|| श्री स्वामी समर्थ ||
ग्रहपीडानिवारणार्थ नवग्रहांची रत्नं महादेवाला श्रद्धापूर्वक, प्रार्थनापूर्वक अर्पण करावीत.
(महादेवाच्या पिंडीला रत्नस्पर्श करून मंदीराच्या दानपेटीत टाकावीत)
तसेच एक गोमेद बालाजीला अर्पण करावा. (हुंडीत टाकावा)
(लहान आकारातील, पैलू न पाडलेले, तसेच उच्च प्रतिचे नसले तरी चालतील)
(वर्षातून किमान एकदा विषेशतः कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी, स्वतःचा वाढदिवस, महत्त्वाच्या कार्यारंभी तसेच सूर्यग्रहणकाळी रत्नार्पण करण्याचे विशेष फळ आहे.)
आजच्या जीवनशैलीचा विचार करता जप, अनुष्ठान उपासना करणे हे इच्छा असली तरी शक्य होत नाही त्यामुळे उपरोक्त उपाय हा सहज सोपा आणि परिणामकारक असा आहे. सर्वांनी अवश्य अनुभव घ्यावा.
यामध्ये समुद्रार्पण हे सर्वोत्तम आहे. ते शक्य नसेल तर नदीच्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करावेत. किंवा वर सांगितल्याप्रमाणे ईश्वरार्पण करावे.
त्यानंतर आपल्याला शुभ असलेल्या ग्रहाचे रत्नं ज्योतिष्याच्या सल्ल्याने श्रद्धापूर्वक वापरावे.
आपल्याला सुचविण्यात आलेले रत्नच वापरावे. त्याशिवाय इतर कोणतेही रत्न वापरू नयेत.
घराण्यातील कुलधर्म, कुलाचार श्रद्धापूर्वक पाळावेत.
पितरांचे श्राद्ध, पक्ष न चुकता करावेत.
आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या सुखदु:खात अवश्य सामील व्हावे. विशेष निमित्तप्रसंगी त्यांनाही आपल्या घरी बोलवावे. त्यांचे आदरातिथ्य करावे. असे केल्याने त्यांच्या आशिर्वाद, शुभेच्छांचा सकारात्मक प्रवाह सदैव आपल्या सोबत राहातो.
पंचमहाभूते आणि सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम, आदरभावना ठेवावी. निसर्गाचे हितचिंतक, मित्र बनण्याचा प्रयत्न करावा.
केवळ आपल्या कुलदेवतेचे पंचायतन पूजेत असावे. याबद्दल आपल्या कुलपुरोहितांचा सल्ला घ्यावा.
आपल्या कुलदेतेच्या पंचायतनाशिवाय इतर देव घरात आणून ठेऊ नयेत.
कुलदेवतेचे वर्षातून किमान एकदा तरी दर्शन घ्यावे.
तसेच कुलदेवतेच्या प्रतिमेचे दर्शन/प्रार्थना/नित्य उपासना इ.नियमितपणे करावे.
(यांविषयी अधिक माहिती संबंधित देवतेच्या मंदीरातून घ्यावी)
काहीच करणे शक्य नसल्यास, किमान आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण तरी सतत अवश्य करीत राहावे.
कलियुगात नामजपाचा महिमा सर्वाधिक आहे.
आपल्या कुलदेवतेशिवाय अन्य कुठल्याही देव, साधु-संत, महाराज इत्यादींचे फार करू नये तसे केल्यास आपल्या कुलदेवतेचा कोप होतो.
कुलदेवता साधारणपणे तीन वर्ष वाट पाहते नंतर आपल्याला आठवण होईल असे प्रसंग जीवनात वारंवार घडतात.
आपल्या पूर्वजांनी या देवतेची उपासना केलेली असल्यामुळे ती आपल्याला केवळ दर्शनानेही प्रसन्न होते.
कोणत्याही मूर्ती, फोटो, प्रतिमा एकाहून अधिक नसाव्यात. शोपीसच्या स्वरूपातील देव इ. घरात ठेवू नयेत.
७ इंचाहून मोठी मूर्ती घरात नसावी.
मूर्ती अभंग असाव्यात.
पितरांचे फोटो/ प्रतिमा/ टाक देवासोबत मांडू नयेत.
आपले आई-वडिल हयात आहेत तोपर्यंत कोणतेही अध्यात्मिक गुरू करण्याची आवश्यक्ता नाही.
आपल्या घराण्यात पूर्वापार नसलेली उपवासादी व्रतवैकल्ये करू नयेत.
कोणत्याही तीर्थयात्रेला किंवा धार्मिक स्थळी गेले असता देवांचे फोटो, मूर्त्या आणून वाटू नयेत.
फक्त प्रसाद, अंगारा/ कुंकू आवश्यक तेवढेच आणावे आणि त्याचा आदर राखावा.
वास्तुपरिक्षण करून घ्यावे. काही वास्तुदोष असतील तर त्यावर उपचार करून घ्यावेत.
उपवर मुलींचा वावर, वास्तव्य, बिछाना घराच्या वायव्य दिशेला असावा.
झोपताना नेहमी उत्तर किंवा पश्चिमेकडे पाय करून झोपावे.
दररोज सकाळी व संध्याकाळी देव, तुळस, गाय, घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या सर्वांना तसेच पूर्वजांच्या प्रतिमांना अवश्य नमस्कार करावा.(आदर आणि श्रद्धापूर्वक)
कोणाची चेष्टा, निंदा, चुगली, तक्रार इ. दुष्कर्म करू नयेत.
सर्वांशी प्रेमाने व प्रामाणिक राहावे.
अनावश्यक अडगळ, भंगार, टाकाऊ वस्तु, रद्दी, बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळं, यंत्रसामुग्री, फुटलेले आरसे, वापरात नसलेले, फाटलेले जुने कपडे, पादत्राणे, वाचनात नसलेल्या पोथ्या, पुस्तकं इत्यादी वस्तु घरात अकारण बाळगू नयेत. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा वाढते.
वापरात असलेले कपडेही (विशेषतः अंतर्वस्त्र) फाटलेले किंवा छिद्र पडलेले कदापिही नसावेत. नसता हमखास दारिद्य्र (अर्थिक/ मानसिक/ वैचारिक/ बौद्धिक) येते.
संन्याशाने एक दिवसाचा, गृहस्थाने एक महिन्याचा तर राजाने एक वर्ष पुरेल एवढा धन/ वस्तुसंग्रह केल्यास तो निर्दोष समजला जातो.
वस्तु विनिमय पद्धती पूर्णपणे निर्दोष होती. पैशाचा वापर सुरू झाला आणि पैशासोबत विकृति आणि दोषही सुरू झाले. कितीही प्रामाणिकपणे, घाम गाळून कमावलेला पैसा असला तरी त्यात दोष हे असतातच. त्यावर उपाय म्हणजे आपल्या एकूण उत्त्पन्नाच्या १०% गुप्तदान करावे असा शास्त्राचा संकेत आहे.
असे केल्याने पैशासोबत येणारे दोष केवळ कमी होतात. नाहीसे होत नाहीत.
गुप्तदान म्हणजे कुठेही वाच्यता न करणे, त्याची पावती न घेणे इ.
टॅक्स बेनिफिटकरिता केलेले दान यात गृहित धरू नये.
धनसमृद्ध होण्याचे हे एकमेव रहस्य आहे.
आपण किमान १% पासून गुप्तदानाची सुरूवात करून अनुभव घ्यावा.
अस्मिता
( संग्रहित )
॥शुभं भवतु॥
No comments:
Post a Comment