Saturday, 27 May 2023

नक्षत्र - कुंडलीचा मेरुमणी – भाग 4

 || श्री स्वामी समर्थ ||


१२ राशी झाल्या ,9 ग्रह पण राहु केतुला तर कुठेच स्थान नव्हते . मग चंद्र आणि सूर्य हे मुख्य दैवत पुढे बसले आणि मग सगळे म्हणाले कि आता तुम्ही सांगाल तसे करू .सूर्य म्हणाला मी जगतावर राज्य करणारा ,स्वयंभू प्रकाशित आहे मी सर्वाना प्रकाशित आहे म्हणून त्याला बुध ह्याला जवळ केले आणि त्याला राजकुमार केले त्याने कन्या राशी घेतली . बुधाने मिथुन राशी आपल्याकडे घेतली. शुक्राने संतुलन करणारी तुला राशी आपल्याकडे घेतली . चंद्राने पहिले कि आपण आधीच भावनिक आहोत . चंद्राने वृषभ घेतली . सूर्याने मंगळाची वृश्चिक घेतली जी मंगळाची जास्ती गुणाची गुह्य राशी घेतली आणि चंद्राने मेष राशी घेतली .

सूर्याने धनु घेतली तेव्हा चंद्राने मीन घेतली . सूर्याने मकर राशी आणि चंद्राने कुंभ राशी घेतली .चंद्राच्या आणि सूर्याच्या राशी असे २ गट पडले. सुर्याधीष्टीत राशी ह्या अधिक प्रखर आणि सूर्याच्या गुणाचा अधिक परिपोष झालेल्या राशी आहेत . चंद्राधीष्टीत राशी थोड्याश्या मवाळ अशी विभागणी झाली . चंद्र २७ नक्षत्रातून दुडूदुडू पळू लागला त्याला मोकळे रानच मिळाले . मग सूर्याने विचार केला मी सुद्धा असे काही केले पाहिजे कि माझ्यामुळे सगळ्यांचे अडेल. सूर्याची महत्वाची पावसाची 9 नक्षत्रे वजा केली तर बाकी शून्य उरेल. पावसाची नक्षत्रे नसतील तर हे जग चालू शकणार नाही . ह्या जगात उत्पत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्या नक्षत्रांमध्ये आहे ती सूर्याची नक्षत्रे आहेत . मृगापासून हस्ताची नक्षत्रे पावसाची आहेत त्यातून सूर्याचे भ्रमण झाले तर पाऊस पडेल आणि त्यातून सूर्याचे भ्रमण झाले नाही तर पाऊस पडणार नाही.सूर्याने ह्या 9 नक्षत्रावर आपला ताबा ठेवला .  कारण पाऊस नसेल तर जनजीवन फुलणार बहरणार नाही . मग त्याप्रमाणे वातावरण झाले , हवामान ऋतू झाले. सूर्याच्या ह्या नक्षत्रातून फिरण्याला महत्व आले आणि सगळ्या नक्षत्रातील ह्या 9 नक्षत्रांना महत्व आले. त्याच्याकडे डोळे लावून जग बघत असते. हि नक्षत्र कोरडे गेले तर प्यायला पाणी मिळणार नाही ,वनस्पती जगणार नाहीत अश्याप्रकारे सूर्याने आपल्या ताब्यात संपूर्ण चराचर सृष्टी घेतली . 

नक्षत्रांना स्वतःचे अस्तित्व आहे पण फलित कुणाप्रमाणे देणार तर ते ज्या ग्रहाचे स्वामी आहेत त्याप्रमाणेच .फलीताच्या दृष्टीने प्रत्येक घटक हा ग्रहांशी बांधल गेला आहे. नक्षत्रांना ग्रहांचे आधिपत्य दिले गेले . 

क्रमशः

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment