळ्या दृष्टीने बघायला शिकले पाहिजे.काय वाटते?
दासगणू महाराजांनी हा ग्रंथ लिहिताना किती विचारपूर्वक शब्द रचना केली आहे बघा . म्हणूनच त्यांनी लिहिले आहे कि ग्रंथ एकदाच वाचा आणि एकदातरी महाराजांचे दर्शन घ्या पण जे वाचाल अनुभवाल ते आचरणात मात्र आणा . आपण नेमके त्याउलट करतो .आपल्याला पारायण करण्याचीही घाई प्रसाद नेवैद्य आरती सगळ्याची घाई असते, त्यामागील भावना कितीही उत्कट असली तरी .चिंतन मनन ह्यासाठी वेळ नसतो आपल्याला , कितीही कटू असले तरी ते खरे आहे. पण जो हे मोठ्या मनाने स्वीकारेल तोच महाराजांच्या सर्वात जवळ जायील ह्यात तिळमात्र शंका नाही.
जसा मला आज वेगळा दृष्टीकोन लाभला तसा तुम्हा सर्वाना लाभूदे हीच त्या गजानना चरणी प्रार्थना .
माझी ज्योतिष कार्यशाळेतील विद्यार्थिनी सुवार्णा खेर हिला मी बुध आणि शुक्रच समजावत होते आणि त्यातून मला हा लेख सुचला म्हणून तिचेही आभार .
आज मला खूप छान वाटत आहे . आजकाल कार्यशाळेमुळे लेखन खुप कमी झाले आहे .पण ह्यापुढे असे होऊ देणार नाही हे नक्की.
अस्मिता
antarnad18@gmail.com
लेख आवडल्यास अभिप्राय आणि तुमचे अनुभव सुद्धा जरूर कथन करा . शेवटी विचारांची देवाणघेवाण आणि संवाद महत्वाचा आहे.
Friday, 19 February 2021
जगातील महिला दिनाच्या निम्मित्ताने विशेष कार्यशाळा
||श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार ,
जागतिक महिला दिनाच्या निम्मित्ताने काहीतरी वेगळे करुया .आपल्या बकेट लिस्ट मध्ये असणार्या गोष्टी पूर्ण करताना एखादा वेगळा पण आज काळाची गरज असणारा विषय शिकूया .ज्योतिष आणि आपले आयुष्य हे वेगळे नाहीच आहे.
हे शास्त्र आपल्याला जीवन जगण्याचा नवा दृष्टीकोन तर देतेच पण आपल्या कर्तव्याची , जबाबदारीची ओळख करून आपले जीवन आनंदी करते.
खास स्त्री वर्गासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करताना आनंद होत आहे.
चला तर मग मिळून सार्याजणी ज्योतिषाचा श्रीगणेशा गिरवूया .
Whatsapp Group 25 फेब्रुवारी ला तयार होयील.
आजवर आपण माझ्या प्रत्येक कार्यशाळेला उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपली ऋणी आहे.
अस्मिता
WHATASAPP (8104639230)
Wednesday, 17 February 2021
रेशीमगाठी
|| श्री स्वामी समर्थ ||
रेशीमगाठी
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात विवाह मात्र पृथ्वीवर संपन्न होतात. काळासोबत विवाहाच्या संकल्पनाही बदलत चालल्या आहेत . पाश्चिमात्यांचे अनुकरण करताना आज तरुण पिढीचा कल विवाह न करण्याकडे किंवा लिव इन रिलेशन कडे झुकत आहे. विवाहसंस्था हि आपल्या समाजाचा मुलभूत पाया आहे आणि तो टिकवणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. आज “ ती दोघे ” एका छताखाली एकत्र नांदणे हेच विवाहाचे यश म्हंटले तर वावगे ठरू नये . त्या दोघांचे मनोमिलन झाले कि मग दोघांचे आप्तेष्ट , मित्रमंडळी आणि समाज. आधुनिक काळात माणसाच्या गरजा ,विवाहाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सगळच बदलत चालले आहे त्यामुळे आता आधुनिक काळात गुणमिलना पेक्षा योग्य पद्धतीने केलेले पत्रिका मिलन अधिक फलदायी ठरेल असे वाटते .
३६ गुण कसे आले ?त्याचे महत्व काय ? ग्रह मिलन आणि गुण मिलन ह्यातील फरक ?
Match Making कसे करायचे ? विवाहापूर्वी आणि
नंतर समुपदेशनाचे महत्व ,प्रेमविवाह ,घटस्फोटांचे वाढते प्रमाण ह्या सर्वांचा
उहापोह तसेच सेलेब्रेटीच्या पत्रिकांचे सोदाहरण स्पष्टीकरण समाविष्ट केलेल्या
“ रेशीमगाठी ” ह्या विवाह कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा . योग्य पत्रिका मिलन तसेच विवाहपूर्वी समुपदेशन करून एखादे जोडपे आणि पर्यायी कुटुंब आनंदी केले तर तीही एक उत्तम समाजसेवाच आहे.
Registration 8104639230 (Gpay)
अस्मिता
Antarnad18@gmail.com
Tuesday, 16 February 2021
|| श्री स्वामी समर्थ ||
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे.
सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्म देवांनी जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली. मात्र, निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले. वातावरण अतिशय शांत होते. त्यात कुठलाही आवाज वा वाणी नव्हती. यामुळे ब्रह्म देव उदास आणि निराश झाले. विष्णू देवाच्या आज्ञेवरून ब्रह्म देवांनी आपल्या कमंडलूतील पाणी पृथ्वीवर शिंपडले. भूमीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वी कंप पावली आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तके आणि माळ होती. ब्रह्म देवाने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. वीणेच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्याला वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली.
माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे सरस्वतीचा जन्मोत्सव रूपात ही पंचमी साजरी केली जाते, अशी मान्यता आहे. या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी, अशी अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे संगीताची देवी म्हणूनही तिचे पूजन केले जाते. विद्या, बुद्धी देणाऱ्या सरस्वती देवीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते.
सर्वांना सरस्वती जन्मदिनाच्या, वसंत पंचमी, वसंतोत्सवाच्या शुभेच्छा
अस्मिता
Saturday, 6 February 2021
|| श्री स्वामी समर्थ ||
महत्त्व विष्णू सहस्त्र नामाचे विष्णुसहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात.विघ्ने, संकटे दूर पळतात.
१)दर बुधवारी ४वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते.
२)नियमित रोज १२वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो,म्हणजेच भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.
३) १५,००० वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे पू.श्रीडोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे.
४)एकादशीच्या रात्री १२वाजता स्नान करून विष्णुपुढे(राम/बालाजी/पांडुरंग/कृष्ण,फक्त नृसिंह नको)तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ १२एकादशीना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते .
५)४०दिवसांच्या रोज १२वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात.
६)सहस्र तुलसीपत्रानी सहस्रनामानी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात.
७)बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णुसहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते,ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते.
८)वास्तु दोष जाण्या करिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत,याची सुरुवात बुधवारीच करावी.तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच.
९)बाहेरच्या त्रास असेल संतती मतिमंद-गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ ऐकवावेत.
१०)घरामधे कोणी व्याधिग्रस्त असेल तर विष्णुसहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते.
११)श्रीविष्णु मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो,त्याचे सर्व अहित नाहीसे होते,त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो.
१२)विष्णुसहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्या ऐवजी विष्णुसहस्रनामाच्या आधी व शेवटी ३ वेळा ॐ नम: शिवाय आणि ३ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा.
१२)श्रीविष्णुसहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की,जो या स्तोत्राचे पठन करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे.
१३)पिंपळाच्या पारावर बसून विष्णुचे ध्यान करीत जो विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो, त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळू हळू नष्ट होतात.
१४)शिवालयात, तुलसीवनात बसून जो रोज विष्णुसहस्रनामाचे पाठ करतो,त्याला कोट्यवधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे.
१५)श्रीविष्णु यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या तीन नावानी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो.
१६)आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर,तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाउल ठेवण्या आधी मनातल्या मनात ४वेळा नारायण, नारायण,नारायण नारायण असे नाम घ्यावे...
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
श्री गुरुदेव दत्त
संग्रहित
अस्मिता
Friday, 5 February 2021
परतफेड
|| श्री स्वामी समर्थ ||
आपण हा जो मनुष्य जन्म घेतलाय, तो आपल्या
अपेक्षांपूर्तीं करिता नाही किंवा नसावा.. कारण
आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या
पूर्ण होत नाहीत.. त्या मुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"
"माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तीं करिता
नाहीच आहे, तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहुन गेलेल्या दुसऱ्यांच्या
परतफेडीसाठी..."
जसं तुमचा आयुष्यात अचानक जोडीदार हे जग सोडून गेला, तुम्ही त्यांचा संसार
पूर्ण केलात, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी
एका जन्माची परतफेड तुमच्या कडुन झाली.. तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच
दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..,
मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत किंवा आपली लाडकी
लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केले ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी
परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण
नाही. तेंव्हा मनातल्या मनांत सुद्धा परमेश्वराला उद्देशून "तु मला का
जगवलंस..?" हा प्रश्न विचारू नका. जे झाले ते चांगले झाले,जे होईल ते चांगले होईल
असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जिवन जगा व इतरांना प्रेरणा द्या.
कुठलीही व्यक्ती असो ती तुमच्याशी विचित्र वागली. तुमचा
अपमान केला. तुमच्या कडे दुर्लक्ष केलं. तुमच्या उपकरांचं कोणाला विस्मरण झालं.
"तेव्हा एकेक अकाउंट पूर्ण झाला असे समजा, आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा.
बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर, 'Account Closed..' असा शिक्का मारतात ना, त्याप्रमाणे जेंव्हा एकांत मिळेल तेंव्हा आपले
किती 'Account Closed' झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका. परतफेडीचा
एक ही क्षण टाळू नका.
कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं
बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं.
तेंव्हा मनाला सांगा."बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं..
तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त
केलं..!"
परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त. "परतफेड आणि
परतफेड" हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर
वाटेल, तुमच्या आयुष्यातुन निगेटीव्हीटी कायमची निघुन जाईल.....
आपण जेव्हा सहन करतो, सहन करतो हे इतक्या वेळा म्हणतो ह्याचा अर्थ आपण ते काहीच सहन करत नाही तर उलट दुःख वाटत असतोन कारण
जो जो सहन करतो तो कधी बोलत नाही.
आज पासुन आपण सुध्दा आपल्या आयुष्यात कोणा कडुन अपेक्षाभंग
करुन घेण्या ऐवजी फक्त "परतफेडीचं" आयुष्य जगायला सुरुवात करुन आयुष्य
मजेत घालवुया..
संग्रहित
अस्मिता
Wednesday, 3 February 2021
प्रवास गुरुसोबतचा
|| श्री स्वामी समर्थ ||
गुरुविण कोण दाखवील वाट...
मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सदगुरु आपणास आपोआप भेटतात..! काहींना त्रास होतो. माणसाचे भोग संपत आले कि, सद्गुरूंचा पत्ता मिळतो..! काहींना अगोदर मिळतो, कारण त्यांचे मागील जन्माची पुण्याई असते..! काहींना जाणीव पूर्वक मिळतो. तर काहींना अपघाताने काहींना पत्ता मिळतो. पण त्यांचे मन तयार होत नाही..! काही जण येण्यास इच्छुक असतात. पण पाठीमागची काळजी चिंता , पाप हे येऊ येऊ देत नाही..! काही जण त्या पत्यावर येतात. पण त्या मार्गात अडथळे येतात..! काही जण भरकटतात. फसतात ,हि त्यांची परिक्षा असते..! कारण त्यांचे भोग हे त्यांना पोहचू देत नाहीत. भोग संपत आले कि गुरु भेटतातच..!
आधी करावी सेवा मग मिळतो मेवा. आधी करावी चाकरी मग मिळते सद्गुरूंची सेवेची भाकरी..!!
आपल्या गुरूंवरील श्रध्दा,विश्वास ठाम ठेवा. कोणत्याही परिस्थिती मध्ये चुकीचा मार्ग अवलंब करू नका. भलत्याच वाटेला जाऊ नका. वेळ लागेल पण आपले गुरू आपले चांगलेच करतील हा विश्वास ठाम ठेवा
आणि शेवटी एक लक्षात ठेवा तुम्ही कोठेही जा काहीही उपाय करा पण या ब्रम्हांडनायकाच्या परवानगी शिवाय झाडाचे पान सुध्दा हालत नाही हे माञ लक्षात ठेवा.
मग पहा आपण काय करायचे ते भलत्या वाटेने जायचे की आपल्या गुरूंच्या वाटेने जायचे खरे पाहता गुरू शिवाय शिष्य नाही, झोळी खप्परा शिवाय भिक्षा नाही, त्रिशूळ चिमट्या शिवाय शस्त्र नाही, कुबडी रूद्राक्ष माळ शिवाय साधना नाही, कपाळावर भस्म(विभूती) शिवाय संरक्षण नाही, सर्व इंद्रियांची ताकद पूर्ण एकवटुन सदगुरू मुखातून मिळालेल ज्ञान आपल्याला पेलता आल पाहिजे आणि मग त्याच कृतीत रूपांतरही करता आल पाहिजे. ध्यान या विषयावर आपण नुसतच ऐकत किंवा वाचत राहिलो तर त्याचा काही उपयोग नाही. जो ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवेल,त्यालाच त्याचा उपयोग होईल.ध्यान हे एक तप आहे. एका जागी एका वेळी कोणतही काम न करता शांत बसून राहण हे सगळ्यात मोठ तप आहे. एरवी मनुष्य चित्रपटगृहात् कित्येक तास काही काम न करता शांत बसु शकेल. परन्तु सिनेमा पाहणे आणि ध्यान करण हयात मोठा फरक आहे. कोणी म्हणेल अहो मी तीन तास एका जागी बसून सिनेमा बघतो म्हणजे मी ध्यानच करतो. पण हे ध्यान नव्हे,कारण खऱ्या ध्यानात आपल्या समोर कोणतही चित्र निर्माण होत नाही किंवा कुठला आवाजही ऐकू येत नाही. म्हणजे काही 'नसण' हेच तिथे 'असत' आणि त्यालाच ध्यान म्हणतात. सुरुवातीच्या काळात प्रतीकावर आणि त्यानंतरच्या काळात प्रतिकाविना घडू शकणार ध्यान आपल्याला अपेक्षित आहे आणि आवश्यकही आहे.
गुरुंची सेवा करणे, गुरुंनी दिलेली साधना "नित्यनेमाने" करणे, त्यामधे खंड पडता कामा नये, तसेच शक्यतो वेळ चुकवू नये, कारण आपण जसजशी साधना नेमाने करू लागतो, "गुरुदेव त्यावेळेला आपली वाट पाहात असतात". ही भावना एकदा का मनामधे रुजली की साधनेमधे सातत्य आपोआप येऊ लागते. आज झोप झाली नाही, आज बरं वाटत नाही म्हणून साधनेची वेळ चुकवू नये. अत्यंत महत्वाचं म्हणजे श्रेष्ठ गुरुंचे चरण आपल्याला मिळाले ही त्यांची आपल्याप्रती दयाभावना आहे हे लक्षात असू द्यावे. बाकी गुरुंची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. भगवंताप्रती आपला भाव कसा दृढ होईल हेच ते पाहात असतात. आपल्या प्रापंचिक समस्या त्यांच्या चरणीं दृढ झाल्यावर आपोआपच मार्गी लागतात. त्यांना सांगायची गरजच लागत नाही, पण त्यांच्याविषयी तेवढी श्रद्धा आणि निष्ठा आपल्या मनात असली पाहिजे. आपल्याबरोबर ते असतातच, फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा ते सतत तपासून पाहातात. आपल्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक प्रसंगी ते आपली परीक्षा पाहात असतात, आपली "निष्ठा" कुठे डळमळत तर नाही ना. त्यामुळे सदैव त्याचे स्मरण करून आयुष्यात घडणा-या प्रसंगांना सामोरे जावे. आपला सर्व भार आपल्या निष्ठेप्रमाणे ते घेतातच. फक्त आपलं आचरण, विचार यांना आपणच सांभाळायचं आहे..एक मात्र नक्की गुरुविण कोण दाखवील वाट.
संग्रहित
अस्मिता
Tuesday, 2 February 2021
ब्राह्ममुहूर्त
|| श्री स्वामी समर्थ ||