|| श्री स्वामी समर्थ ||
नक्षत्रांचा सखोल अभ्यास हा ज्योतिष शास्त्र शिकताना पूरक ठरतो . तुमच्या सोबत नक्षत्र जगताची विलक्षण सफर घडवण्याचा मानस आहे. काही तृटी राहून जातील सुद्धा पण प्रयत्न मनापासून असेल हे नक्की .
एखाद्या सुंदर स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन करताना आपण अगदी सहज म्हणून जातो “ मुलगी अगदी नक्षत्रा सारखी आहे.” नक्षत्र हि तेजस्वी , मनमोहक आणि आकर्षित करणारी असतात . आज थोडे त्यांच्या बाबत जाणून घेवूया . चला तर मग.
नक्षत्रांना ज्योतिष शास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे. किबहुना नक्षत्रा शिवाय भविष्य वर्तवले जाऊ शकत नाही असे म्हंटले तर वावगे ठरू नये. नक्षत्र जगताचा वेगळा सखोल अभ्यास आवश्यक आहे . नक्षत्रांचा आपल्या जीवनातील प्रवास प्रत्येक घटनेवर ठसा उमटवणारा आहे.
नक्षत्र म्हणजे आकाशातील तारकांचे पुंज जे आपले लक्ष वेधून घेतात ,आपल्याला त्यांच्याकडे मान वळून बघायला लावतात .नक्षत्र म्हणजे चंद्राचीच घरे आहेत त्यातून २७ दिवस त्याचा प्रवास सुरूच असतो.
अवकाशात असंख्य तारका लुकलुकताना दिसतात . सूर्याच्या भ्रमण मार्गाच्या जवळ असणारे ठळक आकर्षक तेजपुंज तारकांचे समूह दिसतात त्यांनाच आपण “ नक्षत्रे “ म्हणतो. ज्योतिष शास्त्रात नक्षत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे . आयुष्यातील महादशा नक्षत्रावरून ठरतात . आपण कुठल्या नक्षत्रात जन्म घेतो त्याप्रमाणे आपला स्वभाव असतो.
नक्षत्र ह्या शब्दाचा अर्थ “ न क्षरती “ म्हणजेच आपल्या स्थानापासून जी कधीच ढळत नाहीत . त्यांना संपवता येत नाही . हि नक्षत्रे स्वयंप्रकाशित आहेत . त्यांचे अस्तित्व अबाधित आहे .नक्षत्र स्थिर आहेत पण ग्रह हे चर आहेत . म्हणून गोचर हे ग्रहांचे असते, नक्षत्रांचे नाही.
यजुर्वेदात आपल्याला जगाची उत्पत्ती करणारा आपला क्रिएटर कसा आहे त्याची माहिती सापडते . त्याचे डोके घोड्यासारखे आहे,आकाश म्हणजे त्याचे डोळे आहेत , त्याचे कान म्हणजे त्याचा आत्मा असून त्याचे शरीर म्हणजे तारका पुंज ( नक्षत्र ) आणि त्याची हाडे म्हणजे तारे .
अनेक ग्रंथांमधून आपल्याला नक्षत्रांचा उल्लेख आढळतो . अंदाजे 5000 वर्षापूर्वी पासून हि अस्तित्वात आहेत आणि त्याचा उल्लेख आपल्याला वेदांतून , संहिता , शथपथ ब्राम्हण , लग्ध ऋषींनी लिहिलेले वेदांग ज्योतिष ह्या प्राचीन ग्रंथातून आढळतो.
ह्या नक्षत्रांना दैवी गुणधर्म , दैवी तत्वाचे गुणधर्म दिले आहेत.
न चरती , न क्षरती , अथ नक्षत्रती
नक्षत्र आपल्या जागेपासून हलत नाही ,बदलत नाहीत आणि त्यांचा विनाशही होत नाही. वेदिक शास्त्र हे संपूर्णतः नक्षत्रांवर निर्भर आहे ते ग्रहांनी बनलेले नसून नक्षत्रांनी बनलेले आहे.
क्रांतीवृत्त हे 360 अंशाचे आहे त्यात २७ नक्षत्र म्हणजे प्रत्येक नक्षत्र हे 13 अंश 20 कलांचे आहे.
उत्तराषाढा चे शेवटचे चरण म्हणजे 15 घटिका आणि श्रवण नक्षत्राच्या 53 कला 20 विकला म्हणजे 4 घटिका मिळून अभिजित नक्षत्र बनते ज्याचा उपयोग आपण मुहूर्ता साठी करतो.
ह्या नक्षत्रांवर ग्रहांचे राज्य नसून त्यांना देवांची घरे देवालये म्हंटलेले आहे. चित्रा नक्षत्र हे तूळ राशीत आहे . हे मंगळाचे नक्षत्र आहे पण मंगळाचा प्रभाव ह्यावर दिसत नाही . चित्रा नक्षत्राची देवता आहे विश्वकर्मा म्हणजेच देवांचा कारागीर त्वष्टा ह्याचा अंमल इथे दिसतो. हा कारागीर सुंदर , क्रिएटिव्ह गोष्टी बनवत असे. म्हणजेच इथे मंगळाचा काहीच प्रभाव नाही. म्हणजेच नक्षत्रांवर त्यांच्या देवतेचा प्रभाव असतो हे आपल्या सहज लक्ष्यात येते .
आपले जन्म घेतो तेव्हा चंद्र ज्या नक्षत्रातून भ्रमण करत असतो तेच आपले जन्म नक्षत्र असते . उदा. जन्माच्या वेळी चंद्र पुनर्वसू नक्षत्रात असेल आपल्याला जन्मतः गुरूची महादशा सुरु असते कारण पुनर्वसू हे मिथुन राशीतील देवगुरु बृहस्पतींचे नक्षत्र आहे. गुरूची दशा हि 16 वर्षाची असते अर्थात त्यात जातकांनी ती किती भोगली आहे ते गणिती रुपात पाहता येते.
नक्षत्र हि देवांची दिव्य घरे आहेत . नक्षत्र हे अनेक तारकांचे पुंज आहेत . त्यातील काही तारे आपल्याला ठळक दिसतात त्यांना आकृतीवजा आपण नावे दिली आहेत . त्याही उपर त्यातील एखादा तर अगदीच ठळक असेल तर त्याला आपण योग तारा म्हणतो.
योग म्हणजे जुळणे .चंद्र सूर्याचे अंतर वजा करून आपण तिथी काढतो . पण योग काढतो तेव्हा ते मिळवतो. योग तार्यातून सूर्य चंद्र इतर ग्रहही भ्रमण करतात .प्रत्येक ग्रह त्याच्या गतीप्रमाणे त्या नक्षत्रातून जाताना दिसतो.
वेदांमध्ये ह्या नक्षत्रांबद्दल माहिती आहे. हे वेद कुणी लिहिले ह्याबद्दल सुद्धा गूढता आहे. वेदांमध्ये नक्षत्रांचा उल्लेख आहे. maxmiller ने वेदांचा अभ्यास केला आणि सांगितले कि जगाच्या पुस्तक संग्रहालयात वेद हे सर्वात जुने पुस्तक आहे. आज वेद शिकवणाऱ्या अनेक पाठशाला आहेत . फक्त ज्ञान म्हणून त्याकडे पहिले तर सर्व धर्माच्या लोकांना त्यातून ज्ञानप्राप्ती होईल ह्यात शंकाच नाही .पृथ्वीची उत्पत्ती ,स्थिती आणि लय ह्याबद्दल ज्ञान प्राप्त होयील.
वेद म्हणजे मंत्र आहेत ऋग्वेद यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद . सौरसुक्त हे सूर्यावर लिहिलेले आहे.
निसर्ग कुंडली हि एका विराट पुरुषाची कुंडली आहे जो महाविष्णू आहे. त्याच्या मनाचे प्रतिबिंब चंद्रामध्ये पडते हे वेदात सांगितले आहे. मनाचे अनेक अंतरंग , भाव प्रतिबिंबित करणारा ,मन किती तरल आहे हे सांगणारा हा चंद्र आहे. बहिणाबाई ह्यांची कविता आहे. मन वढाय वढाय आत्ता होत भुईवर गेले गेले आकाशात . इतके चंचल , द्रुत गतीने पळणारा ,तार्यातून पळणारा हा चंद्र आहे म्हणून त्याला मनाची उपमा दिली आहे. ऋषीमुनी अत्यंत बुद्धिमान , ज्ञानी होते ज्यांनी प्रत्येक ग्रहाला विशिष्ठ नाव देवून त्याचे व्यक्तिमत्व जणू आपल्या डोळ्यासमोर उभे केले .
ग्रहाचे अनेक पैलू , त्यांचे वैशिष्ठ हे एकेका शब्दात वर्णन करण्याचे ऋषी मुनींचे सामर्थ्य कौतुकास्पद आहे. पृथ्वीतील चराचराचे मन कुठे पाहायचे असेल तर ते ह्या चंद्रा मध्ये पाहायला मिळते . हा नियम व्यक्तीला लागू पडते . निसर्ग पुरुषाची प्रतिमा आपण मानवात पाहू लागलो आणि अनुभवू लागलो . जसे चंद्र जर स्थिर राशीत असेल तर माझे विचार स्थिर आहेत .द्विस्वभावी राशीत असेल तर दोलायमान मनस्थिती आहे. to be or not to be. चर राशीत चंद्र असेल तर विचार पटापट तयार होतात आणि पळत राहतात . प्रकृती चर आहे. अवध्या ब्रम्हांडाचे भविष्य ह्या चंद्रमा मनसो जातः मध्ये आहे.
चंद्राची उत्पत्ती हि मनाचे प्रतिबिंब दाखवत असेल तर सूर्य हा आत्म्याचे प्रतिक आहे. म्हणून सूर्याला चक्षु अशी उपमा दिली आहे. वेदाचे चक्षु म्हंटले आहे. आपल्या शरीरातील तेजाचा प्रादुर्भाव हा डोळ्यातून बाहेर पडतो . ह्या विराट पुरुषाचा डोळा हा सूर्य आहे .डोळ्याने हा संपूर्ण चराचराला पाहू शकतो.
कोर्टात सुद्धा जज्ज विचारतात कि हि घटना कुणी पहिली आहे का? तर ती सत्य आहे. सूर्य आपल्याला ज्ञानाचे ,आत्मज्ञानाचे , बुद्धीचे , विचार करण्याचे चक्षु देतो . मनाच्या शक्ती आणि ह्या शक्तीमध्ये राहिलेल्या काही उणीवा आहेत जसे राग लोभ मोह मत्सर रोग द्वेष षडरिपू आहेत . माणसाचे मन ह्या षडरीपुना चिटकून असते.
मला मान दिला नाही कुणी विचारले नाही , कौतुक केले नाही , जेवायला बोलावले नाही हा अहंकार हे षडरीपुचे मूळ आहे आणि हे मनातून निर्माण होतो बुद्धीतून नाही . बुद्धी आणि मन हे वेगवेगळे आहे . काम क्रोध ह्या सर्व भावना आणि त्यातून निर्माण होणारे रोग .
रोग कसे निर्माण होतात .मनामध्ये असणार्या ह्या भावना आपण पोटात रिचवतो आणि आजारांना रोगांना आमंत्रण देतो . सगळ्या गोष्टींचे मूळ हे मन आहे . मनातील भावना अनेक आजारांना जन्म देतात . पण मनाचा दृढ निश्चय केला तर आजार पळून जातील .रोज एक चांगली पत्रिका सोडवल्याशिवाय मी झोपणार नाही किंवा अमुक एक संख्येचा जप केल्याशिवाय मी राहणार नाही .
जपमाळ – 109 मण्यांची असते. 27 नक्षत्रे आणि प्रत्येकाचे 4 चरण म्हणून 108 मणी आणि 109 वा मेरुमणी.
क्रमशः
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment