|| श्री स्वामी समर्थ ||
आज पुष्य नक्षत्र आहे. हे शनीचे
नक्षत्र आहे . गुरुवारी चंद्र जेव्हा पुष्य नक्षत्रात येतो त्या दिवसाला गुरुपुष्य
म्हणतात . शनी हा दाता आहे. आपण केलेल्या
कर्माचा लेखाजोखा शनीकडे असतो . मग रस्त्यात कुणाला मुद्दामून मारलेला धक्का असो
कि पत्नीला केलेली मारझोड असो अगदी लहानसहान गोष्टींची नोंद शनी महाराज करत असतात
.
एखादि व्यक्ती १० रुपये चोरते
काहीच वाईट घडत नाही तेव्हा तिचा आत्मविश्वास बळावतो मग १० चे शंबर मग हजार आणि
लाख कधी होतात ते समजत नाही .शिशुपालाचेही१०० अपराध भरले तेव्हाच शिक्षा झाली . आपला वाईट काळ
आयुष्यात एकदा सुरु झाला (महादशा ) कि आपण केलेली सर्व वाईट कर्मे आपल्यासमोर हात
जोडून उभी राहतात आणि त्यासाठी शनी महाराज
शिक्षा सुनावतात .
म्हणूनच निदान कुणाचे चांगले
करायचे नसले तर निदान वाईट तरी करू नये. शेवटी सुटका कुणाचीच नाही बघा . एखाद्याला
मारले आणि तासभर जप केलात तरी सुटका नाही . तुम्ही मारले त्या कुकर्माची शिक्षा
मिळणार आणि नामस्मरणाचे फळ सुद्धा देव देणार पण नामस्मरणामुळे मारल्याची शिक्षा
कदापि कमी होणार नाही . ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.
ह्या सर्व गोष्टींची जाणीव मनुष्याला
जसजशी व्हायला लागते तसतसे आपण उच्चारलेला
प्रत्येक शब्द ,केलेली प्रत्येक कृती ह्यावर त्यांचे लक्ष आहे ह्याची खुणगाठ मनात
बसते आणि हातून होणार्या चुकांचे प्रमाण कमी व्हायला लागते .
हिच आपली अध्यात्माच्या खडतर
वाटेवर होणारी सुरवात असते.
श्री स्वामी समर्थ
अस्मिता
No comments:
Post a Comment