|| श्री स्वामी समर्थ ||
आपण काम करत नाही तर आपले वितभर “ पोट “ काम करत असते . पोटामध्ये पेटलेल्या यज्ञाला घास भरवून आत्मा शांत करणे ह्यासारखे म्हणजेच अन्नदानासारखे पुण्य दुसरे नाही. आपले शरीर ज्यावर पोसले जाते ते अन्न ज्याला शास्त्रात “ साक्षात परमेश्वर म्हणजेच “ ब्रम्ह “ म्हंटलेले आहे.
जन्मलेले बालक आईच्या देहावर स्तनपान करून आपला देह टिकवत वाढवत असते . आपण जे अन्न प्रश्न करतो त्यातून आपले व्यक्तिमत्व , विचार घडत असतात . प्रत्येक व्यक्तीला “ जिभेचे चोचले “ असतात आणि ते स्वाभाविक आहे. अनेकांना अनेक प्रकारची व्यंजने , पदार्थ पेय आवडतात . ह्या पदार्थांची आवड निवड आपल्यात अनुवांशिक असू शकते . आज ह्यावर प्रकाश टाकूया.
आपल्या देहातील प्रत्येक अवयव निसर्ग कुंडलीत प्रत्येक भावात विभागलेला आहे . अन्न प्रश्न करणारे मुख , जिव्हा आणि चवी ह्याचा विचार पत्रिकेतील द्वितीय भावातून केला जातो . निसर्ग कुंडलीत इथे शुक्राची वृषभ राशी येते . शुक्र हा सर्व रसांचा कारक आहे. आपण कुठले आणि कश्या प्रकारचे अन्न प्राशन करणारा हे ह्या भावावरून तसेच येतील स्थित ग्रहांवरून समजते.
शुक्र असेल तर आंबट , चंद्र असल्यास पातळ पदार्थांचे सेवन आवडेल तसेच फळांचे रस , बुध गुरु गोड खाण्याकडे विशेष कल राहील तर मंगळ जिभेवर तिखटाचा मारा करेल.रवी असल्यास राजासारखा आहार तर शनी शीळोपा म्हणजेच शिळे अन्न देयील. चंद्र गुरु सहभोजनाचा स्वादिष्ट पक्वांनाचा आस्वाद देतील.
या भावातील पापग्रह विशेषता राहू मांसाहार , अपेय पान , तिखट भोजन पसंत करेल . मंगळ तिखट खाईल आणि बोलेल सुद्धा . धनस्थानातील पापग्रहांची मांदियाळी सुखाचा घास क्वचित देईल , अकारण भांडणे , अपशब्द , शाब्दिक चकमकी जेवणाच्या वेळी नाही झाले तरच नवल.
दिवसभर आपण ह्या पोटासाठी कष्ट करतो , आणि ह्या कष्टातून मिळवलेली भाकरी सुखाचा आस्वाद घेत आपल्या कुटुंबां सोबत खाणे हाच तर खरा जीवनातील सर्वोच्च आनंद आहे . अन्न फुकट घालवू नका , अन्नाचा आणि अन्न शिजवणाऱ्या व्यक्तीचाही योग्य मान राखा . हॉटेल मधील वेटर पण मागाल ते आणून टेबलावर देयील . पण त्यात प्रेम नसते . आई हेच अन्न चमचाभर प्रेम आणि जीव ओतून करते म्हणून आईच्या हाताला चव असते . ह्या आईला जेवणापूर्वी निदान नमस्कार केलात तरी पुण्य पदरी पडेल. आपली लेकरे पोटभर जेवली कि आईचेही पोट आपोआप भरते .सहमत ???
प्रत्येक ग्रह समजला तर 12 भावातून त्याचा होणारा प्रवास कसा असेल ते सहज उलगडेल .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment