|| श्री स्वामी समर्थ ||
राहू हा मायावी आहे , भास आभास निर्माण करणारा , छल कपट करणे हे सर्व त्याचे गुण आपल्याला ज्ञात आहेत. प्रत्येक ग्रहाची चांगली आणि वाईट अशी बाजू असते . कुठलाही शुभ ग्रह संपूर्ण शुभ फळे प्रदान करत नाही आणि अशुभ ग्रह प्रत्येक वेळी वाट लावेल असेही नाही.
राहू आणि केतू ह्यांनी तर जीवनाची लढाई जिंकली आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही कारण एका अमृताच्या थेंबाने त्यांना जीवनदान दिले आहे तरीही आमरण त्यांची जीवनाशी झुंज चालूच आहे. राहू म्हंटल कि लगेच दडपण येते . शनी परवडला पण राहू नको अशी अवस्था राहू दशेत व्यक्तीची होते . असंख्य अनाकलनीय घटना , सततचे दडपण , भास आभास , निद्रानाश अश्या विविध समस्या व्यक्तीला भेडसावत राहतात . राहू व्यक्तीला प्रलोभनात अडकवतो त्यामुळे व्यक्तिगत फसवणूक , आर्थिक फसगत ह्यासारख्या गोष्टीनी व्यक्ती घेरली जाते . राहूच्या दशेत माणसाने आपले राहते घर भाड्याने देऊ नये दिलेच तर व्यवस्थित चौकशी करून द्यावे . घर घेतानाही विचारपूर्वक घ्यावे .
राहू हा फार महत्वाचा ग्रह आहे. राहू केतू ह्या ग्रहांना डावलून भाकीत करणे अशक्य असते . राहू हा इंटरनेट चा कारक मानला आहे तर केतू टेक्नोलोजी चा. त्यामुळे कलियुगात त्यांचे प्रस्त वाढले आहे आणि अढळ स्थानसुद्धा.
आपले आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर ची राईड आहे. धडाडी , आत्मविश्वास आणि घेयाकडे वाटचाल करायला लावणारी मंगळाची दशा आली कि माणसाला काहीतरी करायची उमेद निर्माण होते .त्यांनतर राहू महाराज येतात आणि सगळी सूत्र हाती घेवून होत्याचे नव्हते करतात . प्रत्येक वेळी वाईट घडतेच असे नाही. शेअर मार्केट हे राहुच्याच अमलाखाली येत असल्यामुळे ज्यांचा राहू चांगला असतो त्यांना त्या दशेत आर्थिक उन्नती व्यावसायिक यशाची गोडी चाखता येते . पण राहूच्या दशेत अनेक विस्मय चकित करणाऱ्या , अचंबित करणाऱ्या घटनांची शृंखला अनुभवायला मिळते हे नक्की . सगळच अधांतरी असल्याचा भास होत राहतो . राहुनंतर जीवन सावरायला गुरु महाराज येतात अश्या जीवनाच्या अनेक दशा आपल्याला अनुभवाव्या लागतात . कधी चांगला काळ तर कधी वाईट .
राहू म्हणजे फसवणूक म्हणून ह्या दशेत माणसाने समाजात फारसे मिसळू नये किंवा सावध राहावे . आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा राहूच समजावा म्हणजे सावध राहून व्यवहार करावे म्हणजे जगणे सुसह्य होयील . राहू कुणाला सर्वात अधिक बिघडवत असेल तर बुधाला त्यामुळे वक्तव्य सांभाळून करावे. कित्येकदा समजलेली बातमी पडताळून पहावी . वयात येणाऱ्या मुलांची राहूची दशा असेल तर पालकांनी सर्वार्थाने सावधगिरी बाळगावी .
व्यसने , दिशाभूल होणे , भूल पडणे , वाईट संगत ह्यापासून आपल्या मुलांना दूर ठेवावे त्यांच्यावर नको तितका आंधळा विश्वास तर अजिबात ठेवू नये.
राहूच्या दशेत समाजात आपल्याबद्दल इतरांचे गैरसमज अधिक होत असतात .राहू सतत संभ्रम निर्माण करतो त्यामुळे कुठलाही निर्णय अनेकदा चुकीचा घेतला जातो . सतत अनामिक भीती वाटत राहणे , आपल्याला कुठलातरी मोठा आजार झालाय , दडपण , निद्रानाश , विचित्र स्वप्ने पडणे ह्या गोष्टी हमखास घडतात . राहू हा आकाशगंगेतील एक लहानसा ठिपका आहे. कित्येक मैल दूर असणारा जो दिसत नाही पण आहे. मायावी आहे आणि त्याचा प्रभाव आपल्या जनजीवनावर किती होतो ह्याचा विचार केला तर राहू च्या ताकदीचा पुसटसा तरी अंदाज नक्कीच येयील.
राहू मुळे सगळेच वाईट होते का तर नाही . राहूमुळे आज जग जवळ आले आहे. आज पुण्यातील सदाशिव पेठेतील सासूबाई आपल्या लेकीसुनांना झूम च्या सहाय्याने करंज्या शंकरपाळे शिकवत असतात आणि नातवंडाना गोष्टीही सांगत असतात . राहूच्या दशेत ज्योतिष शास्त्र ह्या दैवी शास्त्राचा उत्तम अभ्यास करता येतो , अनेक संशोधने , उच्च शिक्षण ह्याच राहूमुळे घेता येते. राहू परदेश गमनासाठी तत्पर असल्यामुळे राहूच्या दशेत परदेशी जाण्याचे स्वप्न साकारले जाते त्यामुळे राहूची फक्त काळीच बाजू आहे असे नाही. पण अनेकदा तीच पुढे येते . एक सावली अनामिक भीती आपली पाठ सोडत नाही म्हणून राहूचा धाक सर्वांनाच आहे. राहू जर पत्रिकेत दुषित असेल तर राहूच्या दशेत आयुष्याची अक्षरशः दशा होते आणि राहू चांगला असेल तर व्यक्तीचे आयुष्य प्रचंड उंचीवर जाते .शेअर मार्केट मध्ये असामान्य आर्थिक यश देणारा राहूच आहे.
लग्नेश किंवा लग्न बिंदू राहूच्या नक्षत्रात असेल तर व्यक्ती हावरट असते . लग्नात राहू व्यक्तीला दशेत सरभरीत करतो . धनेश , सप्तमेश राहूच्या नक्षत्रात किंवा राहुशी निगडीत असल्यास त्याची फळे मिळतात . 3 6 10 11 ह्या स्थानात राहू चांगला फळतो . राहू दशमात सुस्थितीत असेल तर राजकारणात यश मिळते .
राहूच्या दशेत शंकराची उपासना नक्कीच फलदायी ठरते . राहुबद्दल अजूनही खूप लिहिण्यासारखे आहे . योगायोगाने आज पाहिलेल्या सगळ्या पत्रीकांमधील प्रश्नाशी राहू निगडीत होता . आज राहुचेच नक्षत्र आहे.
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment