|| श्री स्वामी समर्थ ||
शनी हा आपल्या सगळ्यांचा जवळचा मित्र आहे . “ आपल्यातील “ आपल्याला तो सदैव घडवत असतो . आपल्या क्षमतांची आपल्याला खरी ओळख करून देत असतो . काहीही झाले तरी त्याच्यावर खापर फोडणारे आपण , तरीही तो आपल्याला चांगल्या वाईटाची पारख करून देत असतो . नुसता जप उपयोगी नाही , त्याचा उपयोग खर्या अर्थाने होईल जेव्हा आपल्यात अंतर्बाह्य बदल होईल हाच त्याचा संदेश आहे. ज्योतिष शास्त्रावर बोलताना शनीबद्दल काही भाष्य केले नाही असे होत नाही इतका खोल प्रभाव जनमानसावर शनीचा आहे. पण मनात खोलवर कुठेतरी त्याची भीती आहे, धाक आहे . एका अर्थी हि चांगलीच गोष्ट आहे कुणाचातरी जीवनात धाक हवाच , बंधन सुद्धा हवेच नाहीतर सगळाच कारभार बेधुंद होयील.
कुंभ राशीतील धनिष्ठा नक्षत्राच्या चौथ्या चरणात आपली वक्र गती सोडून शनी मार्गी होत आहेत . शनी हा धीम्या गतीने जाणारा ग्रह आहे . ग्रहमालिकेतील बाह्य वर्तुळातून भ्रमण करणारा ..आयुष्याच्या संध्याकाळी भेटणारा म्हणूनच वार्धक्या चाही कारक आहे. एका राशीत शनी अडीच वर्ष वास्तव्य करतो. शनी हा कर्मदाता आहे . थोडक्यात जसे कर्म तसे फळ . त्याचे कुणाशीही न मित्रत्व ना शत्रुत्व . त्याच्याकडे लाचलुचपत चालत नाही .राजमार्गाने कष्ट करून भाकरी मिळवणाऱ्या लोकांना शनी भरभरून देतो.
शततारका ते धनिष्ठा आणि आता पुन्हा धनिष्ठा ते शततारका असे शनी महाराजांचे भ्रमण होत आहे. शनी आधीच संथ आहे आणि वक्री झाल्यावर तो अजूनच संथ गतीने जाणार आणि बलवान होणार. आपल्या कर्माकडे अगदी जवळून कटाक्ष टाकणार त्यामुळे सावधान. शनी ला दंडाची शिक्षा देण्याचा अधिकार आहे आणि ती तो निरपेक्षपणे देतो , त्याच्याजवळ गोडीगुलाबी चालत नाही.
सूर्य सकाळी उगवतो पण लगेच तो तळपत नाही. सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यायला सर्वांनाच आवडते पण मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याकडे पाहवत नाही. अगदी हिच शनी महाराजांची शिकवण आहे . एखाद्या गोष्टीची सुरवात झाली कि त्यात लगेच यश मिळत नाही , यश प्रगती आणि व्यवसायातील उत्पन्न , नोकरीतील उन्नती साध्य करण्यासाठी काही काळ जाणे आवश्यक असते . थोडक्यात संयम ठेवला तर वेळ आली कि यशाची दालने शनी महाराज आपल्यासाठी खुली करणार हे नक्की. शनी हा विलंबाचा कारक आहे म्हणूनच एका राशीत अडीच वर्ष . तो रोज फटके मारत नाही आपण त्याच्या नजरेच्या टप्प्यात असतो पण साडेसातीत तो 1000 चुकांचा एकच फटका मारतो जो जन्मभर लक्ष्यात राहील जसे मातृ पितृ छत्र हरवणे , धंद्यात ध्यानी मनी नसताना आलेले अपयश .
शनी महाराज आता आपली वक्र अवस्था सोडून मार्गी होत आहेत . शनी महाराजांना घाबरू नका . खरतर कुठल्याच ग्रहाला घाबरण्याचे मुळात कारण नाही . घाबरायचे असेल तर आपल्या हातून केलेल्या चुकीच्या कर्माना घाबरा. कारण शनीच नाही तर प्रत्येक ग्रह आपल्या कर्माचे फळ आपल्या पदरात टाकत असतो.
आपल्या ह्या अस्तित्वाच्या लढाईत शनी मोठी भूमिका पार पाडत असतो पण आपण त्याचे आभार मानायचे सोडून त्यालाच दोष देतो .
आपले कर्म शुद्ध आणि नियत स्वच्छ असेल तर शनी महाराज त्याचे योग्यच फळ देणार हे त्रिवार सत्य आहे.
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment