|| श्री स्वामी समर्थ ||
शनीला पूर्ण 12 राशीतून भ्रमण करायला 30 वर्ष लागतात म्हणजे एका राशीत अडीच वर्ष लागतात हे आपल्याला माहित आहे. आपल्या राशीच्या मागील राशीत शनी महाराज आले कि आपली साडेसाती चालू असे म्हंटले जाते .पण साडेसातीची गणना अशी करत नाहीत हे लक्ष्यात घ्या . आपला जन्मस्थ चंद्र ज्या अंशावर आहे त्याच्या 45 अंश मागे जेव्हा शनी येतो तेव्हा आपली साडेसाती सुरु होते आणि तसेंच जन्म चंद्राच्या पुढे 45 अंश गेला कि ती संपते. उदा आपला चंद्र कर्क राशीत 5 अंशावर असेल तर मिथुन राशीत शनी आला कि साडेसाती चालू होणार नाही तर ती वृषभ राशीत शनी 20 अंशावर असेल तेव्हाच सुरु होणार आहे पण आपल्याला असे वाटत्ते कि मिथुन राशीत शनी आल्यावर साडेसाती सुरु झाली . तसेच पुढे सिंह राशीत 20 अंशावर ती संपेल.
आपल्या स्वतःच्या पत्रिकेत हे अंश पहा म्हणजे लक्ष्यात येयील. अनेकदा लोक म्हणतात माझी साडेसाती संपली तरी त्रास आहे किंवा अजून सुरु झाली नाही तरी त्रास आहे ह्याचे कारण हे अंशाचे गणित . नवीन अभ्यासकांनी फलादेश करताना हे लक्ष्यात ठेवावे .
ओं शं शनैश्चराय नमः
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment