|| श्री स्वामी समर्थ ||
पुढील काही लेखात आपण शनीबद्दल अधिकाधिक माहिती करून घेवूया . सगळ्यांचेच शनीबद्दल अफाट वाचन असतेच तरीही पत्रिकेत शनी अनेक योगातून समोर येताना त्याच्या फलादेशा बद्दल अनेक कंगोरे लक्ष्यात येतात . वक्री शनी म्हणजे काय ते समजले पण तो पत्रिकेत इतर ग्रहासमोर कसा वागणार ते समजणे म्हणजे ज्योतिषाचा सखोल अभ्यास . शनी वक्री म्हंटल्यावर लगेच घाबरले सगळे अश्या प्रकारचे अनेक समज गैरसमज मनातून जाण्यासाठी संशोधन , विविध पत्रिकांचा अभ्यास आवश्यक आहे. वेळोवेळी शनीच्या अवस्था आणि त्याचा जनमानसावर , शेअर मार्केट , शेती , अर्थव्यवस्था आणि जागतिक उलाढाली , पर्जन्यमान ह्यावर होत असणारा परिणाम ह्याच्या सखोल नोंदी असणे आवश्यक आहे. दोन वेगवेगळ्या पत्रिकेत असलेला उच्चीचा शनी सुद्धा एकसारखी फळे देणार नाही. असो जमेल तितका अभ्यास लिखाणाच्या मध्यमातून मांडत आहे आपण सर्वानीच आपापल्या परीने अधिकाधिक अभ्यास करूया हाच त्यामागील स्पष्ट शुद्ध हेतू आहे.
प्रत्यक्ष आयुष्यात शनी काय फळे देतो त्यावरूनच त्याचा खराखुरा अभ्यास होईल, नुसते पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही .
शनी महाराजांचे सध्या कुंभ राशीतून गोचर सुरु आहे. शनी राहू ह्यांचा जबरदस्त पगडा जनमानसावर आहे . कुठेही शनी राहू हे शब्द दिसले तरी मनात भीती निर्माण होते इतका त्यांचा दुर्दैवाने नकारात्मक प्रभाव मनावर आहे . इतर ग्रहांसारखाच शनी हा ग्रह आहे . त्याला समजून घेतले तर जीवन नक्कीच सुकर होईल. आपल्याला जो गोड पदार्थ आवडतो तोच आई आपल्या वाढदिवसाला आवर्जुन करते अगदी त्याचप्रमाणे शनी ह्या ग्रहाला आपल्याकडून कसे वागणे अपेक्षित आहे हे समजून घेतले तर ढय्या असो कि साडेसाती ती वाईट परिणाम करणार नाही. शनी ना आपल्या गुडबुक मध्ये ना आपल्या ब्याड बुक मध्ये. त्याचे काम चुकांना शासन करणे मग समोर कुणीही असो. जो चुकेल त्याला शिक्षा हे साधे सोपे असे समीकरण आहे त्यामुळे तो अमुक राशीत असेल तर चांगला किंवा वाईट असे काहीही नाही.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याच भोवती आरत्या ओवाळून घेणे, मोठ्या बाता गमजा मारणे , पराकोटीचा अहंकार अगदी माज म्हणा ना त्याला अजिबात सहन होत नाही . मग अश्या लोकांची वेळ भरली म्हणजेच शनी साडेसाती किंवा महादशा आली कि खैर नाही. शनी हा सेवक आहे त्यामुळे त्याला लो प्रोफाईल राहून जगणारी लोक आवडतात . मदमस्त झालेल्यांना शनी पुरून उरतो आणि जागेवर बसवतो . अपंगत्व , शरीराचा एखादा अवयव साद्वात ठेवणे , परालीसीस शनीकडे आहे . वृद्धत्व शनीकडे आहे. बघा आकाशगंगेत क्रांतीवृत्तात शेवटच्या वर्तुळातून भ्रमण करणारा शनी हा सूर्यापासून दूर आहे . आयुष्याच्या संध्याकाळी शनी भेटतो म्हणूनच वृद्धापकाळ त्याच्याकडे आहे.
आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळशी माणसाचे तोंड सुद्धा पाहू नये असे स्वामी म्हणत . प्रत्येकाने कष्ट केले पाहिजे कार्यरत असले पाहिजे. ज्यांच्या पत्रिकेत शनी चांगला असतो ते कार्यमग्न असतात , सतत कष्ट करत राहणे त्यांना आवडते . शनी त्यांना धैर्य प्रदान करतो .परिश्रम करायला लावतो. आपल्यापेक्षा खालच्या दर्ज्याच्या म्हणजे चतुर्थ श्रेणीच्या लोकांसाठी त्यांच्या मनात प्रेम असते. चतुर्थ श्रेणी हि शनीकडे आहे त्यामुळे ह्या लोकांशी केलेलं चांगले आचरण , दानधर्म शनीला नेहमीच आवडतो. करोना मध्ये चतुर्थ श्रेणीतील लोकांची किंमत शनीने आपल्याला दाखवून दिली. घरकाम करणाऱ्या स्त्रीया , मजदूर , सुतार , चांभार , प्लंबर हा कष्टकरी वर्ग ह्यात मोडतो.
शनी नेहमीच अथक परिश्रम करायला लावतो पण त्याचे फळ सुद्धा देतो. विलंब हा त्याचा गुणधर्म असला तरी तो एखादी गोष्ट देणारच नाही असे मात्र नाही त्यामुळे पंचम भाव शनीकडे येत असेल तर संतती होणारच नाही असे विधान करणे धोक्याचे ठरू शकते .
प्रत्येक ग्रहाच्या मार्गी वक्री स्तंभी नीच अश्या वेगवेगळ्या अवस्था आहेत . शनी मेष राशीत नीच होतो तर तूळ राशीत उच्चत्व प्राप्त करतो. आक्रमक , उतावळ्या स्वभावाच्या मंगळाच्या राशीत शनी नीच होतो . मंगळाला थांबायला वेळ नाही आणि ओतप्रोत भरलेले साहस तर शनी संथ शांत संयमी विचारी . शनी वायुतत्व तर मंगळ अग्नीतत्व . शनी सारखा सेवक मेषेत थोडा उदास गंभीर होतो. शनीच्या राशी पत्रिकेत जिथे असतील त्या भावांची सकारत्मक फळे न मिळता तिथेही विलंब उदासीनता अशीच फळे मिळतात. जसे शनी कर्म भावाचा म्हणजे दशम भावाचा कारक असेल तर व्यवसाय नोकरीत अडचणी ,अधोगती किंवा प्रगतीच नाही जैसे थे स्थिती असेल कारण काम करण्याची जिद्द सकारात्मकता उत्साह व्यक्तीत नसेल. अश्या व्यक्ती चिडचिड्या सतत रागराग करणाऱ्या असतात . पंचम भावाचा कारक असेल तर संतती कडून अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. नीच शनी पत्रिकेत असणार्या व्यक्तींना आळस उशिरा उठणे ह्या सवयी असतात .प्रत्येक गोष्टीची सुरवात होते पण पुढे गाडी जाताच नाही मग निराशा पदरी पडते . शनी नीच अवस्थेत पत्रिकेत असताना जीवनात जर आपल्या खालच्या लोकांचा अपमान केला तर शनी आत्यंतिक वाईट फळ प्रदान करतात . अनेकांच्या मानापमानाच्या भावना खूप असतात पण हे सर्व शनी महाराजांसमोर टिकत नाही . म्हणूनच जीवनात साडेसाती शनी दशा असो अथवा नसो माणसाने नेहमीच लो प्रोफाईल जगावे . सतत मी मी मी करणार्यांची शनी दशेत खरच दशा दशा होते. असो.
हाडांचे आजार , अपघात , संघर्ष शनी देतो . अर्थार्जनात चढ उतार येतात . शनीचा नीचभंग झालेला असेल तर शनी वाईट फळ देणार नाही. नीच शनी आयुष्याच्या अखेरी अध्यात्माकडे वळवतो कारण आयुष्यभर व्यक्ती संघर्ष करून मनाने आणि शरीराने सुद्धा थकलेली असते . अखेरच्या क्षणी परमेश्वराची आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा शनीच असतो हे विसरून चालणार नाही.
रोजच्या जीवनातील उदा घेतली तर शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा अन्य वेळी जेव्हा डॉक्टरांच्या सुया आपल्याला टोचल्या जातात आपण केलेय सर्व गोष्टी क्षणात चलत चित्रपटासारख्या डोळ्यासमोर झळकू लागतात . केलेले बुरे भले कर्म , सर्व क्षणात आठवते आणि मनोमनी आपल्याला झालेल्या ह्या आजाराचे मूळ कुठे ते आपले आपल्यालाच समजते .
आयुष्यात परिस्थिती आहे तीच कायम राहत नाही हे शनी शिकवतो . मुळात आयुष्य कसे जगायचे त्याचे धडे तोच गिरवून घेतो. खर सांगू का? ज्योतिष म्हणून नाही पण माणसाने दुसर्या माणसाशी माणुसकीने वागावे, साधे सोप्पे सरळ जगावे. सर्वांवर प्रेम करावे आणि सर्वांच्या प्रेमाला लायक असे जीवन असावे . कुणाला कमी लेखू नये कारण प्रत्येकात परमेश्वर आहेच कि . माणसे मोठी का होतात ? बघा श्री मुकेश अंबानी , उद्योगपती आहेत , नखशिखांत सोन्यात मढू शकतात तसेच जनमानसात वावरू शकतात पण त्यांचा पेहराव किती सामान्य असतो , इथेच आपल्याला शनी भेटतो . आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असणे हि भावना म्हणजेच अहंकार . अहंकाराचा शनीला तिटकारा आहे.
माझा शनी इथे आहे आणि अमुक ग्रहासोबत आहे असे प्रश्न विचारू नयेत कारण पत्रिकेतील इतर ग्रहांचा विचार केल्या शिवाय तसेच महादशा अभ्यासल्या शिवाय निदान करणे चुकीचे ठरेल . त्यापेक्षा अभ्यास करुया
साधी सोपी जीवनशैली जगूया | अहंकाराचा त्याग करुया ||
वृद्धांची सेवा करुया | शनी महाराजांना आपलेसे करुया ||
क्रमशः
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment